Return to Video

इंटरनेट: वायर्स, केबल आणि वायफाय

  • 0:03 - 0:08
    इंटरनेट | वायर्स, केबल्स आणि वाय-फाय
  • 0:08 - 0:13
    माझं नाव आहे टेस विनलॉक, मी गूगलमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून
  • 0:13 - 0:18
    काम करते. एक प्रश्न आहे: एखादे चित्र,
    टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल एका ठिकाणाहून
  • 0:18 - 0:25
    दुसऱ्या ठिकाणी कसे पाठवले जाते? ही जादू नाही, हे आहे इंटरनेट. एक मोजता येणारी, प्रत्यक्ष प्रणाली, जी माहितीच्या प्रसारणासाठी तयार करण्यात आलेली आहे.
  • 0:25 - 0:30
    इंटरनेट बरेचसे पोस्टाच्या सेवेसारखे आहे, पण प्रत्यक्षात पाठवली जाणारी सामग्री
  • 0:30 - 0:37
    थोडीशी वेगळी असते. खोकी किंवा पाकिटांऐवजी, इंटरनेट बायनरी माहिती पाठवते.
  • 0:37 - 0:41
    माहिती बीट्सची बनलेली असते. एक बीट म्हणजे विरुद्ध गोष्टींची जोडी म्हणता येईल: ऑन किंवा ऑफ.
  • 0:41 - 0:49
    हो किंवा नाही. आपण सामान्यपणे 1 म्हणजे ऑन किंवा 0 म्हणजे ऑफ म्हणून वापरतो. बीटमध्ये दोन
  • 0:49 - 0:56
    स्थिती असू शकतात. म्हणून त्याला आपण बायनरी कोड असे म्हणतो. 8 बीट्स एकत्र आल्या की एक बाईट बनते. 1000 बाईट्स
  • 0:56 - 1:02
    मिळून एक किलोबाईट बनते. 1000 किलोबाईट्सची एक मेगाबाईट होते. एक गाणे सामान्यपणे
  • 1:02 - 1:08
    3-4MB वापरून एनकोड केलेले असते. चित्र आहे का व्हिडीओ, का गाणे याने फरक पडत नाही. इंटरनेटवरील
  • 1:08 - 1:13
    प्रत्येक गोष्ट बीट्स म्हणूनच दर्शवली जाते आणि सगळीकडे पाठवली जाते. हे माहितीचे अणू आहेत.
  • 1:13 - 1:17
    पण याचा अर्थ आपण प्रत्यक्षात 1 आणि 0 एका ठिकाणाहून दुसरीकडे किंवा एका व्यक्तीकडून दुसरीकडे
  • 1:17 - 1:22
    पाठवतो, असा नव्हे. मग वायर्सद्वारे आणि
    हवेतून पाठवली जाणारी प्रत्यक्ष
  • 1:22 - 1:26
    गोष्ट कोणती? माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या
    ठिकाणी माहितीची एकच बीट कशी पाठवतात,
  • 1:26 - 1:31
    याचं आपण एक छोटं उदाहरण पाहू. असं समजूया
    की
  • 1:31 - 1:37
    आपण 1 साठी दिवा लावू किंवा 0 साठी बंद करू,
    किंवा बीप असा आवाज किंवा मोर्स कोडसारख्या
  • 1:37 - 1:42
    गोष्टी वापरू. या पद्धती काम करतात, पण त्या फार सावकाश चालतात, त्यात चुका होतात आणि त्या
  • 1:42 - 1:47
    पूर्णपणे माणसांवर अवलंबून असतात. आपल्याला खरी गरज कशाची असेल तर ती मशीनची. संपूर्ण इतिहासात,
  • 1:47 - 1:51
    आपण अनेक मशीन्स बनवली जी विविध प्रकारच्या प्रत्यक्ष माध्यमातून बायनरी माहिती पाठवतात.
  • 1:51 - 2:00
    आज आपण, वीज, प्रकाश आणि रेडीओ लहरींद्वारे बीट्स पाठवतो. बीट्स विजेद्वारे पाठवण्यासाठी,
  • 2:00 - 2:05
    कल्पना करा की तुमच्याकडे तांब्याच्या तारेने जोडलेले दोन विजेचे बल्ब आहेत. जर एका डिव्हाईस ऑपरेटरनं
  • 2:05 - 2:09
    वीज प्रवाह सुरू केला तर दिवा लागतो, वीज नसेल तर प्रकाश नसतो. जर दोन्ही बाजूच्या
  • 2:09 - 2:14
    ऑपरेटर्सनी प्रकाश म्हणजे 1 आणि प्रकाश नाही म्हणजे 0 असं मान्य केलं तर, आपल्याला
  • 2:14 - 2:20
    माहितीच्या बीट्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वीज वापरून पाठवायची प्रणाली मिळते. पण
  • 2:20 - 2:25
    एक छोटीशी समस्या आहे, जर आपल्याला सलग पाच 0 पाठवायची असतील, तर
  • 2:25 - 2:30
    कोणत्याही व्यक्तीला ती मोजता येतील, अशाप्रकारे आपण कशी पाठवू शकतो?
  • 2:30 - 2:35
    याचं उत्तर म्हणजे घड्याळ किंवा टायमरचा वापर. ऑपरेटर्स हे मान्य करू शकतात की
  • 2:35 - 2:39
    पाठवणारा सेकंदाला 1 बीट पाठवेल आणि स्वीकारणारा
    बसून प्रत्येक सेकंद मोजेल आणि लाईनवर काय आहे,
  • 2:39 - 2:44
    ते बघेल. सलग पाच 0 पाठवायची असतील, तर तुम्ही प्रकाश बंद करू शकता,
  • 2:44 - 2:48
    5 सेकंद प्रतीक्षा करू शकता, दुसऱ्या बाजूची व्यक्ती पूर्ण 5 सेकंद होईपर्यंत लिहून घेईल.
  • 2:48 - 2:54
    सलग पाच 1 पाठवायचे असतील, तर दिवा सुरू करेल, 5 सेकंद वाट बघेल, प्रत्येक सेकंदाला लिहून घेईल. अर्थातच
  • 2:54 - 2:58
    आपल्याला सेकंदाला एक बीट यापेक्षा जास्त वेगाने संदेश पाठवायचे असतील, तर आपल्याला
  • 2:58 - 3:04
    आपली बँडविड्थ - डिव्हाईसची जास्तीत जास्त संप्रेषण क्षमता वाढवण्याची गरज आहे. बँडविड्थ
  • 3:04 - 3:09
    आपण दिलेल्या वेळात सामान्यपणे सेकंदामध्ये
    किती बीट्स पाठवू शकतो, यावर मोजली जाते.
  • 3:09 - 3:14
    वेग मोजण्याची दुसरी पद्धत म्हणजे विलंब
    कालावधी किंवा एका बीटला एका ठिकाणाहून दुसऱ्या
  • 3:14 - 3:22
    ठिकाणी, स्रोतापासून ते विनंती करणाऱ्या
    डिव्हाईसपर्यंत पोचायला लागणारा वेळ.
  • 3:22 - 3:27
    मानवी संदर्भात, एका सेकंदाला एक बीट म्हणजे बऱ्यापैकी जलद आहे, पण
  • 3:27 - 3:31
    माणसाला तो वेग गाठणे काहीसे अवघड आहे. तुम्हाला 3MB गाणे 3 सेकंदात डाऊनलोड करायचे असेल,
  • 3:31 - 3:37
    तर 80 लक्ष बीट्स प्रती मेगाबाईट म्हणजे प्रती
    सेकंद 80 लक्ष बीट्स वेग. हे उघडच आहे,
  • 3:37 - 3:41
    की माणूस एका सेकंदाला 80 लक्ष बीट्स पाठवू किंवा स्वीकारू शकत नाही, पण मशीन हे आरामात
  • 3:41 - 3:45
    करू शकतं. पण आता हे संदेश पाठवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या केबल्स वापरायच्या आणि हे सिग्नल्स किती
  • 3:45 - 3:50
    लांब जाऊ शकतात, हे प्रश्नसुद्धा आहेत. घर, ऑफिस, किंवा शाळा इथं दिसणारी इथरनेट वायर वापरल्यावर,
  • 3:50 - 3:56
    आपल्याला सिग्नलमध्ये लक्षणीय नुकसान दिसते किंवा अगदी काहीशे फूटावरसुद्धा हस्तक्षेप दिसतो.
  • 3:56 - 4:01
    इंटरनेट सर्व जगभर चालण्यासाठी, आपल्याकडं बीट्स खूप लांब अंतरावर पाठवण्यासाठी पर्यायी पद्धत असली
  • 4:01 - 4:06
    पाहिजे. आपण अगदी समुद्रापलिकडच्या अंतरांबद्दल बोलत आहोत.
  • 4:06 - 4:11
    आपण दुसऱ्या कशाचा वापर करू शकतो? वायरमधून पाठवण्यापेक्षा खूप जास्त जलद असे आपल्याला काय
  • 4:11 - 4:18
    माहिती आहे? प्रकाश. आपण बीट्स प्रकाशझोत म्हणून
    फायबर ऑप्टिक केबलद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या
  • 4:18 - 4:23
    ठिकाणी पाठवू शकतो. फायबर ऑप्टिक केबल म्हणजे प्रकाश परावर्तित करण्यासाठी तयार केलेला काचेचा
  • 4:23 - 4:27
    दोरा. जेव्हा आपण केबलद्वारे प्रकाशाचा झोत पाठवतो, तेव्हा प्रकाश दुसऱ्या बाजूला स्वीकारला जाईपर्यंत
  • 4:27 - 4:31
    केबलच्या लांबीभर वर खाली उसळतो. उसळण्याच्या कोनानुसार आपण एकाचवेळी अनेक बीट्स
  • 4:31 - 4:36
    पाठवू शकतो, त्या सर्व प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.
  • 4:36 - 4:41
    त्यामुळे फायबर खूप खूप जलद गतीने चालते. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जास्त अंतर गेला तरी
  • 4:41 - 4:45
    सिग्नल कमकुवत होत नाही. म्हणूनच आपण
  • 4:45 - 4:50
    समुद्राच्या तळाशी फायबर ऑप्टिक केबल्स वापरून एक खंड दुसऱ्या खंडाला जोडला आहे.
  • 4:50 - 4:56
    2008 इजिप्तमधील अलेक्झांड्रीया इथं एक केबल तुटली त्यामुळे बहुतेक सर्व मध्यपूर्वेत आणि भारतात इंटरनेट
  • 4:56 - 5:01
    खंडित झालं. आपण इंटरनेट ही गोष्ट गृहीत धरतो
  • 5:01 - 5:05
    पण ती फार नाजूक आहे, भौतिक प्रणाली आहे. आणि फायबर अद्भुत आहे
  • 5:05 - 5:09
    पण ते फार महाग असून ते वापरून काम करणं कठीणसुद्धा आहे. बहुतेक सर्व कारणांसाठी, तुम्हाला
  • 5:09 - 5:17
    तांब्याची केबल वापरलेली दिसेल. पण वायर्स नसताना आपण गोष्टींची हालचाल कशी करतो? वायरशिवाय गोष्टी कशा पाठवतात?
  • 5:17 - 5:21
    वायरलेस बीट पाठवणारी मशीन्स सामान्यपणे रेडीओ सिग्नल वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बीट्स
  • 5:21 - 5:28
    पाठवतात. या मशीन्सना प्रत्यक्षात 1 आणि 0 यांचे रूपांतर विविध वारंवारतेच्या रेडीओ लहरींमध्ये
  • 5:28 - 5:32
    करावं लागतं. स्वीकारणारी मशीन्स याउलट प्रकिया करतात आणि त्याचे रूपांतर तुमच्या कॉम्प्युटरवर
  • 5:32 - 5:38
    बायनरीमध्ये करतात. वायरलेसमुळे आपले इंटरनेट फिरणारे झाले आहे. पण रेडीओ सिग्नल तेवढं अंतर
  • 5:38 - 5:42
    प्रवास करून नंतर पूर्णपणे अनाकलनीय होतो.
    त्यामुळे तुम्हाला शिकागोमध्ये
  • 5:42 - 5:48
    लॉस एंजेलिस स्टेशन ऐकता येत नाही. वायरलेस कितीही महान असले तरी अजूनही ते वायर्ड
  • 5:48 - 5:52
    इंटरनेटवरच अवलंबून आहे. जर तुम्ही कॉफी शॉपमध्ये वाय-फाय वापरत असाल, तर बीट्स वायरलेस राऊटरला
  • 5:52 - 5:56
    पाठवल्या जातात आणि मग प्रत्यक्ष वायरद्वारे पाठवून
    त्या इंटरनेटचं मोठं अंतर काटतात.
  • 5:56 - 6:01
    बीट्स पाठवण्याची प्रत्यक्ष पद्धत भविष्यात
    बदलू शकते,
  • 6:01 - 6:06
    उपग्रहांमध्ये पाठवले जाणारे लेझर्स, किंवा फुगे
    किंवा ड्रोनमधल्या रेडीओ लहरी असल्या तरीही
  • 6:06 - 6:11
    सगळ्याच्या मुळाशी बायनरी पद्धतच आहे आणि
    माहिती पाठवण्याचे आणि स्वीकारण्याचे प्रोटोकॉल्स
  • 6:11 - 6:15
    बरेचसे तसेच राहिले आहेत. इंटरनेटवरची प्रत्येक गोष्ट, मग ते शब्द असूदेत किंवा ईमेल्स, इमेजेस,
  • 6:15 - 6:21
    मांजरांचे व्हिडीओ, कुत्र्यांचे व्हिडीओ, सगळे शेवटी
    इलेक्ट्रॉनिक पल्स, प्रकाश झोत, रेडीओ लहरी
  • 6:21 - 6:26
    आणि खूप खूप प्रेमाच्या रूपात पाठवलेले 1 आणि 0 असतात.
Title:
इंटरनेट: वायर्स, केबल आणि वायफाय
Description:

हा शैक्षणिक व्हिडीओ इंटरनेटची भौतिक पायाभूत सुविधा माहितीचे प्रसारण कसे करते, याची ओळख करून देतो.
अजून माहितीसाठी Code.org/educate/csp

सादरीकरण टेस विनलॉक / गूगलमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर

विशेष आभार:
टेस विनलॉक,
अॅबी हुआंग
बेमनेट असीफा
सलोनी पारीख
archive.org
विकिमिडीया
submarinecablemap.com
गूगल अर्थ
विकिपीडिया

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
06:41

Marathi subtitles

Revisions