WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:02.769 पालकत्व सोपं होत जातं ना? 00:00:03.307 --> 00:00:06.270 नुकतेच पालक झालेले लोक विचारतात. 00:00:06.294 --> 00:00:08.981 मुलांच्या काळजीला ते अजून सरावलेले नसतात. 00:00:09.435 --> 00:00:10.954 मी त्यांना सांगते, की 00:00:11.582 --> 00:00:13.152 ते सोपं होत नाही, बदलत जातं. 00:00:13.176 --> 00:00:16.285 मुलांबद्दल काळजी कायम वाटतच राहते. 00:00:17.275 --> 00:00:20.089 मला आठवतं, माझ्या मुलाला लहानपणी अस्थमा होता, 00:00:20.113 --> 00:00:21.868 तेव्हा मी रात्रभर अर्धवट जागी राहून 00:00:21.892 --> 00:00:24.474 त्याचा श्वास ऐकत असायचे. मग तो टीनएजर झाला, तेव्हा 00:00:24.498 --> 00:00:25.895 रात्री दार उघडल्याचा आवाज येऊन 00:00:25.919 --> 00:00:28.071 तो सुखरूप घरी आला, 00:00:28.095 --> 00:00:29.896 हे समजेपर्यंत जागी असायचे. 00:00:31.037 --> 00:00:33.454 पालकत्व आलं, की मुलांची काळजी आलीच. NOTE Paragraph 00:00:34.318 --> 00:00:37.662 यापैकी पुष्कळशी काळजी साध्या गोष्टींबद्दल असते. 00:00:37.686 --> 00:00:41.469 मुलं काय खाताहेत, कुठे गेली आहेत, कोणाबरोबर गेली आहेत, वगैरे. 00:00:41.493 --> 00:00:45.345 पण आजकालच्या नव्या पद्धती आणि फॅड्सकडेही आपल्याला लक्ष द्यायला हवं. 00:00:46.470 --> 00:00:50.748 सध्या एक नवी क्रेझ आली आहे. ती आरोग्याला अपायकारक असेल, 00:00:50.772 --> 00:00:52.859 याची जाणीव अजून आपल्याला झालेली नाही. 00:00:52.883 --> 00:00:56.002 सध्या प्रसिद्ध असणारी ती गोष्ट म्हणजे व्हेपिंग. 00:00:56.026 --> 00:00:58.127 म्हणजे इ-सिगारेट्स द्वारे इ-द्रवाची वाफ 00:00:58.151 --> 00:01:01.519 करून ते गोड एरोसोल हुंगणे. NOTE Paragraph 00:01:02.835 --> 00:01:05.634 इ-सिगारेट्स, किंवा व्हेप्स आजकाल 00:01:05.658 --> 00:01:07.866 चॉकलेटसारख्या भराभर विकल्या जाताहेत. 00:01:08.375 --> 00:01:11.082 या वर्षी जगभरात इ-सिगारेट्सच्या विक्रीतून 00:01:11.106 --> 00:01:14.276 २६ अब्ज डॉलर्सचा नफा अपेक्षित आहे. 00:01:14.639 --> 00:01:16.232 पुढच्या सहा वर्षांत 00:01:16.256 --> 00:01:18.255 हा आकडा दुप्पट होणार आहे. 00:01:19.681 --> 00:01:23.067 व्हेपिंगच्या दुष्परिणामांविषयी काळजी व्यक्त केली जाते. 00:01:23.091 --> 00:01:25.914 पण दुर्दैवाने त्यावर फारसे उपाय नाहीत. 00:01:26.625 --> 00:01:30.836 इ-सिगारेट्स कोण वापरतं, हे पाहिल्यास या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येईल. 00:01:31.558 --> 00:01:34.007 इ-सिगारेट्सचा वापर, निदान अमेरिकेत तरी, 00:01:34.031 --> 00:01:37.703 तरुण मुलांमध्ये पुष्कळ वाढला आहे. 00:01:37.727 --> 00:01:38.943 आपली मुलं. म्हणजे 00:01:38.967 --> 00:01:40.883 आपल्या समाजाचा सर्वात दुर्बल घटक. 00:01:41.750 --> 00:01:46.376 २०१२ ते २०१५ या काळात 00:01:46.400 --> 00:01:48.565 हा वापर ९०० टक्क्यांनी वाढला. 00:01:49.415 --> 00:01:51.546 अगदी अलिकडच्या अंदाजानुसार, अमेरिकेतल्या 00:01:51.570 --> 00:01:56.063 माध्यमिक शाळांतल्या सुमारे ३.६ दशलक्ष मुलांनी 00:01:56.087 --> 00:01:58.318 इ-सिगारेट वापरली आहे. NOTE Paragraph 00:01:59.635 --> 00:02:02.486 धूम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी शुद्ध स्वरूपातलं निकोटिन 00:02:02.510 --> 00:02:04.728 उपलब्ध करून द्यावं, म्हणून 00:02:04.752 --> 00:02:06.669 इ-सिगारेट्सची निर्मिती झाली. 00:02:07.520 --> 00:02:11.421 अमेरिकेत, हे तंबाखूयुक्त उत्पादन अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) 00:02:11.445 --> 00:02:13.163 अखत्यारीत येतं. 00:02:13.187 --> 00:02:16.570 पण ही साधनं 00:02:16.594 --> 00:02:18.948 जितकी भराभर विकली जाताहेत, तितक्या वेगाने 00:02:18.972 --> 00:02:23.373 त्यामागचं शास्त्र आणि कायदे 00:02:23.397 --> 00:02:24.606 विकसित झालेले नाहीत. 00:02:25.586 --> 00:02:28.927 सध्याच्या कायद्यानुसार ही साधनं 00:02:28.951 --> 00:02:31.645 १८ वर्षांखालील व्यक्तीला विकण्यास मनाई आहे. 00:02:31.669 --> 00:02:34.553 पण कायद्याला न जुमानता लहान वयातच 00:02:34.577 --> 00:02:37.816 या साधनांचा वापर वाढतोच आहे. NOTE Paragraph 00:02:39.052 --> 00:02:42.174 मी जेव्हा पहिल्यांदा इ-सिगारेट पाहिली, तेव्हा ताबडतोब 00:02:42.198 --> 00:02:44.763 माझ्या लक्षात आलं, की लहानगे हिच्या प्रेमात पडणार. 00:02:45.335 --> 00:02:48.154 ही म्हणजे तंत्रज्ञानाची कांडी. 00:02:48.178 --> 00:02:51.245 स्मार्टफोन पिढीसाठी अत्यंत अनुरूप. 00:02:51.269 --> 00:02:57.391 छोटीशी, री चार्ज करता येणारी. वापरायला, बदल करायला सोपी, सुवासिक. 00:02:57.415 --> 00:03:01.190 काही तर स्मार्टफोनद्वारे जोडल्या जातात, आणि किती व्हेपिंग केलं, ते दाखवतात. 00:03:01.214 --> 00:03:04.458 मलाही त्यांची भुरळ पडली होती. 00:03:05.429 --> 00:03:09.978 मी तरुणांमधल्या व्यसनांबद्दल बराच काळ संशोधन केलं असल्यामुळे 00:03:10.002 --> 00:03:15.389 माझ्या लक्षात आलं, की ई धुम्रपान हे कुमारवयाच्या मानसिकतेत नेमकं बसतं. NOTE Paragraph 00:03:16.622 --> 00:03:20.208 या वयात मुलं आवेगासरशी कृती करतात. त्यांना नव्या गोष्टी करून पहायला आवडतं. 00:03:20.589 --> 00:03:24.434 त्यांना स्वातंत्र्याची तहान असते, स्वतः काहीतरी निर्माण करावंसं वाटत असतं. 00:03:25.086 --> 00:03:27.666 इ-सिगारेट्समुळे या दोन्ही गरजा भागतात. 00:03:27.690 --> 00:03:31.490 व्हेपिंगमध्ये नवनिर्मिती करता येते, 00:03:31.514 --> 00:03:32.950 तीही आपल्या आवडीनुसार. 00:03:33.624 --> 00:03:38.522 १५,००० निरनिराळे सुवास आणि निकोटिनच्या वेगवेगळ्या प्रमाणांमधून 00:03:38.546 --> 00:03:40.799 त्यांना हवं ते निवडता येतं. 00:03:40.823 --> 00:03:45.384 स्वतःच्या आवडीप्रमाणे मिश्रण बनवता येतं. 00:03:46.280 --> 00:03:49.856 या साधनाचं तापमान, विद्युतभार, 00:03:49.880 --> 00:03:52.843 झुरक्याचं आकारमान आणि त्यातले घटक बदलून, 00:03:52.867 --> 00:03:55.140 किती वाफ निर्माण होईल, ते ठरवता येतं. NOTE Paragraph 00:03:56.410 --> 00:03:59.284 ही साधनं वापरून धूम्रपानाचे धुराचे ढग पकडत राहणे खेळता येतं. 00:04:00.317 --> 00:04:03.145 त्याला व्हेप ट्रिक्स असंही म्हणतात. 00:04:03.169 --> 00:04:04.455 किंवा स्मोक ट्रिक्स. 00:04:04.479 --> 00:04:08.599 यात धुरांचे मोठे ढग बनवतात, आणि त्यांना चित्रविचित्र आकार आणि नावं देतात. 00:04:08.623 --> 00:04:11.438 वर्तुळं, ड्रॅगन्स, भुतं.. 00:04:11.462 --> 00:04:14.804 त्यांच्या स्पर्धा होतात, 00:04:14.828 --> 00:04:18.451 बक्षिसंही दिली जातात. NOTE Paragraph 00:04:19.884 --> 00:04:23.665 सरळ घशात किती निकोटिन पोहोचतं, त्याचं प्रमाण बदलता येतं. 00:04:23.689 --> 00:04:27.150 त्यासाठी द्रवाचं तापमान वाढवतात किंवा 00:04:27.174 --> 00:04:30.216 ते तापलेल्या तारेवर सोडतात. 00:04:31.423 --> 00:04:34.282 ही साधनं चरस व्हेपिंग साठी सुद्धा वापरतात. 00:04:34.941 --> 00:04:37.308 यात कमी तपमान वापरल्यामुळे 00:04:37.332 --> 00:04:40.353 चरस जळत नाही. 00:04:40.377 --> 00:04:42.182 त्यामुळे गुपचूप ओढता येतो. 00:04:42.206 --> 00:04:44.797 त्याचा वास येत नाही. 00:04:45.577 --> 00:04:48.804 त्यामुळे स्वतःला हवं तसं व्हेपिंग करता येतं. 00:04:48.828 --> 00:04:53.013 याच कारणामुळे तरुणांना ते इतकं आवडतं. NOTE Paragraph 00:04:54.723 --> 00:04:57.710 ई-सिगारेट्सचं तंत्रज्ञान अगदी सोपं आहे. 00:04:58.388 --> 00:05:04.266 इ-द्रव ठेवण्यासाठी एक जागा, पॉड किंवा प्लग. 00:05:04.290 --> 00:05:08.823 तार तापवण्यासाठी एक बॅटरी. तापलेल्या तारेमुळे इ-द्रवाची वाफ होते. 00:05:08.847 --> 00:05:10.341 आणि एक माऊथपीस. 00:05:10.365 --> 00:05:12.936 यातून ती ओढली जाते. 00:05:13.624 --> 00:05:19.654 २०१७ मध्ये अशी ४६६ साधनं उपलब्ध होती. 00:05:20.594 --> 00:05:25.173 त्यांचे विविध प्रकार आहेत. सिगारेट्स सारखी सिगालाईक्स, 00:05:25.197 --> 00:05:28.868 पेन्स, 00:05:28.892 --> 00:05:32.820 बदललेल्या स्वरूपातली मॉड्स. 00:05:32.844 --> 00:05:35.300 ही सिगारेटसारखी दिसत नाहीत. 00:05:35.324 --> 00:05:38.462 त्यांचे अनेक आकार, प्रकार आहेत. 00:05:38.486 --> 00:05:41.790 त्यांना विविध जोडण्या असतात, आणि ती अनेक प्रकारे बदलली जाऊ शकतात. 00:05:41.814 --> 00:05:43.904 क्लाउड चेसिंग साठी ती फार प्रसिद्ध आहेत. NOTE Paragraph 00:05:44.772 --> 00:05:47.157 सध्या नवीन उपलब्ध झालेली साधनं 00:05:47.181 --> 00:05:48.715 म्हणजे पॉड्स. 00:05:48.739 --> 00:05:51.126 यांत इ-द्रव पॉड मध्ये ठेवतात. 00:05:51.713 --> 00:05:54.015 टीनएजर्स मध्ये ही अत्यंत लोकप्रिय आहेत. 00:05:54.039 --> 00:05:56.389 ज्यूल हे यापैकी एक उदाहरण. 00:05:56.413 --> 00:05:59.016 ही USB Device सारखी दिसतात. 00:05:59.040 --> 00:06:02.362 आणि तशीच चार्ज करता येतात. 00:06:03.142 --> 00:06:05.809 अनेक टीनएजर्सना ही इ-सिगारेट वाटत नाही. 00:06:05.833 --> 00:06:10.042 त्यामुळे व्हेपिंग ऐवजी ज्यूलिंग असा शब्द प्रचलित झाला आहे. 00:06:10.897 --> 00:06:14.985 ज्यूल लपवणं इतकं सोपं आहे, आणि त्यातून इतकी कमी वाफ निर्माण होते, 00:06:15.009 --> 00:06:17.171 की मुलं वर्गातही ती वापरतात. 00:06:17.195 --> 00:06:20.874 शार्पी पेन, कपडे, पुस्तकं 00:06:20.898 --> 00:06:22.048 अशा वस्तूंमध्ये दडवतात. NOTE Paragraph 00:06:22.452 --> 00:06:25.473 अनेक टीनएजर्सना वाटतं, ही पाण्याची वाफ आहे,. 00:06:25.497 --> 00:06:27.303 त्यापासून काही धोका नाही. 00:06:27.327 --> 00:06:29.698 पण हे साफ खोटं आहे. 00:06:30.285 --> 00:06:32.479 मुळात ती वाफ नसतेच. 00:06:32.503 --> 00:06:33.746 ते एरोसोल असतं. 00:06:33.770 --> 00:06:36.525 दोघांत पुष्कळ फरक आहे. 00:06:37.237 --> 00:06:41.995 एरोसोलमध्ये अनेक सूक्ष्म द्रव आणि वायु कण तरंगत असतात. 00:06:42.019 --> 00:06:44.650 इ-द्रवात जे काही असेल, त्यापासून ते तयार होतात. 00:06:45.338 --> 00:06:48.670 प्रोपिलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन 00:06:48.694 --> 00:06:50.382 हे द्रावक त्यात असू शकतात. 00:06:50.883 --> 00:06:53.990 हे द्रावक तोंडाद्वारे खाण्यासाठी 00:06:54.014 --> 00:06:56.828 सुरक्षित आहेत. 00:06:56.852 --> 00:07:01.678 पण दीर्घकाळ झुरके ओढण्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. 00:07:02.918 --> 00:07:04.922 इ-द्रवात काही वेळा अल्कोहोल असू शकतं, 00:07:04.946 --> 00:07:06.689 तेही मोठ्या प्रमाणात. 00:07:06.713 --> 00:07:10.552 श्वासावाटे घेतलेलं अल्कोहोल मेंदूला घातक असतं. NOTE Paragraph 00:07:11.957 --> 00:07:16.178 इ-द्रवात १५,००० प्रकारचे सुवास असतात असं मी म्हणाले, त्याची उदाहरणं पहा. 00:07:16.202 --> 00:07:17.614 काही नावं आकर्षक, 00:07:18.440 --> 00:07:23.115 माहितीतली आहेत. स्किटल्स, फ्रूट लूप्स. 00:07:23.139 --> 00:07:27.585 काही नावं नवलाईची आहेत. ड्रॅगन्स मिल्क, टायगर्स ब्लड. 00:07:27.609 --> 00:07:29.107 युनिकॉर्न प्यूक. 00:07:29.522 --> 00:07:34.010 यात धातूंचे अंश असू शकतात. 00:07:34.034 --> 00:07:36.085 क्रोमियम, कॅडमियम, शिसे. 00:07:36.521 --> 00:07:39.887 इ-द्रव तापवण्याच्या तारेत हे धातू असतात. 00:07:39.911 --> 00:07:43.445 हे धातू आपल्या शरीरातल्या अतिमहत्त्वाच्या अवयवांसाठी घातक असतात. 00:07:43.973 --> 00:07:46.589 तर, मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगते. 00:07:46.613 --> 00:07:49.666 यात पाण्याची वाफ नसते. NOTE Paragraph 00:07:52.009 --> 00:07:55.427 इ-सिगारेट्सद्वारे टीनएजर्सच्या मेंदूचा निकोटिनशी संपर्क येतो. 00:07:55.451 --> 00:07:56.889 हेदेखील काळजीचं कारण आहे. 00:07:57.833 --> 00:08:00.971 अत्यंत कमी प्रमाणातलं निकोटिनसुद्धा त्यांच्या मेंदूवर परिणाम करून 00:08:00.995 --> 00:08:02.698 त्यांना व्यसन लावू शकतं. 00:08:03.174 --> 00:08:05.891 आपल्याला ठाऊक आहे, की ९०% व्यसनी लोक 00:08:05.915 --> 00:08:10.637 धूम्रपानाची सुरुवात वयाच्या १८व्या वर्षाआधी करतात. 00:08:11.256 --> 00:08:15.547 लवकर जडलेलं व्यसन जास्त पक्कं असतं. ते सोडणं जास्त कठीण असतं. 00:08:16.269 --> 00:08:20.274 एका माजी FDA कमिशनरनी म्हटलंच आहे, 00:08:20.298 --> 00:08:23.166 धूम्रपान हा एक बालरोग आहे. NOTE Paragraph 00:08:24.435 --> 00:08:27.531 इ-सिगारेट्समधलं निकोटिनचं प्रमाण मोठं आहे. 00:08:28.043 --> 00:08:30.514 यापैकी अनेक साधनांमध्ये 00:08:30.538 --> 00:08:32.383 सिगारेटच्या एका पॅकइतकं निकोटिन असतं. 00:08:33.165 --> 00:08:36.894 हल्लीच्या पॉड्समधला निकोटिनचा क्षार 00:08:36.918 --> 00:08:39.873 वापरायला जास्त सोपा आणि चवीला जास्त चांगला असतो. 00:08:39.897 --> 00:08:43.174 त्याचं मेंदूतलं प्रमाण झट्कन वाढतं. 00:08:44.487 --> 00:08:48.294 इ-सिगारेट्स नियमित वापरणाऱ्या टीनएजर्सनी, त्या उपलब्ध नसतील तेव्हा 00:08:48.318 --> 00:08:51.120 आपल्याला तल्लफ येते असं नमूद केलं आहे. 00:08:51.144 --> 00:08:53.829 व्यसन जडल्याची ही लक्षणं आहेत. NOTE Paragraph 00:08:55.087 --> 00:08:59.935 इ-सिगारेट्सचं व्यसन तर जडतंच, 00:08:59.959 --> 00:09:02.927 शिवाय शरीरातल्या अनेक अवयवांवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. 00:09:03.340 --> 00:09:05.832 कोणतंही निकोटिन Nicotinic Acetylcholine Receptor 00:09:05.856 --> 00:09:09.909 नावाच्या अभिग्राहकांशी जोडलं जातं. 00:09:09.933 --> 00:09:13.756 हे अभिग्राहक शरीरातल्या सर्व अवयवांमध्ये 00:09:13.780 --> 00:09:15.063 महत्त्वाचं कार्य करतात. 00:09:15.415 --> 00:09:19.547 निकोटिनच्या सततच्या संसर्गामुळे 00:09:20.016 --> 00:09:21.764 ही यंत्रणा बिघडते. उदाहरणार्थ, 00:09:21.788 --> 00:09:25.653 रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. 00:09:25.677 --> 00:09:29.983 तणावाच्या परिस्थितीत हृदय योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही. 00:09:31.221 --> 00:09:34.938 व्यसनाबरोबरच हे विपरीत परिणामही 00:09:34.962 --> 00:09:37.105 टीनएजर्सच्या मेंदूला घातक असतात. 00:09:37.605 --> 00:09:42.207 प्राण्यांवरच्या संशोधनानुसार निकोटिन हे चेतासंस्थेसाठी विषारी मानलं जातं. 00:09:42.231 --> 00:09:45.471 त्यामुळे शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होते, 00:09:45.495 --> 00:09:47.927 आणि चंचलतेची लक्षणं वाढतात. NOTE Paragraph 00:09:47.951 --> 00:09:50.852 तंबाखू वापरणाऱ्यांना दारू व चरस यांचंही व्यसन जडतं. 00:09:50.876 --> 00:09:52.396 तरुणपणी किंवा प्रौढपणी त्यांना 00:09:52.420 --> 00:09:57.179 नैराश्य किंवा चिंताविकार जडतो. 00:09:58.648 --> 00:10:02.912 म्हणजेच इ-सिगारेट्स मधलं निकोटिन 00:10:02.936 --> 00:10:06.416 त्यांना या इतर व्यसनांच्या आणि विकारांच्या मार्गावर धाडतं. 00:10:07.210 --> 00:10:11.611 प्राण्यांमध्ये निकोटिनमुळे जनुकीय बदल होतात. 00:10:11.635 --> 00:10:14.043 ते आनुवंशिक रीतीने पुढच्या पिढीतही संक्रमित होतात. 00:10:14.067 --> 00:10:16.667 उदाहरणार्थ, अस्थमा या विकाराशी संबंधित जनुके. 00:10:17.385 --> 00:10:21.011 म्हणजेच, निकोटिन वापरणारे टीनएजर्स केवळ स्वतःलाच नव्हे, 00:10:21.035 --> 00:10:23.800 तर त्यांच्या पुढच्या पिढयांनासुद्धा अपाय करतात. NOTE Paragraph 00:10:25.141 --> 00:10:27.747 इ-सिगारेट्स अस्तित्वात आल्यामुळे 00:10:27.771 --> 00:10:31.721 एका अख्ख्या तरुण पिढीला निकोटिनचं व्यसन लागलं आहे. 00:10:32.861 --> 00:10:36.255 ही साधनं सहज उपलब्ध झाल्यामुळे 00:10:36.279 --> 00:10:40.133 चरस वगैरे इतर अमली पदार्थ वापरून पाहण्याचं प्रमाणही वाढलं असेल. 00:10:41.308 --> 00:10:45.917 धुम्रपानाचं व्यसन सोडवण्यासाठी शुद्ध स्वरूपातलं निकोटिन वापरण्याचा 00:10:45.941 --> 00:10:49.341 उद्देश बाळगणं योग्य आहे. पण या साधनांमुळे 00:10:49.365 --> 00:10:53.226 व्यसन सुटायला खरीच मदत होते का, ते अजून कळलेलं नाही. 00:10:53.250 --> 00:10:56.959 तसेच त्यांच्या दीर्घकाळ वापराचे परिणामही अजून कळलेले नाहीत. 00:10:58.190 --> 00:11:03.132 ठाऊक आहे ते इतकंच, की पुष्कळ तरुण मुलं ही साधनं वापरताहेत. 00:11:03.489 --> 00:11:07.493 हे प्रमाण इतकं प्रचंड आहे, की अमेरिकेचे FDA कमिशनर म्हणतात, 00:11:07.517 --> 00:11:09.934 "इ-सिगारेट्सची साथ पसरली आहे." 00:11:11.280 --> 00:11:15.527 धूम्रपानाचा भयंकर सामाजिक प्रश्न सोडवताना आपण 00:11:15.551 --> 00:11:17.720 दुसरा एक महाभयंकर प्रश्न निर्माण केला आहे. 00:11:18.759 --> 00:11:22.359 पूर्वी धूम्रपानाविषयी अज्ञान होतं. 00:11:22.383 --> 00:11:26.331 त्यामुळे ते साथीसारखं पसरलं आणि अनेक विकार निर्माण झाले. 00:11:26.764 --> 00:11:29.980 आता इ-सिगारेट्सच्या बाबतीत तीच चूक पुन्हा व्हायला नको. 00:11:31.092 --> 00:11:34.452 म्हणून ताबडतोब पावलं उचलली पाहिजेत. 00:11:34.476 --> 00:11:39.202 मुलांच्या हातात ही साधनं पडू नयेत असे निर्बंध घातले गेले पाहिजेत. 00:11:40.405 --> 00:11:45.886 धूम्रपान सोडण्यासाठी १५,००० सुवास लागतात? तेही मुलांना आवडतील असे? 00:11:46.736 --> 00:11:49.670 त्यासाठी इतक्या प्रकारची साधनं लागतात? 00:11:50.458 --> 00:11:54.249 सहज लपवता येणारी, वापरायला सोपी अशी साधनं उपलब्ध असणं 00:11:54.273 --> 00:11:55.973 हे चांगलं आहे का? NOTE Paragraph 00:11:57.292 --> 00:12:01.902 लवकरच FDA असे निर्बंध घालणार आहे. 00:12:01.926 --> 00:12:05.851 इ-द्रव वापरणारी साधनं 00:12:05.875 --> 00:12:09.420 दुकानांतून सर्रास विकणं, 00:12:09.444 --> 00:12:11.370 किंवा ती आंतरजालावरून अल्पवयीनांना विकणं 00:12:11.394 --> 00:12:14.085 याबद्दल कडक निर्बंध लागू होणार आहेत. 00:12:14.951 --> 00:12:19.416 तरुण पिढीतलं हे व्यसन रोखायला इतकं पुरेसं आहे का? 00:12:20.411 --> 00:12:23.343 अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत. NOTE Paragraph 00:12:24.684 --> 00:12:28.398 जनजागृतीची जोरदार मोहीम ताबडतोब सुरु करायला हवी. 00:12:28.946 --> 00:12:31.263 तरुण पिढीला आणि पालकांना समजलं पाहिजे, की 00:12:31.287 --> 00:12:34.976 विषारी घटकांचं प्रमाण सिगारेट्सपेक्षा कमी असलं, तरी 00:12:35.000 --> 00:12:36.763 इ-सिगारेट्स पूर्णपणे निर्धोक नाहीत. 00:12:37.773 --> 00:12:41.384 या साधनांतून निर्माण झालेली रसायनं 00:12:41.408 --> 00:12:44.152 शरीरावर घातक परिणाम घडवून, त्याद्वारे भविष्यकाळात 00:12:44.176 --> 00:12:47.823 अज्ञात आरोग्यविषयक समस्यांना बळी पडण्याची शक्यता वाढवतात. NOTE Paragraph 00:12:49.526 --> 00:12:50.922 मागे मी जेव्हा म्हटलं, की 00:12:50.946 --> 00:12:54.126 इ -सिगारेट्स या स्मार्टफोन पिढीसाठीच बनवल्या गेल्या आहेत, 00:12:54.150 --> 00:12:55.300 ती काही थट्टा नव्हती. 00:12:55.911 --> 00:12:58.802 या तंत्रज्ञान युगात 00:12:58.826 --> 00:13:02.950 एखादं नवीन साधन, नवीन तंत्रज्ञान लोकांचं लक्ष वेधून घेतं. का? 00:13:02.974 --> 00:13:06.531 तर केवळ ते नवं आहे, म्हणून. 00:13:07.414 --> 00:13:11.064 पुढल्या काही वर्षांत, किंवा आपल्या उर्वरित आयुष्यात, 00:13:11.088 --> 00:13:14.122 नवं तंत्रज्ञान बाजारात येण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. 00:13:14.146 --> 00:13:16.722 कदाचित त्यातल्या धोक्यांची सूचना ठळकपणे मिळणार नाही. 00:13:16.746 --> 00:13:19.306 कारण ते दिसायला तितकं घातक नसेल, किंवा 00:13:19.330 --> 00:13:21.275 आरोग्याशी त्याचा प्रत्यक्ष संबंध नसेल. 00:13:21.938 --> 00:13:23.909 उदाहरणार्थ, नव्या साधनांमुळे 00:13:23.933 --> 00:13:27.308 दीर्घकाळ झोपेशिवाय राहणं, 00:13:27.332 --> 00:13:28.619 वजन घटवणं 00:13:28.643 --> 00:13:30.194 --हे माझं वैयक्तिक ध्येय-- 00:13:30.218 --> 00:13:32.484 अशी ध्येयं साध्य करता येतील. 00:13:32.508 --> 00:13:35.694 ही ध्येयं ग्राहकांना आकर्षक वाटतील. 00:13:36.832 --> 00:13:42.039 पण यातली अनेक साधनं आरोग्याला हानिकारक असतील. NOTE Paragraph 00:13:42.904 --> 00:13:46.779 आपलं आणि आपल्या मुलांचं आरोग्य सुरक्षित राखायचं असेल, तर 00:13:46.803 --> 00:13:48.949 नवीन तंत्रज्ञान कौतुकाने वापरण्याची आपली सवय 00:13:48.973 --> 00:13:52.516 आपल्याला मोडावी लागेल. 00:13:52.540 --> 00:13:56.740 त्याऐवजी त्याच्याकडे वैद्यकशास्त्राच्या चिकित्सक दृष्टीने 00:13:56.764 --> 00:13:58.594 पाहावं लागेल. 00:13:59.331 --> 00:14:01.013 कारण.. 00:14:01.037 --> 00:14:05.438 आपलं, आपल्या मुलांचं, आणि आपल्या पुढल्या पिढ्यांचं आरोग्य फार मौल्यवान आहे. 00:14:05.462 --> 00:14:09.474 ते आपण धुरामधून किंवा एरोसोलमधून 00:14:09.498 --> 00:14:11.029 उडून जाऊ देता कामा नये. NOTE Paragraph 00:14:11.363 --> 00:14:12.513 धन्यवाद. NOTE Paragraph 00:14:12.537 --> 00:14:15.167 (टाळ्या)