सहिष्णुता वाढवण्यासाठी हवं जास्त पर्यटन?
-
0:01 - 0:04मी एक पर्यटन उद्योजक आहे
आणि मी शांतीदूतही आहे. -
0:04 - 0:07पण मी काही अशी सुरुवात केली नव्हती.
-
0:07 - 0:10सात वर्षांचा असताना, मी टीव्ही पाहायचो.
-
0:10 - 0:12तेव्हा लोक दगडफेक करताना पाहिल्याचं
मला आठवतंय. -
0:12 - 0:16आणि, हे काहीतरी मजेशीर आहे,
असं वाटल्याचं आठवतंय. -
0:16 - 0:18म्हणून मग मी रस्त्यावर जाऊन
दगड फेकले होते. -
0:18 - 0:23पण दगड इस्त्रायली वाहनांवर फेकायचे होते,
हे काही मला ठाऊक नव्हतं. -
0:23 - 0:27त्याऐवजी माझे दगड माझ्या शेजाऱ्यांच्याच
वाहनांवर पडले होते. -
0:27 - 0:31माझ्या देशभक्तीत त्यांना रस नव्हता.
-
0:31 - 0:33हे छायाचित्र आहे माझ्या भावाबरोबरचं.
-
0:33 - 0:36यातला धाकटा म्हणजे मी.
तुम्हाला काय वाटतंय, मला ठाऊक आहे: -
0:36 - 0:39किती गोड होतास तू!
आणि आता असं काय रे झालं तुझं? -
0:39 - 0:41पण माझा भाऊ, माझ्यापेक्षा मोठा आहे तो,
-
0:41 - 0:43वयाच्या अठराव्या वर्षी पकडला गेला.
-
0:43 - 0:46दगडफेकीच्या आरोपावरून तो तुरुंगात गेला.
-
0:46 - 0:50दगडफेकीची कबुली दिली नाही म्हणून
त्याला मारहाण करण्यात आली. -
0:50 - 0:52त्यामुळे त्याला आंतरिक जखमा झाल्या.
-
0:52 - 0:57आणि त्यामुळे, सुटकेनंतर लवकरच
त्याचा अंत झाला. -
0:57 - 1:00मी चिडलो होतो. कडवा बनलो होतो.
-
1:00 - 1:04मला फक्त सूड घ्यायचा होता.
-
1:04 - 1:07पण १८ वर्षांचा झालो, तेव्हा हे बदललं.
-
1:07 - 1:10नोकरी मिळवण्यासाठी हिब्रू भाषा यायला हवी,
असं मला वाटलं. -
1:10 - 1:13आणि हिब्रू शिकायला त्या वर्गात गेल्यावर
-
1:13 - 1:18प्रथमच मला सैनिक नसलेले ज्यू लोक भेटले.
-
1:18 - 1:23आणि अगदी छोट्या गोष्टींमुळे मैत्री जुळली.
उदाहरणार्थ, माझी कंट्री मुझिक ची आवड. -
1:23 - 1:27जी पेलेस्टिनी लोकांत सापडणं अजबच.
-
1:27 - 1:31पण त्याचवेळी माझ्या लक्षात आलं, की
रागाची, द्वेषाची आणि अज्ञानाची एक भिंत -
1:31 - 1:37आमच्यामध्ये आहे,
जी आम्हाला दूर ठेवते आहे. -
1:37 - 1:41मी ठरवलं, की आपल्याला कशाचा सामना
करावा लागतो, याला महत्त्व नाही. -
1:41 - 1:44महत्त्वाचं आहे,
मी त्याचा सामना कसा करतो, ते. -
1:44 - 1:47आणि म्हणून, मी ठरवलं, की
लोकांना दूर ठेवणाऱ्या भिंती पाडण्यासाठी -
1:47 - 1:52आपलं आयुष्य समर्पित करायचं.
-
1:52 - 1:54मी हे अनेक मार्गांनी करतो.
-
1:54 - 1:57पर्यटन हा त्यातला एक.
तसंच, प्रसारमाध्यमं आणि शिक्षण. -
1:57 - 2:01तुम्हाला वाटत असेल, खरंच?
पर्यटनामुळे गोष्टी बदलतात? -
2:01 - 2:02ते भिंती पाडू शकतं? हो.
-
2:02 - 2:07त्या भिंती पाडण्याचा,
पर्यटन हा सर्वात जास्त टिकणारा मार्ग आहे. -
2:07 - 2:11तसंच, मैत्री जुळवण्याचाही
-
2:11 - 2:14सर्वात जास्त टिकणारा मार्ग.
-
2:14 - 2:18२००९ मध्ये, मी मेजदी टूर्स ची
सहस्थापना केली. -
2:18 - 2:21लोकांना जोडणारा एक सामाजिक उपक्रम,
-
2:21 - 2:24दोन ज्यू मित्रांसमवेत स्थापला.
-
2:24 - 2:26तर आम्ही काय करतो त्याचा नमुना:
-
2:26 - 2:30उदाहरणार्थ, जेरुसलेम मध्ये आम्ही
दोन सहल मार्गदर्शक घेतो. -
2:30 - 2:33एक इस्त्रायली आणि एक पेलेस्टीनी,
सहलीला एकत्र मार्गदर्शन करतात. -
2:33 - 2:36इतिहास, दंतकथा, पुरातत्त्वशास्त्र
आणि संघर्ष -
2:36 - 2:39पूर्णपणे वेगवेगळ्या
दृष्टीकोनांतून सांगतात. -
2:39 - 2:43मला, मी आणि कोबी नावाच्या माझ्या मित्राने
नेलेली एक सहल आठवतेय. -
2:43 - 2:46शिकागोतलं ज्यू लोकांचं एक मंडळ--
जेरुसलेमच्या सहलीला आलं होतं. -
2:46 - 2:49आम्ही त्यांना पेलेस्टीनी निर्वासितांच्या
छावणीत नेलं. -
2:49 - 2:51आणि तिथे आम्ही हा अनोखा पदार्थ चाखला.
-
2:51 - 2:54बरं का, ही माझी आई. एकदम सही आहे ती!
-
2:54 - 2:56आणि हा तो पेलेस्टिनी पदार्थ, मकलुबे.
-
2:56 - 2:58म्हणजे "उलटा"
-
2:58 - 3:01तांदूळ आणि चिकन वापरून तो शिजवतात,
आणि मग हलकेच उडवून उलटा करतात. -
3:01 - 3:02अगदी अप्रतिम पदार्थ आहे हा.
-
3:02 - 3:04आम्ही एकत्र जेवलो.
-
3:04 - 3:07मग इस्त्रायली आणि पेलेस्टीनी संगीतकारांची
एकत्र मैफल केली -
3:07 - 3:08मग बेली-डान्स केला
-
3:08 - 3:12तुम्हाला ठाऊक नसेल,
तर नंतर शिकवेन मी. -
3:12 - 3:15पण जेव्हा आम्ही जायला निघालो,
तेव्हा दोन्हीकडचे लोक -
3:15 - 3:17रडत होते,
इथून जायचं नाही म्हणून. -
3:17 - 3:21तीन वर्षं झाली, तरी ही नाती
अजून टिकली आहेत. -
3:21 - 3:24कल्पना करा, एक अब्ज लोक,
-
3:24 - 3:28जे दरवर्षी परदेशात पर्यटन करतात,
त्यांनी जर अशा सहली केल्या, -
3:28 - 3:31केवळ बसमधून
एका ठिकाणाहून दुसरीकडे न जाता, -
3:31 - 3:33एका हॉटेलमधून दुसऱ्यात न जाता,
-
3:33 - 3:37बसच्या खिडक्यांमधून लोकांची
आणि संस्कृतीची छायाचित्रं न काढता, -
3:37 - 3:40त्याऐवजी लोकांशी मैत्री जुळवत.
-
3:40 - 3:44इंग्लंडहून आलेला एक मुस्लिम गट
मला आठवतोय. -
3:44 - 3:47एका सनातन ज्यू कुटुंबात जाऊन
-
3:47 - 3:51प्रथमच त्यांचं पहिल्या शुक्रवारचं
सब्बाथचं जेवण जेवणारा. -
3:51 - 3:55त्यांच्याबरोबर "हमीन"
-ज्यू पद्धतीचा स्ट्यू -चा आस्वाद घेणारा. -
3:55 - 3:58नंतर त्यांच्या लक्षात आलं, की
-
3:58 - 4:01शेकडो वर्षांपूर्वी दोन्ही वंश
उत्तर आफ्रिकेत, -
4:01 - 4:04एकाच ठिकाणी उगम पावले होते.
-
4:04 - 4:07हा फेसबुक प्रोफाईलवरचा फोटो नव्हे.
-
4:07 - 4:09हे संकटग्रस्त भागातले पर्यटन नव्हे.
-
4:09 - 4:11हा आहे पर्यटनाचा भविष्यकाळ.
-
4:11 - 4:14चला, माझ्यासोबत या,
आणि तुमचं पर्यटन बदलून टाका. -
4:14 - 4:16आता आम्ही हे जगभर सर्वत्र करीत आहोत.
-
4:16 - 4:19आयर्लंड पासून, इराण आणि टर्कीपर्यंत
-
4:19 - 4:21पर्यटनाद्वारे आम्ही
जगात बदल घडवून आणतो आहोत. -
4:21 - 4:23धन्यवाद.
-
4:23 - 4:25(टाळ्या)
- Title:
- सहिष्णुता वाढवण्यासाठी हवं जास्त पर्यटन?
- Speaker:
- अझिझ अबु सारा
- Description:
-
अझिझ अबु सारा एक पेलेस्टिनी कार्यकर्ते आहेत. जगात शांतता राखण्याविषयी त्यांचा एक आगळा दृष्टीकोन आहे: पर्यटक व्हा. या TED Fellow ने दाखवून दिलं आहे, की वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या लोकांच्या एकमेकांशी आलेल्या साध्या संपर्कामुळे कैक दशकांचा द्वेष ओसरू शकतो. ते सुरुवात करतात, पेलेस्टिनी लोकांना इस्त्रायलीं लोकांशी भेटवून. आणि मग त्याहूनही पुढे जातात…
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 04:37
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for For more tolerance, we need more ... tourism? |