1 00:00:06,797 --> 00:00:10,852 लहानपणी नऊ वर्षाची असताना मला शिक्षक व्हावेसे वाटे. 2 00:00:10,852 --> 00:00:13,316 शिक्षक वर्गात उभे राहून शिकवितात. 3 00:00:13,316 --> 00:00:16,276 त्यांचे शिकवणे विद्यार्थी ऐकत असतात. 4 00:00:16,276 --> 00:00:19,661 गरीब मुलांच्या शाळेत मी शिकले, 5 00:00:19,661 --> 00:00:23,376 तेथे मी पाहिले अनेकांना अभ्यासात रस नसायचा. 6 00:00:23,376 --> 00:00:25,826 काहींचे वर्गात लक्ष नसायचे. 7 00:00:25,826 --> 00:00:28,509 काही तर चक्क शाळेस दांडी मारीत, 8 00:00:28,509 --> 00:00:33,038 या सगळ्यांचे शिक्षकांवर दडपण असायचे. 9 00:00:33,038 --> 00:00:34,734 मला प्रश्न पडे : 10 00:00:34,734 --> 00:00:37,683 किती आव्हानात्मक आहे शिक्षकाचे काम 11 00:00:37,683 --> 00:00:40,789 वर्गातील चाळीस मुलांच्या भवितव्याच्या जबाबदारीचे 12 00:00:40,789 --> 00:00:44,379 मला प्रश्न पडे का शिक्षकावर मुलांनी अवलंबून रहावे ? 13 00:00:44,379 --> 00:00:48,373 मुले केव्हा जाणतील त्यांच्यातच एक शिक्षक लपलेला आहे 14 00:00:48,373 --> 00:00:50,784 मला याविषयी काही करावेसे वाटले 15 00:00:50,784 --> 00:00:56,374 मी ठरविले शक्य असलेली सर्व मद्त शिक्षकांना करायची. 16 00:00:56,374 --> 00:00:59,741 त्यासाठी मी रोजची हजेरी घेत असे. 17 00:00:59,741 --> 00:01:02,197 फळ्यावर तारीख. विषय इत्यादी लिहून ठेवी. 18 00:01:02,197 --> 00:01:03,591 सरावाच्या काळात, 19 00:01:03,591 --> 00:01:07,854 अभ्यासात कच्च्या मुलांचा गृहपाठ घेत असे. 20 00:01:07,854 --> 00:01:10,045 माझी शिक्षिका रजा घेत असे तेव्हा 21 00:01:10,045 --> 00:01:15,428 टेलीफोनवरून वर्गात काय करायचे त्याच्या सूचना घेई. 22 00:01:15,428 --> 00:01:20,826 वर्ग प्रतिनिधींशी चर्चा करून मी नवे शब्द शिकवायची. 23 00:01:20,826 --> 00:01:25,106 काही गणितं सोडवून घ्यायची, कधीकधी गृहपाठदेखील. 24 00:01:25,106 --> 00:01:28,090 अनेकांनी कालांतराने मदतीस सुरवात केली 25 00:01:28,090 --> 00:01:33,070 हळूहळू आम्ही आमची स्वतःची शिकविण्याची शैली निर्माण केली. 26 00:01:33,070 --> 00:01:37,710 हे काही काळ चालले, पण आम्हाला अधिक काही करायचे होते. 27 00:01:37,710 --> 00:01:41,562 माझ्या काही मित्रांना वाचन परिच्छेदाचे सारग्रहण यासाठी मदत लागायची. 28 00:01:41,562 --> 00:01:45,286 मी व माही मैत्रीण पिंकी वाचन वेड्या होतो. 29 00:01:45,286 --> 00:01:47,649 आम्ही एक वाचन गट तयार केला. 30 00:01:47,649 --> 00:01:50,928 त्यात चौथी ते ६ वी चे विद्यार्थी होते. 31 00:01:50,928 --> 00:01:53,781 त्यातील बहुतेकांची वाचनाची गती मंद होती. 32 00:01:53,781 --> 00:01:57,755 आम्ही त्यांना पुस्तके दिली, ज्यात चित्रे जास्त पण कमी शब्दात माहिती होती. 33 00:01:57,755 --> 00:02:00,038 त्यांनी ही पुस्तके वाचू शकल्यानंतर 34 00:02:00,038 --> 00:02:05,348 आम्ही अधिक शब्द असलेली सचित्र पुस्तके जरा अधिक काठीण्य पातळीची दिली. 35 00:02:05,348 --> 00:02:08,486 पुस्तकातील व्यक्ती त्यांचे स्वभाव यावर त्यांच्याशी चर्चा केली. 36 00:02:08,486 --> 00:02:11,942 पुस्तकातील मुख्य घटना वर कथा यावर चर्चा केली, 37 00:02:11,942 --> 00:02:16,902 आमच्या वर्ग शिक्षकांनी त्यांची परीक्षा त्यांच्यात घेतल्यावर सुधारणा दिसली. 38 00:02:16,902 --> 00:02:22,637 एकाने तर वाचनाची गती महिनाभरात दीडपट वाढवली. 39 00:02:22,637 --> 00:02:23,533 त्यानंतर 40 00:02:23,533 --> 00:02:28,393 काही मोठ्या मुलांबरोबर वाचनाचे गट चालविले. 41 00:02:28,393 --> 00:02:30,111 या अनुभवानंतर, 42 00:02:30,111 --> 00:02:34,831 मला काही क्षण का होईना शिक्षक झाल्याचा अभिमान वाटला. 43 00:02:34,831 --> 00:02:38,203 त्यात माझे वय व मी कोणत्या वर्गात शिकते याचे महत्व नव्हते 44 00:02:38,203 --> 00:02:40,184 माझा तुम्हा सर्वाना एक प्रश्न आहे. 45 00:02:40,184 --> 00:02:43,803 तुम्हाला काही छंद,आवड आहे ? 46 00:02:43,803 --> 00:02:47,281 मला वाटते असेल. मलाही असे खूप छंद आहेत. 47 00:02:47,281 --> 00:02:51,719 जसे विणकाम, स्वयंपाक, बागकाम, चित्रकला 48 00:02:51,719 --> 00:02:55,970 या सर्व गोष्टी मी वेगवेगळ्या शिक्षकापासून शिकले. 49 00:02:55,970 --> 00:02:59,445 मि. फरहान यांनी बागकाम शिकविले. 50 00:02:59,445 --> 00:03:02,315 त्यांनी मला पर्माकल्चर नावाच्या बागकामपद्धतीविषयी ज्ञान दिले. 51 00:03:02,315 --> 00:03:07,125 आजकाल मी झाडे वाढवण्याच्या अक्वापॉनिक्स नावाच्या नवीन पद्धतीविषयी शिकत आहे. 52 00:03:07,125 --> 00:03:09,806 आईने मला पाककृती शिकविली 53 00:03:09,806 --> 00:03:13,312 तिने मला स्वावलंबी केले तिच्या अनुपस्थितीत. 54 00:03:13,312 --> 00:03:15,475 तुमच्या लक्षात आले असेल पण यापैकी कोणीही 55 00:03:15,475 --> 00:03:17,541 शिक्षक म्हणून काम करीत नव्हते. 56 00:03:17,541 --> 00:03:19,998 पण ते एका अर्थाने शिक्षकच होते. 57 00:03:19,998 --> 00:03:24,237 आठवा, तुमच्या जीवनात असे शिक्षक कोण होते? 58 00:03:24,237 --> 00:03:26,558 मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आठवतील ! 59 00:03:26,558 --> 00:03:27,519 माझ्या परिसरात, 60 00:03:27,519 --> 00:03:31,604 खूप लोक खूप गोष्टी करतात आणि मी त्यांच्यापासून ते शिकते. 61 00:03:31,604 --> 00:03:36,186 कचरा गाडीवाले, सफाई करणारे 62 00:03:36,186 --> 00:03:39,945 सुतार कामाचे गणित पाककला घरातील महिलांपासून 63 00:03:39,945 --> 00:03:43,317 दुकानदारापासून धंदा करणे 64 00:03:43,317 --> 00:03:47,897 पण आपण कधी विचार केला आहे यांच्या पासून आपण शिकू शकतो. 65 00:03:47,897 --> 00:03:51,703 नाही कारण त्यात आपले वय, लिंग, व्यवसाय आड येतो. 66 00:03:51,703 --> 00:03:53,295 ते काही शिकवीत नसतात 67 00:03:53,295 --> 00:03:56,684 पण त्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो. 68 00:03:56,684 --> 00:03:59,054 माझा ठाम विश्वास आहे प्रत्येक जण शिक्षक असतो. 69 00:03:59,054 --> 00:04:01,075 माझ्या प्रमाणे तुम्हीही शिक्षक आहात. 70 00:04:01,075 --> 00:04:05,033 आपला व्यवसाय कोणताही असो वय कितीही असो स्त्री व पुरुष कोणीही असा 71 00:04:05,033 --> 00:04:08,707 जर तुम्ही हा दृष्टिकोन स्वीकारला 72 00:04:08,707 --> 00:04:12,339 मला खात्री आहे एक दिवस आपण परिपूर्ण होऊ 73 00:04:12,339 --> 00:04:13,749 आभारी आहे.