इंटरनेट: वायर्स, केबल आणि वायफाय
-
0:03 - 0:08इंटरनेट | वायर्स, केबल्स आणि वाय-फाय
-
0:08 - 0:13माझं नाव आहे टेस विनलॉक, मी गूगलमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून
-
0:13 - 0:18काम करते. एक प्रश्न आहे: एखादे चित्र,
टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल एका ठिकाणाहून -
0:18 - 0:25दुसऱ्या ठिकाणी कसे पाठवले जाते? ही जादू नाही, हे आहे इंटरनेट. एक मोजता येणारी, प्रत्यक्ष प्रणाली, जी माहितीच्या प्रसारणासाठी तयार करण्यात आलेली आहे.
-
0:25 - 0:30इंटरनेट बरेचसे पोस्टाच्या सेवेसारखे आहे, पण प्रत्यक्षात पाठवली जाणारी सामग्री
-
0:30 - 0:37थोडीशी वेगळी असते. खोकी किंवा पाकिटांऐवजी, इंटरनेट बायनरी माहिती पाठवते.
-
0:37 - 0:41माहिती बीट्सची बनलेली असते. एक बीट म्हणजे विरुद्ध गोष्टींची जोडी म्हणता येईल: ऑन किंवा ऑफ.
-
0:41 - 0:49हो किंवा नाही. आपण सामान्यपणे 1 म्हणजे ऑन किंवा 0 म्हणजे ऑफ म्हणून वापरतो. बीटमध्ये दोन
-
0:49 - 0:56स्थिती असू शकतात. म्हणून त्याला आपण बायनरी कोड असे म्हणतो. 8 बीट्स एकत्र आल्या की एक बाईट बनते. 1000 बाईट्स
-
0:56 - 1:02मिळून एक किलोबाईट बनते. 1000 किलोबाईट्सची एक मेगाबाईट होते. एक गाणे सामान्यपणे
-
1:02 - 1:083-4MB वापरून एनकोड केलेले असते. चित्र आहे का व्हिडीओ, का गाणे याने फरक पडत नाही. इंटरनेटवरील
-
1:08 - 1:13प्रत्येक गोष्ट बीट्स म्हणूनच दर्शवली जाते आणि सगळीकडे पाठवली जाते. हे माहितीचे अणू आहेत.
-
1:13 - 1:17पण याचा अर्थ आपण प्रत्यक्षात 1 आणि 0 एका ठिकाणाहून दुसरीकडे किंवा एका व्यक्तीकडून दुसरीकडे
-
1:17 - 1:22पाठवतो, असा नव्हे. मग वायर्सद्वारे आणि
हवेतून पाठवली जाणारी प्रत्यक्ष -
1:22 - 1:26गोष्ट कोणती? माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या
ठिकाणी माहितीची एकच बीट कशी पाठवतात, -
1:26 - 1:31याचं आपण एक छोटं उदाहरण पाहू. असं समजूया
की -
1:31 - 1:37आपण 1 साठी दिवा लावू किंवा 0 साठी बंद करू,
किंवा बीप असा आवाज किंवा मोर्स कोडसारख्या -
1:37 - 1:42गोष्टी वापरू. या पद्धती काम करतात, पण त्या फार सावकाश चालतात, त्यात चुका होतात आणि त्या
-
1:42 - 1:47पूर्णपणे माणसांवर अवलंबून असतात. आपल्याला खरी गरज कशाची असेल तर ती मशीनची. संपूर्ण इतिहासात,
-
1:47 - 1:51आपण अनेक मशीन्स बनवली जी विविध प्रकारच्या प्रत्यक्ष माध्यमातून बायनरी माहिती पाठवतात.
-
1:51 - 2:00आज आपण, वीज, प्रकाश आणि रेडीओ लहरींद्वारे बीट्स पाठवतो. बीट्स विजेद्वारे पाठवण्यासाठी,
-
2:00 - 2:05कल्पना करा की तुमच्याकडे तांब्याच्या तारेने जोडलेले दोन विजेचे बल्ब आहेत. जर एका डिव्हाईस ऑपरेटरनं
-
2:05 - 2:09वीज प्रवाह सुरू केला तर दिवा लागतो, वीज नसेल तर प्रकाश नसतो. जर दोन्ही बाजूच्या
-
2:09 - 2:14ऑपरेटर्सनी प्रकाश म्हणजे 1 आणि प्रकाश नाही म्हणजे 0 असं मान्य केलं तर, आपल्याला
-
2:14 - 2:20माहितीच्या बीट्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वीज वापरून पाठवायची प्रणाली मिळते. पण
-
2:20 - 2:25एक छोटीशी समस्या आहे, जर आपल्याला सलग पाच 0 पाठवायची असतील, तर
-
2:25 - 2:30कोणत्याही व्यक्तीला ती मोजता येतील, अशाप्रकारे आपण कशी पाठवू शकतो?
-
2:30 - 2:35याचं उत्तर म्हणजे घड्याळ किंवा टायमरचा वापर. ऑपरेटर्स हे मान्य करू शकतात की
-
2:35 - 2:39पाठवणारा सेकंदाला 1 बीट पाठवेल आणि स्वीकारणारा
बसून प्रत्येक सेकंद मोजेल आणि लाईनवर काय आहे, -
2:39 - 2:44ते बघेल. सलग पाच 0 पाठवायची असतील, तर तुम्ही प्रकाश बंद करू शकता,
-
2:44 - 2:485 सेकंद प्रतीक्षा करू शकता, दुसऱ्या बाजूची व्यक्ती पूर्ण 5 सेकंद होईपर्यंत लिहून घेईल.
-
2:48 - 2:54सलग पाच 1 पाठवायचे असतील, तर दिवा सुरू करेल, 5 सेकंद वाट बघेल, प्रत्येक सेकंदाला लिहून घेईल. अर्थातच
-
2:54 - 2:58आपल्याला सेकंदाला एक बीट यापेक्षा जास्त वेगाने संदेश पाठवायचे असतील, तर आपल्याला
-
2:58 - 3:04आपली बँडविड्थ - डिव्हाईसची जास्तीत जास्त संप्रेषण क्षमता वाढवण्याची गरज आहे. बँडविड्थ
-
3:04 - 3:09आपण दिलेल्या वेळात सामान्यपणे सेकंदामध्ये
किती बीट्स पाठवू शकतो, यावर मोजली जाते. -
3:09 - 3:14वेग मोजण्याची दुसरी पद्धत म्हणजे विलंब
कालावधी किंवा एका बीटला एका ठिकाणाहून दुसऱ्या -
3:14 - 3:22ठिकाणी, स्रोतापासून ते विनंती करणाऱ्या
डिव्हाईसपर्यंत पोचायला लागणारा वेळ. -
3:22 - 3:27मानवी संदर्भात, एका सेकंदाला एक बीट म्हणजे बऱ्यापैकी जलद आहे, पण
-
3:27 - 3:31माणसाला तो वेग गाठणे काहीसे अवघड आहे. तुम्हाला 3MB गाणे 3 सेकंदात डाऊनलोड करायचे असेल,
-
3:31 - 3:37तर 80 लक्ष बीट्स प्रती मेगाबाईट म्हणजे प्रती
सेकंद 80 लक्ष बीट्स वेग. हे उघडच आहे, -
3:37 - 3:41की माणूस एका सेकंदाला 80 लक्ष बीट्स पाठवू किंवा स्वीकारू शकत नाही, पण मशीन हे आरामात
-
3:41 - 3:45करू शकतं. पण आता हे संदेश पाठवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या केबल्स वापरायच्या आणि हे सिग्नल्स किती
-
3:45 - 3:50लांब जाऊ शकतात, हे प्रश्नसुद्धा आहेत. घर, ऑफिस, किंवा शाळा इथं दिसणारी इथरनेट वायर वापरल्यावर,
-
3:50 - 3:56आपल्याला सिग्नलमध्ये लक्षणीय नुकसान दिसते किंवा अगदी काहीशे फूटावरसुद्धा हस्तक्षेप दिसतो.
-
3:56 - 4:01इंटरनेट सर्व जगभर चालण्यासाठी, आपल्याकडं बीट्स खूप लांब अंतरावर पाठवण्यासाठी पर्यायी पद्धत असली
-
4:01 - 4:06पाहिजे. आपण अगदी समुद्रापलिकडच्या अंतरांबद्दल बोलत आहोत.
-
4:06 - 4:11आपण दुसऱ्या कशाचा वापर करू शकतो? वायरमधून पाठवण्यापेक्षा खूप जास्त जलद असे आपल्याला काय
-
4:11 - 4:18माहिती आहे? प्रकाश. आपण बीट्स प्रकाशझोत म्हणून
फायबर ऑप्टिक केबलद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या -
4:18 - 4:23ठिकाणी पाठवू शकतो. फायबर ऑप्टिक केबल म्हणजे प्रकाश परावर्तित करण्यासाठी तयार केलेला काचेचा
-
4:23 - 4:27दोरा. जेव्हा आपण केबलद्वारे प्रकाशाचा झोत पाठवतो, तेव्हा प्रकाश दुसऱ्या बाजूला स्वीकारला जाईपर्यंत
-
4:27 - 4:31केबलच्या लांबीभर वर खाली उसळतो. उसळण्याच्या कोनानुसार आपण एकाचवेळी अनेक बीट्स
-
4:31 - 4:36पाठवू शकतो, त्या सर्व प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.
-
4:36 - 4:41त्यामुळे फायबर खूप खूप जलद गतीने चालते. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जास्त अंतर गेला तरी
-
4:41 - 4:45सिग्नल कमकुवत होत नाही. म्हणूनच आपण
-
4:45 - 4:50समुद्राच्या तळाशी फायबर ऑप्टिक केबल्स वापरून एक खंड दुसऱ्या खंडाला जोडला आहे.
-
4:50 - 4:562008 इजिप्तमधील अलेक्झांड्रीया इथं एक केबल तुटली त्यामुळे बहुतेक सर्व मध्यपूर्वेत आणि भारतात इंटरनेट
-
4:56 - 5:01खंडित झालं. आपण इंटरनेट ही गोष्ट गृहीत धरतो
-
5:01 - 5:05पण ती फार नाजूक आहे, भौतिक प्रणाली आहे. आणि फायबर अद्भुत आहे
-
5:05 - 5:09पण ते फार महाग असून ते वापरून काम करणं कठीणसुद्धा आहे. बहुतेक सर्व कारणांसाठी, तुम्हाला
-
5:09 - 5:17तांब्याची केबल वापरलेली दिसेल. पण वायर्स नसताना आपण गोष्टींची हालचाल कशी करतो? वायरशिवाय गोष्टी कशा पाठवतात?
-
5:17 - 5:21वायरलेस बीट पाठवणारी मशीन्स सामान्यपणे रेडीओ सिग्नल वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बीट्स
-
5:21 - 5:28पाठवतात. या मशीन्सना प्रत्यक्षात 1 आणि 0 यांचे रूपांतर विविध वारंवारतेच्या रेडीओ लहरींमध्ये
-
5:28 - 5:32करावं लागतं. स्वीकारणारी मशीन्स याउलट प्रकिया करतात आणि त्याचे रूपांतर तुमच्या कॉम्प्युटरवर
-
5:32 - 5:38बायनरीमध्ये करतात. वायरलेसमुळे आपले इंटरनेट फिरणारे झाले आहे. पण रेडीओ सिग्नल तेवढं अंतर
-
5:38 - 5:42प्रवास करून नंतर पूर्णपणे अनाकलनीय होतो.
त्यामुळे तुम्हाला शिकागोमध्ये -
5:42 - 5:48लॉस एंजेलिस स्टेशन ऐकता येत नाही. वायरलेस कितीही महान असले तरी अजूनही ते वायर्ड
-
5:48 - 5:52इंटरनेटवरच अवलंबून आहे. जर तुम्ही कॉफी शॉपमध्ये वाय-फाय वापरत असाल, तर बीट्स वायरलेस राऊटरला
-
5:52 - 5:56पाठवल्या जातात आणि मग प्रत्यक्ष वायरद्वारे पाठवून
त्या इंटरनेटचं मोठं अंतर काटतात. -
5:56 - 6:01बीट्स पाठवण्याची प्रत्यक्ष पद्धत भविष्यात
बदलू शकते, -
6:01 - 6:06उपग्रहांमध्ये पाठवले जाणारे लेझर्स, किंवा फुगे
किंवा ड्रोनमधल्या रेडीओ लहरी असल्या तरीही -
6:06 - 6:11सगळ्याच्या मुळाशी बायनरी पद्धतच आहे आणि
माहिती पाठवण्याचे आणि स्वीकारण्याचे प्रोटोकॉल्स -
6:11 - 6:15बरेचसे तसेच राहिले आहेत. इंटरनेटवरची प्रत्येक गोष्ट, मग ते शब्द असूदेत किंवा ईमेल्स, इमेजेस,
-
6:15 - 6:21मांजरांचे व्हिडीओ, कुत्र्यांचे व्हिडीओ, सगळे शेवटी
इलेक्ट्रॉनिक पल्स, प्रकाश झोत, रेडीओ लहरी -
6:21 - 6:26आणि खूप खूप प्रेमाच्या रूपात पाठवलेले 1 आणि 0 असतात.
- Title:
- इंटरनेट: वायर्स, केबल आणि वायफाय
- Description:
-
हा शैक्षणिक व्हिडीओ इंटरनेटची भौतिक पायाभूत सुविधा माहितीचे प्रसारण कसे करते, याची ओळख करून देतो.
अजून माहितीसाठी Code.org/educate/cspसादरीकरण टेस विनलॉक / गूगलमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर
विशेष आभार:
टेस विनलॉक,
अॅबी हुआंग
बेमनेट असीफा
सलोनी पारीख
archive.org
विकिमिडीया
submarinecablemap.com
गूगल अर्थ
विकिपीडियाhttp://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Duration:
- 06:41
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Wires, Cables, & Wifi | ||
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Wires, Cables, & Wifi | ||
Tomedes edited Marathi subtitles for The Internet: Wires, Cables, & Wifi |