प्रत्येक जण शिक्षक असतो, अगदी तुम्हीही - आशिया कुमारी, शिक्षक
-
0:07 - 0:11लहानपणी नऊ वर्षाची असताना
मला शिक्षक व्हावेसे वाटे. -
0:11 - 0:13शिक्षक वर्गात उभे राहून शिकवितात.
-
0:13 - 0:16त्यांचे शिकवणे विद्यार्थी ऐकत असतात.
-
0:16 - 0:20गरीब मुलांच्या शाळेत मी शिकले,
-
0:20 - 0:23तेथे मी पाहिले
अनेकांना अभ्यासात रस नसायचा. -
0:23 - 0:26काहींचे वर्गात लक्ष नसायचे.
-
0:26 - 0:29काही तर चक्क शाळेस दांडी मारीत,
-
0:29 - 0:33या सगळ्यांचे शिक्षकांवर दडपण असायचे.
-
0:33 - 0:35मला प्रश्न पडे :
-
0:35 - 0:38किती आव्हानात्मक आहे शिक्षकाचे काम
-
0:38 - 0:41वर्गातील चाळीस मुलांच्या
भवितव्याच्या जबाबदारीचे -
0:41 - 0:44मला प्रश्न पडे
का शिक्षकावर मुलांनी अवलंबून रहावे ? -
0:44 - 0:48मुले केव्हा जाणतील
त्यांच्यातच एक शिक्षक लपलेला आहे -
0:48 - 0:51मला याविषयी काही करावेसे वाटले
-
0:51 - 0:56मी ठरविले शक्य असलेली
सर्व मद्त शिक्षकांना करायची. -
0:56 - 1:00त्यासाठी मी रोजची हजेरी घेत असे.
-
1:00 - 1:02फळ्यावर तारीख. विषय इत्यादी लिहून ठेवी.
-
1:02 - 1:04सरावाच्या काळात,
-
1:04 - 1:08अभ्यासात कच्च्या मुलांचा गृहपाठ घेत असे.
-
1:08 - 1:10माझी शिक्षिका रजा घेत असे तेव्हा
-
1:10 - 1:15टेलीफोनवरून वर्गात काय करायचे
त्याच्या सूचना घेई. -
1:15 - 1:21वर्ग प्रतिनिधींशी चर्चा करून
मी नवे शब्द शिकवायची. -
1:21 - 1:25काही गणितं सोडवून घ्यायची,
कधीकधी गृहपाठदेखील. -
1:25 - 1:28अनेकांनी कालांतराने मदतीस सुरवात केली
-
1:28 - 1:33हळूहळू आम्ही आमची स्वतःची शिकविण्याची
शैली निर्माण केली. -
1:33 - 1:38हे काही काळ चालले, पण आम्हाला
अधिक काही करायचे होते. -
1:38 - 1:42माझ्या काही मित्रांना वाचन
परिच्छेदाचे सारग्रहण यासाठी मदत लागायची. -
1:42 - 1:45मी व माही मैत्रीण पिंकी वाचन वेड्या होतो.
-
1:45 - 1:48आम्ही एक वाचन गट तयार केला.
-
1:48 - 1:51त्यात चौथी ते ६ वी चे विद्यार्थी होते.
-
1:51 - 1:54त्यातील बहुतेकांची वाचनाची गती मंद होती.
-
1:54 - 1:58आम्ही त्यांना पुस्तके दिली, ज्यात चित्रे
जास्त पण कमी शब्दात माहिती होती. -
1:58 - 2:00त्यांनी ही पुस्तके वाचू शकल्यानंतर
-
2:00 - 2:05आम्ही अधिक शब्द असलेली सचित्र पुस्तके
जरा अधिक काठीण्य पातळीची दिली. -
2:05 - 2:08पुस्तकातील व्यक्ती त्यांचे स्वभाव
यावर त्यांच्याशी चर्चा केली. -
2:08 - 2:12पुस्तकातील मुख्य घटना
वर कथा यावर चर्चा केली, -
2:12 - 2:17आमच्या वर्ग शिक्षकांनी त्यांची परीक्षा
त्यांच्यात घेतल्यावर सुधारणा दिसली. -
2:17 - 2:23एकाने तर वाचनाची गती
महिनाभरात दीडपट वाढवली. -
2:23 - 2:24त्यानंतर
-
2:24 - 2:28काही मोठ्या मुलांबरोबर वाचनाचे गट चालविले.
-
2:28 - 2:30या अनुभवानंतर,
-
2:30 - 2:35मला काही क्षण का होईना
शिक्षक झाल्याचा अभिमान वाटला. -
2:35 - 2:38त्यात माझे वय व मी कोणत्या वर्गात शिकते
याचे महत्व नव्हते -
2:38 - 2:40माझा तुम्हा सर्वाना एक प्रश्न आहे.
-
2:40 - 2:44तुम्हाला काही छंद,आवड आहे ?
-
2:44 - 2:47मला वाटते असेल. मलाही असे खूप छंद आहेत.
-
2:47 - 2:52जसे विणकाम, स्वयंपाक, बागकाम, चित्रकला
-
2:52 - 2:56या सर्व गोष्टी मी वेगवेगळ्या
शिक्षकापासून शिकले. -
2:56 - 2:59मि. फरहान यांनी बागकाम शिकविले.
-
2:59 - 3:02त्यांनी मला पर्माकल्चर नावाच्या
बागकामपद्धतीविषयी ज्ञान दिले. -
3:02 - 3:07आजकाल मी झाडे वाढवण्याच्या अक्वापॉनिक्स
नावाच्या नवीन पद्धतीविषयी शिकत आहे. -
3:07 - 3:10आईने मला पाककृती शिकविली
-
3:10 - 3:13तिने मला स्वावलंबी केले
तिच्या अनुपस्थितीत. -
3:13 - 3:15तुमच्या लक्षात आले असेल पण यापैकी कोणीही
-
3:15 - 3:18शिक्षक म्हणून काम करीत नव्हते.
-
3:18 - 3:20पण ते एका अर्थाने शिक्षकच होते.
-
3:20 - 3:24आठवा, तुमच्या जीवनात असे शिक्षक कोण होते?
-
3:24 - 3:27मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आठवतील !
-
3:27 - 3:28माझ्या परिसरात,
-
3:28 - 3:32खूप लोक खूप गोष्टी करतात
आणि मी त्यांच्यापासून ते शिकते. -
3:32 - 3:36कचरा गाडीवाले, सफाई करणारे
-
3:36 - 3:40सुतार कामाचे गणित
पाककला घरातील महिलांपासून -
3:40 - 3:43दुकानदारापासून धंदा करणे
-
3:43 - 3:48पण आपण कधी विचार केला आहे
यांच्या पासून आपण शिकू शकतो. -
3:48 - 3:52नाही कारण त्यात आपले वय,
लिंग, व्यवसाय आड येतो. -
3:52 - 3:53ते काही शिकवीत नसतात
-
3:53 - 3:57पण त्यांच्याकडून आपण खूप काही शिकू शकतो.
-
3:57 - 3:59माझा ठाम विश्वास आहे
प्रत्येक जण शिक्षक असतो. -
3:59 - 4:01माझ्या प्रमाणे तुम्हीही शिक्षक आहात.
-
4:01 - 4:05आपला व्यवसाय कोणताही असो
वय कितीही असो स्त्री व पुरुष कोणीही असा -
4:05 - 4:09जर तुम्ही हा दृष्टिकोन स्वीकारला
-
4:09 - 4:12मला खात्री आहे एक दिवस आपण परिपूर्ण होऊ
-
4:12 - 4:14आभारी आहे.
- Title:
- प्रत्येक जण शिक्षक असतो, अगदी तुम्हीही - आशिया कुमारी, शिक्षक
- Description:
-
प्रत्येकात एक शिक्षक लपलेला असतो. फक्त पाहण्याची दृष्टी लागते. आपल्या सभोवतालच्या कोणाकडूनही आपण त्याला जे येते ते शिकू शकंतो. त्यासाठी आपले वय, व्यवसाय, लिंग आड येता कामा नये TEDEd चा हा पाठ आशिया कुमारी यांनी तयार केला आहे.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:19
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari | |
![]() |
Smita Kantak accepted Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari | |
![]() |
Smita Kantak edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Everyone is a teacher, including you - Ashiya Kumari |