WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:04.000 अशी कल्पना करा की तुम्ही अमेरिकेमध्ये कुठेही, एका रस्त्यावर उभे आहात. 00:00:04.000 --> 00:00:07.000 एक जपानी माणुस तुमच्यापाशी येतो आणि विचारतो, NOTE Paragraph 00:00:07.000 --> 00:00:09.000 “Excuse me, जरा या प्रभागाचं नाव सांगता का?” NOTE Paragraph 00:00:09.000 --> 00:00:13.000 आणि तुम्ही म्हणता, “माफ करा. पण हा ओक मार्ग आहे आणि तो एल्म रस्ता आहे. 00:00:13.000 --> 00:00:15.000 ही आहे २६वी गल्ली आणि ती २७वी.” NOTE Paragraph 00:00:15.000 --> 00:00:17.000 तो म्हणतो, “बरं. ठीक आहे. पण त्या प्रभागाचं नाव काय आहे?” NOTE Paragraph 00:00:17.000 --> 00:00:20.000 तुम्ही म्हणता, “असं पहा की, प्रभागांना नावं नसतात. 00:00:20.000 --> 00:00:22.000 रस्त्यांना नावं असतात; प्रभाग म्हणजे केवळ 00:00:22.000 --> 00:00:24.000 रस्त्यांच्या मधल्या निनावी जागा.” NOTE Paragraph 00:00:24.000 --> 00:00:28.000 तो किंचित गोंधळून, निराश होऊन निघून जातो. NOTE Paragraph 00:00:28.000 --> 00:00:31.000 आता कल्पना करा की, तुम्ही जपानमध्ये कुठेही, रस्त्यावर उभे आहात. 00:00:31.000 --> 00:00:33.000 शेजारीच उभ्या असलेल्या माणसाकडे तुम्ही वळता आणि विचारता, NOTE Paragraph 00:00:33.000 --> 00:00:35.000 “Excuse me, जरा या रस्त्याचं नाव सांगता का?” NOTE Paragraph 00:00:35.000 --> 00:00:39.000 तो म्हणतो, “असा पहा, तो आहे प्रभाग सतरा आणि हा आहे प्रभाग सोळा.” NOTE Paragraph 00:00:39.000 --> 00:00:42.000 मग तुम्ही म्हणता, “ते ठीक आहे. पण या रस्त्याचं नाव काय आहे?” NOTE Paragraph 00:00:42.000 --> 00:00:44.000 यावर तो म्हणतो, “असं पहा की, रस्त्यांना नावं नसतात. 00:00:44.000 --> 00:00:46.000 प्रभागांना नावं असतात. 00:00:46.000 --> 00:00:50.000 इथे या गुगल नकाशावरच बघा. तो आहे प्रभाग चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस. 00:00:50.000 --> 00:00:52.000 या सर्व प्रभागांना नावं आहेत. 00:00:52.000 --> 00:00:56.000 रस्ते म्हणजे केवळ प्रभागांच्या मधल्या निनावी जागा.” NOTE Paragraph 00:00:56.000 --> 00:00:59.000 आणि यावर तुम्ही म्हणता, “ठीक. पण मग तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता कसा कळतो?” NOTE Paragraph 00:00:59.000 --> 00:01:02.000 तो म्हणतो, “सोप्पं आहे. हा आहे जिल्हा क्रमांक आठ. 00:01:02.000 --> 00:01:05.000 तो आहे प्रभाग सतरा, घर नंबर एक.” NOTE Paragraph 00:01:05.000 --> 00:01:07.000 तुम्ही म्हणता, “ठीकच आहे. पण या वस्तीतून फिरताना 00:01:07.000 --> 00:01:09.000 माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, घरांचे क्रमांक सलग नाहीयेत.” NOTE Paragraph 00:01:09.000 --> 00:01:12.000 तो म्हणतो, “नक्कीच आहेत. ज्या क्रमाने घरं बांधली त्या क्रमाने सलगच आहेत. 00:01:12.000 --> 00:01:15.000 प्रभागामध्ये सर्वात प्रथम बांधलेल्या घराचा क्रमांक आहे एक. 00:01:15.000 --> 00:01:18.000 दुसऱ्या बांधलेल्या घरचा क्रमांक आहे दोन. 00:01:18.000 --> 00:01:20.000 तिसऱ्याचा क्रमांक आहे तीन. सोप्पं आहे. अगदी सहाजिक.” NOTE Paragraph 00:01:20.000 --> 00:01:23.000 म्हणूनच मला असं आवडतं की, कधीकधी 00:01:23.000 --> 00:01:25.000 आपल्याला जगाच्या विरुद्ध बाजूस जावं लागतं 00:01:25.000 --> 00:01:27.000 हे कळण्यासाठी की, आपण नकळत गृहीत धरलेल्या गोष्टींच्या, 00:01:27.000 --> 00:01:30.000 थेट विरुद्ध धारणादेखील सत्य असू शकतात. NOTE Paragraph 00:01:30.000 --> 00:01:32.000 उदाहरणार्थ, चीनमध्ये असे डॉक्टर्स आहेत 00:01:32.000 --> 00:01:35.000 ज्यांना असं वाटतं की, तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवणं हे त्याचं काम आहे. 00:01:35.000 --> 00:01:37.000 म्हणून तुम्ही ठणठणीत असाल त्या महिन्यात तुम्ही त्यांना पैसे द्यायचे, 00:01:37.000 --> 00:01:39.000 आणि जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा पैसे द्यायचे नाहीत कारण त्यांच्या कामात ते अयशस्वी ठरले. 00:01:39.000 --> 00:01:41.000 तुम्ही ठणठणीत असताना ते श्रीमंत होत जाणार, तुम्ही आजारी असताना नाही. 00:01:41.000 --> 00:01:44.000 (टाळ्या) NOTE Paragraph 00:01:44.000 --> 00:01:46.000 बहुतांशी सर्व संगीतात आपण "एक" या अंकाला 00:01:46.000 --> 00:01:50.000 सम मानतो, कोणत्याही संगीत रचनेची सुरुवात. एक, दोन, तीन, चार. 00:01:50.000 --> 00:01:52.000 पण पश्चिम आफ्रिकेतल्या संगीतात "एक" 00:01:52.000 --> 00:01:54.000 म्हणजे रचनेचा शेवट मानतात. 00:01:54.000 --> 00:01:56.000 जणू काही, वाक्याच्या शेवटी येणारा पूर्णविराम. 00:01:56.000 --> 00:01:58.000 म्हणून फक्त रचनेतच नव्हे तर, ज्यापद्धतीने ते ठेका मोजतात त्यातही हे आढळून येतं. 00:01:58.000 --> 00:02:01.000 दोन, तीन, चार, एक. NOTE Paragraph 00:02:01.000 --> 00:02:04.000 आणि हा नकाशासुद्धा अचूकच आहे. 00:02:04.000 --> 00:02:06.000 (हशा) NOTE Paragraph 00:02:06.000 --> 00:02:09.000 असं म्हणतात की, भारताबाबत जे विधान सत्य समजलं जातं, 00:02:09.000 --> 00:02:11.000 त्याच्या विरुद्धार्थी गोष्टदेखील तितकीच सत्य असते. 00:02:11.000 --> 00:02:13.000 म्हणूनच या TED च्या मंचावर किंवा इतरत्र कुठेही, हे विसरून चालणार नाही 00:02:13.000 --> 00:02:16.000 की, तुम्ही ज्या काही अभिनव कल्पना बाळगता किंवा ऐकता, 00:02:16.000 --> 00:02:18.000 त्यांच्या विरुद्ध कल्पनाही तेवढ्याच खऱ्या असू शकतात. 00:02:18.000 --> 00:02:20.000 दोमो आरीगातो गोझाईमाशिता. (जपानीमध्ये "धन्यवाद!")