मग, कितवीत आहेस तू? दुसरी. दहावी इयत्ता.
पहिली. मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग
करायला शिकलो. मी सहावीत असताना मला माझा
पहिला कॉम्प्युटर मिळाला.
मला लोकांच्या समस्या सोडवायला मजा येते. तुम्ही
स्वत:ला व्यक्त करू शकता, तुम्ही एखाद्या कल्पनेतून गोष्टी
बनवू शकता. संगणक शास्त्र हा अनेक गोष्टींचा पाया आहे, ज्या गोष्टी महाविद्यालयीन विदयार्थी
आणि व्यावसायिक पुढची वीस किंवा तीस वर्षे
करतील. मला प्रोग्रॅमिंग आवडतं कारण मला
लोकांना मदत करायला आवडतं. मला लोकांचं आयुष्य
सोपं करेल असं काहीतरी बनवण्याची संधी मिळते.
मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात जवळची
गोष्ट आहे. सुरुवात करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
मीसुद्धा नवशिकी आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर
शिकावं असं मला वाटतं.
मी जॉन विची. मी पॉपकॅप गेम्सच्या संस्थापकांपैकी
एक आहे. आम्ही प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज, बीज्वेल्ड,
आणि पेगल असे गेम्स तयार करतो. गेम्समध्ये तुमचा कोड किती परिपूर्ण आहे हे महत्त्वाचं नसतं तर तुमची
कला किती परिपूर्ण आहे, ते असतं. गेम कसा वाटतो आणि त्यात किती मजा येते आहे, हे महत्त्वाचं. त्याचा अंदाज
तुम्हाला प्रयत्न करून, करून बघून, शिकून आणि जुळवून घेऊन आणि गेम्स तयार करायची तुमची
स्वत:ची कौशल्ये पुन्हा पुन्हा वापरून येईल. तुमचा
कुठला आवडता व्हिडीओ गेम आहे का? आता आपण
प्ले लॅब वापरून तसेच गेम तयार करण्याच्या दिशेत एक पाऊल टाकणार आहोत. चांगल्या गेम्सना एक गोष्ट
असते. आणि गोष्टीमध्ये कलाकार असतात. कलाकार
बोलतात, हालचाल करतात, एकमेकांशी संवाद साधतात,
कधीकधी त्या गेम्सच्या नियमांनुसार स्कोअर पॉईंट्ससुद्धा असतात. आज आपण या सगळ्या गोष्टी
एक एक शिकणार आहोत, डिस्नेची अॅना, एल्सा, हिरो, बेमॅक्स, आणि रापुन्झेल अशा पात्रांबरोबर. आपण
अगदी सुरुवातीपासून गेम तयार करू. तो शेअर करता येईल आणि तुमच्या फोनवर खेळता येईल. तुमच्या
स्क्रीनचे तीन भाग आहेत. डावीकडे गेमस्पेस आहे,
तिथे प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या
सूचना खाली दिलेल्या आहेत. मधला भाग म्हणजे
टूल बॉक्स आहे. आणि यातील प्रत्येक बॉक्स म्हणजे
कोड आहे. उजवीकडच्या पांढऱ्या भागाला
वर्कस्पेस म्हणतात,
आणि आपण इथे आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत.
सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला तुमचे ब्लॉक्स
केशरी "when run" ब्लॉकला जोडावे लागतील. तुम्ही
पिवळी रेषा दिसेपर्यंत अनेक ब्लॉक्स ओढून
ते एकत्र जोडू शकता, आणि मग ते एकमेकांना चिकटतील. पहिल्या कोड्यामध्ये हिरो हा पहिला
कलाकार आहे आणि बेमॅक्स दुसरा कलाकार आहे. आपल्याला हिरोला बेमॅक्सपर्यंत न्यायचं आहे
"move right" ब्लॉक ओढून आणि तो "when run" ब्लॉकला जोडून. एकदा तुम्ही ब्लॉक व्यवस्थित जोडले
की "Run" बटण दाबून तुम्ही काय प्रोग्रॅम केले आहे, ते पाहा. सुरू करा आणि
शेवटी, तुम्ही संवाद साधणारे, पॉईंट्स मिळवणारे, मायक्रोबॉट्स, चेरीज, सॉस पॅन्स, स्पार्कल्स, बर्फ
फेकणारे...आणि एकमेकांना गायब करणारे असे अनेक अद्भुत कलाकार घेऊन तुमचा स्वत:चा गेम
तयार करू शकता. काय करायचं,
ते सगळं तुम्ही ठरवायचं!