इंटरनेट: एनक्रीप्शन आणि सार्वजनिक कीज
-
0:03 - 0:08इंटरनेट: एनक्रीप्शन आणि सार्वजनिक कीज
-
0:09 - 0:14हाय, माझं नाव आहे मिया गिल-एपनर, माझा युसी
बर्कलेमध्ये कॉम्प्युटर सायन्स हा मुख्य विषय आहे. -
0:14 - 0:19मी संरक्षण विभागासाठी काम करते, तिथं मी माहिती
सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. इंटरनेट एक खुली -
0:19 - 0:26आणि सार्वजनिक व्यवस्था आहे. आपण सामायिक
वायर्स आणि कनेक्शन्सवरून माहिती पाठवतो. -
0:26 - 0:30पण ही खुली प्रणाली असली तरीही आपण मोठ्या
प्रमाणावर खाजगी डेटाची देवाण-घेवाण करतो. -
0:30 - 0:36म्हणजे क्रेडीट कार्डाचा क्रमांक, बँकेची माहिती, पासवर्ड्स आणि ईमेल यासारख्या गोष्टी. मग
-
0:36 - 0:41या सगळ्या खाजगी गोष्टी गोपनीय कशा ठेवल्या
जातात? कोणत्याही प्रकारचा डेटा एनक्रीप्शन -
0:41 - 0:45नावाच्या प्रक्रियेद्वारे गोपनीय ठेवला जातो, यात मजकूर लपवण्यासाठी मेसेज एकत्र मिसळला किंवा
-
0:45 - 0:52बदलला जातो. डीक्रीप्शन प्रक्रियेत मिसळलेला मेसेज
पुन्हा वाचण्यायोग्य केला जातो. ही एक साधी कल्पना -
0:52 - 0:57आहे आणि लोक याचा वापर कित्येक शतकांपासून करत
आहेत. एनक्रीप्शनच्या माहिती असलेल्या पहिल्या काही -
0:57 - 1:02पद्धतींपैकी एक म्हणजे सीझरचे सायफर. रोमन सेनानी
ज्युलियस सीझरवरून हे नाव देण्यात आले आहे. -
1:02 - 1:07त्याने लष्करी आज्ञा एनक्रीप्ट केल्या जेणे करून त्या शत्रूच्या हाती लागल्या तरी त्यांना वाचता येणार नाहीत.
-
1:07 - 1:13सीझर सायफर हा एक अल्गोरीदम असून त्यात मूळ
मेसेजमधील प्रत्येक -
1:13 - 1:17अक्षर बाराखडीतील ठराविक संख्येनंतर येणाऱ्या
दुसऱ्या एका अक्षराने बदललेले असते. -
1:17 - 1:21जर ही संख्या फक्त पाठवणाऱ्याला आणि
स्वीकारणाऱ्याला माहिती असेल, तर तिला 'की' -
1:21 - 1:29असे म्हणतात. ती वाचकाला गोपनीय मेसेज अनलॉक
करण्यासाठी मदत करते. उदा. जर तुमचा मूळ मेसेज -
1:29 - 1:36'HELLO' असेल तर सीझर सायफर अल्गोरिदममध्ये 5 ही की वापरून एनक्रीप्टेड शब्द हा असेल...
-
1:36 - 1:43मेसेज डीक्रीप्ट करण्यासाठी, स्वीकारणारी व्यक्ती ही 'की' वापरून याच्या उलट प्रक्रिया करेल.
-
1:43 - 1:50सीझर सायफरची मोठी समस्या म्हणजे, शक्य असलेल्या सर्व कीज वापरून कोणालाही
-
1:50 - 1:56एनक्रीप्टेड मेसेज सहजपणे कळू शकतो. आणि इंग्रजी
बाराखडीत फक्त -
1:56 - 2:0026 अक्षरं आहेत, म्हणजे मेसेज डीक्रीप्ट करण्यासाठी
तुम्हाला फारतर 26 कीज वापरून पाहाव्या लागतील. -
2:00 - 2:07आता 26 संभाव्य कीज वापरून बघणे, फारसे अवघड
नाही, त्याला फारतर एक किंवा दोन तास लागतील. -
2:07 - 2:13म्हणून आपण अजून अवघड की बनवूया. प्रत्येक अक्षर
ठराविक संख्येने पुढे ढकलण्याऐवजी -
2:13 - 2:19वेगवेगळ्या संख्येने पुढे ढकलूया. या उदाहरणात, मोठा मेसेज एनक्रीप्ट करण्यासाठी एक दहा आकडी की प्रत्येक
-
2:19 - 2:27अक्षर किती घरे पुढे जाईल, हे दर्शवते. ही की शोधणे
खरंच अवघड असेल. 10 आकडी एनक्रीप्शन वापरले -
2:27 - 2:34तर 1000 कोटी संभाव्य कीज असू शकतात.
-
2:34 - 2:40अर्थातच एखाद्या माणसानं शोधून काढण्यासाठी
ही खूप मोठी संख्या आहे, त्याला काही शतकं लागतील. -
2:40 - 2:46पण सध्याच्या सामान्य कॉम्प्युटरला, सगळ्या 1000 कोटी शक्यता तपासून पाहायला फक्त काही सेकंद
-
2:46 - 2:51लागतील. त्यामुळे आधुनिक जगात, वाईट लोकांकडे
पेन्सिलऐवजी कॉम्प्युटर्स असताना -
2:51 - 2:58आपण शोधून काढायला खूप अवघड अशा पद्धतीनं मेसेज एनक्रीप्ट कसे करू शकतो? आता खूप अवघड
-
2:58 - 3:04म्हणजे एका व्यवहार्य कालावधीत तपासता येणार
नाहीत इतक्या संभाव्यता असणं. हल्लीचे संवाद -
3:04 - 3:10256 बीट कीज वापरून एनक्रीप्ट केलेले असतात.
म्हणजे तुमचा मेसेज बघणाऱ्या वाईट लोकांच्या -
3:10 - 3:16कॉम्प्युटर्सना एवढया सगळ्या शक्यता तपासून बघाव्या लागतील...त्यांना की सापडत नाही
-
3:16 - 3:24आणि मेसेजचा उलगडा करता येत नाही तोपर्यंत. जर तुमच्याकडे 100,000 सुपर कॉम्प्युटर्स असतील आणि
-
3:24 - 3:31त्यातल्या प्रत्येकाला प्रत्येक सेकंदाला लक्षावधी कोट्यावधी कीज दर सेकंदाला वापरून पाहता आल्या
-
3:31 - 3:38तरीही प्रत्येक पर्यायासाठी कित्येक अब्जावधी वर्षं लागतील, फक्त 256 बीट एनक्रीप्शन केलेला एकच मेसेज कळण्यासाठी.
-
3:38 - 3:43अर्थातच, कॉम्प्युटर चिप दरवर्षी दुप्पट वेगवान आणि निम्म्या आकाराची होते. जर
-
3:43 - 3:48घातांकीय प्रगतीचा वेग सुरू राहिला तर, आज अशक्य
वाटणाऱ्या समस्या भविष्यातील काहीशे वर्षातच -
3:48 - 3:55सोडवता येतील आणि 256 बीट्स पुरेशा सुरक्षित राहणार नाहीत. वास्तविक आपण कॉम्प्युटरच्या
-
3:55 - 4:01वेगाबरोबर जुळवून घेण्यासाठी यापूर्वीच स्टँडर्ड
कीची लांबी वाढवलेली आहे. -
4:01 - 4:06चांगली बातमी म्हणजे जास्त मोठी की वापरल्यामुळं
मेसेज एनक्रीप्ट करणं फारसं अवघड होत नाही -
4:06 - 4:12पण त्यामुळं सायफर उलगडण्यासाठी लागणाऱ्या
अंदाजांची संख्या घातांकीय स्वरूपात वाढते. -
4:12 - 4:17जेव्हा पाठवणारा आणि स्वीकारणारा एकच की वापरून मेसेजमध्ये बदल करतो आणि पुन्हा सरळ करतो तेव्हा
-
4:17 - 4:24त्याला सिमेट्रिक एनक्रीप्शन म्हणतात. सीझर सायफरप्रमाणंच, सिमेट्रिक एनक्रीप्शनमध्ये दोन
-
4:24 - 4:30लोकांनी वापरायची गोपनीय की आपापसात आधीच
ठरवावी लागते. त्यामुळं लोकांसाठी हे चांगलं आहे, पण -
4:30 - 4:36इंटरनेट खुलं आणि सार्वजनिक असल्यामुळं, दोन कॉम्प्युटर्सनी एकमेकांना खाजगीमध्ये "भेटून"
-
4:36 - 4:42गोपनीय की ठरवणं अशक्य आहे. त्याऐवजी कॉम्प्युटर्स
असिमेट्रिक कीज वापरतात. ही सार्वजनिक की -
4:42 - 4:49कोणालाही देता येते आणि खाजगी की शेअर केली जात नाही. सार्वजनिक की वापरून डेटा एनक्रीप्ट केला
-
4:49 - 4:56जातो आणि गोपनीय मेसेज तयार करण्यासाठी कोणीही ती वापरू शकतो. पण गोपनीय की फक्त खाजगी की
-
4:56 - 5:01माहिती असलेल्या कॉम्प्युटरलाच कळते. कोणत्या गणितामुळं हे शक्य होतं त्यात आत्ता आपण शिरणार
-
5:01 - 5:06नाही. अशी कल्पना करा की तुमचा एक वैयक्तिक
मेलबॉक्स आहे, -
5:06 - 5:11जिथं कोणीही पत्र पाठवू शकतात, पण त्यासाठी त्यांना
की आवश्यक आहे. तुम्ही अनेक डीपॉझीट की -
5:11 - 5:17बनवू शकता आणि त्यातील एक तुमच्या मित्राला पाठवू शकता किंवा ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध करू शकता.
-
5:17 - 5:21तुमचा मित्र किंवा अगदी अनोळखी व्यक्ती सार्वजनिक की वापरून तुमच्या डीपॉझीट स्लॉटमध्ये प्रवेश करून
-
5:21 - 5:27मेसेज पाठवू शकते, पण तुमची खाजगी की वापरून
फक्त तुम्हीच तुम्हाला आलेले गोपनीय मेसेज पाहू -
5:27 - 5:32शकता. आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या मेलबॉक्सची सार्वजनिक डीपॉझीट की वापरून त्याला सुरक्षित
-
5:32 - 5:38मेसेज पाठवू शकता. अशाप्रकारे लोक कोणतीही खाजगी की ठरवून न ठेवता सुरक्षितपणे मेसेजेसची देवाणघेवाण
-
5:38 - 5:44करू शकतात. सार्वजनिक की क्रीप्टोग्राफी हा खुल्या
इंटरनेटवरील -
5:44 - 5:49सर्व सुरक्षित मेसेजिंगचा पाया आहे. त्यामध्ये आपण वेब ब्राऊझ करताना आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या SSL
-
5:49 - 5:56आणि TLS म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रोटोकॉल्सचासुद्धा समावेश आहे. जेव्हा तुमच्या
-
5:56 - 6:01ब्राऊझरच्या अॅड्रेसमध्ये तुम्हाला कधीही छोटेसे कुलूप किंवा https दिसते, तेव्हा तुमचा कॉम्प्युटर हे प्रोटोकॉल
-
6:01 - 6:07वापरत असतो. म्हणजेच तुमचा कॉम्प्युटर सार्वजनिक की एनक्रीप्शन वापरून त्या वेबसाईटवर सुरक्षितपणे
-
6:07 - 6:13डेटाची देवाणघेवाण करत असतो. अधिकाधिक लोक इंटरनेटवर आले की जास्तीत जास्त खाजगी डेटा
-
6:13 - 6:19पाठवला जाईल. आणि तो डेटा सुरक्षित ठेवण्याची गरज अजून महत्त्वाची ठरेल.
-
6:19 - 6:24आणि जसजसे कॉम्प्युटर्स अधिकाधिक वेगवान होतील
तसतसे आपल्याला कॉम्प्युटर्सना एनक्रीप्शन समजणे -
6:24 - 6:29खूप अवघड करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील.
हेच माझं काम आहे आणि ते सतत बदलणारे आहे.
- Title:
- इंटरनेट: एनक्रीप्शन आणि सार्वजनिक कीज
- Description:
-
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर खात्यात सुरक्षेवर काम करणारी मिया एपनर, क्रीप्टोग्राफी वापरून डेटाची सुरक्षितपणे ऑनलाईन देवाणघेवाण कशी करता येते, हे समजावून सांगत आहे. या शैक्षणिक व्हिडिओमध्ये 256 बीट एनक्रीप्शन, सार्वजनिक आणि खाजगी कीज, SSL, TLS आणि HTTPS समजावून सांगितले आहे.
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Duration:
- 06:40
![]() |
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Encryption & Public Keys | |
![]() |
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Encryption & Public Keys | |
![]() |
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Encryption & Public Keys | |
![]() |
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Encryption & Public Keys |