-
आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात,
ती आपण शिकणार आहोत, तिला
-
इव्हेंट्स म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की
-
प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही उदाहरणं
द्यायची तर, माऊस क्लिक,
-
अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं.
इथे आपण स्पेस बॉटवर प्लेयरनं क्लिक केलं की
-
त्याला पृथ्वीवासियांना अभिवादन करायला लावू.
आपण "when clicked" ब्लॉक वापरू
-
आणि त्याला "say" ब्लॉक जोडू. जेव्हा प्लेयर स्पेस बॉटवर क्लिक करेल तेव्हा, या "when clicked"
-
इव्हेंट ब्लॉकला जोडलेलं सगळं काही केलं जाईल.
तुमचा परग्रहवासी काय म्हणतोय?
-
इथं "when arrow" ब्लॉक्ससुद्धा आहेत. जर तुम्ही "move" ब्लॉक्स त्याला जोडलेत, तर तुम्ही
-
या कलाकारांना वर, खाली, डावीकडं, उजवीकडं हलवू शकता. हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय.
-
माझ्यासाठी, गेम कंपनी सुरू करण्याचं एक कारण
मला गेम्स तयार करायचे होते, हे होतं.
-
लोकांना आवडेल, खेळता येईल आणि मजा करता येईल
असं काहीतरी मला तयार करायचं होतं.
-
ज्या मुलांना काहीतरी करायचंय आणि कॉम्प्युटर सायन्स शिकायचंय त्यांना माझा सल्ला आहे, काहीतरी करायला सुरू करा.
-
खेळून बघा. आणि तुम्हाला थोडंसं असुरक्षित
वाटेल किंवा भीती वाटेल, पण ते ठीक आहे.
-
थोडासा जास्त अनुभव असलेला मित्र/मैत्रिण
शोधा. व्हिडीओ ट्युटोरीयल्स बघा.
-
त्यात उडी घ्या आणि काहीतरी तयार करायचा प्रयत्न करा. "हे फारच साधं दिसतंय का?" असं वाटलं तरी.
-
किंवा ते पाहून तुम्हाला वाटलं "मी हे तर कुठंही जाऊन खेळू शकतो." तरीही.
-
आपल्या स्वत:च्या विचारातून ठरवलेलं काहीतरी
करण्याचा प्रयत्न करायची कृती हा अतिशय
-
मजेशीर अनुभव आहे. मी लोकांना काहीतरी
करायला प्रोत्साहन देतो. तेच सर्वांत महत्त्वाचं आहे.