-
अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | पाया तयार करणे
-
वाळूच्या शिल्पात, अपयश हा
या प्रोग्रॅमचाच एक भाग आहे,
-
हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्ही त्याची
अपेक्षा ठेवली पाहिजे, त्यासाठी नियोजन केले पाहिजे,
-
पण जर तुम्ही चिकाटी दाखवलीत तर हे तुमच्यासाठी
जास्त चांगले आणि जास्त आकर्षक होणार आहे. या
-
खेळाचे नाव आहे, चिकाटी ठेवा आणि तुम्हाला ते आवडेल.
-
हा धड्याचे "पाया बांधणे" असे नाव आहे.
-
या धड्यात, आपण अतिशय अवघड गोष्टीवर काम करणार आहोत.
-
तुम्ही या पैकी एका कपाइतक्या उंचीची रचना
कशी करायची याचा विचार कराल.
-
आणि ही रचना एका पुस्तकाचे वजन सहन करता
येण्याइतकी मजबूत असली पाहिजे.
-
नाही. नाही. अंहं...नाही.
-
कधीकधी असे होईल की आपली रचना
बरोबर होणार नाही.
-
अरे! हे पडलं. पण परत करूया.
-
माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे! पण मला
अजून थोडा डिंक हवा आहे.
-
कधीकधी आपल्याला वैताग येतो आणि
आपल्याला सोडून द्यावंसं वाटतं.
-
कधीकधी असे खूप क्षण येऊ शकतात. (वैताग) मला जमत नाहीये! पण जर आपण प्रयत्न करत राहिलो
-
तर, आपला चांगला प्रयत्न पुन्हा पुन्हा करत राहिलो तर
आपण लवकरच तिथं पोचू अशी आपल्याला खात्री आहे. जमलं!
-
चिकाटी म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट सोडून द्यावीशी वाटत असताना टिकून राहणे.
-
जर तुम्हाला एखादी नवीन आणि वेगळी गोष्ट तयार करायची असेल, तर त्या मार्गात अनेक समस्या येणार.
-
चिकाटीसाठी युक्ती म्हणजे वैतागून सोडून देण्याऐवजी चालू ठेवण्याची निवड करणे आणि
-
आपल्या अपयशातून शिकणे. वैताग म्हणजे खरंतर
लवकरच काहीतरी चांगलं घडणार आहे.
-
(या वेळी बरोबर जमेल का?) त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका.