इंटरनेट: HTTP आणि HTML.
-
0:03 - 0:07इंटरनेट: HTTP आणि HTML
-
0:07 - 0:12मी जास्मिन आहे. मी XBOX One इंजिनीअरींग
टीममध्ये प्रोग्रॅम मॅनेजर आहे. -
0:12 - 0:19आमचं एक सर्वांत महत्त्वाचं फिचर म्हणजे
XBOX लाईव्ह. ही ऑनलाईन सेवा असून ती -
0:19 - 0:24जगातल्या सगळ्या गेमर्सना जोडते आणि आम्ही
त्यासाठी इंटरनेटवर अवलंबून असतो. -
0:24 - 0:30ही सोपी गोष्ट नाही, यासाठी पडद्यामागं अनेक गोष्टी
घडत असतात. लोक कशाप्रकारे एकमेकांशी संवाद -
0:30 - 0:36साधतात आणि जोडले जातात, हे इंटरनेटमुळं पूर्णपणे
बदलत आहे. पण हे होतं कसं? जगभरातले कॉम्प्युटर्स -
0:36 - 0:43एकमेकांशी कसा संवाद साधतात? वेब ब्राऊझिंगचं
उदाहरण घेऊया. -
0:43 - 0:50आधी, आपण वेब ब्राऊझर उघडतो. आपण वेब पेजेस बघण्यासाठी हे अॅप उघडतो. नंतर, आपण
-
0:50 - 0:56tumblr.com सारख्या ज्या वेबसाईटला भेट द्यायची
आहे, तिचा वेब अॅड्रेस किंवा युआरएल म्हणजे -
0:56 - 1:07युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर टाईप करतो. हाय, मी डेव्हिड कार्प, Tumblr चा संस्थापक. आज आपण रोज
-
1:07 - 1:13वापरत असलेली वेब ब्राऊझर्स कशाप्रकारे काम करतात,
याबद्दल बोलणार आहोत. तर तुम्हाला कुतूहल वाटत -
1:13 - 1:16असेल की तुम्ही वेब ब्राऊझरमध्ये अॅड्रेस टाईप करता
आणि एंटर दाबता तेव्हा नेमकं काय होतं? -
1:16 - 1:21आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही तितकं हे अद्भुत आहे. तर त्या क्षणी तुमचा कॉम्प्युटर
-
1:21 - 1:26सर्व्हर नावाच्या दुसऱ्या कॉम्प्युटरशी बोलायला सुरुवात
करतो, जो सामान्यपणे हजारो मैलांवर असतो. -
1:26 - 1:32आणि काही मिलीसेकंदांमध्ये तुमचा कॉम्प्युटर त्या
सर्व्हरला वेबसाईट मागतो, आणि तो तुमच्या -
1:32 - 1:40कॉम्प्युटरशी HTTP नावाच्या भाषेत बोलायला लागतो.
HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट -
1:40 - 1:44ट्रान्सफर प्रोटोकॉल. एखाद्या डॉक्युमेंटसाठी एक
कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरशी ज्या भाषेत बोलतो -
1:44 - 1:48ती ही भाषा. आणि हे प्रत्यक्षात अगदी सरळ पद्धतीने
घडते. -
1:48 - 1:53जर तुमचा कॉम्प्युटर आणि वेब सर्व्हर यांच्यातला संवाद तुम्ही पाहिलात तर
-
1:53 - 1:57तो मुख्यत: "GET" रिक्वेस्ट्सनी बनलेला असतो. त्या अतिशय साध्या असतात, फक्त शब्द GET
-
1:57 - 2:02आणि तुम्ही विनंती करत असलेल्या डॉक्युमेंटचं नाव.
त्यामुळं जर तुम्ही Tumblr ला लॉग इन करायचा -
2:02 - 2:06प्रयत्न करत असाल आणि आमचं लॉग इन पेज लोड करत असाल, तर तुम्ही Tumblr च्या सर्व्हरला GET ही
-
2:06 - 2:14विनंती GET /login अशी पाठवत असता. आणि ती Tumblr च्या सर्व्हरला सांगते की तुम्हाला Tumblr
-
2:14 - 2:22लॉगिन पेजचा सगळा HTML कोड हवा आहे. HTML
म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि पेज -
2:22 - 2:26कसं दिसावं हे वेब ब्राऊझरला सांगण्याची भाषा, असे आपण याला म्हणू शकतो.
-
2:26 - 2:31जर तुम्ही विकिपीडियासारख्या एखाद्या गोष्टीचा
विचार केलात तर ते एक मोठं साधं डॉक्युमेंट -
2:31 - 2:36असतं आणि त्याचं शीर्षक मोठं आणि ठळक करायला, फॉन्ट योग्य ठेवायला, विशिष्ट मजकूर विशिष्ट इतर
-
2:36 - 2:43पानांना जोडायला, काही मजकूर ठळक करायला, काही मजकूर तिरपा करायला, इमेज पानाच्या मध्यभागी
-
2:43 - 2:47ठेवायला, इमेज उजव्या बाजूला ठेवायला, इमेज डाव्या बाजूला ठेवायला आपण जी भाषा वापरतो ती HTML
-
2:47 - 2:53असते. वेबपेजचा मजकूर थेट HTML मध्ये समाविष्ट केलेला असतो,
-
2:53 - 2:58पण इमेज किंवा व्हिडीओ असे इतर भाग म्हणजे स्वतंत्र
फाईल्स असतात. त्यांच्या वेगळ्या युआरएल असतात. -
2:58 - 3:05त्यांना विनंती पाठवणे आवश्यक असते. ब्राऊझर
यातील प्रत्येकाला स्वतंत्र HTTP विनंती पाठवतो आणि -
3:05 - 3:12ते आले की दर्शवतो. जर वेबपेजवर खूपच इमेजेस
असतील तर त्यातील प्रत्येकासाठी स्वतंत्र HTTP -
3:12 - 3:21विनंती करावी लागते आणि पेज सावकाश लोड होते. आता कधीकधी जेव्हा तुम्ही वेब ब्राऊझ करता तेव्हा
-
3:21 - 3:26नुसत्या GET विनंत्या पाठवत नाही, तर तुम्ही कधीकधी माहितीही पाठवता, उदा. तुम्ही एखादा फॉर्म भरता किंवा
-
3:26 - 3:32सर्च क्वेरी टाईप करता. तुमचा ब्राऊझर ही माहिती प्लेन टेक्स्ट म्हणून वेब सर्व्हरकडे
-
3:32 - 3:39HTTP POST विनंती वापरून पाठवतो. समजा तुम्ही
Tumblr ला लॉगिन केलंत. पहिली गोष्ट तुम्ही करता -
3:39 - 3:45ती म्हणजे POST रिक्वेस्ट, ती Tumblr च्या लॉगिन
पेजला काही डेटासह POST केली जाते. -
3:45 - 3:50त्यामध्ये तुमचा ईमेल अॅड्रेस आणि पासवर्ड असतो. तो
-
3:50 - 3:55Tumblr सर्व्हरकडं पाठवला जातो. Tumblr सर्व्हरला
कळतं की तुम्ही डेव्हिड आहात. तो वेबपेज तुमच्या -
3:55 - 4:00ब्राऊझरकडे परत पाठवतो, यशस्वी! अशा मेसेजसह.
डेव्हिड म्हणून लॉगिन झाले. पण त्या वेबपेजबरोबर -
4:00 - 4:07थोडासा न दिसणारा कुकी डेटा जोडलेला असतो. तो तुमच्या ब्राऊझरला दिसतो आणि तो सेव्ह करायचा आहे हे माहीतही असतं.
-
4:07 - 4:11आणि हे खरंच महत्त्वाचं असतं कारण त्यामुळंच
वेबसाईटला तुम्ही कोण आहात, हे लक्षात रहातं. -
4:11 - 4:17हा सर्व कुकी डेटा म्हणजे, Tumblr साठी एक आयडी कार्ड असतं. हा नंबर तुम्हाला
-
4:17 - 4:22डेव्हिड म्हणून ओळखतो. आणि तुमचं वेब ब्राऊझर
तो नंबर जवळ ठेवतं आणि पुढच्या वेळी तुम्ही -
4:22 - 4:27Tumblr रिफ्रेश केलंत की, पुन्हा Tumblr वर गेलात की
तुमच्या वेब ब्राऊझरला Tumblr च्या सर्व्हरला -
4:27 - 4:31पाठवायच्या विनंतीबरोबर तुमचा तो आयडी नंबर
जोडायचा हे माहिती असतं. त्यामुळे आता -
4:31 - 4:36Tumblr च्या सर्व्हर्सना तुमच्या ब्राऊझरकडून येणारी
विनंती दिसते आणि आयडी नंबर दिसतो, आणि -
4:36 - 4:44"ही डेव्हिडची विनंती आहे" हे कळतं. आता इंटरनेट
पूर्णपणे खुलं आहे. त्याची सर्व कनेक्शन्स सामायिक -
4:44 - 4:49आहेत आणि माहिती प्लेन टेक्स्ट रूपात पाठवली जाते. त्यामुळे तुम्ही इंटरनेटवरून पाठवत असलेली
-
4:49 - 4:56एखादी वैयक्तिक माहिती पाहणे हॅकर्सना शक्य होते.
पण सुरक्षित -
4:56 - 5:01वेबसाईट्स याला प्रतिबंध करतात. त्यासाठी त्या तुमच्या वेब ब्राऊझरला सेक्युअर सॉकेट्स लेयर आणि
-
5:01 - 5:08त्याच्या पुढचा ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरीटी वापरून संवाद साधायला सांगतात.
-
5:08 - 5:14SSL आणि TLS म्हणजे तुमच्या संवादाच्या भोवतालचे सुरक्षेचे लेयर असे आपण म्हणू शकतो. हॅकर्सनी तुमच्या
-
5:14 - 5:21संवादावर लक्ष ठेवण्यापासून किंवा त्यात बदल करण्यापासून ते संरक्षण करतील. जेव्हा तुम्हाला
-
5:21 - 5:27ब्राऊझर अॅड्रेसबारमध्ये HTTPS जवळ छोटे कुलूप दिसते, तेव्हा SSL आणि TLS सक्रिय असतात. HTTPS
-
5:27 - 5:34प्रोटोकॉल्स तुमच्या HTTP विनंत्या सुरक्षित आणि संरक्षित असतील, हे सुनिश्चित करतात. जेव्हा वेबसाईट
-
5:34 - 5:40तुमच्या ब्राऊझरला सुरक्षित कनेक्शन वापरायला सांगते
तेव्हा ती आधी एक डिजिटल प्रमाणपत्र देते. हे एखाद्या -
5:40 - 5:45अधिकृत आयडी कार्डसारखे असून ती वेबसाईट जी असल्याचा दावा करत आहे, त्याचा तो पुरावा असतो.
-
5:45 - 5:50डिजिटल प्रमाणपत्रे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून प्रकाशित
केली जातात. या विश्वासार्ह संस्था असून त्या -
5:50 - 5:55वेबसाईट्सच्या ओळखीची पुष्टी करतात आणि त्यांना
प्रमाणपत्रे जारी करतात. सरकार आयडी किंवा पासपोर्ट -
5:55 - 6:01जारी करते, तसेच. आता जर वेबसाईटने व्यवस्थित जारी केलेल्या डिजिटल प्रमाणपत्राशिवाय सुरक्षित
-
6:01 - 6:10कनेक्शन सुरू करायचा प्रयत्न केला तर, तुमचा ब्राऊझर
तुम्हाला इशारा देईल. हा वेब ब्राऊझिंगचा पाया आहे! -
6:10 - 6:17आपल्याला दररोज दिसणारा इंटरनेटचा भाग. थोडक्यात, HTTP आणि DNS हे HTML, मिडीया
-
6:17 - 6:23फाईल्स किंवा काहीही वेबवर पाठवणे आणि स्वीकारणे,
यांचे व्यवस्थापन करतात. हे शक्य होण्यासाठी TCP/IP -
6:23 - 6:30आणि राऊटर नेटवर्क्स काम करतात. ती माहितीचे विभाजन करून माहिती पॅकेट्सद्वारे पाठवतात. ही
-
6:30 - 6:37पॅकेट्स 1 आणि 0 च्या बायनरी मालिकेपासून बनलेली
असतात आणि ती प्रत्यक्ष विद्युत तारा, फायबर -
6:37 - 6:43ऑप्टिक केबल्स, आणि वायरलेस नेटवर्क्सद्वारे पाठवली जातात.
-
6:43 - 6:47सुदैवाने, एकदा तुम्ही इंटरनेटचा एक लेयर कसा काम
करतो हे शिकलात की तुम्ही त्यावर कोणतेही तपशील -
6:47 - 6:52लक्षात न ठेवता त्यावर अवलंबून राहू शकता. आणि हे
सगळे लेयर्स एकत्रपणे काम करून यशस्वीपणे -
6:52 - 6:59मोठ्या प्रमाणात आणि विश्वसनीयरित्या माहिती
पाठवतील, असा विश्वास ठेवू शकतो.
- Title:
- इंटरनेट: HTTP आणि HTML.
- Description:
-
Tumblr चा संस्थापक डेव्हिड कार्प आणि Xbox प्रोग्रॅम मॅनेजर जास्मिन लॉरेन्स HTTP आणि HTML वापरून इंटरनेट कसे काम करते, याचे तपशीलवार वर्णन करत आहेत.
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Duration:
- 07:07
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: HTTP and HTML | ||
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: HTTP and HTML |