1 00:00:00,000 --> 00:00:02,769 पालकत्व सोपं होत जातं ना? 2 00:00:03,307 --> 00:00:06,270 नुकतेच पालक झालेले लोक विचारतात. 3 00:00:06,294 --> 00:00:08,981 मुलांच्या काळजीला ते अजून सरावलेले नसतात. 4 00:00:09,435 --> 00:00:10,954 मी त्यांना सांगते, की 5 00:00:11,582 --> 00:00:13,152 ते सोपं होत नाही, बदलत जातं. 6 00:00:13,176 --> 00:00:16,285 मुलांबद्दल काळजी कायम वाटतच राहते. 7 00:00:17,275 --> 00:00:20,089 मला आठवतं, माझ्या मुलाला लहानपणी अस्थमा होता, 8 00:00:20,113 --> 00:00:21,868 तेव्हा मी रात्रभर अर्धवट जागी राहून 9 00:00:21,892 --> 00:00:24,474 त्याचा श्वास ऐकत असायचे. मग तो टीनएजर झाला, तेव्हा 10 00:00:24,498 --> 00:00:25,895 रात्री दार उघडल्याचा आवाज येऊन 11 00:00:25,919 --> 00:00:28,071 तो सुखरूप घरी आला, 12 00:00:28,095 --> 00:00:29,896 हे समजेपर्यंत जागी असायचे. 13 00:00:31,037 --> 00:00:33,454 पालकत्व आलं, की मुलांची काळजी आलीच. 14 00:00:34,318 --> 00:00:37,662 यापैकी पुष्कळशी काळजी साध्या गोष्टींबद्दल असते. 15 00:00:37,686 --> 00:00:41,469 मुलं काय खाताहेत, कुठे गेली आहेत, कोणाबरोबर गेली आहेत, वगैरे. 16 00:00:41,493 --> 00:00:45,345 पण आजकालच्या नव्या पद्धती आणि फॅड्सकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवं. 17 00:00:46,470 --> 00:00:50,748 सध्या एक नवी क्रेझ आली आहे. ती आरोग्याला अपायकारक असेल, 18 00:00:50,772 --> 00:00:52,859 याची जाणीव अजून आपल्याला झालेली नाही. 19 00:00:52,883 --> 00:00:56,002 सध्या प्रसिद्ध असणारी ती गोष्ट म्हणजे व्हेपिंग. 20 00:00:56,026 --> 00:00:58,127 म्हणजे इ-सिगारेट्स द्वारे इ-द्रवाची वाफ 21 00:00:58,151 --> 00:01:01,519 करून ते गोड एरोसोल हुंगणे. 22 00:01:02,835 --> 00:01:05,634 इ-सिगारेट्स, किंवा व्हेप्स आजकाल 23 00:01:05,658 --> 00:01:07,866 चॉकलेटसारख्या भराभर विकल्या जाताहेत. 24 00:01:08,375 --> 00:01:11,082 या वर्षी जगभरात इ-सिगारेट्सच्या विक्रीतून 25 00:01:11,106 --> 00:01:14,276 २६ अब्ज डॉलर्सचा नफा अपेक्षित आहे. 26 00:01:14,639 --> 00:01:16,232 पुढच्या सहा वर्षांत 27 00:01:16,256 --> 00:01:18,255 हा आकडा दुप्पट होणार आहे. 28 00:01:19,681 --> 00:01:23,067 व्हेपिंगच्या दुष्परिणामांविषयी काळजी व्यक्त केली जाते. 29 00:01:23,091 --> 00:01:25,914 पण दुर्दैवाने त्यावर फारसे उपाय नाहीत. 30 00:01:26,625 --> 00:01:30,836 इ-सिगारेट्स कोण वापरतं, हे पाहिल्यास या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येईल. 31 00:01:31,558 --> 00:01:34,007 इ-सिगारेट्सचा वापर, निदान अमेरिकेत तरी, 32 00:01:34,031 --> 00:01:37,703 तरुण मुलांमध्ये पुष्कळ वाढला आहे. 33 00:01:37,727 --> 00:01:38,943 आपली मुलं. म्हणजे 34 00:01:38,967 --> 00:01:40,883 आपल्या समाजाचा सर्वात दुर्बल घटक. 35 00:01:41,750 --> 00:01:46,376 २०१२ ते २०१५ या काळात 36 00:01:46,400 --> 00:01:48,565 हा वापर ९०० टक्क्यांनी वाढला. 37 00:01:49,415 --> 00:01:51,546 अगदी अलिकडच्या अंदाजानुसार, अमेरिकेतल्या 38 00:01:51,570 --> 00:01:56,063 माध्यमिक शाळांतल्या सुमारे ३.६ दशलक्ष मुलांनी 39 00:01:56,087 --> 00:01:58,318 इ-सिगारेट वापरली आहे. 40 00:01:59,635 --> 00:02:02,486 धूम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी शुद्ध स्वरूपातलं निकोटिन 41 00:02:02,510 --> 00:02:04,728 उपलब्ध करून द्यावं, म्हणून 42 00:02:04,752 --> 00:02:06,669 इ-सिगारेट्सची निर्मिती झाली. 43 00:02:07,520 --> 00:02:11,421 अमेरिकेत, हे तंबाखूयुक्त उत्पादन अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) 44 00:02:11,445 --> 00:02:13,163 अखत्यारीत येतं. 45 00:02:13,187 --> 00:02:16,570 पण ही साधनं 46 00:02:16,594 --> 00:02:18,948 जितकी भराभर विकली जाताहेत, तितक्या वेगाने 47 00:02:18,972 --> 00:02:23,373 त्यामागचं शास्त्र आणि कायदे 48 00:02:23,397 --> 00:02:24,606 विकसित झालेले नाहीत. 49 00:02:25,586 --> 00:02:28,927 सध्याच्या कायद्यानुसार ही साधनं 50 00:02:28,951 --> 00:02:31,645 १८ वर्षांखालील व्यक्तीला विकण्यास मनाई आहे. 51 00:02:31,669 --> 00:02:34,553 पण कायद्याला न जुमानता लहान वयातच 52 00:02:34,577 --> 00:02:37,816 या साधनांचा वापर वाढतोच आहे. 53 00:02:39,052 --> 00:02:42,174 मी जेव्हा पहिल्यांदा इ-सिगारेट पाहिली, तेव्हा ताबडतोब 54 00:02:42,198 --> 00:02:44,763 माझ्या लक्षात आलं, की लहानगे हिच्या प्रेमात पडणार. 55 00:02:45,335 --> 00:02:48,154 ही म्हणजे तंत्रज्ञानाची कांडी. 56 00:02:48,178 --> 00:02:51,245 स्मार्टफोन पिढीसाठी अत्यंत अनुरूप. 57 00:02:51,269 --> 00:02:57,391 छोटीशी, री चार्ज करता येणारी. वापरायला, बदल करायला सोपी, सुवासिक. 58 00:02:57,415 --> 00:03:01,190 काही तर स्मार्टफोनद्वारे जोडल्या जातात, आणि किती व्हेपिंग केलं, ते दाखवतात. 59 00:03:01,214 --> 00:03:04,458 मलाही त्यांची भुरळ पडली होती. 60 00:03:05,429 --> 00:03:09,978 मी तरुणांमधल्या व्यसनांबद्दल बराच काळ संशोधन केलं असल्यामुळे 61 00:03:10,002 --> 00:03:15,389 माझ्या लक्षात आलं, की ई धुम्रपान हे कुमारवयाच्या मानसिकतेत नेमकं बसतं. 62 00:03:16,622 --> 00:03:20,208 या वयात मुलं आवेगासरशी कृती करतात. त्यांना नव्या गोष्टी करून पहायला आवडतं. 63 00:03:20,589 --> 00:03:24,434 त्यांना स्वातंत्र्याची तहान असते, स्वतः काहीतरी निर्माण करावंसं वाटत असतं. 64 00:03:25,086 --> 00:03:27,666 इ-सिगारेट्समुळे या दोन्ही गरजा भागतात. 65 00:03:27,690 --> 00:03:31,490 व्हेपिंगमध्ये नवनिर्मिती करता येते, 66 00:03:31,514 --> 00:03:32,950 तीही आपल्या आवडीनुसार. 67 00:03:33,624 --> 00:03:38,522 १५,००० निरनिराळे सुवास आणि निकोटिनच्या वेगवेगळ्या प्रमाणांमधून 68 00:03:38,546 --> 00:03:40,799 त्यांना हवं ते निवडता येतं. 69 00:03:40,823 --> 00:03:45,384 स्वतःच्या आवडीप्रमाणे मिश्रण बनवता येतं. 70 00:03:46,280 --> 00:03:49,856 या साधनाचं तापमान, विद्युतभार, 71 00:03:49,880 --> 00:03:52,843 झुरक्याचं आकारमान आणि त्यातले घटक बदलून, 72 00:03:52,867 --> 00:03:55,140 किती वाफ निर्माण होईल, ते ठरवता येतं. 73 00:03:56,410 --> 00:03:59,284 ही साधनं वापरून धूम्रपानाचे धुराचे ढग पकडत राहणे खेळता येतं. 74 00:04:00,317 --> 00:04:03,145 त्याला व्हेप ट्रिक्स असंही म्हणतात. 75 00:04:03,169 --> 00:04:04,455 किंवा स्मोक ट्रिक्स. 76 00:04:04,479 --> 00:04:08,599 यात धुरांचे मोठे ढग बनवतात, आणि त्यांना चित्रविचित्र आकार आणि नावं देतात. 77 00:04:08,623 --> 00:04:11,438 वर्तुळं, ड्रॅगन्स, भुतं.. 78 00:04:11,462 --> 00:04:14,804 त्यांच्या स्पर्धा होतात, 79 00:04:14,828 --> 00:04:18,451 बक्षिसंही दिली जातात. 80 00:04:19,884 --> 00:04:23,665 सरळ घशात किती निकोटिन पोहोचतं, त्याचं प्रमाण बदलता येतं. 81 00:04:23,689 --> 00:04:27,150 त्यासाठी द्रवाचं तापमान वाढवतात किंवा 82 00:04:27,174 --> 00:04:30,216 ते तापलेल्या तारेवर सोडतात. 83 00:04:31,423 --> 00:04:34,282 ही साधनं चरस व्हेपिंग साठी सुद्धा वापरतात. 84 00:04:34,941 --> 00:04:37,308 यात कमी तपमान वापरल्यामुळे 85 00:04:37,332 --> 00:04:40,353 चरस जळत नाही. 86 00:04:40,377 --> 00:04:42,182 त्यामुळे गुपचूप ओढता येतो. 87 00:04:42,206 --> 00:04:44,797 त्याचा वास येत नाही. 88 00:04:45,577 --> 00:04:48,804 त्यामुळे स्वतःला हवं तसं व्हेपिंग करता येतं. 89 00:04:48,828 --> 00:04:53,013 याच कारणामुळे तरुणांना ते इतकं आवडतं. 90 00:04:54,723 --> 00:04:57,710 ई-सिगारेट्सचं तंत्रज्ञान अगदी सोपं आहे. 91 00:04:58,388 --> 00:05:04,266 इ-द्रव ठेवण्यासाठी एक जागा, पॉड किंवा प्लग. 92 00:05:04,290 --> 00:05:08,823 तार तापवण्यासाठी एक बॅटरी. तापलेल्या तारेमुळे इ-द्रवाची वाफ होते. 93 00:05:08,847 --> 00:05:10,341 आणि एक माऊथपीस. 94 00:05:10,365 --> 00:05:12,936 यातून ती ओढली जाते. 95 00:05:13,624 --> 00:05:19,654 २०१७ मध्ये अशी ४६६ साधनं उपलब्ध होती. 96 00:05:20,594 --> 00:05:25,173 त्यांचे विविध प्रकार आहेत. सिगारेट्स सारखी सिगालाईक्स, 97 00:05:25,197 --> 00:05:28,868 पेन्स, 98 00:05:28,892 --> 00:05:32,820 बदललेल्या स्वरूपातली मॉड्स. 99 00:05:32,844 --> 00:05:35,300 ही सिगारेटसारखी दिसत नाहीत. 100 00:05:35,324 --> 00:05:38,462 त्यांचे अनेक आकार, प्रकार आहेत. 101 00:05:38,486 --> 00:05:41,790 त्यांना विविध जोडण्या असतात, आणि ती अनेक प्रकारे बदलली जाऊ शकतात. 102 00:05:41,814 --> 00:05:43,904 क्लाउड चेसिंग साठी ती फार प्रसिद्ध आहेत. 103 00:05:44,772 --> 00:05:47,157 सध्या नवीन उपलब्ध झालेली साधनं 104 00:05:47,181 --> 00:05:48,715 म्हणजे पॉड्स. 105 00:05:48,739 --> 00:05:51,126 यांत इ-द्रव पॉड मध्ये ठेवतात. 106 00:05:51,713 --> 00:05:54,015 टीनएजर्स मध्ये ही अत्यंत लोकप्रिय आहेत. 107 00:05:54,039 --> 00:05:56,389 ज्यूल हे यापैकी एक उदाहरण. 108 00:05:56,413 --> 00:05:59,016 ही USB Device सारखी दिसतात. 109 00:05:59,040 --> 00:06:02,362 आणि तशीच चार्ज करता येतात. 110 00:06:03,142 --> 00:06:05,809 अनेक टीनएजर्सना ही इ-सिगारेट वाटत नाही. 111 00:06:05,833 --> 00:06:10,042 त्यामुळे व्हेपिंग ऐवजी ज्यूलिंग असा शब्द प्रचलित झाला आहे. 112 00:06:10,897 --> 00:06:14,985 ज्यूल लपवणं इतकं सोपं आहे, आणि त्यातून इतकी कमी वाफ निर्माण होते, 113 00:06:15,009 --> 00:06:17,171 की मुलं वर्गातही ती वापरतात. 114 00:06:17,195 --> 00:06:20,874 शार्पी पेन, कपडे, पुस्तकं 115 00:06:20,898 --> 00:06:22,048 अशा वस्तूंमध्ये दडवतात. 116 00:06:22,452 --> 00:06:25,473 अनेक टीनएजर्सना वाटतं, ही पाण्याची वाफ आहे,. 117 00:06:25,497 --> 00:06:27,303 त्यापासून काही धोका नाही. 118 00:06:27,327 --> 00:06:29,698 पण हे साफ खोटं आहे. 119 00:06:30,285 --> 00:06:32,479 मुळात ती वाफ नसतेच. 120 00:06:32,503 --> 00:06:33,746 ते एरोसोल असतं. 121 00:06:33,770 --> 00:06:36,525 दोघांत पुष्कळ फरक आहे. 122 00:06:37,237 --> 00:06:41,995 एरोसोलमध्ये अनेक सूक्ष्म द्रव आणि वायु कण तरंगत असतात. 123 00:06:42,019 --> 00:06:44,650 इ-द्रवात जे काही असेल, त्यापासून ते तयार होतात. 124 00:06:45,338 --> 00:06:48,670 प्रोपिलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन 125 00:06:48,694 --> 00:06:50,382 हे द्रावक त्यात असू शकतात. 126 00:06:50,883 --> 00:06:53,990 हे द्रावक तोंडाद्वारे खाण्यासाठी 127 00:06:54,014 --> 00:06:56,828 सुरक्षित आहेत. 128 00:06:56,852 --> 00:07:01,678 पण दीर्घकाळ झुरके ओढण्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. 129 00:07:02,918 --> 00:07:04,922 इ-द्रवात काही वेळा अल्कोहोल असू शकतं, 130 00:07:04,946 --> 00:07:06,689 तेही मोठ्या प्रमाणात. 131 00:07:06,713 --> 00:07:10,552 श्वासावाटे घेतलेलं अल्कोहोल मेंदूला घातक असतं. 132 00:07:11,957 --> 00:07:16,178 इ-द्रवात १५,००० प्रकारचे सुवास असतात असं मी म्हणाले, त्याची उदाहरणं पहा. 133 00:07:16,202 --> 00:07:17,614 काही नावं आकर्षक, 134 00:07:18,440 --> 00:07:23,115 माहितीतली आहेत. स्किटल्स, फ्रूट लूप्स. 135 00:07:23,139 --> 00:07:27,585 काही नावं नवलाईची आहेत. ड्रॅगन्स मिल्क, टायगर्स ब्लड. 136 00:07:27,609 --> 00:07:29,107 युनिकॉर्न प्यूक. 137 00:07:29,522 --> 00:07:34,010 यात धातूंचे अंश असू शकतात. 138 00:07:34,034 --> 00:07:36,085 क्रोमियम, कॅडमियम, शिसे. 139 00:07:36,521 --> 00:07:39,887 इ-द्रव तापवण्याच्या तारेत हे धातू असतात. 140 00:07:39,911 --> 00:07:43,445 हे धातू आपल्या शरीरातल्या अतिमहत्त्वाच्या अवयवांसाठी घातक असतात. 141 00:07:43,973 --> 00:07:46,589 तर, मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगते. 142 00:07:46,613 --> 00:07:49,666 यात पाण्याची वाफ नसते. 143 00:07:52,009 --> 00:07:55,427 इ-सिगारेट्सद्वारे टीनएजर्सच्या मेंदूचा निकोटिनशी संपर्क येतो. 144 00:07:55,451 --> 00:07:56,889 हेदेखील काळजीचं कारण आहे. 145 00:07:57,833 --> 00:08:00,971 अत्यंत कमी प्रमाणातलं निकोटिनसुद्धा त्यांच्या मेंदूवर परिणाम करून 146 00:08:00,995 --> 00:08:02,698 त्यांना व्यसन लावू शकतं. 147 00:08:03,174 --> 00:08:05,891 आपल्याला ठाऊक आहे, की ९०% व्यसनी लोक 148 00:08:05,915 --> 00:08:10,637 धूम्रपानाची सुरुवात वयाच्या १८व्या वर्षाआधी करतात. 149 00:08:11,256 --> 00:08:15,547 लवकर जडलेलं व्यसन जास्त पक्कं असतं. ते सोडणं जास्त कठीण असतं. 150 00:08:16,269 --> 00:08:20,274 एका माजी FDA कमिशनरनी म्हटलंच आहे, 151 00:08:20,298 --> 00:08:23,166 धूम्रपान हा एक बालरोग आहे. 152 00:08:24,435 --> 00:08:27,531 इ-सिगारेट्समधलं निकोटिनचं प्रमाण मोठं आहे. 153 00:08:28,043 --> 00:08:30,514 यापैकी अनेक साधनांमध्ये 154 00:08:30,538 --> 00:08:32,383 सिगारेटच्या एका पॅकइतकं निकोटिन असतं. 155 00:08:33,165 --> 00:08:36,894 हल्लीच्या पॉड्समधला निकोटिनचा क्षार 156 00:08:36,918 --> 00:08:39,873 वापरायला जास्त सोपा आणि चवीला जास्त चांगला असतो. 157 00:08:39,897 --> 00:08:43,174 त्याचं मेंदूतलं प्रमाण झट्कन वाढतं. 158 00:08:44,487 --> 00:08:48,294 इ-सिगारेट्स नियमित वापरणाऱ्या टीनएजर्सनी, त्या उपलब्ध नसतील तेव्हा 159 00:08:48,318 --> 00:08:51,120 आपल्याला तल्लफ येते असं नमूद केलं आहे. 160 00:08:51,144 --> 00:08:53,829 व्यसन जडल्याची ही लक्षणं आहेत. 161 00:08:55,087 --> 00:08:59,935 इ-सिगारेट्सचं व्यसन तर जडतंच, 162 00:08:59,959 --> 00:09:02,927 शिवाय शरीरातल्या अनेक अवयवांवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. 163 00:09:03,340 --> 00:09:05,832 कोणतंही निकोटिन Nicotinic Acetylcholine Receptor 164 00:09:05,856 --> 00:09:09,909 नावाच्या अभिग्राहकांशी जोडलं जातं. 165 00:09:09,933 --> 00:09:13,756 हे अभिग्राहक शरीरातल्या सर्व अवयवांमध्ये 166 00:09:13,780 --> 00:09:15,063 महत्त्वाचं कार्य करतात. 167 00:09:15,415 --> 00:09:19,547 निकोटिनच्या सततच्या संसर्गामुळे 168 00:09:20,016 --> 00:09:21,764 ही यंत्रणा बिघडते. उदाहरणार्थ, 169 00:09:21,788 --> 00:09:25,653 रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. 170 00:09:25,677 --> 00:09:29,983 तणावाच्या परिस्थितीत हृदय योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही. 171 00:09:31,221 --> 00:09:34,938 व्यसनाबरोबरच हे विपरीत परिणामही 172 00:09:34,962 --> 00:09:37,105 टीनएजर्सच्या मेंदूला घातक असतात. 173 00:09:37,605 --> 00:09:42,207 प्राण्यांवरच्या संशोधनानुसार निकोटिन हे चेतासंस्थेसाठी विषारी मानलं जातं. 174 00:09:42,231 --> 00:09:45,471 त्यामुळे शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते, 175 00:09:45,495 --> 00:09:47,927 आणि चंचलतेची लक्षणं वाढतात. 176 00:09:47,951 --> 00:09:50,852 तंबाखू वापरणाऱ्यांना दारू व चरस यांचंही व्यसन जडतं. 177 00:09:50,876 --> 00:09:52,396 तरुणपणी किंवा प्रौढपणी त्यांना 178 00:09:52,420 --> 00:09:57,179 नैराश्य किंवा चिंताविकार जडतो. 179 00:09:58,648 --> 00:10:02,912 म्हणजेच इ-सिगारेट्स मधलं निकोटिन 180 00:10:02,936 --> 00:10:06,416 त्यांना या इतर व्यसनांच्या आणि विकारांच्या मार्गावर धाडतं. 181 00:10:07,210 --> 00:10:11,611 प्राण्यांमध्ये निकोटिनमुळे जनुकीय बदल होतात. 182 00:10:11,635 --> 00:10:14,043 ते आनुवंशिक रीतीने पुढच्या पिढीतही संक्रमित होतात. 183 00:10:14,067 --> 00:10:16,667 उदाहरणार्थ, अस्थमा या विकाराशी संबंधित जनुके. 184 00:10:17,385 --> 00:10:21,011 म्हणजेच, निकोटिन वापरणारे टीनएजर्स केवळ स्वतःलाच नव्हे, 185 00:10:21,035 --> 00:10:23,800 तर त्यांच्या पुढच्या पिढयांनासुद्धा अपाय करतात. 186 00:10:25,141 --> 00:10:27,747 इ-सिगारेट्स अस्तित्वात आल्यामुळे 187 00:10:27,771 --> 00:10:31,721 एका अख्ख्या तरुण पिढीला निकोटिनचं व्यसन लागलं आहे. 188 00:10:32,861 --> 00:10:36,255 ही साधनं सहज उपलब्ध झाल्यामुळे 189 00:10:36,279 --> 00:10:40,133 चरस वगैरे इतर अमली पदार्थ वापरून पाहण्याचं प्रमाणही वाढलं असेल. 190 00:10:41,308 --> 00:10:45,917 धुम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी शुद्ध स्वरूपातलं निकोटिन वापरण्याचा 191 00:10:45,941 --> 00:10:49,341 उद्देश बाळगणं योग्य आहे. पण या साधनांमुळे 192 00:10:49,365 --> 00:10:53,226 व्यसन सुटायला खरीच मदत होते का, ते अजून कळलेलं नाही. 193 00:10:53,250 --> 00:10:56,959 तसेच त्यांच्या दीर्घकाळ वापराचे परिणामही अजून कळलेले नाहीत. 194 00:10:58,190 --> 00:11:03,132 ठाऊक आहे ते इतकंच, की पुष्कळ तरुण मुलं ही साधनं वापरताहेत. 195 00:11:03,489 --> 00:11:07,493 हे प्रमाण इतकं प्रचंड आहे, की अमेरिकेचे FDA कमिशनर म्हणतात, 196 00:11:07,517 --> 00:11:09,934 "इ-सिगारेट्सची साथ पसरली आहे." 197 00:11:11,280 --> 00:11:15,527 धूम्रपानाचा भयंकर सामाजिक प्रश्न सोडवताना आपण 198 00:11:15,551 --> 00:11:17,720 दुसरा एक महाभयंकर प्रश्न निर्माण केला आहे. 199 00:11:18,759 --> 00:11:22,359 पूर्वी धूम्रपानाविषयी अज्ञान होतं. 200 00:11:22,383 --> 00:11:26,331 त्यामुळे ते साथीसारखं पसरलं आणि अनेक विकार निर्माण झाले. 201 00:11:26,764 --> 00:11:29,980 आता इ-सिगारेट्सच्या बाबतीत तीच चूक पुन्हा व्हायला नको. 202 00:11:31,092 --> 00:11:34,452 म्हणून ताबडतोब पावलं उचलली पाहिजेत. 203 00:11:34,476 --> 00:11:39,202 मुलांच्या हातात ही साधनं पडू नयेत असे निर्बंध घातले गेले पाहिजेत. 204 00:11:40,405 --> 00:11:45,886 धूम्रपान सोडण्यासाठी १५,००० सुवास लागतात? तेही मुलांना आवडतील असे? 205 00:11:46,736 --> 00:11:49,670 त्यासाठी इतक्या प्रकारची साधनं लागतात? 206 00:11:50,458 --> 00:11:54,249 सहज लपवता येणारी, वापरायला सोपी अशी साधनं उपलब्ध असणं 207 00:11:54,273 --> 00:11:55,973 हे चांगलं आहे का? 208 00:11:57,292 --> 00:12:01,902 लवकरच FDA असे निर्बंध घालणार आहे. 209 00:12:01,926 --> 00:12:05,851 इ-द्रव वापरणारी साधनं 210 00:12:05,875 --> 00:12:09,420 दुकानांतून सर्रास विकणं, 211 00:12:09,444 --> 00:12:11,370 किंवा ती आंतरजालावरून अल्पवयीनांना विकणं 212 00:12:11,394 --> 00:12:14,085 याबद्दल कडक निर्बंध लागू होणार आहेत. 213 00:12:14,951 --> 00:12:19,416 तरुण पिढीतलं हे व्यसन रोखायला इतकं पुरेसं आहे का? 214 00:12:20,411 --> 00:12:23,343 अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. 215 00:12:24,684 --> 00:12:28,398 जनजागृतीची जोरदार मोहीम ताबडतोब सुरु करायला हवी. 216 00:12:28,946 --> 00:12:31,263 तरुण पिढीला आणि पालकांना समजलं पाहिजे, की 217 00:12:31,287 --> 00:12:34,976 विषारी घटकांचं प्रमाण सिगारेट्सपेक्षा कमी असलं, तरी 218 00:12:35,000 --> 00:12:36,763 इ-सिगारेट्स पूर्णपणे निर्धोक नाहीत. 219 00:12:37,773 --> 00:12:41,384 या साधनांतून निर्माण झालेली रसायनं 220 00:12:41,408 --> 00:12:44,152 शरीरावर घातक परिणाम घडवून, त्याद्वारे भविष्यकाळात 221 00:12:44,176 --> 00:12:47,823 अज्ञात आरोग्यविषयक समस्यांना बळी पडण्याची शक्यता वाढवतात. 222 00:12:49,526 --> 00:12:50,922 मागे मी जेव्हा म्हटलं, की 223 00:12:50,946 --> 00:12:54,126 इ -सिगारेट्स या स्मार्टफोन पिढीसाठीच बनवल्या गेल्या आहेत, 224 00:12:54,150 --> 00:12:55,300 ती काही थट्टा नव्हती. 225 00:12:55,911 --> 00:12:58,802 या तंत्रज्ञान युगात 226 00:12:58,826 --> 00:13:02,950 एखादं नवीन साधन, नवीन तंत्रज्ञान लोकांचं लक्ष वेधून घेतं. का? 227 00:13:02,974 --> 00:13:06,531 तर केवळ ते नवं आहे, म्हणून. 228 00:13:07,414 --> 00:13:11,064 पुढल्या काही वर्षांत, किंवा आपल्या उर्वरित आयुष्यात, 229 00:13:11,088 --> 00:13:14,122 नवं तंत्रज्ञान बाजारात येण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. 230 00:13:14,146 --> 00:13:16,722 कदाचित त्यातल्या धोक्यांची सूचना ठळकपणे मिळणार नाही. 231 00:13:16,746 --> 00:13:19,306 कारण ते दिसायला तितकं घातक नसेल, किंवा 232 00:13:19,330 --> 00:13:21,275 आरोग्याशी त्याचा प्रत्यक्ष संबंध नसेल. 233 00:13:21,938 --> 00:13:23,909 उदाहरणार्थ, नव्या साधनांमुळे 234 00:13:23,933 --> 00:13:27,308 दीर्घकाळ झोपेशिवाय राहणं, 235 00:13:27,332 --> 00:13:28,619 वजन घटवणं 236 00:13:28,643 --> 00:13:30,194 --हे माझं वैयक्तिक ध्येय-- 237 00:13:30,218 --> 00:13:32,484 अशी ध्येयं साध्य करता येतील. 238 00:13:32,508 --> 00:13:35,694 ही ध्येयं ग्राहकांना आकर्षक वाटतील. 239 00:13:36,832 --> 00:13:42,039 पण यातली अनेक साधनं आरोग्याला हानिकारक असतील. 240 00:13:42,904 --> 00:13:46,779 आपलं आणि आपल्या मुलांचं आरोग्य सुरक्षित राखायचं असेल, तर 241 00:13:46,803 --> 00:13:48,949 नवीन तंत्रज्ञान कौतुकाने वापरण्याची आपली सवय 242 00:13:48,973 --> 00:13:52,516 आपल्याला मोडावी लागेल. 243 00:13:52,540 --> 00:13:56,740 त्याऐवजी त्याच्याकडे वैद्यकशास्त्राच्या चिकित्सक दृष्टीने 244 00:13:56,764 --> 00:13:58,594 पाहावं लागेल. 245 00:13:59,331 --> 00:14:01,013 कारण.. 246 00:14:01,037 --> 00:14:05,438 आपलं, आपल्या मुलांचं, आणि आपल्या पुढल्या पिढ्यांचं आरोग्य फार मौल्यवान आहे. 247 00:14:05,462 --> 00:14:09,474 ते आपण धुरामधून किंवा एरोसोलमधून 248 00:14:09,498 --> 00:14:11,029 उडून जाऊ देता कामा नये. 249 00:14:11,363 --> 00:14:12,513 धन्यवाद. 250 00:14:12,537 --> 00:14:15,167 (टाळ्या)