< Return to Video

Unplugged: For Loop Fun

  • 0:20 - 0:25
    या धड्याला लूपची गंमत असे म्हणतात. या धड्यात
    आपण फाशांचा खेळ खेळण्यासाठी संख्या रेखा वापरू.
  • 0:27 - 0:30
    प्रत्येक खेळाडू सुरुवातीचे मूल्य, अंतिम
    मूल्य आणि आपला कालावधी निश्चित
  • 0:30 - 0:32
    करायला तीन वेळा फासा फेकेल.
  • 0:34 - 0:38
    प्रत्येक पाळीच्या वेळी, आपण आपल्या सुरुवातीच्या मूल्याला गोल करू आणि आपल्या
  • 0:38 - 0:40
    कालावधीच्या मूल्याइतक्या पायऱ्या पुढे असलेल्या प्रत्येक मूल्याला आपण गोल करू.
  • 0:42 - 0:44
    जेव्हा आपण आपल्या अंतिम मूल्यापर्यंत पोचू तेव्हा आपण गोळा करणे थांबवू.
  • 0:45 - 0:47
    सर्वांत जास्त गुण असलेली व्यक्ती जिंकेल!
  • 0:48 - 0:50
    अनेक ठिकाणी लूप्स उपयुक्त ठरतात.
  • 0:51 - 0:54
    जर तुम्ही हवामानशास्त्रज्ञ असाल तर तुम्ही
    नेहमी लूप्स वापरता.
  • 1:03 - 1:11
    हाय, मी बेकी आहे. मी एबल ड्रिलर रिन्यूएबल्समध्ये
    वाऱ्याची हवामानशास्त्रज्ञ म्हणून काम करते.
  • 1:12 - 1:19
    मी कंपनीच्या मालकीची विंड फार्म्स असलेल्या कोलंबिया नदीच्या घळईच्या भागासाठी वाऱ्याच्या वेगाचा अंदाज
  • 1:20 - 1:23
    व्यक्त करते. आम्ही किती वारा येणार आहे, हे
    समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
  • 1:24 - 1:27
    म्हणजे आम्हाला किती ऊर्जा तयार होणार आहे, हे समजेल.
  • 1:27 - 1:31
    आम्ही ती माहिती प्रत्यक्ष वेळी ऊर्जेचा व्यापार
    करणाऱ्यांना देतो. आम्ही किती वीज निर्माण
  • 1:32 - 1:36
    होणार आहे, हे त्यांना सांगतो त्यानुसार ते विजेची खरेदी-विक्री करतात.
  • 1:37 - 1:39
    म्हणजे पॉवर ग्रीड संतुलित करता येते, तुमचे दिवे सुरू राहतात,
  • 1:39 - 1:44
    आणि आम्हाला आमच्या विंड फार्म्समधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग होतो.
  • 1:48 - 1:51
    आम्ही पोर्टलँडमध्ये एबर ट्रोलर रीन्यूएबल्सच्या
    राष्ट्रीय नियंत्रण केंद्रात आहोत.
  • 1:51 - 1:56
    आणि इथे आमच्याकडे आमच्या देशभरातील सगळ्या फार्म्समधून माहिती येते.
  • 1:58 - 2:03
    आजचे जगातील सर्वांत ताकदवान कॉम्प्युटर्ससुद्धा सगळीकडे वातावरणाचे सिम्युलेशन करू शकत नाहीत.
  • 2:04 - 2:11
    कॉम्प्युटर वापरून हवामानाचा अंदाज करणाऱ्या मॉडेल्समध्ये ग्रीड असते. प्रत्येक ग्रीड पॉईंट म्हणजे
  • 2:11 - 2:16
    एक अक्षांश आणि रेखांश असतो. आम्हाला भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागतो,
  • 2:16 - 2:20
    आणि वाऱ्याच्या वेगाचा, तापमानाचा, दाबाचा आणि अशा गोष्टींचा अंदाज वर्तवावा लागतो.
  • 2:21 - 2:24
    आमची ग्रीड्स खूप मोठी असल्यामुळे आणि आम्ही
    हे अनेक ठिकाणी करत आहोत.
  • 2:24 - 2:28
    आम्ही या गोष्टी लाखो वेळा पुन्हा पुन्हा लूप करत आहोत.
  • 2:29 - 2:36
    मी जे काही करतो, त्यात मी फॉर लूप्स वापरतो. फॉर लूपचे उदाहरण इथं आहे.
  • 2:38 - 2:44
    जेव्हा तुम्ही वाऱ्याचा अंदाज वर्तवत असता तेव्हा त्यात अनेक घटक असतात,
  • 2:44 - 2:49
    त्यामुळे मानवाने बसून हे सगळे गणित करणे
    अशक्य आहे.
  • 2:52 - 2:56
    वाऱ्यावर ज्यांचा परिणाम होणार आहे, असे अनेक वेगवेगळे घटक आहेत.
  • 2:56 - 3:00
    अंदाज वर्तवण्यासाठी आम्हाला ते कॉम्प्युटर
    मॉडेलमध्ये घालावे लागते.
Title:
Unplugged: For Loop Fun
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
03:03

Marathi subtitles

Revisions