hide🌟Accessibility matters for everyone!🌟
Learn with Amara.org about the Best Practices for Creating SDH Subtitles !

< Return to Video

प्रत्येक जण शिक्षक असतो, अगदी तुम्हीही - आशिया कुमारी, शिक्षक

  • 0:07 - 0:11
    लहानपणी नऊ वर्षाची असताना
    मला शिक्षक व्हावेसे वाटे.
  • 0:11 - 0:13
    शिक्षक वर्गात उभे राहून शिकवितात.
  • 0:13 - 0:16
    त्यांचे शिकवणे विद्यार्थी ऐकत असतात.
  • 0:16 - 0:20
    गरीब मुलांच्या शाळेत मी शिकले,
  • 0:20 - 0:23
    तेथे मी पाहिले
    अनेकांना अभ्यासात रस नसायचा.
  • 0:23 - 0:26
    काहींचे वर्गात लक्ष नसायचे.
  • 0:26 - 0:29
    काही तर चक्क शाळेस दांडी मारीत,
  • 0:29 - 0:33
    या सगळ्यांचे शिक्षकांवर दडपण असायचे.
  • 0:33 - 0:35
    मला प्रश्न पडे :
  • 0:35 - 0:38
    किती आव्हानात्मक आहे शिक्षकाचे काम
  • 0:38 - 0:41
    वर्गातील चाळीस मुलांच्या
    भवितव्याच्या जबाबदारीचे
  • 0:41 - 0:44
    मला प्रश्न पडे
    का शिक्षकावर मुलांनी अवलंबून रहावे ?
  • 0:44 - 0:48
    मुले केव्हा जाणतील
    त्यांच्यातच एक शिक्षक लपलेला आहे
  • 0:48 - 0:51
    मला याविषयी काही करावेसे वाटले
  • 0:51 - 0:56
    मी ठरविले शक्य असलेली
    सर्व मद्त शिक्षकांना करायची.
  • 0:56 - 1:00
    त्यासाठी मी रोजची हजेरी घेत असे.
  • 1:00 - 1:02
    फळ्यावर तारीख. विषय इत्यादी लिहून ठेवी.
  • 1:02 - 1:04
    सरावाच्या काळात,
  • 1:04 - 1:08
    अभ्यासात कच्च्या मुलांचा गृहपाठ घेत असे.
  • 1:08 - 1:10
    माझी शिक्षिका रजा घेत असे तेव्हा
  • 1:10 - 1:15
    टेलीफोनवरून वर्गात काय करायचे
    त्याच्या सूचना घेई.
  • 1:15 - 1:21
    वर्ग प्रतिनिधींशी चर्चा करून
    मी नवे शब्द शिकवायची.
  • 1:21 - 1:25
    काही गणितं सोडवून घ्यायची,
    कधीकधी गृहपाठदेखील.
  • 1:25 - 1:28
    अनेकांनी कालांतराने मदतीस सुरवात केली
  • 1:28 - 1:33
    हळूहळू आम्ही आमची स्वतःची शिकविण्याची
    शैली निर्माण केली.
  • 1:33 - 1:38
    हे काही काळ चालले, पण आम्हाला
    अधिक काही करायचे होते.
  • 1:38 - 1:42
    माझ्या काही मित्रांना वाचन
    परिच्छेदाचे सारग्रहण यासाठी मदत लागायची.
  • 1:42 - 1:45
    मी व माही मैत्रीण पिंकी वाचन वेड्या होतो.
  • 1:45 - 1:48
    आम्ही एक वाचन गट तयार केला.
  • 1:48 - 1:51
    त्यात चौथी ते ६ वी चे विद्यार्थी होते.
  • 1:51 - 1:54
    त्यातील बहुतेकांची वाचनाची गती मंद होती.
  • 1:54 - 1:58
    आम्ही त्यांना पुस्तके दिली, ज्यात चित्रे
    जास्त पण कमी शब्दात माहिती होती.
  • 1:58 - 2:00
    त्यांनी ही पुस्तके वाचू शकल्यानंतर
  • 2:00 - 2:05
    आम्ही अधिक शब्द असलेली सचित्र पुस्तके
    जरा अधिक काठीण्य पातळीची दिली.
  • 2:05 - 2:08
    पुस्तकातील व्यक्ती त्यांचे स्वभाव
    यावर त्यांच्याशी चर्चा केली.
  • 2:08 - 2:12
    पुस्तकातील मुख्य घटना
    वर कथा यावर चर्चा केली,
  • 2:12 - 2:17
    आमच्या वर्ग शिक्षकांनी त्यांची परीक्षा
    त्यांच्यात घेतल्यावर सुधारणा दिसली.
  • 2:17 - 2:23
    एकाने तर वाचनाची गती
    महिनाभरात दीडपट वाढवली.
  • 2:23 - 2:24
    त्यानंतर
  • 2:24 - 2:28
    काही मोठ्या मुलांबरोबर वाचनाचे गट चालविले.
  • 2:28 - 2:30
    या अनुभवानंतर,
  • 2:30 - 2:35
    मला काही क्षण का होईना
    शिक्षक झाल्याचा अभिमान वाटला.
  • 2:35 - 2:38
    त्यात माझे वय व मी कोणत्या वर्गात शिकते
    याचे महत्व नव्हते
  • 2:38 - 2:40
    माझा तुम्हा सर्वाना एक प्रश्न आहे.
  • 2:40 - 2:44
    तुम्हाला काही छंद,आवड आहे ?
  • 2:44 - 2:47
    मला वाटते असेल. मलाही असे खूप छंद आहेत.
  • 2:47 - 2:52
    जसे विणकाम, स्वयंपाक, बागकाम, चित्रकला
  • 2:52 - 2:56
    या सर्व गोष्टी मी वेगवेगळ्या
    शिक्षकापासून शिकले.
  • 2:56 - 2:59
    मि. फरहान यांनी बागकाम शिकविले.
  • 2:59 - 3:02
    त्यांनी मला पर्माकल्चर नावाच्या
    बागकामपद्धतीविषयी ज्ञान दिले.
  • 3:02 - 3:07
    आजकाल मी झाडे वाढवण्याच्या अक्वापॉनिक्स
    नावाच्या नवीन पद्धतीविषयी शिकत आहे.
  • 3:07 - 3:10
    आईने मला पाककृती शिकविली
  • 3:10 - 3:13
    तिने मला स्वावलंबी केले
    तिच्या अनुपस्थितीत.
  • 3:13 - 3:15
    तुमच्या लक्षात आले असेल पण यापैकी कोणीही
  • 3:15 - 3:18
    शिक्षक म्हणून काम करीत नव्हते.
  • 3:18 - 3:20
    पण ते एका अर्थाने शिक्षकच होते.
  • 3:20 - 3:24
    आठवा, तुमच्या जीवनात असे शिक्षक कोण होते?
  • 3:24 - 3:27
    मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आठवतील !
  • 3:27 - 3:28
    माझ्या परिसरात,
  • 3:28 - 3:32
    खूप लोक खूप गोष्टी करतात
    आणि मी त्यांच्यापासून ते शिकते.
  • 3:32 - 3:36
    कचरा गाडीवाले, सफाई करणारे
  • 3:36 - 3:40
    सुतार कामाचे गणित
    पाककला घरातील महिलांपासून
  • 3:40 - 3:43
    दुकानदारापासून धंदा करणे
  • 3:43 - 3:48
    पण आपण कधी विचार केला आहे
    यांच्या पासून आपण शिकू शकतो.
  • 3:48 - 3:52
    नाही कारण त्यात आपले वय,
    लिंग, व्यवसाय आड येतो.
  • 3:52 - 3:53
    ते काही शिकवीत नसतात
  • 3:53 - 3:57
    पण त्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो.
  • 3:57 - 3:59
    माझा ठाम विश्वास आहे
    प्रत्येक जण शिक्षक असतो.
  • 3:59 - 4:01
    माझ्या प्रमाणे तुम्हीही शिक्षक आहात.
  • 4:01 - 4:05
    आपला व्यवसाय कोणताही असो
    वय कितीही असो स्त्री व पुरुष कोणीही असा
  • 4:05 - 4:09
    जर तुम्ही हा दृष्टिकोन स्वीकारला
  • 4:09 - 4:12
    मला खात्री आहे एक दिवस आपण परिपूर्ण होऊ
  • 4:12 - 4:14
    आभारी आहे.
Title:
प्रत्येक जण शिक्षक असतो, अगदी तुम्हीही - आशिया कुमारी, शिक्षक
Description:

प्रत्येकात एक शिक्षक लपलेला असतो. फक्त पाहण्याची दृष्टी लागते. आपल्या सभोवतालच्या कोणाकडूनही आपण त्याला जे येते ते शिकू शकंतो. त्यासाठी आपले वय, व्यवसाय, लिंग आड येता कामा नये TEDEd चा हा पाठ आशिया कुमारी यांनी तयार केला आहे.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:19
Abhinav Garule approved Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Sep 22, 2019, 8:38 AM
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Sep 22, 2019, 8:38 AM
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Sep 22, 2019, 8:34 AM
Smita Kantak accepted Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Jul 15, 2019, 4:52 PM
Smita Kantak edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Jul 15, 2019, 4:52 PM
Arvind Patil edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Jul 10, 2019, 1:48 AM
Arvind Patil edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Jul 6, 2019, 11:50 PM
Arvind Patil edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari Jul 6, 2019, 3:29 AM
Show all

Marathi subtitles

Revisions

  • Revision 7 Edited
    Abhinav Garule Sep 22, 2019, 8:38 AM