1 00:00:02,940 --> 00:00:08,500 इंटरनेट: एनक्रीप्शन आणि सार्वजनिक कीज 2 00:00:08,990 --> 00:00:14,150 हाय, माझं नाव आहे मिया गिल-एपनर, माझा युसी बर्कलेमध्ये कॉम्प्युटर सायन्स हा मुख्य विषय आहे. 3 00:00:14,150 --> 00:00:19,460 मी संरक्षण विभागासाठी काम करते, तिथं मी माहिती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते. इंटरनेट एक खुली 4 00:00:19,460 --> 00:00:25,510 आणि सार्वजनिक व्यवस्था आहे. आपण सामायिक वायर्स आणि कनेक्शन्सवरून माहिती पाठवतो. 5 00:00:25,510 --> 00:00:30,039 पण ही खुली प्रणाली असली तरीही आपण मोठ्या प्रमाणावर खाजगी डेटाची देवाण-घेवाण करतो. 6 00:00:30,039 --> 00:00:35,890 म्हणजे क्रेडीट कार्डाचा क्रमांक, बँकेची माहिती, पासवर्ड्स आणि ईमेल यासारख्या गोष्टी. मग 7 00:00:35,890 --> 00:00:40,690 या सगळ्या खाजगी गोष्टी गोपनीय कशा ठेवल्या जातात? कोणत्याही प्रकारचा डेटा एनक्रीप्शन 8 00:00:40,690 --> 00:00:45,299 नावाच्या प्रक्रियेद्वारे गोपनीय ठेवला जातो, यात मजकूर लपवण्यासाठी मेसेज एकत्र मिसळला किंवा 9 00:00:45,309 --> 00:00:51,900 बदलला जातो. डीक्रीप्शन प्रक्रियेत मिसळलेला मेसेज पुन्हा वाचण्यायोग्य केला जातो. ही एक साधी कल्पना 10 00:00:51,900 --> 00:00:56,970 आहे आणि लोक याचा वापर कित्येक शतकांपासून करत आहेत. एनक्रीप्शनच्या माहिती असलेल्या पहिल्या काही 11 00:00:56,970 --> 00:01:02,379 पद्धतींपैकी एक म्हणजे सीझरचे सायफर. रोमन सेनानी ज्युलियस सीझरवरून हे नाव देण्यात आले आहे. 12 00:01:02,379 --> 00:01:07,220 त्याने लष्करी आज्ञा एनक्रीप्ट केल्या जेणे करून त्या शत्रूच्या हाती लागल्या तरी त्यांना वाचता येणार नाहीत. 13 00:01:07,220 --> 00:01:12,540 सीझर सायफर हा एक अल्गोरीदम असून त्यात मूळ मेसेजमधील प्रत्येक 14 00:01:12,540 --> 00:01:16,759 अक्षर बाराखडीतील ठराविक संख्येनंतर येणाऱ्या दुसऱ्या एका अक्षराने बदललेले असते. 15 00:01:16,759 --> 00:01:21,259 जर ही संख्या फक्त पाठवणाऱ्याला आणि स्वीकारणाऱ्याला माहिती असेल, तर तिला 'की' 16 00:01:21,259 --> 00:01:28,640 असे म्हणतात. ती वाचकाला गोपनीय मेसेज अनलॉक करण्यासाठी मदत करते. उदा. जर तुमचा मूळ मेसेज 17 00:01:28,640 --> 00:01:35,869 'HELLO' असेल तर सीझर सायफर अल्गोरिदममध्ये 5 ही की वापरून एनक्रीप्टेड शब्द हा असेल... 18 00:01:35,869 --> 00:01:43,259 मेसेज डीक्रीप्ट करण्यासाठी, स्वीकारणारी व्यक्ती ही 'की' वापरून याच्या उलट प्रक्रिया करेल. 19 00:01:43,259 --> 00:01:50,179 सीझर सायफरची मोठी समस्या म्हणजे, शक्य असलेल्या सर्व कीज वापरून कोणालाही 20 00:01:50,179 --> 00:01:55,569 एनक्रीप्टेड मेसेज सहजपणे कळू शकतो. आणि इंग्रजी बाराखडीत फक्त 21 00:01:55,569 --> 00:02:00,389 26 अक्षरं आहेत, म्हणजे मेसेज डीक्रीप्ट करण्यासाठी तुम्हाला फारतर 26 कीज वापरून पाहाव्या लागतील. 22 00:02:00,389 --> 00:02:06,810 आता 26 संभाव्य कीज वापरून बघणे, फारसे अवघड नाही, त्याला फारतर एक किंवा दोन तास लागतील. 23 00:02:06,810 --> 00:02:13,050 म्हणून आपण अजून अवघड की बनवूया. प्रत्येक अक्षर ठराविक संख्येने पुढे ढकलण्याऐवजी 24 00:02:13,050 --> 00:02:18,920 वेगवेगळ्या संख्येने पुढे ढकलूया. या उदाहरणात, मोठा मेसेज एनक्रीप्ट करण्यासाठी एक दहा आकडी की प्रत्येक 25 00:02:18,920 --> 00:02:26,560 अक्षर किती घरे पुढे जाईल, हे दर्शवते. ही की शोधणे खरंच अवघड असेल. 10 आकडी एनक्रीप्शन वापरले 26 00:02:26,560 --> 00:02:34,160 तर 1000 कोटी संभाव्य कीज असू शकतात. 27 00:02:34,160 --> 00:02:39,860 अर्थातच एखाद्या माणसानं शोधून काढण्यासाठी ही खूप मोठी संख्या आहे, त्याला काही शतकं लागतील. 28 00:02:39,860 --> 00:02:46,030 पण सध्याच्या सामान्य कॉम्प्युटरला, सगळ्या 1000 कोटी शक्यता तपासून पाहायला फक्त काही सेकंद 29 00:02:46,030 --> 00:02:51,240 लागतील. त्यामुळे आधुनिक जगात, वाईट लोकांकडे पेन्सिलऐवजी कॉम्प्युटर्स असताना 30 00:02:51,240 --> 00:02:57,890 आपण शोधून काढायला खूप अवघड अशा पद्धतीनं मेसेज एनक्रीप्ट कसे करू शकतो? आता खूप अवघड 31 00:02:57,890 --> 00:03:03,760 म्हणजे एका व्यवहार्य कालावधीत तपासता येणार नाहीत इतक्या संभाव्यता असणं. हल्लीचे संवाद 32 00:03:03,760 --> 00:03:10,200 256 बीट कीज वापरून एनक्रीप्ट केलेले असतात. म्हणजे तुमचा मेसेज बघणाऱ्या वाईट लोकांच्या 33 00:03:10,200 --> 00:03:16,290 कॉम्प्युटर्सना एवढया सगळ्या शक्यता तपासून बघाव्या लागतील...त्यांना की सापडत नाही 34 00:03:16,290 --> 00:03:24,040 आणि मेसेजचा उलगडा करता येत नाही तोपर्यंत. जर तुमच्याकडे 100,000 सुपर कॉम्प्युटर्स असतील आणि 35 00:03:24,040 --> 00:03:30,680 त्यातल्या प्रत्येकाला प्रत्येक सेकंदाला लक्षावधी कोट्यावधी कीज दर सेकंदाला वापरून पाहता आल्या 36 00:03:30,680 --> 00:03:37,690 तरीही प्रत्येक पर्यायासाठी कित्येक अब्जावधी वर्षं लागतील, फक्त 256 बीट एनक्रीप्शन केलेला एकच मेसेज कळण्यासाठी. 37 00:03:37,690 --> 00:03:43,320 अर्थातच, कॉम्प्युटर चिप दरवर्षी दुप्पट वेगवान आणि निम्म्या आकाराची होते. जर 38 00:03:43,320 --> 00:03:48,400 घातांकीय प्रगतीचा वेग सुरू राहिला तर, आज अशक्य वाटणाऱ्या समस्या भविष्यातील काहीशे वर्षातच 39 00:03:48,400 --> 00:03:54,680 सोडवता येतील आणि 256 बीट्स पुरेशा सुरक्षित राहणार नाहीत. वास्तविक आपण कॉम्प्युटरच्या 40 00:03:54,680 --> 00:04:01,070 वेगाबरोबर जुळवून घेण्यासाठी यापूर्वीच स्टँडर्ड कीची लांबी वाढवलेली आहे. 41 00:04:01,070 --> 00:04:05,540 चांगली बातमी म्हणजे जास्त मोठी की वापरल्यामुळं मेसेज एनक्रीप्ट करणं फारसं अवघड होत नाही 42 00:04:05,540 --> 00:04:11,660 पण त्यामुळं सायफर उलगडण्यासाठी लागणाऱ्या अंदाजांची संख्या घातांकीय स्वरूपात वाढते. 43 00:04:11,660 --> 00:04:16,779 जेव्हा पाठवणारा आणि स्वीकारणारा एकच की वापरून मेसेजमध्ये बदल करतो आणि पुन्हा सरळ करतो तेव्हा 44 00:04:16,779 --> 00:04:24,199 त्याला सिमेट्रिक एनक्रीप्शन म्हणतात. सीझर सायफरप्रमाणंच, सिमेट्रिक एनक्रीप्शनमध्ये दोन 45 00:04:24,199 --> 00:04:29,710 लोकांनी वापरायची गोपनीय की आपापसात आधीच ठरवावी लागते. त्यामुळं लोकांसाठी हे चांगलं आहे, पण 46 00:04:29,710 --> 00:04:35,840 इंटरनेट खुलं आणि सार्वजनिक असल्यामुळं, दोन कॉम्प्युटर्सनी एकमेकांना खाजगीमध्ये "भेटून" 47 00:04:35,840 --> 00:04:41,599 गोपनीय की ठरवणं अशक्य आहे. त्याऐवजी कॉम्प्युटर्स असिमेट्रिक कीज वापरतात. ही सार्वजनिक की 48 00:04:41,599 --> 00:04:49,020 कोणालाही देता येते आणि खाजगी की शेअर केली जात नाही. सार्वजनिक की वापरून डेटा एनक्रीप्ट केला 49 00:04:49,020 --> 00:04:55,800 जातो आणि गोपनीय मेसेज तयार करण्यासाठी कोणीही ती वापरू शकतो. पण गोपनीय की फक्त खाजगी की 50 00:04:55,800 --> 00:05:01,270 माहिती असलेल्या कॉम्प्युटरलाच कळते. कोणत्या गणितामुळं हे शक्य होतं त्यात आत्ता आपण शिरणार 51 00:05:01,270 --> 00:05:06,129 नाही. अशी कल्पना करा की तुमचा एक वैयक्तिक मेलबॉक्स आहे, 52 00:05:06,129 --> 00:05:11,430 जिथं कोणीही पत्र पाठवू शकतात, पण त्यासाठी त्यांना की आवश्यक आहे. तुम्ही अनेक डीपॉझीट की 53 00:05:11,430 --> 00:05:16,509 बनवू शकता आणि त्यातील एक तुमच्या मित्राला पाठवू शकता किंवा ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध करू शकता. 54 00:05:16,509 --> 00:05:21,400 तुमचा मित्र किंवा अगदी अनोळखी व्यक्ती सार्वजनिक की वापरून तुमच्या डीपॉझीट स्लॉटमध्ये प्रवेश करून 55 00:05:21,400 --> 00:05:27,400 मेसेज पाठवू शकते, पण तुमची खाजगी की वापरून फक्त तुम्हीच तुम्हाला आलेले गोपनीय मेसेज पाहू 56 00:05:27,400 --> 00:05:31,539 शकता. आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या मेलबॉक्सची सार्वजनिक डीपॉझीट की वापरून त्याला सुरक्षित 57 00:05:31,539 --> 00:05:37,620 मेसेज पाठवू शकता. अशाप्रकारे लोक कोणतीही खाजगी की ठरवून न ठेवता सुरक्षितपणे मेसेजेसची देवाणघेवाण 58 00:05:37,620 --> 00:05:43,699 करू शकतात. सार्वजनिक की क्रीप्टोग्राफी हा खुल्या इंटरनेटवरील 59 00:05:43,699 --> 00:05:49,340 सर्व सुरक्षित मेसेजिंगचा पाया आहे. त्यामध्ये आपण वेब ब्राऊझ करताना आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या SSL 60 00:05:49,340 --> 00:05:55,900 आणि TLS म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रोटोकॉल्सचासुद्धा समावेश आहे. जेव्हा तुमच्या 61 00:05:55,900 --> 00:06:01,400 ब्राऊझरच्या अॅड्रेसमध्ये तुम्हाला कधीही छोटेसे कुलूप किंवा https दिसते, तेव्हा तुमचा कॉम्प्युटर हे प्रोटोकॉल 62 00:06:01,400 --> 00:06:07,409 वापरत असतो. म्हणजेच तुमचा कॉम्प्युटर सार्वजनिक की एनक्रीप्शन वापरून त्या वेबसाईटवर सुरक्षितपणे 63 00:06:07,409 --> 00:06:13,400 डेटाची देवाणघेवाण करत असतो. अधिकाधिक लोक इंटरनेटवर आले की जास्तीत जास्त खाजगी डेटा 64 00:06:13,400 --> 00:06:19,080 पाठवला जाईल. आणि तो डेटा सुरक्षित ठेवण्याची गरज अजून महत्त्वाची ठरेल. 65 00:06:19,080 --> 00:06:24,059 आणि जसजसे कॉम्प्युटर्स अधिकाधिक वेगवान होतील तसतसे आपल्याला कॉम्प्युटर्सना एनक्रीप्शन समजणे 66 00:06:24,059 --> 00:06:29,259 खूप अवघड करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील. हेच माझं काम आहे आणि ते सतत बदलणारे आहे.