< Return to Video

Unplugged - Conditionals with Cards

  • 0:05 - 0:12
    या धड्याचं नाव आहे पत्त्यांसह कंडीशनल्स.
    दररोज तुम्ही काय बघता आणि ऐकता
  • 0:12 - 0:19
    त्यानुसार तुम्ही निर्णय घेत असता. मला बागेपर्यंत
    चालत जायचं आहे पण आधी मला हे ठरवायचं आहे
  • 0:19 - 0:25
    की मी छत्री नेऊ की नको. त्यामुळे मी खिडकीबाहेर बघते. जर ढगाळ असेल तर मी छत्री घेऊन
  • 0:25 - 0:30
    जाणार आहे. नाहीतर, मी गॉगल घेऊन जाईन.
    मला वाटतं छत्री नेलेली बरी. मी काय पाहते
  • 0:30 - 0:37
    आणि ऐकते त्यानुसार मी बागेत काय घेऊन जाणार ते ठरतं. खेळांमध्येसुद्धा कंडीशनल्स वापरले जातात.
  • 0:37 - 0:41
    आज आपण पत्त्यांचा खेळ वापरून कंडीशनल्सचा सराव करणार आहे. या खेळात, मी जो पत्ता काढते
  • 0:41 - 0:50
    तो ठरवतो की माझे मित्र काय करणार आहेत. जर मी सत्ती काढली तर सगळेजण टाळ्या वाजवतात.
  • 0:50 - 1:03
    नाहीतर सगळेजण "ऑ" म्हणतात. चला करून बघूया.
    तुम्ही कंडीशनल्स वापरून यापेक्षासुद्धा चांगले गेम्स
  • 1:03 - 1:09
    तयार करू शकाल अशी मला खात्री आहे.
    करून पहा! कंडीशनल्समुळे
  • 1:09 - 1:15
    कॉम्प्युटर स्मार्ट वाटतात. कंडीशनल्स असलेला कॉम्प्युटर युजरला प्रतिसाद देऊ शकतो आणि
  • 1:15 - 1:20
    त्यांच्या कृतीचा मार्ग बदलू शकतो. तुमच्या आवडत्या व्हिडीओ गेमचा विचार करा. इतर कृतींपेक्षा काही
  • 1:20 - 1:26
    कृतींसाठी तुम्हाला जास्त पॉईंट्स मिळतात का?
  • 1:26 - 1:34
    असे होते कारण कॉम्प्युटर कंडीशनल्स वापरत असतो. या पद्धतीने कॉम्प्युटर निर्णय घेतो. असे केले तर.. की तुम्ही टार्गेट हिट
  • 1:34 - 1:40
    केले तर तुम्हाला दहा पॉईंट्स मिळतील, नाहीतर तुमचे तीन पॉईंट्स कमी होतील. जेव्हा
  • 1:40 - 1:42
    कंडीशनल्स कसे काम करतात, हे तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही वेगवेगळे आकर्षक गेम्स तयार करू शकता.
Title:
Unplugged - Conditionals with Cards
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:45

Marathi subtitles

Revisions