-
अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | इव्हेंट्स
-
या पुढच्या पातळीला, तुम्ही स्टीव्ह किंवा
अलेक्स निवडू शकता.
-
तुमच्या कीबोर्डवरची बाणाची बटणे दाबा
वर, खाली, डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी
-
आता तुम्ही या पातळीवर कुठेही
फिरू शकता.
-
एखादा प्राणी वापरण्यासाठी, त्याच्याकडे चालत जा,
त्याच्याकडे तोंड करा, आणि स्पेसबार दाबा.
-
जर टचस्क्रीन वापरत असाल, तर वर, खाली,
डावीकडे, उजवीकडे स्वाईप करून हालचाल करा.
-
मग तुमच्यासमोरची वस्तू वापरण्यासाठी
गेमवर टॅप करा.
-
पण हे वापरल्यावर काय होतं?
-
माईनक्राफ्टमध्ये तुम्ही मेंढी भादरली की ती
लोकर टाकते. गायींना मारलं की त्या पळून जातात,
-
वेलींच्या जवळ गेलात की त्यांचा स्फोट होतो.
-
काही इव्हेंट्समुळे या प्रतिक्रिया घडतात.
-
इव्हेंट्स प्रोग्रॅमला काहीतरी घडतंय ते
ऐकायला किंवा त्याची वाट पाहायला सांगतात.
-
आणि ते घडलं की, कृती केली जाते.
-
आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट वापरली आहे. तुम्ही
"when spawned" स्लॉटमध्ये टाकलेला कोड
-
तुमचा प्राणी तयार झाला की किंवा गेम सुरू
झाला की रन होतो.
-
पुढच्या काही पातळ्यांमध्ये "when touched"
सारख्या इव्हेन्टसाठी तुमच्याकडे नवीन स्लॉट असतील
-
तुम्ही प्राण्याला स्पर्श केला की ती रन होईल किंवा
तुम्ही प्राणी वापरला की "when used" रन होईल,
-
किंवा, तुम्हाला सूर्य आल्यावर झोम्बीला गायब करायचं असेल तर तो कोड "when day" स्लॉट मध्ये घाला.