नकाराच्या १०० दिवसांपासून मी काय शिकलो
-
0:01 - 0:02जेव्हा मी सहा वर्षांचा झालो,
-
0:02 - 0:04मला माझ्या भेटवस्तू मिळाल्या.
-
0:04 - 0:08माझ्या पहिलीच्या बाईंची हि एक सुंदर
कल्पना होती. -
0:08 - 0:11त्यांना आम्हांला भेटवस्तू स्वीकारणं
अनुभवू द्यायचं होतं -
0:11 - 0:15पण त्याचवेळी एकमेकांची प्रशंसा करण्याचा
गुणही शिकवायचा होता. -
0:16 - 0:19म्हणून त्या आम्हां सर्वांना
वर्गात पुढे बोलवायच्या, -
0:19 - 0:22आणि आमच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू
कोपऱ्यात रचून ठेवायच्या. -
0:22 - 0:23आणि त्या म्हणायच्या,
-
0:23 - 0:25"आपण इथे उभं राहून एकमेकांची
प्रशंसा का करू नये? -
0:25 - 0:27जर तुमचं नाव पुकारलं गेलं,
-
0:27 - 0:29तर तिथे जाऊन तुमची भेटवस्तू उचला
आणि जागेवर बसा -
0:31 - 0:32किती सुंदर कल्पना, बरोबर?
-
0:33 - 0:34काय चूक घडू शकतं?
-
0:34 - 0:36(हशा)
-
0:36 - 0:38सुरुवातीला आम्ही ४० जण होतो,
-
0:38 - 0:41आणि दरवेळी कुणाचं तरी
नाव पुकारल्याचं ऐकल्यावर, -
0:41 - 0:43मी अगदी मनापासून आनंद व्यक्त करायचो.
-
0:43 - 0:46आणि मग २० जण उरले,
-
0:46 - 0:48आणि १० उरले,
-
0:48 - 0:49आणि पाच उरले...
-
0:50 - 0:51आणि तीन उरले.
-
0:51 - 0:52आणि मी त्यांपैकी एक होतो.
-
0:53 - 0:54आणि प्रशंसोद्गार थांबले.
-
0:56 - 0:58त्याक्षणी, मी रडत होतो.
-
0:59 - 1:01आणि बाईंची अवस्था विचित्र झाली होती.
-
1:01 - 1:04त्या म्हणत होत्या, "अरे, या लोकांबद्दल
कोणी काही चांगलं बोलेल का?" -
1:04 - 1:05(हशा)
-
1:05 - 1:09"कुणीच नाही? ठीक आहे, तुम्ही तुमच्या
भेटवस्तू घेऊन जागेवर का बसत नाही. -
1:09 - 1:10पुढच्या वर्षी नीट वागा --
-
1:10 - 1:12कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं
बोलेल." -
1:12 - 1:14(हशा)
-
1:15 - 1:16हे सगळं वर्णन मी आपल्याला सांगत
-
1:16 - 1:19असताना कदाचित तुम्हांला कळलं असेल कि
हे माझ्या लक्षात आहे. -
1:19 - 1:20(हशा)
-
1:21 - 1:23पण त्यादिवशी नक्की कुणाला वाईट वाटलं हे
ठाऊक -
1:23 - 1:25नाही.
मला का बाईंना? -
1:25 - 1:28त्यांना कळून चुकलं असणार कि एका संघ
उभारणीच्या घटनेचं रूपांतर -
1:28 - 1:31त्यांनी तीन षड्वर्षीय बालकांसाठी
एका जाहीर फजितीत केलं होतं -
1:32 - 1:33आणि विनोदाशिवाय.
असं बघा, -
1:33 - 1:35जेव्हा आपण टीव्हीवर लोकांचा
पाणउतारा झालेला पाहतो, -
1:35 - 1:37ते मजेशीर असतं.
-
1:37 - 1:39त्या दिवसाबद्दल काहीच मजेशीर नव्हतं.
-
1:39 - 1:42ते माझं एक रूप होतं,
-
1:42 - 1:46आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढवण्याऐवजी
मी मरण पत्करेन -- -
1:46 - 1:48जाहीररीत्या नाकारलं जाण्याची परिस्थिती.
-
1:48 - 1:50ते एक रूप आहे.
-
1:50 - 1:52नंतर आठ वर्षांनी पुढे येऊ.
-
1:52 - 1:54बिल गेट्स माझ्या गावी आले होते --
-
1:54 - 1:56बीजींग, चीन --
-
1:56 - 1:57भाषण देण्यासाठी,
-
1:57 - 1:59आणि मी त्यांचा संदेश पाहिला.
-
1:59 - 2:01मी त्या माणसाच्या प्रेमात पडलो.
-
2:01 - 2:04मी विचार केला, वा,
आता मला काय करायचं आहे हे मला कळलंय. -
2:04 - 2:06त्या रात्री मी माझ्या कुटुंबीयांना एक
पत्र -
2:06 - 2:08लिहीलं आणि कळवलं: "२५ वर्षांचा होईस्तोवर,
-
2:08 - 2:11मी जगातील सर्वांत मोठी कंपनी उभारेन,
-
2:11 - 2:13आणि ती कंपनी मायक्रोसॉफ्टला खरेदी करेल."
-
2:13 - 2:15(हशा)
-
2:15 - 2:17जग जिंकण्याच्या या कल्पनेला
मी पूर्णतः अंगीकारलं -- -
2:18 - 2:19वर्चस्व, बरोबर?
-
2:19 - 2:22आणि हि बनवाबनवी नाही,
मी खरंच ते पत्र लिहीलं. -
2:22 - 2:23आणि हे बघा ते --
-
2:23 - 2:25(हशा)
-
2:25 - 2:27तुम्ही ते खरंतर वाचण्याची गरज नाही --
-
2:27 - 2:29(हशा)
-
2:29 - 2:32हे एक खराब हस्ताक्षरदेखील आहे,
पण काही महत्वाचे शब्द मी ठळक केले आहेत -
2:34 - 2:35तुम्हाला कल्पना आलीच असेल
-
2:35 - 2:37(हशा)
-
2:37 - 2:38तर...
-
2:39 - 2:41ते माझं दुसरं रूप होतं:
-
2:41 - 2:43एक जो जगाला जिंकेल.
-
2:44 - 2:45मग दोन वर्षांनंतर,
-
2:45 - 2:49अमेरिकेला येण्याची एक संधी माझ्यासमोर आली.
-
2:49 - 2:51मी त्यावर तुटून पडलो,
-
2:51 - 2:53कारण तिथे बिल गेट्स राहत होते, बरोबर?
-
2:53 - 2:54(हशा)
-
2:54 - 2:57मला वाटलं उद्योजक बनण्याच्या
प्रवासाची ती सुरुवात होती. -
2:58 - 3:00मग, अजून १४ वर्षं पुढे येऊ.
-
3:00 - 3:01मी ३० वर्षांचा होतो.
-
3:01 - 3:04नाही, मी ती कंपनी उभारली नाही.
-
3:04 - 3:05मी सुरुवातदेखील केली नाही.
-
3:05 - 3:09एका फॉर्च्युन ५०० कंपनीत
मी विपणन व्यवस्थापक होतो. -
3:09 - 3:11आणि मला वाटत होतं मी स्थानबद्ध
-
3:11 - 3:12झालो आहे; मी अचल होतो.
-
3:13 - 3:14ते का आहे?
-
3:14 - 3:17ते पत्र लिहिणारा तो
१४ वर्षीय कुठे आहे? त्याने -
3:17 - 3:19प्रयत्न केले नाहीत म्हणून नाही.
-
3:19 - 3:23त्याचं कारण म्हणजे दरवेळी जेव्हा मला
नवीन कल्पना सुचायची तेव्हा, -
3:23 - 3:25दरवेळी जेव्हा मला काहीतरी नवीन आजमावायचं
-
3:25 - 3:26असायचं तेव्हा, कामातही --
-
3:26 - 3:28मला प्रस्ताव मांडायचा असायचा,
-
3:28 - 3:31समूहातील लोकांसमोर मला बोलायचे असायचे --
-
3:31 - 3:33मला वाटतं सतत एक द्वंद्व असायचं
-
3:33 - 3:36१४ वर्षीय आणि सहा वर्षीय मुलामध्ये.
-
3:36 - 3:38एकाला जग जिंकायचं असायचं --
-
3:38 - 3:39बदल घडवायचा असायचा --
-
3:39 - 3:41दुसरा नकारला घाबरायचा.
-
3:42 - 3:44आणि दरवेळी तो सहा वर्षांचा मुलगाच जिंकायचा
-
3:46 - 3:50मी माझी स्वतःची कंपनी सुरु केल्यानंतरही
हि भीती कायम होती. -
3:50 - 3:53म्हणजे, मी ३० वर्षांचा असताना माझी
स्वतःची कंपनी सुरु केली -- जर -
3:53 - 3:54बिल गेट्स व्हायचं असेल
-
3:54 - 3:56तर लवकरात लवकर सुरुवात
करायला हवी, बरोबर? -
3:57 - 4:00मी जेव्हा उद्योजक होतो,
-
4:00 - 4:03तेव्हा मला एक गुंतवणुकीची संधी पेश झाली,
-
4:03 - 4:04आणि नंतर ती नाकारण्यात आली.
-
4:05 - 4:07आणि तो नकार मला खुपला.
-
4:07 - 4:10तो इतका खुपला कि मला
त्याक्षणी त्यातून बाहेर पडावंसं वाटत होतं. -
4:11 - 4:12पण मग मी विचार केला,
-
4:13 - 4:16अरे, एका सध्या गुंतवणुकीच्या नकाराने बिल
गेट्सने हार पत्करली असती का? -
4:17 - 4:20कुठलाही यशस्वी उद्योजक अशी माघार घेईल का?
-
4:20 - 4:21कदापि नाही.
-
4:21 - 4:23आणि तिथेच मला कळून चुकलं.
-
4:23 - 4:25हो, मी एक चांगली कंपनी उभारू शकतो.
-
4:25 - 4:27मी एक चांगला संघ किंवा उत्पादन तयार करू
शकतो, -
4:27 - 4:29पण एक गोष्ट नक्की:
-
4:29 - 4:31मला एक चांगला नेता व्हायला हवं.
-
4:31 - 4:32मला एक चांगला माणूस व्हायला हवं
-
4:33 - 4:36त्या सहा वर्षीय मुलाला मी माझं आयुष्य
यापुढे नाही लिहू देऊ शकत. -
4:36 - 4:38मला त्याला त्याच्या जागी परत पाठवायला हवं.
-
4:39 - 4:41मग या ठिकाणी मी इंटरनेटवर मदतीचा शोध घेतला
-
4:41 - 4:43गुगल माझा मित्र होता.
-
4:43 - 4:44(हशा)
-
4:44 - 4:46मी शोधलं, "मी नकाराच्या भीतीवर
कशी मात करू?" -
4:47 - 4:50मानसशास्त्रीय लेखांचा
एक समूह उत्तरादाखलआला -
4:50 - 4:53भीती आणि वेदनांचे उगमस्थान कोणते हे
सांगणारा. -
4:53 - 4:56मग एक उत्साहवर्धक प्रेरणादायी लेखांचा
समूह उत्तरादाखल आला -
4:56 - 4:58हे सांगणारा "व्यक्तिशः घेऊ नका, त्यावर
मात करा." -
4:59 - 5:01हे कुणाला ठाऊक नाही?
-
5:01 - 5:02(हशा)
-
5:02 - 5:05पण मी अजूनही इतका घाबरलेला का होतो?
-
5:05 - 5:07मग नशिबानेच मला हे संकेतस्थळ सापडलं.
-
5:07 - 5:09त्याचं नाव रिजेक्शनथेरपी डॉट कॉम.
-
5:09 - 5:12(हशा)
-
5:12 - 5:16या कॅनेडियन उद्योजकाने हा "रिजेक्शन थेरपी"
नावाचा खेळ शोधला. -
5:16 - 5:17त्याचे नाव जेसन कोमली.
-
5:17 - 5:22आणि मूलतः कल्पना अशी आहे कि
३० दिवस तुम्ही बाहेर जाऊन नकार शोधायचा, -
5:22 - 5:25आणि रोज कशात तरी नाकारून घ्यायचे,
-
5:25 - 5:28आणि मग अखेरीस तुम्ही स्वतःला,
दुःखाबाबत असंवेदनशील बनवायचे. -
5:29 - 5:31आणि मला ती कल्पना आवडली.
-
5:31 - 5:32(हशा)
-
5:32 - 5:35मी म्हणालो, "तुम्हाला ठाऊक आहे?
मी हे करणार. -
5:35 - 5:38आणि १०० दिवस मी स्वतःला नाकारून घेणार."
-
5:38 - 5:40आणि नाकारून घेण्याच्या
मी स्वतः काही कल्पना लढवल्या -
5:40 - 5:43आणि मी त्याचा एक व्हिडीओ ब्लॉग तयार केला.
-
5:44 - 5:46आणि मी हे केले.
-
5:46 - 5:48ब्लॉग हा साधारण असा होता.
-
5:48 - 5:49पहिला दिवस...
-
5:50 - 5:51(हशा)
-
5:51 - 5:55अनोळखी व्यक्तीकडून १०० डॉलर्स उधार घेणे.
-
5:56 - 5:58जिथे मी काम करत होतो तिथे
या ठिकाणी मी गेलो. -
5:58 - 6:00मी खाली आलो
-
6:00 - 6:02आणि मला हा धिप्पाड माणूस
डेस्कमागे बसलेला दिसला -
6:02 - 6:04तो सुरक्षा रक्षकासारखा दिसत होता.
-
6:04 - 6:06म्हणून मी त्याच्या सहज जवळ गेलो.
-
6:06 - 6:08आणि मी असच चालत राहिलो
-
6:08 - 6:10आणि माझ्या आयुष्यातील
ते सर्वात लांबचं चालणं होतं -
6:10 - 6:12माझ्या मानेवरील केस उभे राहात होते,
-
6:12 - 6:15मी घामाने निथळलो होतो
आणि माझं हृदय धडधडत होतं. -
6:15 - 6:16आणि मी तिथे पोचून म्हणालो
-
6:16 - 6:18"श्रीमान, मला आपल्याकडून
१०० डॉलर्स उधार मिळतील काय?" -
6:18 - 6:20(हशा)
-
6:20 - 6:22त्यांनी वर पाहिल्यावर "नाही" असा भाव होता.
-
6:23 - 6:24"का?"
-
6:24 - 6:26आणि मी म्हणालो, "नाही? मला माफ करा."
-
6:27 - 6:28मग मी वळलो आणि पळत सुटलो.
-
6:28 - 6:30(हशा)
-
6:31 - 6:33मी एकदम गोरामोरा झालो होतो.
-
6:33 - 6:34पण मी स्वतःचे चित्रीकरण केलेले
-
6:34 - 6:37असल्याने - त्या रात्री मग मी स्वतःला
नाकारला जात असताना पाहात होतो, -
6:37 - 6:39मी पाहिलं कि मी किती घाबरलो होतो.
-
6:39 - 6:42मी या "छठ्या अर्थात"
असलेल्या मुलासारखा दिसलो. -
6:42 - 6:43मला मृत लोक दिसले.
-
6:43 - 6:45(हशा)
-
6:45 - 6:47पण मग मला हा माणूस दिसला.
-
6:47 - 6:48असं बघा कि, तो तेवढा धोकादायक नव्हता.
-
6:49 - 6:51तो एक गुबगुबीत, प्रेमळ माणूस होता,
-
6:51 - 6:54आणि त्याने मला "का?" म्हणून विचारलं देखील
-
6:54 - 6:57खरंतर, त्याने मला विनम्र स्पष्टीकरण
मागितले होते. -
6:57 - 6:58आणि मी बरंच काही सांगू शकलो असतो.
-
6:58 - 7:01मी स्पष्टीकरण देऊ शकलो असतो.
मी तडजोड केली असती. -
7:01 - 7:02पण मी त्यापैकी काहीच केले नाही
-
7:03 - 7:04मी फक्त पळ काढला.
-
7:05 - 7:08मला वाटलं, अरे, हि तर
माझ्या आयुष्याची छोटी प्रतिकृतीच आहे. -
7:09 - 7:11दरवेळी जेव्हा मला हलकासा नकार जाणवत असे,
-
7:11 - 7:14मी शक्य तितक्या जोरात पळ काढत असे.
-
7:14 - 7:15तुम्हाला माहिती आहे का?
-
7:15 - 7:17पुढच्या दिवशी, काहीही झाले तरी,
-
7:17 - 7:18मी पळ काढणार नाही.
-
7:18 - 7:19मी तिथेच थांबेन.
-
7:20 - 7:22दुसरा दिवस: "बर्गर पुनर्भरणाची" विनंती.
-
7:22 - 7:24(हशा)
-
7:24 - 7:26ते जेव्हा मी बर्गरच्या हॉटेलात गेलो,
-
7:26 - 7:29मी जेवण संपवलं,
मी कॅशियरपाशी गेलो आणि विचारलं, -
7:29 - 7:31मला बर्गर पुनर्भरण करून मिळेल का?
-
7:31 - 7:33(हशा)
-
7:33 - 7:35तो पूर्णतः गोंधळला होता,
"बर्गरचे पुनर्भरण म्हणजे?" -
7:35 - 7:37(हशा)
-
7:37 - 7:40मी म्हणालो, "म्हणजे ते पेयाच्या
पुनर्भरणासारखेच आहे फक्त बर्गरने करायचे." -
7:40 - 7:43आणि तो म्हणाला, "माफ कर,
मित्रा, आम्ही बर्गरचे -
7:43 - 7:44पुनर्भरण करत नाही."
(हशा) -
7:44 - 7:48म्हणजे इथे नकार मिळाला
आणि मी पळू शकलो असतो, पण मी थांबलो. -
7:48 - 7:50मी म्हणालो, "अहो, मला तुमचे बर्गर्स आवडतात,
-
7:50 - 7:52मला तुमचे हॉटेल आवडते,
-
7:52 - 7:54आणि तुम्ही जर बर्गरचे पुनर्भरण केले तर,
-
7:54 - 7:55मला तुम्ही अधिक आवडू लागाल."
-
7:55 - 7:57(हशा)
-
7:57 - 7:59आणि तो म्हणाला, "ठीक आहे,
मी माझ्या व्यवस्थापकाला सांगतो -
7:59 - 8:02आणि कदाचित आम्ही ते करू,पण माफ करा,
हे आम्ही आज नाही करू शकणार. -
8:02 - 8:04मग मी निघालो.
-
8:04 - 8:05आणि हो,
-
8:06 - 8:08मला नाही वाटत त्यांनी
बर्गरचे पुनर्भरण कधी केले -
8:08 - 8:09असेल.
(हशा) -
8:09 - 8:11मला वाटतं ते अजूनही तिथे आहेत.
-
8:11 - 8:14पण मला पहिल्यांदा वाटत असलेली
जीवन मृत्युची भावना -
8:14 - 8:16आता अजिबात नव्हती,
-
8:16 - 8:18केवळ मी तिथे गुंतून राहिलो म्हणून --
-
8:18 - 8:19केवळ मी पळ काढला नाही म्हणून.
-
8:19 - 8:22मी म्हणालो, "अरे वा, छान,
मी गोष्टी शिकायलासुद्धा -
8:23 - 8:24लागलो. मस्त."
-
8:24 - 8:26आणि मग तिसरा दिवस:
ऑलिम्पिकचे डोनट्स मिळवणे. -
8:27 - 8:29इथे माझे आयुष्य पूर्णतः बदलून गेले.
-
8:30 - 8:32मी क्रिस्पी क्रीममधे गेलो होतो.
-
8:32 - 8:33ते डोनटचे दुकान आहे
-
8:33 - 8:36मुख्यतः अमेरिकेच्या दक्षिणपूर्व भागात आहे.
-
8:36 - 8:37माझी खात्री आहे ते इथेही असतील.
-
8:38 - 8:39आणि मी आत गेलो,
-
8:39 - 8:42मी विचारलं, "ऑलिम्पिकच्या चिन्हासारखे
दिसणारे डोनट्स तुम्ही बनवू -
8:42 - 8:45शकता का? म्हणजे पाच डोनट्स एकमेकाला
जोडायचे..." -
8:45 - 8:47म्हणजे ते हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता,
बरोबर? -
8:48 - 8:50डोनट बनवणाऱ्याने माझे म्हणणे
खूप गांभीर्याने घेतले. -
8:50 - 8:51(हशा)
-
8:51 - 8:52मग तिने एक कागद घेतला,
-
8:53 - 8:55आणि रंग आणि वर्तुळं काढायला सुरुवात केली,
-
8:55 - 8:57आणि म्हणाली, "हे मी कसं बनवू शकते?"
-
8:57 - 8:59आणि १५ मिनिटांनंतर,
-
8:59 - 9:02ती एक खोकं घेऊन आली
जे ऑलिम्पिकच्या वर्तुळांसारखं दिसत होतं. -
9:02 - 9:04आणि मला खूप भरून आलं.
-
9:04 - 9:06माझा त्यावर विश्वासच बसला नाही.
-
9:06 - 9:10आणि त्या व्हिडीओला युट्युबवर आतापर्यंत
पन्नास लाखवेळा पाहिलं गेलं आहे. -
9:10 - 9:13जगाचाही त्यावर विश्वास बसला नाही.
-
9:13 - 9:14(हशा)
-
9:15 - 9:19तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी
वर्तमानपत्रात, चर्चांमध्ये, -
9:19 - 9:20सगळ्यांत झळकलो.
-
9:20 - 9:22आणि मी प्रसिद्ध झालो.
-
9:22 - 9:24बऱ्याच लोकांनी मला ईमेल पाठवायला
सुरुवात केली -
9:24 - 9:26आणि म्हणू लागले, "तुम्ही जे करत
आहात ते जबरदस्त आहे." -
9:26 - 9:30पण प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धीने माझे काही
झाले नाही. -
9:30 - 9:32मला खरंतर शिकायचे होते,
-
9:32 - 9:33आणि स्वतःला बदलायचे होते.
-
9:33 - 9:36म्हणून मग मी माझे नकाराचे
उर्वरित १०० दिवस -
9:36 - 9:38या मैदानात रूपांतरित केले --
-
9:38 - 9:40या शोध प्रकल्पात रूपांतरित केले.
-
9:40 - 9:42मला बघायचं होत मी काय शिकू शकतो ते.
-
9:42 - 9:44आणि मग मी बऱ्याच गोष्टी शिकलो.
-
9:44 - 9:46मला कित्येक गुपितं कळली.
-
9:46 - 9:49उदाहरणार्थ, मला कळलं कि मी जर पळालो नाही,
-
9:49 - 9:50मला नकार मिळालेला असताना,
-
9:50 - 9:52मी नकारला होकारात बदलवू शकतो
-
9:52 - 9:54आणि जादुई शब्द आहे, "का".
-
9:54 - 9:58मग एका दिवशी मी एका अनोळखी व्यक्तीच्या
घरी गेलो, माझ्या हातात हे फुल होतं, -
9:58 - 9:59दार ठोठावलं आणि विचारलं,
-
9:59 - 10:01"काय हो, हे फुल मी तुमच्या परसात लावू
शकतो का?" -
10:01 - 10:03(हशा)
-
10:03 - 10:05आणि तो म्हणाला, "नाही".
-
10:06 - 10:07पण तो जायच्या आत मी विचारलं,
-
10:07 - 10:09"अरे, मला कारण कळू शकेल का?"
-
10:09 - 10:12आणि तो म्हणाला, "माझ्याकडे कुत्रा आहे
जो मी परसात -
10:12 - 10:15ठेवलेली कुठलीही गोष्ट उकरून काढतो."
-
10:15 - 10:16मला तुमचे फुल वाया जाऊ द्यायचे नाही.
-
10:16 - 10:20जर तुम्हाला हे करायचेच असेल तर
रस्त्याच्या पलीकडे जा आणि कॉनीशी बोला. -
10:20 - 10:21तिला फुलं आवडतात."
-
10:21 - 10:22मग मी तेच केले.
-
10:22 - 10:24मी पलीकडे गेलो
आणि कॉनीचे दार ठोठावले. -
10:24 - 10:26आणि मला भेटून तिला खूप आनंद झाला.
-
10:26 - 10:28(हशा)
-
10:28 - 10:29आणि अर्ध्या तासानंतर,
-
10:29 - 10:31हे फुल कॉनीच्या परसात होतं.
माझी खात्री आहे -
10:31 - 10:33ते आता अधिक चांगलं दिसत असेल.
-
10:33 - 10:34(हशा)
-
10:34 - 10:37पण सुरुवातीच्या नकारानंतर जर
मी निघून गेलो असतो तर, -
10:37 - 10:38मी विचार केला असता,
-
10:38 - 10:40त्या माणसाचा माझ्यावर
विश्वास नसल्याने ते झालं, -
10:40 - 10:42मी वेडा झालो होतो
-
10:42 - 10:44माझा पोषाख चांगला नव्हता,
मी चांगला दिसत नव्हतो म्हणून. -
10:44 - 10:45त्यापैकी काहीच नव्हते.
-
10:45 - 10:48त्याचं कारण हे होतं कि मी जे दिलं होतं
ते त्याला पाहिजे -
10:48 - 10:50तसं नव्हतं. आणि त्याने
दुसरा संदर्भ देण्याइतका -
10:50 - 10:52विश्वास ठेवला, विक्रीची संज्ञा.
-
10:52 - 10:53मी त्या संदर्भाचे रूपांतरण केले
-
10:55 - 10:56मग एका दिवशी -
-
10:56 - 10:59आणि मला हेही कळलं कि
मी काही गोष्टी खरंच म्हणू शकतो -
10:59 - 11:01आणि होकार मिळवण्याची
शक्यता वाढवू शकतो. -
11:01 - 11:03म्हणजे उदाहरणार्थ,
एका दिवशी मी स्टारबक्स मधे -
11:03 - 11:06गेलो आणि व्यवस्थापकाला विचारले,
"काय हो, मी स्टारबक्स ग्रीटर होवू शकतो का? -
11:07 - 11:09तो म्हणाला, "स्टारबक्स ग्रीटर म्हणजे?"
-
11:09 - 11:11मी म्हणालो, "तुम्हाला ते वॉलमार्टचे
ग्रीटर्स -
11:11 - 11:14ठाऊक आहेत? ते लोक जे तुम्ही स्टोअरमधे जात
असताना तुम्हाला 'हाय' म्हणतात, -
11:14 - 11:17आणि खरंतर तुम्ही काही चोरणार नाही
याची खात्री करत असतात? -
11:17 - 11:20मला स्टारबक्सच्या ग्राहकांना
वॉलमार्टचा अनुभव द्यायचाय." -
11:20 - 11:21(हशा)
-
11:21 - 11:24खरंतर ती चांगली गोष्ट आहे का नाही
याची खात्री नाही -- -
11:26 - 11:28खरंतर मला हे पक्कं माहिती आहे कि
ती वाईट गोष्ट आहे. -
11:28 - 11:30आणि त्याने "ओह" असे केले --
-
11:30 - 11:32हो, तो असा दिसला, त्याचे नाव एरिक आहे --
-
11:32 - 11:34आणि तो म्हणाला, "मला माहिती नाही.
-
11:34 - 11:36तो माझं म्हणणं असं ऐकत होता.
"नक्की नाही." -
11:36 - 11:38मी त्याला विचारलं "ते विचित्र आहे
-
11:38 - 11:40का?" तो म्हणाला, "हो ते खरंच विचित्र आहे."
-
11:41 - 11:44पण तो तसं म्हणताच त्याचे पूर्ण हावभावच
बदलले. -
11:44 - 11:47ते जणू काही त्याचा
पूर्ण संभ्रम बाजूला ठेवण्यासारखे होते. -
11:47 - 11:48आणि तो म्हणाला, "हो तू हे करू शकतोस,
-
11:48 - 11:50फक्त खूप काही विचित्र करू नकोस."
-
11:50 - 11:51(हशा)
-
11:51 - 11:53मग पुढचा तासभर मी स्टारबक्स ग्रीटर होतो.
-
11:54 - 11:56येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला
मी 'हाय' करायचो, -
11:56 - 11:58आणि सुट्टीच्या शुभेच्छा द्यायचो.
-
11:58 - 12:01मला ठाऊक नाही तुमच्या कारकिर्दीची
कमान कशी आहे ते, -
12:01 - 12:02ग्रीटर होऊ नका.
-
12:02 - 12:03(हशा)
-
12:03 - 12:04ते खरंच कंटाळवाणं होतं.
-
12:05 - 12:10पण मग मला कळलं कि मी ते करू शकलो
कारण मी म्हणालो, "ते विचित्र आहे का?" -
12:10 - 12:12त्याला असलेली शंका मी नमूद केली होती.
-
12:12 - 12:16आणि "ते विचित्र आहे का?"
असं मी म्हणल्यानेच त्यातून मी विचित्र नाही -
12:16 - 12:18असा अर्थ निघतो, त्याचा अर्थ
मी खरंतर त्याच्यासारखा -
12:18 - 12:21विचार करत होतो
या गोष्टीकडे विचित्र म्हणून बघून. -
12:21 - 12:22आणि पुन्हा, आणि मग,
-
12:22 - 12:25मला हे कळलं कि जर लोकांच्या मनात असलेली
शंका मी बोलून दाखवली, -
12:25 - 12:27मी प्रश्न विचारायच्या आधी,
-
12:27 - 12:29तर मी त्यांचा विश्वास जिंकत असे.
-
12:29 - 12:31लोकांची हो म्हणण्याची जास्त शक्यता होती.
-
12:31 - 12:34आणि मग मला उमजलं कि
माझे स्वप्न पूर्ण करू शकतो... -
12:34 - 12:36प्रश्न विचारून.
-
12:36 - 12:39असं बघा, माझ्या आधीच्या चार पिढ्या
शिक्षकांच्या होत्या, -
12:39 - 12:42आणि माझी आजी मला नेहमी सांगत असे,
-
12:42 - 12:44"जिया, तुला हवं असेल ते
काहीही तू करू शकतोस, -
12:44 - 12:46पण तू शिक्षक झालास तर उत्तम होईल."
-
12:46 - 12:47(हशा)
-
12:47 - 12:50पण मला उद्योजक व्हायचे होते
म्हणून मी झालो नाही. -
12:50 - 12:53पण खरंच काहीतरी शिकवावे
हे माझे नेहमी स्वप्न होते. -
12:53 - 12:55म्हणून मी म्हणालो, "मी विचारलं
-
12:55 - 12:58आणि कॉलेजच्या वर्गाला शिकवले तर काय होईल?"
-
12:58 - 12:59त्यावेळेस मी ऑस्टीनमधे राहायचो
-
12:59 - 13:01म्हणून मी ऑस्टीनच्या
टेक्सास विद्यापीठात गेलो -
13:01 - 13:04आणि प्राध्यापकांची दारं ठोठावून
विचारलं, "मी तुमच्या वर्गाला शिकवू?" -
13:04 - 13:07पहिल्या दोन वेळेस मला काहीच हाती लागलं
नाही. -
13:07 - 13:09पण मी पळालो नाही म्हणून
मी ते करत राहिलो -- -
13:09 - 13:13आणि तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी
प्राध्यापक खूप प्रभावित झाले. -
13:13 - 13:15ते म्हणाले, "याआधी असे कोणीच केलेले नाही."
-
13:15 - 13:19आणि मी पॉवरपॉईंट्स आणि शिकवायचा धडा
याची तयारी करून आलो. -
13:19 - 13:21ते म्हणाले. "छान, मी हे वापरू शकतो.
-
13:21 - 13:24तू दोन महिन्यांनंतर का येत नाहीस?
मी तुला माझ्या अभ्यासक्रमात जागा देईन -
13:24 - 13:26आणि दोन महिन्यांनंतर
मी वर्गाला शिकवत होतो. -
13:26 - 13:30हा मी आहे -- कदाचित तुम्हाला दिसत नसेन,
हा खराब फोटो आहे. -
13:30 - 13:32असं बघा, कधी कधी प्रकाशाने
तुम्ही नाकारले जाता. -
13:33 - 13:34(हशा)
-
13:35 - 13:36पण वा --
-
13:36 - 13:39जेव्हा मी तो क्लास संपवला,
मी रडत बाहेर आलो, -
13:39 - 13:40कारण मला वाटलं
-
13:40 - 13:44मी माझे आयुष्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो
केवळ विचारल्याने. -
13:44 - 13:46मी विचार करायचो मला या सगळ्या गोष्टी
मिळवाव्या लागतील -- -
13:46 - 13:50शिकवण्यासाठी एक महान उद्योजक बनावं लागेल,
किंवा पीएचडी मिळवावी लागेल -- -
13:50 - 13:52पण नाही, मी फक्त विचारलं,
-
13:52 - 13:53आणि मी शिकवू शकलो.
-
13:53 - 13:56आणि त्या फोटोत जो तुम्ही पाहू शकत नाहीयेत,
-
13:56 - 13:59मी मार्टिन ल्युथर किंग ज्यु.
यांचे शब्द वापरले होते -
13:59 - 14:04का? कारण माझ्या संशोधनात मला आढळलं कि
जे लोक खरंच जगात परिवर्तन घडवतात, -
14:04 - 14:07जे आपल्या जगण्याचा
आणि विचार करण्याचा मार्ग बदलतात, -
14:07 - 14:11ते असे लोक असतात ज्यांना प्रारंभी
आणि नेहमी तीव्र नकार मिळालेला असतो. -
14:11 - 14:13मार्टिन ल्युथर किंग ज्यु., महात्मा गांधी,
-
14:13 - 14:15नेल्सन मंडेला किंवा जिझस क्राईस्टसुद्धा
-
14:15 - 14:16यांसारखे लोक.
-
14:16 - 14:20त्यांना मिळालेल्या नकाराने
ते ओळखले जात नाहीत. -
14:20 - 14:24नकारानंतरच्या त्यांच्या
प्रतिक्रियेमुळे ते ओळखले जातात. -
14:25 - 14:26आणि त्यांनी नकाराला कवेत घेतले.
-
14:27 - 14:31आणि नकाराबाबत शिकण्यासाठी
आपल्याला ते लोक व्हायची गरज नाही, -
14:31 - 14:32आणि माझ्या बाबतीत,
-
14:32 - 14:34नकार माझा शाप होता,
-
14:34 - 14:35माझा बागुलबुवा होता.
-
14:35 - 14:39माझ्या संपूर्ण आयुष्यभर त्याने मला छळलं
कारण मी त्यापासून दूर पळत होतो. -
14:39 - 14:41मग मी त्याला कवेत घ्यायला लागलो.
-
14:42 - 14:45मी त्याचे रूपांतर आयुष्याच्या
सर्वात मोठ्या भेटीत केले. -
14:45 - 14:50नकारांचे रूपांतर संधींत कसे करावे
हे मी लोकांना शिकवायला सुरुवात केली. -
14:50 - 14:52मी माझा ब्लॉग, माझे व्याख्यान,
-
14:52 - 14:54माझे नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक वापरतो,
-
14:54 - 14:58आणि लोकांना नकाराच्या भयावर मात करता
यावी याकरता तंत्रज्ञानसुद्धा विकसित करतोय. -
15:00 - 15:02जेव्हा आयुष्यात तुम्हाला नकार मिळतो,
-
15:02 - 15:04जेव्हा तुम्ही पुढच्या अडथळ्याचा
सामना करत असाल -
15:04 - 15:06किंवा पुढच्या अपयशाचा,
-
15:06 - 15:08शक्यतांचा विचार करा.
-
15:08 - 15:09पळू नका.
-
15:09 - 15:11जर तुम्ही त्यांना कवेत
-
15:11 - 15:13घेतले तर ते तुमचे वरदानही ठरू शकतील.
-
15:13 - 15:14धन्यवाद.
-
15:14 - 15:19(टाळ्या)
- Title:
- नकाराच्या १०० दिवसांपासून मी काय शिकलो
- Speaker:
- जिया जियांग
- Description:
-
नकार: आपल्यापैकी कित्येक जणांना ज्याची भीती वाटते अशा प्रदेशात जिया जियांग धाडसाने संचार करतात. १०० दिवस नकार शोधत - अनोळखी व्यक्तीकडे १०० डॉलर्स उधार मागण्यापासून ते रेस्टॉरंटमध्ये बर्गर पुनर्भरणाची विनवणी करण्यापर्यंत - जियांग यांनी स्वतःला नकारासोबत येणाऱ्या वेदना आणि लाज यांबाबत असंवेदनशील बनवलं आणि या प्रक्रियेत हे शोधलं कि तुम्हाला जे हवं ते केवळ मागण्याने अनेक शक्यता निर्माण होतात जिथे तुम्हाला शेवटाची अपेक्षा असते.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 15:31
Abhinav Garule approved Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for What I learned from 100 days of rejection |