1 00:00:00,760 --> 00:00:02,376 जेव्हा मी सहा वर्षांचा झालो, 2 00:00:02,400 --> 00:00:03,890 मला माझ्या भेटवस्तू मिळाल्या. 3 00:00:04,320 --> 00:00:07,776 माझ्या पहिलीच्या बाईंची हि एक सुंदर कल्पना होती. 4 00:00:07,800 --> 00:00:11,136 त्यांना आम्हांला भेटवस्तू स्वीकारणं अनुभवू द्यायचं होतं 5 00:00:11,160 --> 00:00:15,160 पण त्याचवेळी एकमेकांची प्रशंसा करण्याचा गुणही शिकवायचा होता. 6 00:00:15,640 --> 00:00:18,536 म्हणून त्या आम्हां सर्वांना वर्गात पुढे बोलवायच्या, 7 00:00:18,560 --> 00:00:21,536 आणि आमच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू कोपऱ्यात रचून ठेवायच्या. 8 00:00:21,560 --> 00:00:22,776 आणि त्या म्हणायच्या, 9 00:00:22,800 --> 00:00:25,456 "आपण इथे उभं राहून एकमेकांची प्रशंसा का करू नये? 10 00:00:25,480 --> 00:00:27,056 जर तुमचं नाव पुकारलं गेलं, 11 00:00:27,080 --> 00:00:29,280 तर तिथे जाऊन तुमची भेटवस्तू उचला आणि जागेवर बसा 12 00:00:30,520 --> 00:00:32,000 किती सुंदर कल्पना, बरोबर? 13 00:00:32,880 --> 00:00:34,096 काय चूक घडू शकतं? 14 00:00:34,120 --> 00:00:35,640 (हशा) 15 00:00:36,400 --> 00:00:38,456 सुरुवातीला आम्ही ४० जण होतो, 16 00:00:38,480 --> 00:00:40,936 आणि दरवेळी कुणाचं तरी नाव पुकारल्याचं ऐकल्यावर, 17 00:00:40,960 --> 00:00:42,760 मी अगदी मनापासून आनंद व्यक्त करायचो. 18 00:00:43,280 --> 00:00:45,776 आणि मग २० जण उरले, 19 00:00:45,800 --> 00:00:47,576 आणि १० उरले, 20 00:00:47,600 --> 00:00:48,960 आणि पाच उरले... 21 00:00:49,560 --> 00:00:50,936 आणि तीन उरले. 22 00:00:50,960 --> 00:00:52,160 आणि मी त्यांपैकी एक होतो. 23 00:00:52,720 --> 00:00:54,320 आणि प्रशंसोद्गार थांबले. 24 00:00:55,560 --> 00:00:57,600 त्याक्षणी, मी रडत होतो. 25 00:00:58,600 --> 00:01:00,616 आणि बाईंची अवस्था विचित्र झाली होती. 26 00:01:00,640 --> 00:01:04,296 त्या म्हणत होत्या, "अरे, या लोकांबद्दल कोणी काही चांगलं बोलेल का?" 27 00:01:04,319 --> 00:01:05,350 (हशा) 28 00:01:05,350 --> 00:01:08,846 "कुणीच नाही? ठीक आहे, तुम्ही तुमच्या भेटवस्तू घेऊन जागेवर का बसत नाही. 29 00:01:08,846 --> 00:01:10,046 पुढच्या वर्षी नीट वागा -- 30 00:01:10,046 --> 00:01:12,146 कुणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलेल." 31 00:01:12,146 --> 00:01:13,720 (हशा) 32 00:01:14,520 --> 00:01:16,136 हे सगळं वर्णन मी आपल्याला सांगत 33 00:01:16,160 --> 00:01:18,966 असताना कदाचित तुम्हांला कळलं असेल कि हे माझ्या लक्षात आहे. 34 00:01:18,966 --> 00:01:20,160 (हशा) 35 00:01:20,800 --> 00:01:22,896 पण त्यादिवशी नक्की कुणाला वाईट वाटलं हे ठाऊक 36 00:01:22,920 --> 00:01:25,096 नाही. मला का बाईंना? 37 00:01:25,120 --> 00:01:28,256 त्यांना कळून चुकलं असणार कि एका संघ उभारणीच्या घटनेचं रूपांतर 38 00:01:28,280 --> 00:01:31,080 त्यांनी तीन षड्वर्षीय बालकांसाठी एका जाहीर फजितीत केलं होतं 39 00:01:31,800 --> 00:01:33,056 आणि विनोदाशिवाय. असं बघा, 40 00:01:33,080 --> 00:01:35,416 जेव्हा आपण टीव्हीवर लोकांचा पाणउतारा झालेला पाहतो, 41 00:01:35,440 --> 00:01:36,656 ते मजेशीर असतं. 42 00:01:36,680 --> 00:01:38,538 त्या दिवसाबद्दल काहीच मजेशीर नव्हतं. 43 00:01:39,320 --> 00:01:42,336 ते माझं एक रूप होतं, 44 00:01:42,360 --> 00:01:45,856 आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढवण्याऐवजी मी मरण पत्करेन -- 45 00:01:45,880 --> 00:01:47,760 जाहीररीत्या नाकारलं जाण्याची परिस्थिती. 46 00:01:48,440 --> 00:01:49,896 ते एक रूप आहे. 47 00:01:49,920 --> 00:01:52,376 नंतर आठ वर्षांनी पुढे येऊ. 48 00:01:52,400 --> 00:01:54,376 बिल गेट्स माझ्या गावी आले होते -- 49 00:01:54,400 --> 00:01:55,616 बीजींग, चीन -- 50 00:01:55,640 --> 00:01:56,856 भाषण देण्यासाठी, 51 00:01:56,880 --> 00:01:58,616 आणि मी त्यांचा संदेश पाहिला. 52 00:01:58,640 --> 00:02:00,936 मी त्या माणसाच्या प्रेमात पडलो. 53 00:02:00,960 --> 00:02:03,856 मी विचार केला, वा, आता मला काय करायचं आहे हे मला कळलंय. 54 00:02:03,880 --> 00:02:06,016 त्या रात्री मी माझ्या कुटुंबीयांना एक पत्र 55 00:02:06,040 --> 00:02:08,336 लिहीलं आणि कळवलं: "२५ वर्षांचा होईस्तोवर, 56 00:02:08,360 --> 00:02:10,976 मी जगातील सर्वांत मोठी कंपनी उभारेन, 57 00:02:11,000 --> 00:02:12,936 आणि ती कंपनी मायक्रोसॉफ्टला खरेदी करेल." 58 00:02:12,960 --> 00:02:14,856 (हशा) 59 00:02:14,880 --> 00:02:17,496 जग जिंकण्याच्या या कल्पनेला मी पूर्णतः अंगीकारलं -- 60 00:02:17,520 --> 00:02:18,720 वर्चस्व, बरोबर? 61 00:02:19,160 --> 00:02:21,976 आणि हि बनवाबनवी नाही, मी खरंच ते पत्र लिहीलं. 62 00:02:22,000 --> 00:02:23,336 आणि हे बघा ते -- 63 00:02:23,360 --> 00:02:25,336 (हशा) 64 00:02:25,360 --> 00:02:27,176 तुम्ही ते खरंतर वाचण्याची गरज नाही -- 65 00:02:27,200 --> 00:02:28,976 (हशा) 66 00:02:29,000 --> 00:02:32,240 हे एक खराब हस्ताक्षरदेखील आहे, पण काही महत्वाचे शब्द मी ठळक केले आहेत 67 00:02:33,600 --> 00:02:34,816 तुम्हाला कल्पना आलीच असेल 68 00:02:34,840 --> 00:02:36,616 (हशा) 69 00:02:36,640 --> 00:02:37,840 तर... 70 00:02:39,280 --> 00:02:41,296 ते माझं दुसरं रूप होतं: 71 00:02:41,320 --> 00:02:43,000 एक जो जगाला जिंकेल. 72 00:02:43,880 --> 00:02:45,336 मग दोन वर्षांनंतर, 73 00:02:45,360 --> 00:02:49,296 अमेरिकेला येण्याची एक संधी माझ्यासमोर आली. 74 00:02:49,320 --> 00:02:50,896 मी त्यावर तुटून पडलो, 75 00:02:50,920 --> 00:02:53,136 कारण तिथे बिल गेट्स राहत होते, बरोबर? 76 00:02:53,160 --> 00:02:54,376 (हशा) 77 00:02:54,400 --> 00:02:57,040 मला वाटलं उद्योजक बनण्याच्या प्रवासाची ती सुरुवात होती. 78 00:02:57,680 --> 00:02:59,856 मग, अजून १४ वर्षं पुढे येऊ. 79 00:02:59,880 --> 00:03:01,296 मी ३० वर्षांचा होतो. 80 00:03:01,320 --> 00:03:03,696 नाही, मी ती कंपनी उभारली नाही. 81 00:03:03,720 --> 00:03:05,256 मी सुरुवातदेखील केली नाही. 82 00:03:05,280 --> 00:03:09,256 एका फॉर्च्युन ५०० कंपनीत मी विपणन व्यवस्थापक होतो. 83 00:03:09,280 --> 00:03:10,896 आणि मला वाटत होतं मी स्थानबद्ध 84 00:03:10,920 --> 00:03:12,120 झालो आहे; मी अचल होतो. 85 00:03:13,080 --> 00:03:14,296 ते का आहे? 86 00:03:14,320 --> 00:03:16,560 ते पत्र लिहिणारा तो १४ वर्षीय कुठे आहे? त्याने 87 00:03:17,480 --> 00:03:18,957 प्रयत्न केले नाहीत म्हणून नाही. 88 00:03:19,480 --> 00:03:22,536 त्याचं कारण म्हणजे दरवेळी जेव्हा मला नवीन कल्पना सुचायची तेव्हा, 89 00:03:22,560 --> 00:03:24,536 दरवेळी जेव्हा मला काहीतरी नवीन आजमावायचं 90 00:03:24,560 --> 00:03:25,776 असायचं तेव्हा, कामातही -- 91 00:03:25,800 --> 00:03:27,536 मला प्रस्ताव मांडायचा असायचा, 92 00:03:27,560 --> 00:03:31,096 समूहातील लोकांसमोर मला बोलायचे असायचे -- 93 00:03:31,120 --> 00:03:32,936 मला वाटतं सतत एक द्वंद्व असायचं 94 00:03:32,960 --> 00:03:35,736 १४ वर्षीय आणि सहा वर्षीय मुलामध्ये. 95 00:03:35,760 --> 00:03:37,896 एकाला जग जिंकायचं असायचं -- 96 00:03:37,920 --> 00:03:39,136 बदल घडवायचा असायचा -- 97 00:03:39,160 --> 00:03:41,280 दुसरा नकारला घाबरायचा. 98 00:03:41,960 --> 00:03:44,480 आणि दरवेळी तो सहा वर्षांचा मुलगाच जिंकायचा 99 00:03:45,760 --> 00:03:49,736 मी माझी स्वतःची कंपनी सुरु केल्यानंतरही हि भीती कायम होती. 100 00:03:49,760 --> 00:03:52,896 म्हणजे, मी ३० वर्षांचा असताना माझी स्वतःची कंपनी सुरु केली -- जर 101 00:03:52,920 --> 00:03:54,336 बिल गेट्स व्हायचं असेल 102 00:03:54,360 --> 00:03:56,400 तर लवकरात लवकर सुरुवात करायला हवी, बरोबर? 103 00:03:57,080 --> 00:03:59,616 मी जेव्हा उद्योजक होतो, 104 00:03:59,640 --> 00:04:02,536 तेव्हा मला एक गुंतवणुकीची संधी पेश झाली, 105 00:04:02,560 --> 00:04:04,360 आणि नंतर ती नाकारण्यात आली. 106 00:04:05,040 --> 00:04:06,776 आणि तो नकार मला खुपला. 107 00:04:06,800 --> 00:04:10,400 तो इतका खुपला कि मला त्याक्षणी त्यातून बाहेर पडावंसं वाटत होतं. 108 00:04:11,280 --> 00:04:12,496 पण मग मी विचार केला, 109 00:04:12,520 --> 00:04:16,360 अरे, एका सध्या गुंतवणुकीच्या नकाराने बिल गेट्सने हार पत्करली असती का? 110 00:04:16,920 --> 00:04:19,776 कुठलाही यशस्वी उद्योजक अशी माघार घेईल का? 111 00:04:19,800 --> 00:04:21,176 कदापि नाही. 112 00:04:21,200 --> 00:04:23,176 आणि तिथेच मला कळून चुकलं. 113 00:04:23,200 --> 00:04:25,016 हो, मी एक चांगली कंपनी उभारू शकतो. 114 00:04:25,040 --> 00:04:27,256 मी एक चांगला संघ किंवा उत्पादन तयार करू शकतो, 115 00:04:27,280 --> 00:04:28,816 पण एक गोष्ट नक्की: 116 00:04:28,840 --> 00:04:30,696 मला एक चांगला नेता व्हायला हवं. 117 00:04:30,720 --> 00:04:32,240 मला एक चांगला माणूस व्हायला हवं 118 00:04:32,720 --> 00:04:36,096 त्या सहा वर्षीय मुलाला मी माझं आयुष्य यापुढे नाही लिहू देऊ शकत. 119 00:04:36,120 --> 00:04:38,200 मला त्याला त्याच्या जागी परत पाठवायला हवं. 120 00:04:39,000 --> 00:04:41,416 मग या ठिकाणी मी इंटरनेटवर मदतीचा शोध घेतला 121 00:04:41,440 --> 00:04:42,696 गुगल माझा मित्र होता. 122 00:04:42,720 --> 00:04:43,856 (हशा) 123 00:04:43,880 --> 00:04:46,440 मी शोधलं, "मी नकाराच्या भीतीवर कशी मात करू?" 124 00:04:46,960 --> 00:04:49,816 मानसशास्त्रीय लेखांचा एक समूह उत्तरादाखलआला 125 00:04:49,840 --> 00:04:52,696 भीती आणि वेदनांचे उगमस्थान कोणते हे सांगणारा. 126 00:04:52,720 --> 00:04:56,016 मग एक उत्साहवर्धक प्रेरणादायी लेखांचा समूह उत्तरादाखल आला 127 00:04:56,040 --> 00:04:58,421 हे सांगणारा "व्यक्तिशः घेऊ नका, त्यावर मात करा." 128 00:04:59,200 --> 00:05:00,856 हे कुणाला ठाऊक नाही? 129 00:05:00,880 --> 00:05:02,456 (हशा) 130 00:05:02,480 --> 00:05:04,616 पण मी अजूनही इतका घाबरलेला का होतो? 131 00:05:04,640 --> 00:05:06,656 मग नशिबानेच मला हे संकेतस्थळ सापडलं. 132 00:05:06,680 --> 00:05:09,056 त्याचं नाव रिजेक्शनथेरपी डॉट कॉम. 133 00:05:09,080 --> 00:05:11,616 (हशा) 134 00:05:11,640 --> 00:05:15,576 या कॅनेडियन उद्योजकाने हा "रिजेक्शन थेरपी" नावाचा खेळ शोधला. 135 00:05:15,600 --> 00:05:17,296 त्याचे नाव जेसन कोमली. 136 00:05:17,320 --> 00:05:22,416 आणि मूलतः कल्पना अशी आहे कि ३० दिवस तुम्ही बाहेर जाऊन नकार शोधायचा, 137 00:05:22,440 --> 00:05:24,696 आणि रोज कशात तरी नाकारून घ्यायचे, 138 00:05:24,720 --> 00:05:28,240 आणि मग अखेरीस तुम्ही स्वतःला, दुःखाबाबत असंवेदनशील बनवायचे. 139 00:05:29,200 --> 00:05:30,896 आणि मला ती कल्पना आवडली. 140 00:05:30,920 --> 00:05:32,456 (हशा) 141 00:05:32,480 --> 00:05:34,616 मी म्हणालो, "तुम्हाला ठाऊक आहे? मी हे करणार. 142 00:05:34,640 --> 00:05:37,656 आणि १०० दिवस मी स्वतःला नाकारून घेणार." 143 00:05:37,680 --> 00:05:40,096 आणि नाकारून घेण्याच्या मी स्वतः काही कल्पना लढवल्या 144 00:05:40,120 --> 00:05:42,600 आणि मी त्याचा एक व्हिडीओ ब्लॉग तयार केला. 145 00:05:43,600 --> 00:05:45,536 आणि मी हे केले. 146 00:05:45,560 --> 00:05:48,176 ब्लॉग हा साधारण असा होता. 147 00:05:48,200 --> 00:05:49,400 पहिला दिवस... 148 00:05:50,000 --> 00:05:51,296 (हशा) 149 00:05:51,320 --> 00:05:54,560 अनोळखी व्यक्तीकडून १०० डॉलर्स उधार घेणे. 150 00:05:55,720 --> 00:05:58,456 जिथे मी काम करत होतो तिथे या ठिकाणी मी गेलो. 151 00:05:58,480 --> 00:06:00,216 मी खाली आलो 152 00:06:00,240 --> 00:06:02,456 आणि मला हा धिप्पाड माणूस डेस्कमागे बसलेला दिसला 153 00:06:02,480 --> 00:06:04,216 तो सुरक्षा रक्षकासारखा दिसत होता. 154 00:06:04,240 --> 00:06:05,776 म्हणून मी त्याच्या सहज जवळ गेलो. 155 00:06:05,800 --> 00:06:07,536 आणि मी असच चालत राहिलो 156 00:06:07,560 --> 00:06:09,896 आणि माझ्या आयुष्यातील ते सर्वात लांबचं चालणं होतं 157 00:06:09,920 --> 00:06:12,056 माझ्या मानेवरील केस उभे राहात होते, 158 00:06:12,080 --> 00:06:14,536 मी घामाने निथळलो होतो आणि माझं हृदय धडधडत होतं. 159 00:06:14,560 --> 00:06:15,776 आणि मी तिथे पोचून म्हणालो 160 00:06:15,800 --> 00:06:18,456 "श्रीमान, मला आपल्याकडून १०० डॉलर्स उधार मिळतील काय?" 161 00:06:18,480 --> 00:06:19,816 (हशा) 162 00:06:19,840 --> 00:06:21,940 त्यांनी वर पाहिल्यावर "नाही" असा भाव होता. 163 00:06:22,640 --> 00:06:23,840 "का?" 164 00:06:24,200 --> 00:06:26,496 आणि मी म्हणालो, "नाही? मला माफ करा." 165 00:06:26,520 --> 00:06:28,235 मग मी वळलो आणि पळत सुटलो. 166 00:06:28,259 --> 00:06:29,619 (हशा) 167 00:06:30,960 --> 00:06:32,696 मी एकदम गोरामोरा झालो होतो. 168 00:06:32,720 --> 00:06:34,176 पण मी स्वतःचे चित्रीकरण केलेले 169 00:06:34,200 --> 00:06:37,336 असल्याने - त्या रात्री मग मी स्वतःला नाकारला जात असताना पाहात होतो, 170 00:06:37,360 --> 00:06:39,456 मी पाहिलं कि मी किती घाबरलो होतो. 171 00:06:39,480 --> 00:06:41,936 मी या "छठ्या अर्थात" असलेल्या मुलासारखा दिसलो. 172 00:06:41,960 --> 00:06:43,376 मला मृत लोक दिसले. 173 00:06:43,400 --> 00:06:45,016 (हशा) 174 00:06:45,040 --> 00:06:46,576 पण मग मला हा माणूस दिसला. 175 00:06:46,600 --> 00:06:48,496 असं बघा कि, तो तेवढा धोकादायक नव्हता. 176 00:06:48,520 --> 00:06:50,896 तो एक गुबगुबीत, प्रेमळ माणूस होता, 177 00:06:50,920 --> 00:06:54,376 आणि त्याने मला "का?" म्हणून विचारलं देखील 178 00:06:54,400 --> 00:06:56,816 खरंतर, त्याने मला विनम्र स्पष्टीकरण मागितले होते. 179 00:06:56,840 --> 00:06:58,416 आणि मी बरंच काही सांगू शकलो असतो. 180 00:06:58,440 --> 00:07:00,736 मी स्पष्टीकरण देऊ शकलो असतो. मी तडजोड केली असती. 181 00:07:00,760 --> 00:07:02,200 पण मी त्यापैकी काहीच केले नाही 182 00:07:02,680 --> 00:07:04,200 मी फक्त पळ काढला. 183 00:07:05,160 --> 00:07:08,320 मला वाटलं, अरे, हि तर माझ्या आयुष्याची छोटी प्रतिकृतीच आहे. 184 00:07:08,920 --> 00:07:11,456 दरवेळी जेव्हा मला हलकासा नकार जाणवत असे, 185 00:07:11,480 --> 00:07:13,616 मी शक्य तितक्या जोरात पळ काढत असे. 186 00:07:13,640 --> 00:07:14,896 तुम्हाला माहिती आहे का? 187 00:07:14,920 --> 00:07:16,736 पुढच्या दिवशी, काहीही झाले तरी, 188 00:07:16,760 --> 00:07:18,256 मी पळ काढणार नाही. 189 00:07:18,280 --> 00:07:19,480 मी तिथेच थांबेन. 190 00:07:20,080 --> 00:07:22,136 दुसरा दिवस: "बर्गर पुनर्भरणाची" विनंती. 191 00:07:22,160 --> 00:07:24,136 (हशा) 192 00:07:24,160 --> 00:07:26,456 ते जेव्हा मी बर्गरच्या हॉटेलात गेलो, 193 00:07:26,480 --> 00:07:28,976 मी जेवण संपवलं, मी कॅशियरपाशी गेलो आणि विचारलं, 194 00:07:29,000 --> 00:07:30,576 मला बर्गर पुनर्भरण करून मिळेल का? 195 00:07:30,600 --> 00:07:32,776 (हशा) 196 00:07:32,800 --> 00:07:35,256 तो पूर्णतः गोंधळला होता, "बर्गरचे पुनर्भरण म्हणजे?" 197 00:07:35,280 --> 00:07:36,536 (हशा) 198 00:07:36,560 --> 00:07:40,216 मी म्हणालो, "म्हणजे ते पेयाच्या पुनर्भरणासारखेच आहे फक्त बर्गरने करायचे." 199 00:07:40,240 --> 00:07:42,736 आणि तो म्हणाला, "माफ कर, मित्रा, आम्ही बर्गरचे 200 00:07:42,760 --> 00:07:44,096 पुनर्भरण करत नाही." (हशा) 201 00:07:44,120 --> 00:07:48,176 म्हणजे इथे नकार मिळाला आणि मी पळू शकलो असतो, पण मी थांबलो. 202 00:07:48,200 --> 00:07:50,336 मी म्हणालो, "अहो, मला तुमचे बर्गर्स आवडतात, 203 00:07:50,360 --> 00:07:51,776 मला तुमचे हॉटेल आवडते, 204 00:07:51,800 --> 00:07:53,896 आणि तुम्ही जर बर्गरचे पुनर्भरण केले तर, 205 00:07:53,920 --> 00:07:55,256 मला तुम्ही अधिक आवडू लागाल." 206 00:07:55,280 --> 00:07:56,536 (हशा) 207 00:07:56,560 --> 00:07:59,176 आणि तो म्हणाला, "ठीक आहे, मी माझ्या व्यवस्थापकाला सांगतो 208 00:07:59,200 --> 00:08:02,176 आणि कदाचित आम्ही ते करू,पण माफ करा, हे आम्ही आज नाही करू शकणार. 209 00:08:02,200 --> 00:08:03,616 मग मी निघालो. 210 00:08:03,640 --> 00:08:05,496 आणि हो, 211 00:08:05,520 --> 00:08:07,776 मला नाही वाटत त्यांनी बर्गरचे पुनर्भरण कधी केले 212 00:08:07,800 --> 00:08:09,016 असेल. (हशा) 213 00:08:09,040 --> 00:08:10,600 मला वाटतं ते अजूनही तिथे आहेत. 214 00:08:11,160 --> 00:08:14,456 पण मला पहिल्यांदा वाटत असलेली जीवन मृत्युची भावना 215 00:08:14,480 --> 00:08:15,816 आता अजिबात नव्हती, 216 00:08:15,840 --> 00:08:17,576 केवळ मी तिथे गुंतून राहिलो म्हणून -- 217 00:08:17,600 --> 00:08:19,216 केवळ मी पळ काढला नाही म्हणून. 218 00:08:19,240 --> 00:08:21,600 मी म्हणालो, "अरे वा, छान, मी गोष्टी शिकायलासुद्धा 219 00:08:22,520 --> 00:08:23,736 लागलो. मस्त." 220 00:08:23,760 --> 00:08:25,960 आणि मग तिसरा दिवस: ऑलिम्पिकचे डोनट्स मिळवणे. 221 00:08:26,760 --> 00:08:29,280 इथे माझे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. 222 00:08:30,120 --> 00:08:31,736 मी क्रिस्पी क्रीममधे गेलो होतो. 223 00:08:31,760 --> 00:08:32,976 ते डोनटचे दुकान आहे 224 00:08:33,000 --> 00:08:35,616 मुख्यतः अमेरिकेच्या दक्षिणपूर्व भागात आहे. 225 00:08:35,640 --> 00:08:37,496 माझी खात्री आहे ते इथेही असतील. 226 00:08:37,520 --> 00:08:38,775 आणि मी आत गेलो, 227 00:08:38,799 --> 00:08:41,936 मी विचारलं, "ऑलिम्पिकच्या चिन्हासारखे दिसणारे डोनट्स तुम्ही बनवू 228 00:08:41,960 --> 00:08:44,856 शकता का? म्हणजे पाच डोनट्स एकमेकाला जोडायचे..." 229 00:08:44,880 --> 00:08:47,120 म्हणजे ते हो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, बरोबर? 230 00:08:47,640 --> 00:08:50,016 डोनट बनवणाऱ्याने माझे म्हणणे खूप गांभीर्याने घेतले. 231 00:08:50,040 --> 00:08:51,256 (हशा) 232 00:08:51,280 --> 00:08:52,496 मग तिने एक कागद घेतला, 233 00:08:52,520 --> 00:08:54,696 आणि रंग आणि वर्तुळं काढायला सुरुवात केली, 234 00:08:54,720 --> 00:08:56,736 आणि म्हणाली, "हे मी कसं बनवू शकते?" 235 00:08:56,760 --> 00:08:58,656 आणि १५ मिनिटांनंतर, 236 00:08:58,680 --> 00:09:02,096 ती एक खोकं घेऊन आली जे ऑलिम्पिकच्या वर्तुळांसारखं दिसत होतं. 237 00:09:02,120 --> 00:09:03,776 आणि मला खूप भरून आलं. 238 00:09:03,800 --> 00:09:05,936 माझा त्यावर विश्वासच बसला नाही. 239 00:09:05,960 --> 00:09:09,720 आणि त्या व्हिडीओला युट्युबवर आतापर्यंत पन्नास लाखवेळा पाहिलं गेलं आहे. 240 00:09:10,440 --> 00:09:12,536 जगाचाही त्यावर विश्वास बसला नाही. 241 00:09:12,560 --> 00:09:14,080 (हशा) 242 00:09:15,440 --> 00:09:18,656 तुम्हाला माहित आहे, त्यामुळे मी वर्तमानपत्रात, चर्चांमध्ये, 243 00:09:18,680 --> 00:09:20,096 सगळ्यांत झळकलो. 244 00:09:20,120 --> 00:09:21,616 आणि मी प्रसिद्ध झालो. 245 00:09:21,640 --> 00:09:23,776 बऱ्याच लोकांनी मला ईमेल पाठवायला सुरुवात केली 246 00:09:23,800 --> 00:09:26,336 आणि म्हणू लागले, "तुम्ही जे करत आहात ते जबरदस्त आहे." 247 00:09:26,360 --> 00:09:29,896 पण प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धीने माझे काही झाले नाही. 248 00:09:29,920 --> 00:09:31,736 मला खरंतर शिकायचे होते, 249 00:09:31,760 --> 00:09:32,976 आणि स्वतःला बदलायचे होते. 250 00:09:33,000 --> 00:09:35,616 म्हणून मग मी माझे नकाराचे उर्वरित १०० दिवस 251 00:09:35,640 --> 00:09:37,536 या मैदानात रूपांतरित केले -- 252 00:09:37,560 --> 00:09:39,696 या शोध प्रकल्पात रूपांतरित केले. 253 00:09:39,720 --> 00:09:41,800 मला बघायचं होत मी काय शिकू शकतो ते. 254 00:09:42,240 --> 00:09:44,016 आणि मग मी बऱ्याच गोष्टी शिकलो. 255 00:09:44,040 --> 00:09:45,616 मला कित्येक गुपितं कळली. 256 00:09:45,640 --> 00:09:48,536 उदाहरणार्थ, मला कळलं कि मी जर पळालो नाही, 257 00:09:48,560 --> 00:09:49,816 मला नकार मिळालेला असताना, 258 00:09:49,840 --> 00:09:51,896 मी नकारला होकारात बदलवू शकतो 259 00:09:51,920 --> 00:09:53,536 आणि जादुई शब्द आहे, "का". 260 00:09:53,560 --> 00:09:57,656 मग एका दिवशी मी एका अनोळखी व्यक्तीच्या घरी गेलो, माझ्या हातात हे फुल होतं, 261 00:09:57,680 --> 00:09:59,096 दार ठोठावलं आणि विचारलं, 262 00:09:59,120 --> 00:10:01,376 "काय हो, हे फुल मी तुमच्या परसात लावू शकतो का?" 263 00:10:01,400 --> 00:10:02,936 (हशा) 264 00:10:02,960 --> 00:10:04,680 आणि तो म्हणाला, "नाही". 265 00:10:05,640 --> 00:10:07,376 पण तो जायच्या आत मी विचारलं, 266 00:10:07,400 --> 00:10:09,336 "अरे, मला कारण कळू शकेल का?" 267 00:10:09,360 --> 00:10:12,416 आणि तो म्हणाला, "माझ्याकडे कुत्रा आहे जो मी परसात 268 00:10:12,440 --> 00:10:14,520 ठेवलेली कुठलीही गोष्ट उकरून काढतो." 269 00:10:14,520 --> 00:10:16,340 मला तुमचे फुल वाया जाऊ द्यायचे नाही. 270 00:10:16,340 --> 00:10:19,656 जर तुम्हाला हे करायचेच असेल तर रस्त्याच्या पलीकडे जा आणि कॉनीशी बोला. 271 00:10:19,680 --> 00:10:20,896 तिला फुलं आवडतात." 272 00:10:20,920 --> 00:10:22,136 मग मी तेच केले. 273 00:10:22,160 --> 00:10:24,216 मी पलीकडे गेलो आणि कॉनीचे दार ठोठावले. 274 00:10:24,240 --> 00:10:26,096 आणि मला भेटून तिला खूप आनंद झाला. 275 00:10:26,120 --> 00:10:27,816 (हशा) 276 00:10:27,840 --> 00:10:29,216 आणि अर्ध्या तासानंतर, 277 00:10:29,240 --> 00:10:31,296 हे फुल कॉनीच्या परसात होतं. माझी खात्री आहे 278 00:10:31,320 --> 00:10:32,736 ते आता अधिक चांगलं दिसत असेल. 279 00:10:32,760 --> 00:10:34,056 (हशा) 280 00:10:34,080 --> 00:10:37,016 पण सुरुवातीच्या नकारानंतर जर मी निघून गेलो असतो तर, 281 00:10:37,040 --> 00:10:38,256 मी विचार केला असता, 282 00:10:38,280 --> 00:10:40,466 त्या माणसाचा माझ्यावर विश्वास नसल्याने ते झालं, 283 00:10:40,466 --> 00:10:41,676 मी वेडा झालो होतो 284 00:10:41,676 --> 00:10:44,276 माझा पोषाख चांगला नव्हता, मी चांगला दिसत नव्हतो म्हणून. 285 00:10:44,276 --> 00:10:45,386 त्यापैकी काहीच नव्हते. 286 00:10:45,386 --> 00:10:47,976 त्याचं कारण हे होतं कि मी जे दिलं होतं ते त्याला पाहिजे 287 00:10:48,000 --> 00:10:50,256 तसं नव्हतं. आणि त्याने दुसरा संदर्भ देण्याइतका 288 00:10:50,280 --> 00:10:51,936 विश्वास ठेवला, विक्रीची संज्ञा. 289 00:10:51,960 --> 00:10:53,480 मी त्या संदर्भाचे रूपांतरण केले 290 00:10:54,560 --> 00:10:55,776 मग एका दिवशी - 291 00:10:55,800 --> 00:10:58,696 आणि मला हेही कळलं कि मी काही गोष्टी खरंच म्हणू शकतो 292 00:10:58,720 --> 00:11:00,656 आणि होकार मिळवण्याची शक्यता वाढवू शकतो. 293 00:11:00,680 --> 00:11:02,896 म्हणजे उदाहरणार्थ, एका दिवशी मी स्टारबक्स मधे 294 00:11:02,920 --> 00:11:06,496 गेलो आणि व्यवस्थापकाला विचारले, "काय हो, मी स्टारबक्स ग्रीटर होवू शकतो का? 295 00:11:06,520 --> 00:11:08,896 तो म्हणाला, "स्टारबक्स ग्रीटर म्हणजे?" 296 00:11:08,920 --> 00:11:11,016 मी म्हणालो, "तुम्हाला ते वॉलमार्टचे ग्रीटर्स 297 00:11:11,040 --> 00:11:14,456 ठाऊक आहेत? ते लोक जे तुम्ही स्टोअरमधे जात असताना तुम्हाला 'हाय' म्हणतात, 298 00:11:14,480 --> 00:11:17,136 आणि खरंतर तुम्ही काही चोरणार नाही याची खात्री करत असतात? 299 00:11:17,136 --> 00:11:19,856 मला स्टारबक्सच्या ग्राहकांना वॉलमार्टचा अनुभव द्यायचाय." 300 00:11:19,880 --> 00:11:21,336 (हशा) 301 00:11:21,360 --> 00:11:24,360 खरंतर ती चांगली गोष्ट आहे का नाही याची खात्री नाही -- 302 00:11:25,600 --> 00:11:28,096 खरंतर मला हे पक्कं माहिती आहे कि ती वाईट गोष्ट आहे. 303 00:11:28,120 --> 00:11:30,176 आणि त्याने "ओह" असे केले -- 304 00:11:30,200 --> 00:11:32,456 हो, तो असा दिसला, त्याचे नाव एरिक आहे -- 305 00:11:32,480 --> 00:11:34,056 आणि तो म्हणाला, "मला माहिती नाही. 306 00:11:34,080 --> 00:11:36,136 तो माझं म्हणणं असं ऐकत होता. "नक्की नाही." 307 00:11:36,160 --> 00:11:37,816 मी त्याला विचारलं "ते विचित्र आहे 308 00:11:37,840 --> 00:11:39,880 का?" तो म्हणाला, "हो ते खरंच विचित्र आहे." 309 00:11:40,800 --> 00:11:43,656 पण तो तसं म्हणताच त्याचे पूर्ण हावभावच बदलले. 310 00:11:43,680 --> 00:11:46,616 ते जणू काही त्याचा पूर्ण संभ्रम बाजूला ठेवण्यासारखे होते. 311 00:11:46,640 --> 00:11:48,376 आणि तो म्हणाला, "हो तू हे करू शकतोस, 312 00:11:48,400 --> 00:11:50,056 फक्त खूप काही विचित्र करू नकोस." 313 00:11:50,056 --> 00:11:51,096 (हशा) 314 00:11:51,120 --> 00:11:53,496 मग पुढचा तासभर मी स्टारबक्स ग्रीटर होतो. 315 00:11:53,520 --> 00:11:55,656 येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मी 'हाय' करायचो, 316 00:11:55,680 --> 00:11:58,056 आणि सुट्टीच्या शुभेच्छा द्यायचो. 317 00:11:58,080 --> 00:12:00,736 मला ठाऊक नाही तुमच्या कारकिर्दीची कमान कशी आहे ते, 318 00:12:00,760 --> 00:12:01,976 ग्रीटर होऊ नका. 319 00:12:02,000 --> 00:12:03,216 (हशा) 320 00:12:03,240 --> 00:12:04,440 ते खरंच कंटाळवाणं होतं. 321 00:12:05,200 --> 00:12:10,136 पण मग मला कळलं कि मी ते करू शकलो कारण मी म्हणालो, "ते विचित्र आहे का?" 322 00:12:10,160 --> 00:12:12,296 त्याला असलेली शंका मी नमूद केली होती. 323 00:12:12,320 --> 00:12:15,856 आणि "ते विचित्र आहे का?" असं मी म्हणल्यानेच त्यातून मी विचित्र नाही 324 00:12:15,880 --> 00:12:18,416 असा अर्थ निघतो, त्याचा अर्थ मी खरंतर त्याच्यासारखा 325 00:12:18,440 --> 00:12:20,816 विचार करत होतो या गोष्टीकडे विचित्र म्हणून बघून. 326 00:12:20,840 --> 00:12:22,096 आणि पुन्हा, आणि मग, 327 00:12:22,120 --> 00:12:25,256 मला हे कळलं कि जर लोकांच्या मनात असलेली शंका मी बोलून दाखवली, 328 00:12:25,280 --> 00:12:27,096 मी प्रश्न विचारायच्या आधी, 329 00:12:27,120 --> 00:12:28,666 तर मी त्यांचा विश्वास जिंकत असे. 330 00:12:28,666 --> 00:12:30,680 लोकांची हो म्हणण्याची जास्त शक्यता होती. 331 00:12:30,800 --> 00:12:34,136 आणि मग मला उमजलं कि माझे स्वप्न पूर्ण करू शकतो... 332 00:12:34,160 --> 00:12:35,576 प्रश्न विचारून. 333 00:12:35,600 --> 00:12:38,696 असं बघा, माझ्या आधीच्या चार पिढ्या शिक्षकांच्या होत्या, 334 00:12:38,720 --> 00:12:41,536 आणि माझी आजी मला नेहमी सांगत असे, 335 00:12:41,560 --> 00:12:43,856 "जिया, तुला हवं असेल ते काहीही तू करू शकतोस, 336 00:12:43,880 --> 00:12:45,936 पण तू शिक्षक झालास तर उत्तम होईल." 337 00:12:45,960 --> 00:12:47,376 (हशा) 338 00:12:47,400 --> 00:12:49,656 पण मला उद्योजक व्हायचे होते म्हणून मी झालो नाही. 339 00:12:49,680 --> 00:12:53,056 पण खरंच काहीतरी शिकवावे हे माझे नेहमी स्वप्न होते. 340 00:12:53,080 --> 00:12:54,896 म्हणून मी म्हणालो, "मी विचारलं 341 00:12:54,920 --> 00:12:57,536 आणि कॉलेजच्या वर्गाला शिकवले तर काय होईल?" 342 00:12:57,560 --> 00:12:58,980 त्यावेळेस मी ऑस्टीनमधे राहायचो 343 00:12:58,980 --> 00:13:01,096 म्हणून मी ऑस्टीनच्या टेक्सास विद्यापीठात गेलो 344 00:13:01,120 --> 00:13:04,336 आणि प्राध्यापकांची दारं ठोठावून विचारलं, "मी तुमच्या वर्गाला शिकवू?" 345 00:13:04,360 --> 00:13:06,856 पहिल्या दोन वेळेस मला काहीच हाती लागलं नाही. 346 00:13:06,880 --> 00:13:09,376 पण मी पळालो नाही म्हणून मी ते करत राहिलो -- 347 00:13:09,400 --> 00:13:12,736 आणि तिसऱ्या प्रयत्नाच्या वेळी प्राध्यापक खूप प्रभावित झाले. 348 00:13:12,760 --> 00:13:14,816 ते म्हणाले, "याआधी असे कोणीच केलेले नाही." 349 00:13:14,840 --> 00:13:18,856 आणि मी पॉवरपॉईंट्स आणि शिकवायचा धडा याची तयारी करून आलो. 350 00:13:18,880 --> 00:13:20,936 ते म्हणाले. "छान, मी हे वापरू शकतो. 351 00:13:20,960 --> 00:13:24,296 तू दोन महिन्यांनंतर का येत नाहीस? मी तुला माझ्या अभ्यासक्रमात जागा देईन 352 00:13:24,320 --> 00:13:26,416 आणि दोन महिन्यांनंतर मी वर्गाला शिकवत होतो. 353 00:13:26,440 --> 00:13:29,696 हा मी आहे -- कदाचित तुम्हाला दिसत नसेन, हा खराब फोटो आहे. 354 00:13:29,720 --> 00:13:32,496 असं बघा, कधी कधी प्रकाशाने तुम्ही नाकारले जाता. 355 00:13:32,520 --> 00:13:33,720 (हशा) 356 00:13:34,680 --> 00:13:35,896 पण वा -- 357 00:13:35,920 --> 00:13:38,656 जेव्हा मी तो क्लास संपवला, मी रडत बाहेर आलो, 358 00:13:38,680 --> 00:13:40,456 कारण मला वाटलं 359 00:13:40,480 --> 00:13:43,776 मी माझे आयुष्याचे स्वप्न पूर्ण करू शकलो केवळ विचारल्याने. 360 00:13:43,800 --> 00:13:46,456 मी विचार करायचो मला या सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागतील -- 361 00:13:46,480 --> 00:13:50,096 शिकवण्यासाठी एक महान उद्योजक बनावं लागेल, किंवा पीएचडी मिळवावी लागेल -- 362 00:13:50,120 --> 00:13:51,656 पण नाही, मी फक्त विचारलं, 363 00:13:51,680 --> 00:13:52,880 आणि मी शिकवू शकलो. 364 00:13:53,400 --> 00:13:55,776 आणि त्या फोटोत जो तुम्ही पाहू शकत नाहीयेत, 365 00:13:55,800 --> 00:13:59,096 मी मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचे शब्द वापरले होते 366 00:13:59,120 --> 00:14:03,656 का? कारण माझ्या संशोधनात मला आढळलं कि जे लोक खरंच जगात परिवर्तन घडवतात, 367 00:14:03,680 --> 00:14:06,616 जे आपल्या जगण्याचा आणि विचार करण्याचा मार्ग बदलतात, 368 00:14:06,640 --> 00:14:10,736 ते असे लोक असतात ज्यांना प्रारंभी आणि नेहमी तीव्र नकार मिळालेला असतो. 369 00:14:10,760 --> 00:14:12,816 मार्टिन ल्युथर किंग ज्यु., महात्मा गांधी, 370 00:14:12,840 --> 00:14:14,896 नेल्सन मंडेला किंवा जिझस क्राईस्टसुद्धा 371 00:14:14,920 --> 00:14:16,456 यांसारखे लोक. 372 00:14:16,480 --> 00:14:19,856 त्यांना मिळालेल्या नकाराने ते ओळखले जात नाहीत. 373 00:14:19,880 --> 00:14:24,040 नकारानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे ते ओळखले जातात. 374 00:14:24,920 --> 00:14:26,480 आणि त्यांनी नकाराला कवेत घेतले. 375 00:14:27,360 --> 00:14:30,576 आणि नकाराबाबत शिकण्यासाठी आपल्याला ते लोक व्हायची गरज नाही, 376 00:14:30,600 --> 00:14:31,856 आणि माझ्या बाबतीत, 377 00:14:31,880 --> 00:14:33,896 नकार माझा शाप होता, 378 00:14:33,920 --> 00:14:35,176 माझा बागुलबुवा होता. 379 00:14:35,200 --> 00:14:39,376 माझ्या संपूर्ण आयुष्यभर त्याने मला छळलं कारण मी त्यापासून दूर पळत होतो. 380 00:14:39,400 --> 00:14:41,120 मग मी त्याला कवेत घ्यायला लागलो. 381 00:14:41,800 --> 00:14:44,520 मी त्याचे रूपांतर आयुष्याच्या सर्वात मोठ्या भेटीत केले. 382 00:14:45,320 --> 00:14:49,776 नकारांचे रूपांतर संधींत कसे करावे हे मी लोकांना शिकवायला सुरुवात केली. 383 00:14:49,800 --> 00:14:51,816 मी माझा ब्लॉग, माझे व्याख्यान, 384 00:14:51,840 --> 00:14:53,986 माझे नुकतेच प्रकाशित केलेले पुस्तक वापरतो, 385 00:14:53,986 --> 00:14:58,320 आणि लोकांना नकाराच्या भयावर मात करता यावी याकरता तंत्रज्ञानसुद्धा विकसित करतोय. 386 00:15:00,200 --> 00:15:01,936 जेव्हा आयुष्यात तुम्हाला नकार मिळतो, 387 00:15:01,960 --> 00:15:04,176 जेव्हा तुम्ही पुढच्या अडथळ्याचा सामना करत असाल 388 00:15:04,200 --> 00:15:06,216 किंवा पुढच्या अपयशाचा, 389 00:15:06,240 --> 00:15:08,056 शक्यतांचा विचार करा. 390 00:15:08,080 --> 00:15:09,296 पळू नका. 391 00:15:09,320 --> 00:15:10,536 जर तुम्ही त्यांना कवेत 392 00:15:10,560 --> 00:15:12,640 घेतले तर ते तुमचे वरदानही ठरू शकतील. 393 00:15:13,160 --> 00:15:14,376 धन्यवाद. 394 00:15:14,400 --> 00:15:18,744 (टाळ्या)