अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | पाया तयार करणे वाळूच्या शिल्पात, अपयश हा या प्रोग्रॅमचाच एक भाग आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्ही त्याची अपेक्षा ठेवली पाहिजे, त्यासाठी नियोजन केले पाहिजे, पण जर तुम्ही चिकाटी दाखवलीत तर हे तुमच्यासाठी जास्त चांगले आणि जास्त आकर्षक होणार आहे. या खेळाचे नाव आहे, चिकाटी ठेवा आणि तुम्हाला ते आवडेल. हा धड्याचे "पाया बांधणे" असे नाव आहे. या धड्यात, आपण अतिशय अवघड गोष्टीवर काम करणार आहोत. तुम्ही या पैकी एका कपाइतक्या उंचीची रचना कशी करायची याचा विचार कराल. आणि ही रचना एका पुस्तकाचे वजन सहन करता येण्याइतकी मजबूत असली पाहिजे. नाही. नाही. अंहं...नाही. कधीकधी असे होईल की आपली रचना बरोबर होणार नाही. अरे! हे पडलं. पण परत करूया. माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे! पण मला अजून थोडा डिंक हवा आहे. कधीकधी आपल्याला वैताग येतो आणि आपल्याला सोडून द्यावंसं वाटतं. कधीकधी असे खूप क्षण येऊ शकतात. (वैताग) मला जमत नाहीये! पण जर आपण प्रयत्न करत राहिलो तर, आपला चांगला प्रयत्न पुन्हा पुन्हा करत राहिलो तर आपण लवकरच तिथं पोचू अशी आपल्याला खात्री आहे. जमलं! चिकाटी म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट सोडून द्यावीशी वाटत असताना टिकून राहणे. जर तुम्हाला एखादी नवीन आणि वेगळी गोष्ट तयार करायची असेल, तर त्या मार्गात अनेक समस्या येणार. चिकाटीसाठी युक्ती म्हणजे वैतागून सोडून देण्याऐवजी चालू ठेवण्याची निवड करणे आणि आपल्या अपयशातून शिकणे. वैताग म्हणजे खरंतर लवकरच काहीतरी चांगलं घडणार आहे. (या वेळी बरोबर जमेल का?) त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका.