डेरेक सिवर्स : विचित्र की केवळ वेगळं?
-
0:00 - 0:04अशी कल्पना करा की तुम्ही अमेरिकेमध्ये कुठेही, एका रस्त्यावर उभे आहात.
-
0:04 - 0:07एक जपानी माणुस तुमच्यापाशी येतो आणि विचारतो,
-
0:07 - 0:09“Excuse me, जरा या प्रभागाचं नाव सांगता का?”
-
0:09 - 0:13आणि तुम्ही म्हणता, “माफ करा. पण हा ओक मार्ग आहे आणि तो एल्म रस्ता आहे.
-
0:13 - 0:15ही आहे २६वी गल्ली आणि ती २७वी.”
-
0:15 - 0:17तो म्हणतो, “बरं. ठीक आहे. पण त्या प्रभागाचं नाव काय आहे?”
-
0:17 - 0:20तुम्ही म्हणता, “असं पहा की, प्रभागांना नावं नसतात.
-
0:20 - 0:22रस्त्यांना नावं असतात; प्रभाग म्हणजे केवळ
-
0:22 - 0:24रस्त्यांच्या मधल्या निनावी जागा.”
-
0:24 - 0:28तो किंचित गोंधळून, निराश होऊन निघून जातो.
-
0:28 - 0:31आता कल्पना करा की, तुम्ही जपानमध्ये कुठेही, रस्त्यावर उभे आहात.
-
0:31 - 0:33शेजारीच उभ्या असलेल्या माणसाकडे तुम्ही वळता आणि विचारता,
-
0:33 - 0:35“Excuse me, जरा या रस्त्याचं नाव सांगता का?”
-
0:35 - 0:39तो म्हणतो, “असा पहा, तो आहे प्रभाग सतरा आणि हा आहे प्रभाग सोळा.”
-
0:39 - 0:42मग तुम्ही म्हणता, “ते ठीक आहे. पण या रस्त्याचं नाव काय आहे?”
-
0:42 - 0:44यावर तो म्हणतो, “असं पहा की, रस्त्यांना नावं नसतात.
-
0:44 - 0:46प्रभागांना नावं असतात.
-
0:46 - 0:50इथे या गुगल नकाशावरच बघा. तो आहे प्रभाग चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस.
-
0:50 - 0:52या सर्व प्रभागांना नावं आहेत.
-
0:52 - 0:56रस्ते म्हणजे केवळ प्रभागांच्या मधल्या निनावी जागा.”
-
0:56 - 0:59आणि यावर तुम्ही म्हणता, “ठीक. पण मग तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता कसा कळतो?”
-
0:59 - 1:02तो म्हणतो, “सोप्पं आहे. हा आहे जिल्हा क्रमांक आठ.
-
1:02 - 1:05तो आहे प्रभाग सतरा, घर नंबर एक.”
-
1:05 - 1:07तुम्ही म्हणता, “ठीकच आहे. पण या वस्तीतून फिरताना
-
1:07 - 1:09माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, घरांचे क्रमांक सलग नाहीयेत.”
-
1:09 - 1:12तो म्हणतो, “नक्कीच आहेत. ज्या क्रमाने घरं बांधली त्या क्रमाने सलगच आहेत.
-
1:12 - 1:15प्रभागामध्ये सर्वात प्रथम बांधलेल्या घराचा क्रमांक आहे एक.
-
1:15 - 1:18दुसऱ्या बांधलेल्या घरचा क्रमांक आहे दोन.
-
1:18 - 1:20तिसऱ्याचा क्रमांक आहे तीन. सोप्पं आहे. अगदी सहाजिक.”
-
1:20 - 1:23म्हणूनच मला असं आवडतं की, कधीकधी
-
1:23 - 1:25आपल्याला जगाच्या विरुद्ध बाजूस जावं लागतं
-
1:25 - 1:27हे कळण्यासाठी की, आपण नकळत गृहीत धरलेल्या गोष्टींच्या,
-
1:27 - 1:30थेट विरुद्ध धारणादेखील सत्य असू शकतात.
-
1:30 - 1:32उदाहरणार्थ, चीनमध्ये असे डॉक्टर्स आहेत
-
1:32 - 1:35ज्यांना असं वाटतं की, तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवणं हे त्याचं काम आहे.
-
1:35 - 1:37म्हणून तुम्ही ठणठणीत असाल त्या महिन्यात तुम्ही त्यांना पैसे द्यायचे,
-
1:37 - 1:39आणि जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा पैसे द्यायचे नाहीत कारण त्यांच्या कामात ते अयशस्वी ठरले.
-
1:39 - 1:41तुम्ही ठणठणीत असताना ते श्रीमंत होत जाणार, तुम्ही आजारी असताना नाही.
-
1:41 - 1:44(टाळ्या)
-
1:44 - 1:46बहुतांशी सर्व संगीतात आपण "एक" या अंकाला
-
1:46 - 1:50सम मानतो, कोणत्याही संगीत रचनेची सुरुवात. एक, दोन, तीन, चार.
-
1:50 - 1:52पण पश्चिम आफ्रिकेतल्या संगीतात "एक"
-
1:52 - 1:54म्हणजे रचनेचा शेवट मानतात.
-
1:54 - 1:56जणू काही, वाक्याच्या शेवटी येणारा पूर्णविराम.
-
1:56 - 1:58म्हणून फक्त रचनेतच नव्हे तर, ज्यापद्धतीने ते ठेका मोजतात त्यातही हे आढळून येतं.
-
1:58 - 2:01दोन, तीन, चार, एक.
-
2:01 - 2:04आणि हा नकाशासुद्धा अचूकच आहे.
-
2:04 - 2:06(हशा)
-
2:06 - 2:09असं म्हणतात की, भारताबाबत जे विधान सत्य समजलं जातं,
-
2:09 - 2:11त्याच्या विरुद्धार्थी गोष्टदेखील तितकीच सत्य असते.
-
2:11 - 2:13म्हणूनच या TED च्या मंचावर किंवा इतरत्र कुठेही, हे विसरून चालणार नाही
-
2:13 - 2:16की, तुम्ही ज्या काही अभिनव कल्पना बाळगता किंवा ऐकता,
-
2:16 - 2:18त्यांच्या विरुद्ध कल्पनाही तेवढ्याच खऱ्या असू शकतात.
-
2:18 - 2:20दोमो आरीगातो गोझाईमाशिता. (जपानीमध्ये "धन्यवाद!")
- Title:
- डेरेक सिवर्स : विचित्र की केवळ वेगळं?
- Speaker:
- Derek Sivers
- Description:
-
"प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते." अशी एक म्हण आहे, आणि दोन मिनिटात डेरेक सिवर्स हे दाखवून देतात की, तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा काही गोष्टींबाबतदेखील ही म्हण सत्यात उतरते.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 02:21