0:00:02.220,0:00:06.660 इंटरनेट: सायबरसुरक्षा आणि गुन्हे 0:00:06.660,0:00:11.080 हाय, माझं नाव आहे जेनी मार्टीन आणि मी[br]सिमँटेकमध्ये सायबर सुरक्षा तपास विभागाची 0:00:11.080,0:00:16.299 संचालक आहे. आज सायबर गुन्ह्यांमुळे समाजात[br]वैयक्तिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या 0:00:16.299,0:00:22.550 आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टींमध्ये मोठ्या[br]प्रमाणावर समस्या निर्माण झालेल्या आहेत. गेल्या 0:00:22.550,0:00:26.660 काही वर्षातच कोट्यावधी क्रेडीट कार्ड नंबर्स[br]चोरीला गेले आहेत, 0:00:26.660,0:00:30.539 कोट्यावधी सोशल सिक्युरीटी क्रमांक आणि आरोग्यसेवा [br]नोंदी 0:00:30.539,0:00:35.360 उघड झाल्या. अगदी आण्विक सेन्ट्रीफ्युजेससुद्धा हॅक[br]झाले आणि मानवरहित 0:00:35.360,0:00:40.090 हवाई ड्रोन्स हायजॅक करण्यात आले. हार्डवेअर आणि[br]सॉफ्टवेअरमधील कमकुवत दुवे ओळखून किंवा 0:00:40.090,0:00:45.059 बऱ्याचदा सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांनी नकळत घेतलेल्या निर्णयांचा फायदा घेऊन 0:00:45.059,0:00:53.300 या सर्व गोष्टी केल्या जातात. सायबर गुन्हे 0:00:53.300,0:00:57.600 करणारे लोक एकाच प्रकारचे किंवा एक हेतू असलेलेच नसतात. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यापासून ते 0:00:57.600,0:01:03.329 अधिकार मिळवण्यासाठी झगडणाऱ्या किशोरवयीन मुलांपर्यंत कोणीही त्यात असू शकतो. आज सर्वांत 0:01:03.329,0:01:08.960 मोठ्या देशांमध्ये केवळ नेहमीचे सैन्यच नसते तर सज्ज[br]असलेले सायबर सैन्यसुद्धा असते. 0:01:08.960,0:01:12.500 खरं तर, पुढचं जागतिक युद्ध पारंपारिक शस्त्रांनी लढलं[br]जाणार नाही तर देशातील पाणी पुरवठा, 0:01:12.500,0:01:17.210 वीजेची ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था बंद करणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून लढलं जाईल. 0:01:17.210,0:01:25.330 हाय, माझं नाव परिसा आणि मी गुगल सुरक्षा राजकन्या आहे. मी खूप वेगवेगळ्या 0:01:25.330,0:01:29.540 उत्पादनांवर काम केलं आहे आणि आमचं सॉफ्टवेअर[br]शक्य तितकं सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळया[br] 0:01:29.540,0:01:33.600 पद्धतींवर काम केलं आहे. 0:01:33.600,0:01:36.690 आता आपण सायबर गुन्हे कसं काम करतात, ते पाहू. 0:01:36.690,0:01:41.320 आपण सॉफ्टवेअर व्हायरसेस, सेवा नाकारण्यासाठी[br]हल्ले, आणि फिशिंग स्कॅम्स याबद्दल शिकू. 0:01:41.320,0:01:46.170 जीवशास्त्रात आणि जीवनात, व्हायरस म्हणजे खोकणे,[br]शिंकणे किंवा 0:01:46.170,0:01:49.130 शारीरिक संपर्कातून पसरणारा जीव. 0:01:49.130,0:01:53.370 पेशींना संसर्ग करून, आपले जेनेटिक मटेरियल त्यात[br]घालून आणि पुनरुत्पादनासाठी या 0:01:53.370,0:01:59.140 पेशी वापरून विषाणू काम करतात. ते लोकांना आजारी पाडतात आणि नंतर इतर लोकांकडे प्रसारित करतात. 0:01:59.140,0:02:04.290 कॉम्प्युटरमधील व्हायरस थोडासा अशाचप्रकारे काम[br]करतो. व्हायरस एक्झिक्युट करण्यासारखा प्रोग्रॅम 0:02:04.290,0:02:10.090 असतो, जो सामान्यपणे, नकळत इन्स्टॉल होणारा[br]असतो आणि तो युजर आणि त्यांचा कॉम्प्युटर यांचे 0:02:10.090,0:02:16.210 नुकसान करतो. व्हायरस आपणहून इतर[br]कॉम्प्युटर्सपर्यंत प्रसारित होणंसुद्धा शक्य असतं. आता 0:02:16.210,0:02:19.880 तुमच्या कॉम्प्युटरपर्यंत व्हायरस येतो कसा? हल्लेखोर[br]एक-दोन मार्गांनी एखाद्याच्या कॉम्प्युटरला 0:02:19.880,0:02:24.730 संसर्ग करू शकतो. ते बळी पडणाऱ्या माणसाला प्रोग्रॅम इन्स्टॉल करायला भाग पाडतात, तेव्हा त्या प्रोग्रॅमचा हेतू 0:02:24.730,0:02:29.200 वेगळाच सांगून दिशाभूल करतात, उदा. खूप व्हायरस एखाद्या सिक्युरीटी अपडेटचे सोंग घेऊन येतात. 0:02:29.200,0:02:35.920 तुमच्या कॉम्प्युटरवरील सॉफ्टवेअरमध्ये काही [br]कच्चे दुवे असू शकतात, त्यामुळे हल्लेखोर 0:02:35.920,0:02:39.330 स्पष्ट परवानगी न मागतासुद्धा स्वत: इन्स्टॉल करू[br]शकतो. 0:02:39.330,0:02:43.590 एकदा व्हायरस तुमच्या कॉम्प्युटरवर आला की तो[br]तुमच्या कोणत्याही फाईल्स चोरू शकतो, हटवू शकतो 0:02:43.590,0:02:47.959 इतर प्रोग्रॅम्स नियंत्रित करू शकतो, किंवा अगदी एखाद्याला लांबून तुमच्या कॉम्प्युटरचं नियंत्रण 0:02:47.959,0:02:50.340 करण्याची परवानगीसुद्धा देऊ शकतो. 0:02:50.340,0:02:55.830 कॉम्प्युटर व्हायरस वापरून, हॅकर्स जगभरातील[br]लक्षावधी कॉम्प्युटर्सवर नियंत्रण मिळवू शकतात 0:02:55.830,0:03:01.280 आणि त्यांचा उपयोग डिजिटल सैन्य म्हणून करू [br]शकतात, ज्याला बॉटनेट असं म्हणतात, आणि हल्ले 0:03:01.280,0:03:07.269 करून वेबसाईट्स बंद पाडू शकतात. अशा हल्ल्याला[br]सेवेला वितरीत नकार, असे म्हणतात. 0:03:07.269,0:03:10.470 सेवेला नकार म्हणजे हॅकर्स वेबसाईटला खूपच 0:03:10.470,0:03:14.840 जास्त विनंत्या पाठवून ती बंद पाडतात. जेव्हा असा[br]हल्ला अनेक कॉम्प्युटर्सकडून एकाच वेळी केला जातो 0:03:14.840,0:03:16.540 तेव्हा त्याला सेवेला वितरीत नकार असे म्हणतात. 0:03:16.540,0:03:21.950 बहुतेक सर्व वेबसाईट्स एका दिवशी लक्षावधी विनंत्यांना [br]प्रतिसाद देण्यासाठी तयार असतात, पण जर आपण 0:03:21.950,0:03:25.430 त्यांना कोट्यावधी किंवा अब्जावधी विनंत्या, वेगवेगळ्या[br]ठिकाणांहून पाठवल्या, 0:03:25.430,0:03:31.500 तर कॉम्प्युटर्स ओव्हरलोड होतात आणि प्रतिसाद देणे[br]थांबवतात. सायबर गुन्हेगार करत असलेला दुसरा 0:03:31.500,0:03:35.970 प्रकार म्हणजे लोकांना संवेदनशील वैयक्तिक माहिती[br]शेअर करायला भाग पाडण्यासाठी खूप मोठ्या 0:03:35.970,0:03:39.110 प्रमाणावर स्पॅम ईमेल पाठवणे. 0:03:39.110,0:03:44.920 याला फिशिंग स्कॅम असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला एखादे विश्वासार्ह ईमेलसारखे दिसणारे ईमेल येते आणि 0:03:44.920,0:03:49.590 ते तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करायला सांगते,[br]पण त्या ईमेलवर क्लिक केल्यास तुम्हाला एका 0:03:49.590,0:03:51.560 बनावट वेबसाईटवर नेण्यात येते. 0:03:51.560,0:03:55.599 जर तुम्ही लॉग इन केलेच तर तुम्हाला फसवून तुमचा[br]पासवर्ड चोरला जातो. 0:03:55.599,0:04:00.390 मग हॅकर्स तुमची लॉग इन क्रेडेन्शियल्स वापरून[br]तुमच्या खऱ्या खात्यांमध्ये प्रवेश करून 0:04:00.390,0:04:05.520 माहिती चोरतात किंवा अगदी तुमचे पैसेसुद्धा चोरतात.[br]सुदैवाने अनेक कंपन्या, 0:04:05.520,0:04:09.920 कायदे आणि सरकारी संस्था इंटरनेट सुरक्षित करण्यासाठी काम करत आहेत, 0:04:09.920,0:04:14.750 पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत. 0:04:14.750,0:04:18.450 तुम्हाला असं वाटेल की जेव्हा कॉम्प्युटर सिस्टीम हॅक[br]होते, तेव्हा ही सुरक्षेच्या डिझाईनची 0:04:18.450,0:04:22.860 किंवा सॉफ्टवेअरची समस्या असेल. नव्वद टक्के वेळा[br]जेव्हा सिस्टीम हॅक होते, तेव्हा ती सुरक्षेतील 0:04:22.860,0:04:26.980 बगमुळं नाही तर माणसांनी केलेल्या साध्या चुकांमुळं[br]होते. 0:04:26.980,0:04:35.070 स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही पावलं उचलू[br]शकतो. बऱ्याचदा 0:04:35.070,0:04:39.040 तुमच्या कृतींचा परिणाम केवळ तुमच्या स्वत:चा डेटा[br]आणि कॉम्प्युटर याच्याच सुरक्षिततेवरच नव्हे, 0:04:39.040,0:04:41.550 तर तुमची शाळा, कामाची जागा आणि घरातील[br]सगळ्याच्यांच सुरक्षिततेवर होतो. 0:04:41.550,0:04:46.510 कोट्यावधी किंवा अब्जावधी डॉलर्स पणाला[br]लागलेले असल्यामुळं 0:04:46.510,0:04:51.590 सायबर गुन्हेगार दरवर्षी अधिकाधिक स्मार्ट होतात आणि आपण सर्वांनी त्यांचा वेग गाठणं आवश्यक आहे.