< Return to Video

Artist Intro video - presented by JR Hildebrand

  • 0:05 - 0:10
    संगणक शास्त्रात तज्ज्ञ असलेले लोक नसतील तर
    तुम्ही रेससाठी पात्रसुद्धा ठरू शकणार नाही
  • 0:10 - 0:15
    कारण कार्स किती डेटा गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी, कामगिरी कशी सुधारली पाहिजे
  • 0:15 - 0:20
    हे ठरवण्यासाठी प्रोग्रॅम लिहू शकणारे लोक असणे आवश्यक असते.
  • 0:20 - 0:25
    या कोड्यांमध्ये, तुम्ही एक कलाकार असाल
    जो वेगवेगळे आकार काढण्यासाठी एक पेन्सिल
  • 0:25 - 0:30
    वापरेल. तुमचा कलाकार जिथे जिथे जाईल, तिथे तिथे तो तुमच्या मागे एक रेष काढेल. तुमच्या कॅनव्हासवर
  • 0:30 - 0:35
    फिरण्यासाठी तुम्ही move forward ब्लॉक्स वापराल. इथे move forward ब्लॉक म्हणतो
  • 0:35 - 0:41
    100 पिक्सेल्सने पुढे जा. जेव्हा आपण रन बटण दाबतो, तेव्हा काय होतं? कलाकार थोडासा पुढे जातो
  • 0:41 - 0:47
    आणि हे अंतर 100 पिक्सेल्स असते. पिक्सेल्स म्हणजे तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरचे अतिशय लहान चौरस.
  • 0:47 - 0:55
    या कोड्यात आपल्याकडे असलेला दुसरा ब्लॉक म्हणतो turn right by 90 degrees आणि जेव्हा आपण तो
  • 0:55 - 1:00
    बाहेर ड्रॅग करतो तेव्हा आपला कलाकार थोडासा वळतो. त्यामुळे तुमच्या कलाकाराने किती वळले पाहिजे
  • 1:00 - 1:07
    हे तुम्ही खेळून पाहू शकता. हे 90 अंशांचे वळण आहे आणि हे 120 अंशांचे वळण आहे.
  • 1:07 - 1:13
    आणि लक्षात ठेवा, तुम्ही पिक्सेल्स आणि अंशाच्या समोरचे बाण क्लिक करून
  • 1:13 - 1:16
    तुम्ही ही मूल्ये बदलू शकता. तुमच्या कलाकाराबरोबर चित्रे काढण्याचा आनंद घ्या!
Title:
Artist Intro video - presented by JR Hildebrand
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:24

Marathi subtitles

Revisions Compare revisions