Return to Video

इ-सिगारेट्सच्या धूम्रपानाचे धोके जाणून घ्या.

  • 0:00 - 0:03
    पालकत्व सोपं होत जातं ना?
  • 0:03 - 0:06
    नुकतेच पालक झालेले लोक विचारतात.
  • 0:06 - 0:09
    मुलांच्या काळजीला ते अजून
    सरावलेले नसतात.
  • 0:09 - 0:11
    मी त्यांना सांगते, की
  • 0:12 - 0:13
    ते सोपं होत नाही, बदलत जातं.
  • 0:13 - 0:16
    मुलांबद्दल काळजी कायम वाटतच राहते.
  • 0:17 - 0:20
    मला आठवतं, माझ्या मुलाला
    लहानपणी अस्थमा होता,
  • 0:20 - 0:22
    तेव्हा मी रात्रभर अर्धवट जागी राहून
  • 0:22 - 0:24
    त्याचा श्वास ऐकत असायचे.
    मग तो टीनएजर झाला, तेव्हा
  • 0:24 - 0:26
    रात्री दार उघडल्याचा
    आवाज येऊन
  • 0:26 - 0:28
    तो सुखरूप घरी आला,
  • 0:28 - 0:30
    हे समजेपर्यंत जागी असायचे.
  • 0:31 - 0:33
    पालकत्व आलं, की मुलांची काळजी आलीच.
  • 0:34 - 0:38
    यापैकी पुष्कळशी काळजी
    साध्या गोष्टींबद्दल असते.
  • 0:38 - 0:41
    मुलं काय खाताहेत, कुठे गेली आहेत,
    कोणाबरोबर गेली आहेत, वगैरे.
  • 0:41 - 0:45
    पण आजकालच्या नव्या पद्धती आणि
    फॅड्सकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवं.
  • 0:46 - 0:51
    सध्या एक नवी क्रेझ आली आहे.
    ती आरोग्याला अपायकारक असेल,
  • 0:51 - 0:53
    याची जाणीव अजून आपल्याला झालेली नाही.
  • 0:53 - 0:56
    सध्या प्रसिद्ध असणारी ती गोष्ट
    म्हणजे व्हेपिंग.
  • 0:56 - 0:58
    म्हणजे इ-सिगारेट्स द्वारे इ-द्रवाची वाफ
  • 0:58 - 1:02
    करून ते गोड एरोसोल हुंगणे.
  • 1:03 - 1:06
    इ-सिगारेट्स, किंवा व्हेप्स आजकाल
  • 1:06 - 1:08
    चॉकलेटसारख्या भराभर विकल्या जाताहेत.
  • 1:08 - 1:11
    या वर्षी जगभरात इ-सिगारेट्सच्या विक्रीतून
  • 1:11 - 1:14
    २६ अब्ज डॉलर्सचा नफा अपेक्षित आहे.
  • 1:15 - 1:16
    पुढच्या सहा वर्षांत
  • 1:16 - 1:18
    हा आकडा दुप्पट होणार आहे.
  • 1:20 - 1:23
    व्हेपिंगच्या दुष्परिणामांविषयी
    काळजी व्यक्त केली जाते.
  • 1:23 - 1:26
    पण दुर्दैवाने त्यावर फारसे उपाय नाहीत.
  • 1:27 - 1:31
    इ-सिगारेट्स कोण वापरतं, हे पाहिल्यास
    या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येईल.
  • 1:32 - 1:34
    इ-सिगारेट्सचा वापर, निदान अमेरिकेत तरी,
  • 1:34 - 1:38
    तरुण मुलांमध्ये पुष्कळ वाढला आहे.
  • 1:38 - 1:39
    आपली मुलं. म्हणजे
  • 1:39 - 1:41
    आपल्या समाजाचा सर्वात दुर्बल घटक.
  • 1:42 - 1:46
    २०१२ ते २०१५ या काळात
  • 1:46 - 1:49
    हा वापर ९०० टक्क्यांनी वाढला.
  • 1:49 - 1:52
    अगदी अलिकडच्या अंदाजानुसार,
    अमेरिकेतल्या
  • 1:52 - 1:56
    माध्यमिक शाळांतल्या
    सुमारे ३.६ दशलक्ष मुलांनी
  • 1:56 - 1:58
    इ-सिगारेट वापरली आहे.
  • 2:00 - 2:02
    धूम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी
    शुद्ध स्वरूपातलं निकोटिन
  • 2:03 - 2:05
    उपलब्ध करून द्यावं, म्हणून
  • 2:05 - 2:07
    इ-सिगारेट्सची निर्मिती झाली.
  • 2:08 - 2:11
    अमेरिकेत, हे तंबाखूयुक्त उत्पादन
    अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA)
  • 2:11 - 2:13
    अखत्यारीत येतं.
  • 2:13 - 2:17
    पण ही साधनं
  • 2:17 - 2:19
    जितकी भराभर विकली जाताहेत, तितक्या वेगाने
  • 2:19 - 2:23
    त्यामागचं शास्त्र आणि कायदे
  • 2:23 - 2:25
    विकसित झालेले नाहीत.
  • 2:26 - 2:29
    सध्याच्या कायद्यानुसार ही साधनं
  • 2:29 - 2:32
    १८ वर्षांखालील व्यक्तीला
    विकण्यास मनाई आहे.
  • 2:32 - 2:35
    पण कायद्याला न जुमानता लहान वयातच
  • 2:35 - 2:38
    या साधनांचा वापर वाढतोच आहे.
  • 2:39 - 2:42
    मी जेव्हा पहिल्यांदा इ-सिगारेट पाहिली,
    तेव्हा ताबडतोब
  • 2:42 - 2:45
    माझ्या लक्षात आलं, की लहानगे
    हिच्या प्रेमात पडणार.
  • 2:45 - 2:48
    ही म्हणजे तंत्रज्ञानाची कांडी.
  • 2:48 - 2:51
    स्मार्टफोन पिढीसाठी अत्यंत अनुरूप.
  • 2:51 - 2:57
    छोटीशी, री चार्ज करता येणारी.
    वापरायला, बदल करायला सोपी, सुवासिक.
  • 2:57 - 3:01
    काही तर स्मार्टफोनद्वारे जोडल्या जातात,
    आणि किती व्हेपिंग केलं, ते दाखवतात.
  • 3:01 - 3:04
    मलाही त्यांची भुरळ पडली होती.
  • 3:05 - 3:10
    मी तरुणांमधल्या व्यसनांबद्दल बराच काळ
    संशोधन केलं असल्यामुळे
  • 3:10 - 3:15
    माझ्या लक्षात आलं, की ई धुम्रपान हे
    कुमारवयाच्या मानसिकतेत नेमकं बसतं.
  • 3:17 - 3:20
    या वयात मुलं आवेगासरशी कृती करतात.
    त्यांना नव्या गोष्टी करून पहायला आवडतं.
  • 3:21 - 3:24
    त्यांना स्वातंत्र्याची तहान असते,
    स्वतः काहीतरी निर्माण करावंसं वाटत असतं.
  • 3:25 - 3:28
    इ-सिगारेट्समुळे या दोन्ही गरजा भागतात.
  • 3:28 - 3:31
    व्हेपिंगमध्ये नवनिर्मिती करता येते,
  • 3:32 - 3:33
    तीही आपल्या आवडीनुसार.
  • 3:34 - 3:39
    १५,००० निरनिराळे सुवास आणि
    निकोटिनच्या वेगवेगळ्या प्रमाणांमधून
  • 3:39 - 3:41
    त्यांना हवं ते निवडता येतं.
  • 3:41 - 3:45
    स्वतःच्या आवडीप्रमाणे मिश्रण बनवता येतं.
  • 3:46 - 3:50
    या साधनाचं तापमान, विद्युतभार,
  • 3:50 - 3:53
    झुरक्याचं आकारमान आणि त्यातले घटक बदलून,
  • 3:53 - 3:55
    किती वाफ निर्माण होईल, ते ठरवता येतं.
  • 3:56 - 3:59
    ही साधनं वापरून धूम्रपानाचे धुराचे
    ढग पकडत राहणे खेळता येतं.
  • 4:00 - 4:03
    त्याला व्हेप ट्रिक्स असंही म्हणतात.
  • 4:03 - 4:04
    किंवा स्मोक ट्रिक्स.
  • 4:04 - 4:09
    यात धुरांचे मोठे ढग बनवतात, आणि
    त्यांना चित्रविचित्र आकार आणि नावं देतात.
  • 4:09 - 4:11
    वर्तुळं, ड्रॅगन्स, भुतं..
  • 4:11 - 4:15
    त्यांच्या स्पर्धा होतात,
  • 4:15 - 4:18
    बक्षिसंही दिली जातात.
  • 4:20 - 4:24
    सरळ घशात किती निकोटिन पोहोचतं,
    त्याचं प्रमाण बदलता येतं.
  • 4:24 - 4:27
    त्यासाठी द्रवाचं तापमान वाढवतात किंवा
  • 4:27 - 4:30
    ते तापलेल्या तारेवर सोडतात.
  • 4:31 - 4:34
    ही साधनं चरस व्हेपिंग साठी
    सुद्धा वापरतात.
  • 4:35 - 4:37
    यात कमी तपमान वापरल्यामुळे
  • 4:37 - 4:40
    चरस जळत नाही.
  • 4:40 - 4:42
    त्यामुळे गुपचूप ओढता येतो.
  • 4:42 - 4:45
    त्याचा वास येत नाही.
  • 4:46 - 4:49
    त्यामुळे स्वतःला हवं तसं
    व्हेपिंग करता येतं.
  • 4:49 - 4:53
    याच कारणामुळे तरुणांना ते इतकं आवडतं.
  • 4:55 - 4:58
    ई-सिगारेट्सचं तंत्रज्ञान अगदी सोपं आहे.
  • 4:58 - 5:04
    इ-द्रव ठेवण्यासाठी एक जागा,
    पॉड किंवा प्लग.
  • 5:04 - 5:09
    तार तापवण्यासाठी एक बॅटरी.
    तापलेल्या तारेमुळे इ-द्रवाची वाफ होते.
  • 5:09 - 5:10
    आणि एक माऊथपीस.
  • 5:10 - 5:13
    यातून ती ओढली जाते.
  • 5:14 - 5:20
    २०१७ मध्ये अशी ४६६ साधनं उपलब्ध होती.
  • 5:21 - 5:25
    त्यांचे विविध प्रकार आहेत.
    सिगारेट्स सारखी सिगालाईक्स,
  • 5:25 - 5:29
    पेन्स,
  • 5:29 - 5:33
    बदललेल्या स्वरूपातली मॉड्स.
  • 5:33 - 5:35
    ही सिगारेटसारखी दिसत नाहीत.
  • 5:35 - 5:38
    त्यांचे अनेक आकार, प्रकार आहेत.
  • 5:38 - 5:42
    त्यांना विविध जोडण्या असतात,
    आणि ती अनेक प्रकारे बदलली जाऊ शकतात.
  • 5:42 - 5:44
    क्लाउड चेसिंग साठी ती फार प्रसिद्ध आहेत.
  • 5:45 - 5:47
    सध्या नवीन उपलब्ध झालेली साधनं
  • 5:47 - 5:49
    म्हणजे पॉड्स.
  • 5:49 - 5:51
    यांत इ-द्रव पॉड मध्ये ठेवतात.
  • 5:52 - 5:54
    टीनएजर्स मध्ये ही अत्यंत लोकप्रिय आहेत.
  • 5:54 - 5:56
    ज्यूल हे यापैकी एक उदाहरण.
  • 5:56 - 5:59
    ही USB Device सारखी दिसतात.
  • 5:59 - 6:02
    आणि तशीच चार्ज करता येतात.
  • 6:03 - 6:06
    अनेक टीनएजर्सना ही इ-सिगारेट वाटत नाही.
  • 6:06 - 6:10
    त्यामुळे व्हेपिंग ऐवजी
    ज्यूलिंग असा शब्द प्रचलित झाला आहे.
  • 6:11 - 6:15
    ज्यूल लपवणं इतकं सोपं आहे, आणि
    त्यातून इतकी कमी वाफ निर्माण होते,
  • 6:15 - 6:17
    की मुलं वर्गातही ती वापरतात.
  • 6:17 - 6:21
    शार्पी पेन, कपडे, पुस्तकं
  • 6:21 - 6:22
    अशा वस्तूंमध्ये दडवतात.
  • 6:22 - 6:25
    अनेक टीनएजर्सना वाटतं,
    ही पाण्याची वाफ आहे,.
  • 6:25 - 6:27
    त्यापासून काही धोका नाही.
  • 6:27 - 6:30
    पण हे साफ खोटं आहे.
  • 6:30 - 6:32
    मुळात ती वाफ नसतेच.
  • 6:33 - 6:34
    ते एरोसोल असतं.
  • 6:34 - 6:37
    दोघांत पुष्कळ फरक आहे.
  • 6:37 - 6:42
    एरोसोलमध्ये अनेक सूक्ष्म द्रव आणि वायु
    कण तरंगत असतात.
  • 6:42 - 6:45
    इ-द्रवात जे काही असेल,
    त्यापासून ते तयार होतात.
  • 6:45 - 6:49
    प्रोपिलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन
  • 6:49 - 6:50
    हे द्रावक त्यात असू शकतात.
  • 6:51 - 6:54
    हे द्रावक तोंडाद्वारे खाण्यासाठी
  • 6:54 - 6:57
    सुरक्षित आहेत.
  • 6:57 - 7:02
    पण दीर्घकाळ झुरके ओढण्याबद्दल
    फारशी माहिती उपलब्ध नाही.
  • 7:03 - 7:05
    इ-द्रवात काही वेळा अल्कोहोल असू शकतं,
  • 7:05 - 7:07
    तेही मोठ्या प्रमाणात.
  • 7:07 - 7:11
    श्वासावाटे घेतलेलं अल्कोहोल
    मेंदूला घातक असतं.
  • 7:12 - 7:16
    इ-द्रवात १५,००० प्रकारचे सुवास असतात
    असं मी म्हणाले, त्याची उदाहरणं पहा.
  • 7:16 - 7:18
    काही नावं आकर्षक,
  • 7:18 - 7:23
    माहितीतली आहेत.
    स्किटल्स, फ्रूट लूप्स.
  • 7:23 - 7:28
    काही नावं नवलाईची आहेत.
    ड्रॅगन्स मिल्क, टायगर्स ब्लड.
  • 7:28 - 7:29
    युनिकॉर्न प्यूक.
  • 7:30 - 7:34
    यात धातूंचे अंश असू शकतात.
  • 7:34 - 7:36
    क्रोमियम, कॅडमियम, शिसे.
  • 7:37 - 7:40
    इ-द्रव तापवण्याच्या तारेत हे धातू असतात.
  • 7:40 - 7:43
    हे धातू आपल्या शरीरातल्या
    अतिमहत्त्वाच्या अवयवांसाठी घातक असतात.
  • 7:44 - 7:47
    तर, मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगते.
  • 7:47 - 7:50
    यात पाण्याची वाफ नसते.
  • 7:52 - 7:55
    इ-सिगारेट्सद्वारे टीनएजर्सच्या मेंदूचा
    निकोटिनशी संपर्क येतो.
  • 7:55 - 7:57
    हेदेखील काळजीचं कारण आहे.
  • 7:58 - 8:01
    अत्यंत कमी प्रमाणातलं निकोटिनसुद्धा
    त्यांच्या मेंदूवर परिणाम करून
  • 8:01 - 8:03
    त्यांना व्यसन लावू शकतं.
  • 8:03 - 8:06
    आपल्याला ठाऊक आहे, की
    ९०% व्यसनी लोक
  • 8:06 - 8:11
    धूम्रपानाची सुरुवात
    वयाच्या १८व्या वर्षाआधी करतात.
  • 8:11 - 8:16
    लवकर जडलेलं व्यसन जास्त पक्कं असतं.
    ते सोडणं जास्त कठीण असतं.
  • 8:16 - 8:20
    एका माजी FDA कमिशनरनी म्हटलंच आहे,
  • 8:20 - 8:23
    धूम्रपान हा एक बालरोग आहे.
  • 8:24 - 8:28
    इ-सिगारेट्समधलं निकोटिनचं प्रमाण मोठं आहे.
  • 8:28 - 8:31
    यापैकी अनेक साधनांमध्ये
  • 8:31 - 8:32
    सिगारेटच्या एका पॅकइतकं निकोटिन असतं.
  • 8:33 - 8:37
    हल्लीच्या पॉड्समधला निकोटिनचा क्षार
  • 8:37 - 8:40
    वापरायला जास्त सोपा आणि
    चवीला जास्त चांगला असतो.
  • 8:40 - 8:43
    त्याचं मेंदूतलं प्रमाण झट्कन वाढतं.
  • 8:44 - 8:48
    इ-सिगारेट्स नियमित वापरणाऱ्या टीनएजर्सनी,
    त्या उपलब्ध नसतील तेव्हा
  • 8:48 - 8:51
    आपल्याला तल्लफ येते असं नमूद केलं आहे.
  • 8:51 - 8:54
    व्यसन जडल्याची ही लक्षणं आहेत.
  • 8:55 - 9:00
    इ-सिगारेट्सचं व्यसन तर जडतंच,
  • 9:00 - 9:03
    शिवाय शरीरातल्या अनेक अवयवांवर
    त्यांचा विपरीत परिणाम होतो.
  • 9:03 - 9:06
    कोणतंही निकोटिन
    Nicotinic Acetylcholine Receptor
  • 9:06 - 9:10
    नावाच्या अभिग्राहकांशी जोडलं जातं.
  • 9:10 - 9:14
    हे अभिग्राहक शरीरातल्या सर्व अवयवांमध्ये
  • 9:14 - 9:15
    महत्त्वाचं कार्य करतात.
  • 9:15 - 9:20
    निकोटिनच्या सततच्या संसर्गामुळे
  • 9:20 - 9:22
    ही यंत्रणा बिघडते.
    उदाहरणार्थ,
  • 9:22 - 9:26
    रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते.
  • 9:26 - 9:30
    तणावाच्या परिस्थितीत हृदय
    योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही.
  • 9:31 - 9:35
    व्यसनाबरोबरच हे विपरीत परिणामही
  • 9:35 - 9:37
    टीनएजर्सच्या मेंदूला घातक असतात.
  • 9:38 - 9:42
    प्राण्यांवरच्या संशोधनानुसार निकोटिन हे
    चेतासंस्थेसाठी विषारी मानलं जातं.
  • 9:42 - 9:45
    त्यामुळे शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि
    एकाग्रता कमी होते,
  • 9:45 - 9:48
    आणि चंचलतेची लक्षणं वाढतात.
  • 9:48 - 9:51
    तंबाखू वापरणाऱ्यांना
    दारू व चरस यांचंही व्यसन जडतं.
  • 9:51 - 9:52
    तरुणपणी किंवा प्रौढपणी त्यांना
  • 9:52 - 9:57
    नैराश्य किंवा चिंताविकार जडतो.
  • 9:59 - 10:03
    म्हणजेच इ-सिगारेट्स मधलं निकोटिन
  • 10:03 - 10:06
    त्यांना या इतर व्यसनांच्या
    आणि विकारांच्या मार्गावर धाडतं.
  • 10:07 - 10:12
    प्राण्यांमध्ये निकोटिनमुळे
    जनुकीय बदल होतात.
  • 10:12 - 10:14
    ते आनुवंशिक रीतीने
    पुढच्या पिढीतही संक्रमित होतात.
  • 10:14 - 10:17
    उदाहरणार्थ, अस्थमा या विकाराशी
    संबंधित जनुके.
  • 10:17 - 10:21
    म्हणजेच, निकोटिन वापरणारे टीनएजर्स
    केवळ स्वतःलाच नव्हे,
  • 10:21 - 10:24
    तर त्यांच्या पुढच्या पिढयांनासुद्धा
    अपाय करतात.
  • 10:25 - 10:28
    इ-सिगारेट्स अस्तित्वात आल्यामुळे
  • 10:28 - 10:32
    एका अख्ख्या तरुण पिढीला
    निकोटिनचं व्यसन लागलं आहे.
  • 10:33 - 10:36
    ही साधनं सहज उपलब्ध झाल्यामुळे
  • 10:36 - 10:40
    चरस वगैरे इतर अमली पदार्थ
    वापरून पाहण्याचं प्रमाणही वाढलं असेल.
  • 10:41 - 10:46
    धुम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी
    शुद्ध स्वरूपातलं निकोटिन वापरण्याचा
  • 10:46 - 10:49
    उद्देश बाळगणं योग्य आहे.
    पण या साधनांमुळे
  • 10:49 - 10:53
    व्यसन सुटायला खरीच मदत होते का,
    ते अजून कळलेलं नाही.
  • 10:53 - 10:57
    तसेच त्यांच्या दीर्घकाळ वापराचे परिणामही
    अजून कळलेले नाहीत.
  • 10:58 - 11:03
    ठाऊक आहे ते इतकंच, की पुष्कळ तरुण मुलं
    ही साधनं वापरताहेत.
  • 11:03 - 11:07
    हे प्रमाण इतकं प्रचंड आहे, की
    अमेरिकेचे FDA कमिशनर म्हणतात,
  • 11:08 - 11:10
    "इ-सिगारेट्सची साथ पसरली आहे."
  • 11:11 - 11:16
    धूम्रपानाचा भयंकर सामाजिक प्रश्न
    सोडवताना आपण
  • 11:16 - 11:18
    दुसरा एक महाभयंकर प्रश्न
    निर्माण केला आहे.
  • 11:19 - 11:22
    पूर्वी धूम्रपानाविषयी अज्ञान होतं.
  • 11:22 - 11:26
    त्यामुळे ते साथीसारखं पसरलं
    आणि अनेक विकार निर्माण झाले.
  • 11:27 - 11:30
    आता इ-सिगारेट्सच्या बाबतीत
    तीच चूक पुन्हा व्हायला नको.
  • 11:31 - 11:34
    म्हणून ताबडतोब पावलं उचलली पाहिजेत.
  • 11:34 - 11:39
    मुलांच्या हातात ही साधनं पडू नयेत
    असे निर्बंध घातले गेले पाहिजेत.
  • 11:40 - 11:46
    धूम्रपान सोडण्यासाठी १५,००० सुवास लागतात?
    तेही मुलांना आवडतील असे?
  • 11:47 - 11:50
    त्यासाठी इतक्या प्रकारची साधनं लागतात?
  • 11:50 - 11:54
    सहज लपवता येणारी, वापरायला सोपी
    अशी साधनं उपलब्ध असणं
  • 11:54 - 11:56
    हे चांगलं आहे का?
  • 11:57 - 12:02
    लवकरच FDA असे निर्बंध घालणार आहे.
  • 12:02 - 12:06
    इ-द्रव वापरणारी साधनं
  • 12:06 - 12:09
    दुकानांतून सर्रास विकणं,
  • 12:09 - 12:11
    किंवा ती आंतरजालावरून अल्पवयीनांना विकणं
  • 12:11 - 12:14
    याबद्दल कडक निर्बंध लागू होणार आहेत.
  • 12:15 - 12:19
    तरुण पिढीतलं हे व्यसन रोखायला
    इतकं पुरेसं आहे का?
  • 12:20 - 12:23
    अशा महत्त्वाच्या प्रश्नांची
    उत्तरं शोधायला हवीत.
  • 12:25 - 12:28
    जनजागृतीची जोरदार मोहीम
    ताबडतोब सुरु करायला हवी.
  • 12:29 - 12:31
    तरुण पिढीला आणि पालकांना
    समजलं पाहिजे, की
  • 12:31 - 12:35
    विषारी घटकांचं प्रमाण
    सिगारेट्सपेक्षा कमी असलं, तरी
  • 12:35 - 12:37
    इ-सिगारेट्स पूर्णपणे निर्धोक नाहीत.
  • 12:38 - 12:41
    या साधनांतून निर्माण झालेली रसायनं
  • 12:41 - 12:44
    शरीरावर घातक परिणाम घडवून,
    त्याद्वारे भविष्यकाळात
  • 12:44 - 12:48
    अज्ञात आरोग्यविषयक समस्यांना
    बळी पडण्याची शक्यता वाढवतात.
  • 12:50 - 12:51
    मागे मी जेव्हा म्हटलं, की
  • 12:51 - 12:54
    इ -सिगारेट्स या स्मार्टफोन पिढीसाठीच
    बनवल्या गेल्या आहेत,
  • 12:54 - 12:55
    ती काही थट्टा नव्हती.
  • 12:56 - 12:59
    या तंत्रज्ञान युगात
  • 12:59 - 13:03
    एखादं नवीन साधन, नवीन तंत्रज्ञान
    लोकांचं लक्ष वेधून घेतं. का?
  • 13:03 - 13:07
    तर केवळ ते नवं आहे, म्हणून.
  • 13:07 - 13:11
    पुढल्या काही वर्षांत, किंवा
    आपल्या उर्वरित आयुष्यात,
  • 13:11 - 13:14
    नवं तंत्रज्ञान बाजारात येण्याचं प्रमाण
    वाढत जाणार आहे.
  • 13:14 - 13:17
    कदाचित त्यातल्या धोक्यांची सूचना
    ठळकपणे मिळणार नाही.
  • 13:17 - 13:19
    कारण ते दिसायला तितकं घातक नसेल, किंवा
  • 13:19 - 13:21
    आरोग्याशी त्याचा प्रत्यक्ष संबंध नसेल.
  • 13:22 - 13:24
    उदाहरणार्थ, नव्या साधनांमुळे
  • 13:24 - 13:27
    दीर्घकाळ झोपेशिवाय राहणं,
  • 13:27 - 13:29
    वजन घटवणं
  • 13:29 - 13:30
    --हे माझं वैयक्तिक ध्येय--
  • 13:30 - 13:32
    अशी ध्येयं साध्य करता येतील.
  • 13:33 - 13:36
    ही ध्येयं ग्राहकांना आकर्षक वाटतील.
  • 13:37 - 13:42
    पण यातली अनेक साधनं आरोग्याला
    हानिकारक असतील.
  • 13:43 - 13:47
    आपलं आणि आपल्या मुलांचं आरोग्य
    सुरक्षित राखायचं असेल, तर
  • 13:47 - 13:49
    नवीन तंत्रज्ञान कौतुकाने वापरण्याची
    आपली सवय
  • 13:49 - 13:53
    आपल्याला मोडावी लागेल.
  • 13:53 - 13:57
    त्याऐवजी त्याच्याकडे
    वैद्यकशास्त्राच्या चिकित्सक दृष्टीने
  • 13:57 - 13:59
    पाहावं लागेल.
  • 13:59 - 14:01
    कारण..
  • 14:01 - 14:05
    आपलं, आपल्या मुलांचं, आणि आपल्या
    पुढल्या पिढ्यांचं आरोग्य फार मौल्यवान आहे.
  • 14:05 - 14:09
    ते आपण धुरामधून किंवा एरोसोलमधून
  • 14:09 - 14:11
    उडून जाऊ देता कामा नये.
  • 14:11 - 14:13
    धन्यवाद.
  • 14:13 - 14:15
    (टाळ्या)
Title:
इ-सिगारेट्सच्या धूम्रपानाचे धोके जाणून घ्या.
Speaker:
सुचित्रा कृष्णन-सरीन
Description:

गेल्या दशकात व्हेप्स आणि इ-सिगारेट्सची लोकप्रियता शिगेला पोहोचली. २०११ ते २०१५ या काळात तरुणाईचा, खासकरून माध्यमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांमधला इ-सिगारेट्सचा वापर ९०० टक्क्यांनी वाढला. व्हेपिंग करताना श्वासाबरोबर नेमकं काय शोषलं जातं, ते समजावून सांगताहेत जैविक स्वभावशास्त्रज्ञ सुचित्रा कृष्णन-सरीन. (सूचना: पाण्याची वाफ नक्कीच नव्हे.) इ-सिगारेट्स विकण्याकरता किती भयानक पद्धतीने मुलांना लक्ष्य बनवलं जातं, यावरदेखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्या म्हणतात, "आपलं, आपल्या मुलांचं, आणि आपल्या पुढल्या पिढ्यांचं आरोग्य फार मौल्यवान आहे. ते आपण धुरामधून किंवा एरोसोलमधून उडून जाऊ देता कामा नये."

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
14:29

Marathi subtitles

Revisions