डिस्ने इन्फिनिटी प्ले लॅब - प्रस्तावना
-
0:02 - 0:09मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता.
पहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग -
0:10 - 0:17करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा
पहिला कॉम्प्युटर मिळाला. -
0:17 - 0:21मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही
स्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी -
0:21 - 0:27बनवू शकता. संगणक शास्त्र हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी
-
0:27 - 0:31आणि व्यावसायिक पुढची वीस किंवा तीस वर्षे
करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला -
0:31 - 0:37लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचं आयुष्य
सोपं करेल असं काहीतरी बनवण्याची संधी मिळते. -
0:37 - 0:41मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची
गोष्ट आहे. सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. -
0:41 - 0:48मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर
शिकावं असं मला वाटतं. -
0:48 - 0:52मी जॉन विची. मी पॉपकॅप गेम्सच्या संस्थापकांपैकी
एक आहे. आम्ही प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज, बीज्वेल्ड, -
0:52 - 0:58आणि पेगल असे गेम्स तयार करतो. गेम्समध्ये तुमचा कोड किती परिपूर्ण आहे हे महत्त्वाचं नसतं तर तुमची
-
0:58 - 1:02कला किती परिपूर्ण आहे, ते असतं. गेम कसा वाटतो आणि त्यात किती मजा येते आहे, हे महत्त्वाचं. त्याचा अंदाज
-
1:02 - 1:06तुम्हाला प्रयत्न करून, करून बघून, शिकून आणि जुळवून घेऊन आणि गेम्स तयार करायची तुमची
-
1:06 - 1:11स्वत:ची कौशल्ये पुन्हा पुन्हा वापरून येईल. तुमचा
कुठला आवडता व्हिडीओ गेम आहे का? आता आपण -
1:11 - 1:17प्ले लॅब वापरून तसेच गेम तयार करण्याच्या दिशेत एक पाऊल टाकणार आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट
-
1:17 - 1:23असते. आणि गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार
बोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात, -
1:23 - 1:28कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी
-
1:28 - 1:34एक एक शिकणार आहोत, डिस्नेची अॅना, एल्सा, हिरो, बेमॅक्स, आणि रापुन्झेल अशा पात्रांबरोबर. आपण
-
1:34 - 1:40अगदी सुरुवातीपासून गेम तयार करू. तो शेअर करता येईल आणि तुमच्या फोनवर खेळता येईल. तुमच्या
-
1:40 - 1:45स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे गेमस्पेस आहे,
तिथे प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या -
1:45 - 1:51सूचना खाली दिलेल्या आहेत. मधला भाग म्हणजे
टूल बॉक्स आहे. आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे -
1:51 - 1:56कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला
वर्कस्पेस म्हणतात, -
1:56 - 2:02आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत.
सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स -
2:02 - 2:07केशरी "when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही
पिवळी रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून -
2:07 - 2:13ते एकत्र जोडू शकता, आणि मग ते एकमेकांना चिकटतील. पहिल्या कोड्यामध्ये हिरो हा पहिला
-
2:13 - 2:19कलाकार आहे आणि बेमॅक्स दुसरा कलाकार आहे. आपल्याला हिरोला बेमॅक्सपर्यंत न्यायचं आहे
-
2:19 - 2:25"move right" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला जोडून. एकदा तुम्ही ब्लॉक व्यवस्थित जोडले
-
2:25 - 2:30की "Run" बटण दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा आणि
-
2:30 - 2:34शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, पॉईंट्स मिळवणारे, मायक्रोबॉट्स, चेरीज, सॉस पॅन्स, स्पार्कल्स, बर्फ
-
2:34 - 2:41फेकणारे...आणि एकमेकांना गायब करणारे असे अनेक अद्भुत कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम
-
2:41 - 2:43तयार करू शकता. काय करायचं,
ते सगळं तुम्ही ठरवायचं!
- Title:
- डिस्ने इन्फिनिटी प्ले लॅब - प्रस्तावना
- Description:
-
डिस्ने इन्फिनिटी प्ले लॅब वापरून तुमचे स्वत:चे व्हिडीओ गेम्स प्रोग्रॅम करा. पॉपकॅप गेम्सचा संस्थापक जॉन विची व्हिडिओ गेम डिझाईनच्या मूलभूत गोष्टींची आणि प्ले लॅब इंटरफेस कसा वापरायचा याची माहिती देत आहे.
- Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- Hour of Code
- Duration:
- 02:45
Tomedes edited Marathi subtitles for Disney Infinity Play Lab - Intro | ||
Tomedes edited Marathi subtitles for Disney Infinity Play Lab - Intro |