इंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे
-
0:02 - 0:07इंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे
-
0:07 - 0:11हाय, माझं नाव आहे जेनी मार्टीन आणि मी
सिमँटेकमध्ये सायबर सुरक्षा तपास विभागाची -
0:11 - 0:16संचालक आहे. आज सायबर गुन्ह्यांमुळे समाजात
वैयक्तिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या -
0:16 - 0:23आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टींमध्ये मोठ्या
प्रमाणावर समस्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या -
0:23 - 0:27काही वर्षातच कोट्यावधी क्रेडीट कार्ड नंबर्स
चोरीला गेले आहेत, -
0:27 - 0:31कोट्यावधी सोशल सिक्युरीटी क्रमांक आणि आरोग्यसेवा
नोंदी -
0:31 - 0:35उघड झाल्या. अगदी आण्विक सेन्ट्रीफ्युजेससुद्धा हॅक
झाले आणि मानवरहित -
0:35 - 0:40हवाई ड्रोन्स हायजॅक करण्यात आले. हार्डवेअर आणि
सॉफ्टवेअरमधील कमकुवत दुवे ओळखून किंवा -
0:40 - 0:45बऱ्याचदा सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांनी नकळत घेतलेल्या निर्णयांचा फायदा घेऊन
-
0:45 - 0:53या सर्व गोष्टी केल्या जातात. सायबर गुन्हे
-
0:53 - 0:58करणारे लोक एकाच प्रकारचे किंवा एक हेतू असलेलेच नसतात. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यापासून ते
-
0:58 - 1:03अधिकार मिळवण्यासाठी झगडणाऱ्या किशोरवयीन मुलांपर्यंत कोणीही त्यात असू शकतो. आज सर्वांत
-
1:03 - 1:09मोठ्या देशांमध्ये केवळ नेहमीचे सैन्यच नसते तर सज्ज
असलेले सायबर सैन्यसुद्धा असते. -
1:09 - 1:12खरं तर, पुढचं जागतिक युद्ध पारंपारिक शस्त्रांनी लढलं
जाणार नाही तर देशातील पाणी पुरवठा, -
1:12 - 1:17वीजेची ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था बंद करणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून लढलं जाईल.
-
1:17 - 1:25हाय, माझं नाव परिसा आणि मी गुगल सुरक्षा राजकन्या आहे. मी खूप वेगवेगळ्या
-
1:25 - 1:30उत्पादनांवर काम केलं आहे आणि आमचं सॉफ्टवेअर
शक्य तितकं सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळया -
1:30 - 1:34पद्धतींवर काम केलं आहे.
-
1:34 - 1:37आता आपण सायबर गुन्हे कसं काम करतात, ते पाहू.
-
1:37 - 1:41आपण सॉफ्टवेअर व्हायरसेस, सेवा नाकारण्यासाठी
हल्ले, आणि फिशिंग स्कॅम्स याबद्दल शिकू. -
1:41 - 1:46जीवशास्त्रात आणि जीवनात, व्हायरस म्हणजे खोकणे,
शिंकणे किंवा -
1:46 - 1:49शारीरिक संपर्कातून पसरणारा जीव.
-
1:49 - 1:53पेशींना संसर्ग करून, आपले जेनेटिक मटेरियल त्यात
घालून आणि पुनरुत्पादनासाठी या -
1:53 - 1:59पेशी वापरून विषाणू काम करतात. ते लोकांना आजारी पाडतात आणि नंतर इतर लोकांकडे प्रसारित करतात.
-
1:59 - 2:04कॉम्प्युटरमधील व्हायरस थोडासा अशाचप्रकारे काम
करतो. व्हायरस एक्झिक्युट करण्यासारखा प्रोग्रॅम -
2:04 - 2:10असतो, जो सामान्यपणे, नकळत इन्स्टॉल होणारा
असतो आणि तो युजर आणि त्यांचा कॉम्प्युटर यांचे -
2:10 - 2:16नुकसान करतो. व्हायरस आपणहून इतर
कॉम्प्युटर्सपर्यंत प्रसारित होणंसुद्धा शक्य असतं. आता -
2:16 - 2:20तुमच्या कॉम्प्युटरपर्यंत व्हायरस येतो कसा? हल्लेखोर
एक-दोन मार्गांनी एखाद्याच्या कॉम्प्युटरला -
2:20 - 2:25संसर्ग करू शकतो. ते बळी पडणाऱ्या माणसाला प्रोग्रॅम इन्स्टॉल करायला भाग पाडतात, तेव्हा त्या प्रोग्रॅमचा हेतू
-
2:25 - 2:29वेगळाच सांगून दिशाभूल करतात, उदा. खूप व्हायरस एखाद्या सिक्युरीटी अपडेटचे सोंग घेऊन येतात.
-
2:29 - 2:36तुमच्या कॉम्प्युटरवरील सॉफ्टवेअरमध्ये काही
कच्चे दुवे असू शकतात, त्यामुळे हल्लेखोर -
2:36 - 2:39स्पष्ट परवानगी न मागतासुद्धा स्वत: इन्स्टॉल करू
शकतो. -
2:39 - 2:44एकदा व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर आला की तो
तुमच्या कोणत्याही फाईल्स चोरू शकतो, हटवू शकतो -
2:44 - 2:48इतर प्रोग्रॅम्स नियंत्रित करू शकतो, किंवा अगदी एखाद्याला लांबून तुमच्या कॉम्प्युटरचं नियंत्रण
-
2:48 - 2:50करण्याची परवानगीसुद्धा देऊ शकतो.
-
2:50 - 2:56कॉम्प्युटर व्हायरस वापरून, हॅकर्स जगभरातील
लक्षावधी कॉम्प्युटर्सवर नियंत्रण मिळवू शकतात -
2:56 - 3:01आणि त्यांचा उपयोग डिजिटल सैन्य म्हणून करू
शकतात, ज्याला बॉटनेट असं म्हणतात, आणि हल्ले -
3:01 - 3:07करून वेबसाईट्स बंद पाडू शकतात. अशा हल्ल्याला
सेवेला वितरीत नकार, असे म्हणतात. -
3:07 - 3:10सेवेला नकार म्हणजे हॅकर्स वेबसाईटला खूपच
-
3:10 - 3:15जास्त विनंत्या पाठवून ती बंद पाडतात. जेव्हा असा
हल्ला अनेक कॉम्प्युटर्सकडून एकाच वेळी केला जातो -
3:15 - 3:17तेव्हा त्याला सेवेला वितरीत नकार असे म्हणतात.
-
3:17 - 3:22बहुतेक सर्व वेबसाईट्स एका दिवशी लक्षावधी विनंत्यांना
प्रतिसाद देण्यासाठी तयार असतात, पण जर आपण -
3:22 - 3:25त्यांना कोट्यावधी किंवा अब्जावधी विनंत्या, वेगवेगळ्या
ठिकाणांहून पाठवल्या, -
3:25 - 3:32तर कॉम्प्युटर्स ओव्हरलोड होतात आणि प्रतिसाद देणे
थांबवतात. सायबर गुन्हेगार करत असलेला दुसरा -
3:32 - 3:36प्रकार म्हणजे लोकांना संवेदनशील वैयक्तिक माहिती
शेअर करायला भाग पाडण्यासाठी खूप मोठ्या -
3:36 - 3:39प्रमाणावर स्पॅम ईमेल पाठवणे.
-
3:39 - 3:45याला फिशिंग स्कॅम असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला एखादे विश्वासार्ह ईमेलसारखे दिसणारे ईमेल येते आणि
-
3:45 - 3:50ते तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करायला सांगते,
पण त्या ईमेलवर क्लिक केल्यास तुम्हाला एका -
3:50 - 3:52बनावट वेबसाईटवर नेण्यात येते.
-
3:52 - 3:56जर तुम्ही लॉग इन केलेच तर तुम्हाला फसवून तुमचा
पासवर्ड चोरला जातो. -
3:56 - 4:00मग हॅकर्स तुमची लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून
तुमच्या खऱ्या खात्यांमध्ये प्रवेश करून -
4:00 - 4:06माहिती चोरतात किंवा अगदी तुमचे पैसेसुद्धा चोरतात.
सुदैवाने अनेक कंपन्या, -
4:06 - 4:10कायदे आणि सरकारी संस्था इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत,
-
4:10 - 4:15पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत.
-
4:15 - 4:18तुम्हाला असं वाटेल की जेव्हा कॉम्प्युटर सिस्टीम हॅक
होते, तेव्हा ही सुरक्षेच्या डिझाईनची -
4:18 - 4:23किंवा सॉफ्टवेअरची समस्या असेल. नव्वद टक्के वेळा
जेव्हा सिस्टीम हॅक होते, तेव्हा ती सुरक्षेतील -
4:23 - 4:27बगमुळं नाही तर माणसांनी केलेल्या साध्या चुकांमुळं
होते. -
4:27 - 4:35स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही पावलं उचलू
शकतो. बऱ्याचदा -
4:35 - 4:39तुमच्या कृतींचा परिणाम केवळ तुमच्या स्वत:चा डेटा
आणि कॉम्प्युटर याच्याच सुरक्षिततेवरच नव्हे, -
4:39 - 4:42तर तुमची शाळा, कामाची जागा आणि घरातील
सगळ्याच्यांच सुरक्षिततेवर होतो. -
4:42 - 4:47कोट्यावधी किंवा अब्जावधी डॉलर्स पणाला
लागलेले असल्यामुळं -
4:47 - 4:52सायबर गुन्हेगार दरवर्षी अधिकाधिक स्मार्ट होतात आणि आपण सर्वांनी त्यांचा वेग गाठणं आवश्यक आहे.
- Title:
- इंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे
- Description:
-
more » « less
गुगलमधील परिसा तबरिझ आणि सिमँटेकमधील जेनी मार्टीन स्याबर गुन्ह्यांच्या सर्वांत सामान्य प्रकारांची म्हणजे व्हायरसेस, मालवेअर, डीडीओएस हल्ले, फिशिंग स्कॅम्सची ओळख करून देत आहेत. हॅक होणे टाळण्याकरता महत्त्वाच्या चार टिप्स पाहण्यासाठी 4:40 पर्यंत व्हिडिओ बघा.
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Duration:
- 05:02
| Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Cybersecurity & Crime | ||
| Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Cybersecurity & Crime | ||
| Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Cybersecurity & Crime | ||
| Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Cybersecurity & Crime |