प्रणव मिस्त्री: सिक्स्थ सेन्स तंत्राचं रोमांचक सामर्थ्य
-
0:00 - 0:02आपला विकास आपल्या चहुबाजूच्या
-
0:02 - 0:05वस्तूंबरोबरच्या संबंधांतून झाला आहे.
-
0:05 - 0:07यांपैकी बर्याचशा वस्तू
-
0:07 - 0:09आपण दररोज वापरतो.
-
0:09 - 0:12आपल्या बहुतांश कम्प्युटिंग यंत्रांच्या ऐवजी
-
0:12 - 0:15या वस्तू वपरणे खूप मजेशीर वाटते.
-
0:15 - 0:18या वस्तूंबाबत बोलताना,
-
0:18 - 0:21त्यांच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट समोर येते,
-
0:21 - 0:23आणि ती आहे संकेत:
-
0:23 - 0:25आपण या वस्तूंपासून कसं काम करून घेतो,
-
0:25 - 0:28आपण या वस्तूंचा दैनंदिन कामांसाठी कसा वापर करतो.
-
0:28 - 0:31आपण संकेतांद्वारे या वस्तूंकडून फक्त कामच करून घेतो असं नाही,
-
0:31 - 0:33तर यांचा वापर करून आपण एकमेकांशी संपर्कही प्रस्थापित करतो.
-
0:33 - 0:36हा संकेत आहे "नमस्कारा"चा, एखाद्याबद्दल आदर दाखवण्यासाठी
-
0:36 - 0:37किंवा--
-
0:37 - 0:39मला भारतातल्या कुठल्याही मुलाला शिकवायची गरज नाही की ह्याचा अर्थ
-
0:39 - 0:41क्रिकेट मध्ये "चौकार" आहे.
-
0:41 - 0:44हे आपल्या दररोजच्या शिकण्यातून येतं.
-
0:44 - 0:46तर, मला नेहमीच याची उत्सुकता वाटत आली आहे,
-
0:46 - 0:48की कसं काय
-
0:48 - 0:50आपण आपल्या दैनंदिन
-
0:50 - 0:52वस्तू आणि संकेतांची माहिती,
-
0:52 - 0:54आणि या वस्तूंचा वापर करू शकतो,
-
0:54 - 0:57डिजिटल जगाशी संपर्क करण्यासाठी.
-
0:57 - 1:00आपल्या कीबोर्ड आणि माऊस शिवाय,
-
1:00 - 1:03मी माझा कॉम्प्युटर वापरु शकतो का?
-
1:03 - 1:06प्रत्यक्ष जगाशी संपर्क करतो तसंच?
-
1:06 - 1:09म्हणूनच मी हे संशोधन आठ वर्षांपूर्वी सुरु केलं,
-
1:09 - 1:12आणि खरं तर याची सुरुवात झाली माझ्या टेबलावरच्या एका माऊसपासून.
-
1:12 - 1:15त्याचा माझ्या कॉम्पुटरसोबत वापर करण्याऐवजी,
-
1:15 - 1:18मी त्याला उघडलं.
-
1:18 - 1:20आपल्यापैकी बर्याच लोकांना माहिती असेल की त्या काळी
-
1:20 - 1:22माउस मध्ये एक गोळा असायचा,
-
1:22 - 1:24आणि बरोबर दोन रोलर असत
-
1:24 - 1:27जे प्रत्यक्षात गोळ्याची दिशा कॉम्प्युटरपर्यंत पोहोचवत,
-
1:27 - 1:29आणि त्यानुसाराच माउसच्या हालचालींचं मार्गदर्शन करत.
-
1:29 - 1:32तर, मला या दोन रोलरमध्ये रस वाटू लागला,
-
1:32 - 1:35मला खरंतर आणखी हवे होते, मग मी एका मित्राकडून एक माऊस मागून घेतला --
-
1:35 - 1:37आणि कधी परत दिलाच नाही--
-
1:37 - 1:39तर आता माझ्याकडं चार रोलर होते.
-
1:39 - 1:42मजेशीर गोष्ट म्हणजे मी या रोलर्सचं हे केलं,
-
1:42 - 1:45मी त्यांना ह्या माउसमधून काढून घेतलं
-
1:45 - 1:47आणि त्यांना एका रेषेत ठेवून दिलं.
-
1:47 - 1:50त्याबरोबर काही तारा आणि कप्प्या व काही स्प्रिंग्ज होते.
-
1:50 - 1:53आणि मला मौल्यवान असा एक इंटरफेस (मध्यस्थी) मिळाला
-
1:53 - 1:57जो खरा तर एका संवेदक यंत्राचं काम करत होता
-
1:57 - 1:59आणि तो बनला होता २ डॉलर मध्ये.
-
1:59 - 2:02तर ज्या क्रिया मी इथं प्रत्यक्षात करतो
-
2:02 - 2:05त्याची नक्कल डिजिटल दुनियेत होते आहे
-
2:05 - 2:08फक्त ह्या छोट्याश्या यंत्राच्या सहाय्याने, जे मी आठ वर्षांपूर्वी बनवले होते,
-
2:08 - 2:10सन २००० मध्ये.
-
2:10 - 2:12कारण की या दोन विश्वांना जोडण्यासाठी मी अतिशय उत्सुक होतो,
-
2:12 - 2:14मी स्टिकी नोट्सबद्दल विचार केला.
-
2:14 - 2:17मी विचार केला कि "मी
-
2:17 - 2:19एका भौतिक स्टिकी नोटच्या सामान्य माध्यमाला
-
2:19 - 2:21डिजिटल जगाशी जोडू शकतो का?"
-
2:21 - 2:23माझ्या आईला एका स्टिकी नोटवर लिहिलेला संदेश
-
2:23 - 2:24एका कागदावर
-
2:24 - 2:26एका एसेमेसच्या रुपानं मिळू शकतो,
-
2:26 - 2:28किंवा एका बैठकीचं रिमाइन्डर जे आपोआप
-
2:28 - 2:30माझ्या डिजिटल कॅलेंडरशी जुळवून घेईल--
-
2:30 - 2:33एक कामाची यादी जी माझ्याशी स्वतःहून जुळवून घेईल.
-
2:33 - 2:36पण आपण डिजिटल जगामध्ये संशोधनही करु शकता
-
2:36 - 2:38किंवा आपण एक प्रश्न लिहू शकता, जसे कि,
-
2:38 - 2:40"डॉ. स्मिथचा पत्ता काय आहे?"
-
2:40 - 2:42आणि ही छोटीशी यंत्रणा जी खरंतर प्रिंट करू शकते,
-
2:42 - 2:44तर हे एका इनपुट-आउटपुट पद्धतीप्रमाणे कार्य करते,
-
2:44 - 2:47कागदापासून बनलेले.
-
2:50 - 2:52अजून एका शोधामध्ये,
-
2:52 - 2:55मी एक असा पेन बनवायचा विचार केला कि जो त्रिमितीय चित्र बनवू शकेल.
-
2:55 - 2:57तर, मी हे पेन चालू केलं
-
2:57 - 2:59जे केवळ डिझायनर आणि वास्तुकारांना
-
2:59 - 3:01त्रिमितीय दृष्टी देण्यातच मदत करते असे नाही,
-
3:01 - 3:03तर प्रत्यक्ष रचनादेखील करु शकते
-
3:03 - 3:05तर हे वापरणं अजून सोपं आहे.
-
3:05 - 3:07आता मी विचार केला, "एक गुगल मॅप बनवूया,
-
3:07 - 3:09पण खरोखरचा!"
-
3:09 - 3:12काही शोधण्यासाठी एखादा की-वर्ड लिहिण्याऐवजी
-
3:12 - 3:14मी ती वस्तू त्याच्यावर ठेऊन दिली.
-
3:14 - 3:17जर मी एक बोर्डिंग पास ठेवला, तर तो मला फ्लाइट गेट दाखवेल.
-
3:17 - 3:20एक कॉफी कप दाखवेल मला कुठे कॉफी मिळू शकेल,
-
3:20 - 3:22किंवा मी कोठे कप फेकू शकतो.
-
3:22 - 3:25तर हे माझे काही जुने शोध होते ज्यांच्यामार्फत मी
-
3:25 - 3:28या दोन जगांना बेमालूम जोडू इच्छित होतो.
-
3:29 - 3:31या सगळ्या प्रयोगांमध्ये
-
3:31 - 3:33एक समानता होती:
-
3:33 - 3:37मी प्रत्यक्ष जगातला एक भाग डिजिटल जगामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत होतो.
-
3:37 - 3:40मी काही वस्तूंचे भाग घेई,
-
3:40 - 3:43किंवा वास्तविक जीवनातली कोणतीही गोष्ट,
-
3:43 - 3:46आणि त्यांना डिजिटल जगात आणे,
-
3:46 - 3:49कारण उद्देश होता आपल्या कॉम्पुटर्सना अजून सोपे बनवणे.
-
3:49 - 3:51पण तेव्हा मला असे वाटले कि मानवाला
-
3:51 - 3:54खरंतर कॉम्प्युटिंगमध्ये रस नाहीये.
-
3:54 - 3:57आपल्याला रस आहे माहितीमधे.
-
3:57 - 3:59आपल्याला वस्तूंबद्दल माहिती हवी असते.
-
3:59 - 4:01आपल्याला आजूबाजूच्या वस्तूंबद्दल माहिती पाहिजे असे वाटत असते.
-
4:01 - 4:06तर मी विचार केला, गेल्या वर्षी, गेल्या वर्षीच्या सुरुवातीला--
-
4:06 - 4:09मी विचार करू लागलो, "हे मी वेगळ्या पद्धतीने करु शकतो का?"
-
4:09 - 4:12"मी डिजिटल विश्व सोबत घेऊन
-
4:12 - 4:17प्रत्यक्ष जग डिजिटल माहितीनं रंगवलं तर?"
-
4:17 - 4:21कारण पिक्सल खरेतर, आत्ता या यंत्रांमध्ये बंद आहेत
-
4:21 - 4:23जे आपल्या खिशामध्ये मावतात.
-
4:23 - 4:26ह्यांना मुक्त का करू नये?
-
4:26 - 4:29आणि ह्यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणू
-
4:29 - 4:31जेणेकरुन त्या पिक्सलांचा वापर करण्यासाठी
-
4:31 - 4:34मला कुठली नवी भाषा शिकायची गरज पडणार नाही?
-
4:35 - 4:37तर, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
-
4:37 - 4:40मी माझ्या डोक्यावर खरंच एक प्रोजेक्टर ठेवायचा विचार केला.
-
4:40 - 4:43माझ्या मते, ह्याचमुळे याला हेड-माउंटेड प्रोजेक्टर म्हणतात, हो ना?
-
4:43 - 4:45जसे मी म्हटले,
-
4:45 - 4:47मी माझ्या गाडीचं हेल्मेट घेतलं,
-
4:47 - 4:50त्याला थोडं कापलं ज्यामुळे प्रोजेक्टर व्यवस्थित बसवला जाईल.
-
4:50 - 4:52तर आता,
-
4:52 - 4:56मी या डिजिटल माहितीद्वारे माझ्या विश्वाचा प्रसार करू शकतो .
-
4:56 - 4:58पण नंतर,
-
4:58 - 5:01मला जाणीव झाली कि मी ह्या डिजिटल पिक्सलबरोबर पण काम करू इच्छित होतो.
-
5:01 - 5:03तर मी तिथे एक छोटा कॅमेरा लावला,
-
5:03 - 5:05जो एका डिजिटल डोळ्यासारखं काम करतो.
-
5:05 - 5:07नंतर, आम्ही याची एक चांगली,
-
5:07 - 5:09ग्राहकांना आवडेल अशी पेन्डण्ट आवृत्ती काढली,
-
5:09 - 5:12ज्याला आपण आता सिक्स्थ सेन्स नावानं ओळखता.
-
5:12 - 5:15पण या तंत्राची सगळ्यात रोचक गोष्ट ही आहे
-
5:15 - 5:19की आपण आपलं डिजिटल जग आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकता
-
5:19 - 5:21आपण जाल तिथं.
-
5:21 - 5:24आपण कुठल्याही पृष्ठभागाचा, जवळच्या भिंतीचा वापर करू शकता,
-
5:24 - 5:26एका इंटरफेस प्रमाणे.
-
5:26 - 5:29कॅमेरा आपल्या सगळ्या संदेशांचे अनुसरण करत आहे.
-
5:29 - 5:31जे काही आपण आपल्या हातानी करत आहात,
-
5:31 - 5:33त्याला ते संदेश समजत आहेत.
-
5:33 - 5:35आणि जसे आपण बघू शकता, आम्ही प्रारंभिक आवृत्तीमधे
-
5:35 - 5:38काही रंगीत मार्कर वापरले आहेत.
-
5:38 - 5:40आपण कुठल्याही भिंतीवर चित्र काढू शकता.
-
5:40 - 5:43भिंतीच्या समोर थांबून त्यावर चित्र काढू शकता.
-
5:43 - 5:45पण आम्ही इथे एकाच बोटावर काम नाही करत.
-
5:45 - 5:49आम्ही तुम्हाला दोन्ही हात वापरायचं स्वातंत्र्य देत आहोत.
-
5:49 - 5:52यामुळे आपण दोन्ही हात वापरून एखाद्या नकाशाचा आकार कमी-जास्त करू शकता,
-
5:52 - 5:54फक्त ह्या सगळ्यांना दाबून.
-
5:54 - 5:57खरे तर कॅमेरा हे काम करत आहे--
-
5:57 - 5:58सगळ्या चित्रांना एकत्र करणं--
-
5:58 - 6:01व कडा आणि रंगांना ओळखणं
-
6:01 - 6:04आणि त्याच्या आत अनेक प्रक्रिया घडताहेत.
-
6:04 - 6:06तर, तांत्रिकदृष्ट्या हे थोडेसे किचकट आहे,
-
6:06 - 6:09परंतु हे आपल्याला वापरण्यास सोपी अशी एक वस्तू देईल.
-
6:09 - 6:12पण मी उत्साही आहे कारण आपण याला बाहेरही घेऊन जाऊ शकता.
-
6:12 - 6:15आपला कॅमेरा खिशातून न काढता,
-
6:15 - 6:18तुम्ही फक्त फोटो काढायचा इशारा करा
-
6:18 - 6:20आणि हे आपल्यासाठी फोटो घेईल.
-
6:20 - 6:24(टाळ्या)
-
6:24 - 6:25धन्यवाद.
-
6:26 - 6:28आणि नंतर कुठेही, कुठल्याही भिंतीवर,
-
6:28 - 6:30मी फोटो बघू शकतो,
-
6:30 - 6:32किंवा "मी हे चित्र थोडंसं सुधरवून
-
6:32 - 6:34माझ्या मित्राला ई-मेल करू शकतो.
-
6:34 - 6:37तर आपण एका अश्या युगाकडे निघालो आहोत जिथे,
-
6:37 - 6:40कम्प्युटिंग खरंच भौतिक जीवनात मिसळून जाईल.
-
6:40 - 6:43आणि जर आपल्याकडे कुठला पृष्ठभाग नसेल,
-
6:43 - 6:46तर आपण आपला हात वापरू शकता सोप्या कामांसाठी.
-
6:46 - 6:48इथे मी माझा हात वापरून एक नंबर डायल करत आहे.
-
6:52 - 6:55इथे कॅमेर्याला फक्त हाताची हालचालच समजतेय असं नाही,
-
6:55 - 6:56तर, गंमत म्हणजे,
-
6:56 - 6:59तो आपल्या हातात असलेल्या वस्तुलाही ओळखतो आहे.
-
6:59 - 7:02इथे खरंतर असे होत आहे--
-
7:02 - 7:04उदाहरणार्थ, इथे,
-
7:04 - 7:06पुस्तकाच्या कव्हरला
-
7:06 - 7:09काही हजार किंवा लाख पुस्तकांत मिसळून टाकले
-
7:09 - 7:11आणि हे कुठले पुस्तक आहे ते पण ओळखले.
-
7:11 - 7:12एकदा याला ही माहिती मिळाली,
-
7:12 - 7:14नंतर ते त्याच्याबद्दल पुनरवलोकन प्राप्त करून घेते,
-
7:14 - 7:17किंवा न्यूयॉर्क टाईम्सकडे त्याचा एखादा ध्वनी पुनरवलोकन आहे,
-
7:17 - 7:19तर आपण त्याला एका पुस्तकावर
-
7:19 - 7:21ध्वनीच्या रुपात ऐकू शकता.
-
7:21 - 7:23("हार्वर्ड विश्वविद्यालयामध्ये सुविख्यात गोष्ट ")
-
7:23 - 7:26ही ओबामांची एम. आय. टी मधली मागच्या आठवड्यातली मुलाखत होती.
-
7:27 - 7:31("आणि मी आभार व्यक्त करतो दोन उत्तम एम. आय. टी")
-
7:31 - 7:36तर, मी याचा व्हिडीओ बघत होतो बाहेर फक्त एका वर्तमानपत्रावर.
-
7:36 - 7:39आपले वर्तमानपत्र हवामानाचा ताजा अहवाल दाखवेल
-
7:39 - 7:42त्याला अपडेट न करता -- जसे आपल्याला हे करण्यासाठी
-
7:42 - 7:44आपला कॉम्प्युटर बघावा लागतो, बरोबर?
-
7:44 - 7:49(टाळ्या)
-
7:49 - 7:52मी परत जाईन तेव्हा, मी फक्त माझा बोर्डिंग पास वापरु शकतो
-
7:52 - 7:54हे बघण्यासाठी की माझी फ्लाईट यायला किती वेळ आहे,
-
7:54 - 7:56कारण त्यावेळेस मला नाही वाटत
-
7:56 - 7:58की मी माझा आय-फोन काढेन,
-
7:58 - 8:00आणि कुठलं आयकॉन शोधेन.
-
8:00 - 8:03आणि मला वाटते की हे तंत्र फक्त याच पद्धतीला नाही बदलणार--
-
8:03 - 8:04होय.
-
8:05 - 8:07आपण लोकांशी जे व्यवहार करतो त्याचीसुद्धा पद्धत हे बदलेल,
-
8:07 - 8:09फक्त भौतिक विश्वच नाही.
-
8:09 - 8:12मजेची गोष्ट आहे, मी बोस्टन मेट्रोमध्ये जातो
-
8:12 - 8:15आणि पोंग खेळू शकतो ट्रेन मध्ये
-
8:15 - 8:17पृष्ठावर , बरोबर?
-
8:17 - 8:18(हशा)
-
8:18 - 8:20आणि मला वाटते की कल्पना हीच सीमा आहे
-
8:20 - 8:22की आपण काय विचार करू शकता
-
8:22 - 8:24जेव्हा हे तंत्रज्ञान दैनंदिन जीवनात मिसळून जाईल.
-
8:24 - 8:26पण आपल्यातले बरेचजण म्हणतील की
-
8:26 - 8:29आमचे सगळे काम वस्तूंबरोबर तर नाही होत.
-
8:29 - 8:32आम्ही बरीच गणितं आणि संपादन
-
8:32 - 8:34आणि बर्याच अशा गोष्टी करतो, त्यांचं काय?
-
8:34 - 8:38आणि तुमच्यापैकी बरेचजण टॅब्लेट कॉम्प्युटर
-
8:38 - 8:40बाजारामध्ये येण्याबाबत उत्सुक आहात.
-
8:40 - 8:42तर त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा
-
8:42 - 8:45मी स्वतःच ते बनवले आहे, फक्त एक कागद वापरून.
-
8:45 - 8:47तर इथे मी माझा कॅमेरा काढून टाकला--
-
8:47 - 8:51प्रत्येक वेबकॅम कॅमेर्यामध्ये एक मायक्रोफोन लावलेला असतो.
-
8:51 - 8:54मी तो मायक्रोफोन तिथून काढला,
-
8:54 - 8:56आणि त्याला फक्त दाबले--
-
8:56 - 8:59जसे मी माझ्या मायक्रोफोनपासून एक क्लिप बनविली--
-
8:59 - 9:03आणि त्याला एका कसल्याही कागदाबरोबर जोडून टाकलं.
-
9:03 - 9:06तर आता स्पर्शाची ध्वनी मला सांगते
-
9:06 - 9:09की मी कागदाला हात लावत आहे.
-
9:09 - 9:13पण कॅमेरा खरंतर बघत आहे माझी बोटे कुठे जात आहेत ते.
-
9:13 - 9:16आपण चित्रपटदेखील बघू शकता.
-
9:16 - 9:19("गुड आफ्टरनून. माय नेम इज रसेल...")
-
9:19 - 9:22("...ऍन्ड आय ऍम अ वाइल्डरनेस एक्स्प्लोरर इन ट्राइब ५४.")
-
9:22 - 9:25आणि आपण गेमपण खेळू शकता.
-
9:25 - 9:28(कार इंजिन)
-
9:28 - 9:31इथे खरंतर कॅमेर्याला कळतंय मी कागद कसा पकडला आहे ते
-
9:31 - 9:33आणि आपण एक कार-रेसिंग गेम खेळत आहात.
-
9:33 - 9:36(टाळ्या )
-
9:37 - 9:39आपल्यापैकी बर्याच जणांनी हा विचार केला असेल की, ठीक आहे,
-
9:39 - 9:42आपण कुठलीही वेबसाईट ब्राउज करू शकता,
-
9:42 - 9:45किंवा आपण कसलंही कॉम्प्युटिंग करू शकता एका कागदावर,
-
9:45 - 9:46तुम्हाला पाहिजे तिथे.
-
9:46 - 9:49तर, गंमत म्हणजे,
-
9:49 - 9:52याला अजून एका परिवर्तनात्मक पद्धतीने वापरायला मला आवडेल.
-
9:52 - 9:55मी परत येईन तेव्हा त्या माहितीला फक्त पकडून
-
9:55 - 9:57माझ्या डेस्कटॉपवर आणू शकतो जेणेकरून
-
9:57 - 10:00ती मी माझ्या कॉम्प्युटरवर वापरु शकेन.
-
10:00 - 10:02(टाळ्या)
-
10:02 - 10:05आणि कॉम्प्युटरच का? आपण फक्त कागदांसोबतही खेळू शकतो.
-
10:05 - 10:08कागदांच्या दुनियेशी खेळणं अधिक मनोरंजक आहे.
-
10:08 - 10:10इथे मी एका पत्राचा एक भाग घेतोय--
-
10:10 - 10:14आणि इथे दुसऱ्या पत्राचा भाग घेतोय--
-
10:14 - 10:17आणि मी खरच त्या माहिती मध्ये बदल करत आहे
-
10:17 - 10:19जी तिथे माझ्याजवळ आहे.
-
10:19 - 10:22हां, आणि मी म्हणालो, "ठीक आहे, हे चांगलं वाटतंय,
-
10:22 - 10:24याला प्रिंट का करु नये."
-
10:24 - 10:26तर आता माझ्याकडे तिची प्रिंटेड प्रत आहे आणि आता--
-
10:26 - 10:29कामाची पद्धत खूपच सहजसोपी झाली आहे
-
10:29 - 10:32आजपासून २० वर्षापूर्वीच्या तुलनेत,
-
10:32 - 10:35आपल्याला या दोन्ही जगांना बदलायची गरज नाहीये.
-
10:35 - 10:38तर, मला वाटतं,
-
10:38 - 10:41दररोज लागणाऱ्या वस्तूंची माहिती एकत्र करून,
-
10:41 - 10:46आपल्या फक्त डिजिटल विभाजनातून सुटका नाही मिळणार,
-
10:46 - 10:48तर या दोन्ही जगातील अंतर,
-
10:48 - 10:50उलट हे एकप्रकारे आपली मदतपण करेल,
-
10:50 - 10:52माणूस बनून राहण्यासाठी,
-
10:52 - 10:55भौतिक जगाशी आणखी मिसळून राहण्यासाठी.
-
10:58 - 11:01आणि खरंतर हे आपल्याला मदत करेल की आपण मशीन बनून
-
11:01 - 11:03मशिनसमोर बसू नये.
-
11:03 - 11:06तर एवढंच. धन्यवाद.
-
11:06 - 11:20(टाळ्या)
-
11:20 - 11:21धन्यवाद.
-
11:21 - 11:24(टाळ्या)
-
11:24 - 11:25क्रिस एंडर्सन: तर, प्रणव,
-
11:25 - 11:28सर्वप्रथम, तू प्रतिभाशाली आहेस,
-
11:28 - 11:31हे अविश्वसनीय आहे, खरंच.
-
11:31 - 11:34तू याचं काय करणार आहेस? कुठल्या कंपनीची योजना आहे?
-
11:34 - 11:36का हा एक शोधच बनून राहील?
-
11:36 - 11:38प्रणव मिस्त्री: खरेतर बर्याच कंपन्या आहेत--
-
11:38 - 11:39मीडिया लॅबच्या प्रायोजक कंपन्या--
-
11:39 - 11:42ज्या याला कुठल्या न कुठल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत.
-
11:42 - 11:44मोबाईल फोन कंपन्या ज्या याला वेगळ्या रुपात
-
11:44 - 11:47बघतात जसे की भारतातील संस्था,
-
11:47 - 11:50ज्या विचार करतात, "आपल्याजवळ फक्त सिक्स्थ सेन्सच का?
-
11:50 - 11:52आपल्याजवळ फिफ्थ सेन्स पण असणे जरुरी आहे, अपंग लोकांसाठी
-
11:52 - 11:53जे बोलू शकत नाहीत.
-
11:53 - 11:56या तंत्राचा वापर वेगळ्या प्रकारे बोलण्यासाठी केला जाऊ शकतो
-
11:56 - 11:57जसे एका स्पीकर सिस्टीम बरोबर."
-
11:57 - 12:00क्रिस एंडर्सन: आपली योजना काय आहे? आपण एम. आय. टी. मध्ये राहणार,
-
12:00 - 12:01का याबरोबर काही करणार आहात?
-
12:01 - 12:03प्रणव मिस्त्री: मी हे जास्त लोकांना उपलब्ध करून देऊ इच्छितो,
-
12:03 - 12:06जेणेकरून कुणीही आपलं एक सिक्स्थ सेन्स यंत्र तयार करू शकेल
-
12:06 - 12:11कारण हे हार्डवेअर बनवायला अवघड नाहीये,
-
12:11 - 12:13ना स्वतःला बनवणं.
-
12:13 - 12:15आम्ही त्यांच्यासाठी सगळे ओपन सोर्स सॉफ्टवेअर देऊ,
-
12:15 - 12:17बहुतेक पुढच्या महिन्यापासून.
-
12:17 - 12:19क्रिस एंडर्सन: ओपन सोर्स, वाह।
-
12:19 - 12:24(टाळ्या)
-
12:24 - 12:27क्रिस एंडर्सन: तुम्हाला यासोबत भारतात यायला आवडेल?
-
12:27 - 12:29प्रणव मिस्त्री: हो हो, जरूर.
-
12:29 - 12:31क्रिस एंडर्सन: काय योजना आहे आपली? MIT?
-
12:31 - 12:33भारत? पुढच्या वाटचालीसाठी आपण वेळ कसा द्याल?
-
12:33 - 12:36प्रणव मिस्त्री: इथे बरीच उर्जा आहे. बरेच ज्ञान आहे.
-
12:36 - 12:38जे काही काम आज आपण बघितले ते सगळे भारतात
-
12:38 - 12:40माझ्या ज्ञानाविषयी आहे.
-
12:40 - 12:43आणि आपण जर खर्चाबद्दल विचार केला तर.
-
12:43 - 12:45या तंत्रज्ञानासाठी फक्त ३०० डॉलर लागतात.
-
12:45 - 12:48२०,००० डॉलरच्या सरफेस टेबल्सच्या, किंवा त्यासारख्या कशाच्या तरी तुलनेत.
-
12:48 - 12:51किंवा माउस-संदेश पद्धत जी
-
12:51 - 12:54त्या काळी ५००० डॉलरची होती?
-
12:54 - 12:58तर, आपण-- मी, एका सभेमध्ये,
-
12:58 - 13:00राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना हे दाखवले तेव्हा,
-
13:00 - 13:03आणि ते म्हणाले, "ठीक आहे, आपण हे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये आणलं पाहिजे
-
13:03 - 13:05कुठल्या तरी उपयोगासाठी."
-
13:05 - 13:08तर मी खूप उत्सुक आहे, या तंत्रज्ञानाला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी
-
13:08 - 13:11याला फक्त प्रयोगशाळेत ठेवण्याऐवजी.
-
13:11 - 13:15(टाळ्या)
-
13:15 - 13:18क्रिस एंडर्सन: जसे लोक मी 'टेड'वर बघितले आहेत त्या आधारावर
-
13:18 - 13:19मी हे सांगू इच्छितो की आपण सध्या या जगातल्या
-
13:19 - 13:21दोन किंवा तीन चमत्कारांमधील एक आहात.
-
13:21 - 13:23आपलं 'टेड'वर असणं हा आमचा सन्मान आहे.
-
13:23 - 13:25खूप खूप धन्यवाद.
-
13:25 - 13:26हे अद्भुत आहे .
-
13:26 - 13:30(टाळ्या)
- Title:
- प्रणव मिस्त्री: सिक्स्थ सेन्स तंत्राचं रोमांचक सामर्थ्य
- Speaker:
- प्रणव मिस्त्री
- Description:
-
'टेड इंडिया'वर, प्रणव मिस्त्री अशी साधनं प्रदर्शित करतात जी भौतिक जगाला माहितीच्या जगाशी जुळवण्यात मदत करतात। सोबतच, एक नजर त्यांच्या सिक्स्थ सेन्स यंत्र आणि एका नव्या, क्रांतिकारी कागदी लॅपटॉपवर. व्यासपीठावर झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये मिस्त्री म्हणतात की, सिक्स्थ सेन्समागचे सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी खुले असेल, जेणेकरून सगळ्यांसाठी पर्याय उपलब्ध राहतील.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 13:30
![]() |
Dimitra Papageorgiou approved Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology | |
![]() |
Mandar Shinde accepted Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology | |
![]() |
Mandar Shinde edited Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology | |
![]() |
Mandar Shinde edited Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology | |
![]() |
Mandar Shinde edited Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology | |
![]() |
Mandar Shinde edited Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology | |
![]() |
Mandar Shinde edited Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for The thrilling potential of SixthSense technology |