< Return to Video

01 What Makes A Computer v7

  • 0:05 - 0:09
    माझं नाव मे-ली खो. मी डीझायनर आणि
    संशोधक आहे.
  • 0:10 - 0:16
    मी काही गोष्टी अॅपलसाठी डिझाईन केल्या आहेत आणि आता मी मुलांसाठी उत्पादने डिझाईन करते,
  • 0:16 - 0:18
    त्यांचा शाळेतला वेळ जास्त आरामदायक करण्यासाठी.
  • 0:18 - 0:22
    माझे इतर जॉब्ज म्हणजे डीजेइंग आणि नृत्य.
  • 0:26 - 0:28
    कॉम्प्युटर्स सगळीकडे आहेत!
  • 0:28 - 0:33
    लोकांच्या खिशांमध्ये, लोकांच्या गाड्यांमध्ये,
    लोकांच्या मनगटावरसुद्धा.
  • 0:33 - 0:35
    अगदी आत्ता ते तुमच्या बॅकपॅकमध्येसुद्धा
    असतील.
  • 0:36 - 0:39
    पण तुमचा कॉम्प्युटर, कॉम्प्युटर
    कशामुळे होतो?
  • 0:39 - 0:41
    कॉम्प्युटरला काय कॉम्प्युटर बनवतं?
  • 0:41 - 0:43
    आणि तो काम कसं करतो?
  • 0:46 - 0:50
    हाय. मी आहे नॅट! मी एक्सबॉक्सच्या
    मूळ डिझायनर्सपैकी एक आहे.
  • 0:50 - 0:56
    मी बहुतेक सात वर्षांचा असल्यापासून कॉम्प्युटर्सवर काम करतो आहे. आता मी व्हर्च्युअल रियालिटीवर काम करतो.
  • 1:07 - 1:11
    मानव म्हणून, आपण नेहमी आपल्या समस्या सोडवायला मदत होण्यासाठी हत्यारे तयार केली.
  • 1:11 - 1:16
    चाकाची गाडी, हातोडा, किंवा प्रिंटींग प्रेस
    किंवा ट्रॅक्टर- ट्रेलर.
  • 1:16 - 1:19
    या सगळ्या शोधांमुळं आपल्याला शारीरिक
    कामांसाठी मदत झाली.
  • 1:19 - 1:21
    कालांतरानं, लोकांना वाटू लागलं की
  • 1:21 - 1:26
    जर मशीन डिझाईन आणि तयार करता येतं, आणि त्याचा वापर आपल्याला
  • 1:26 - 1:30
    समीकरणे सोडवणे किंवा आकाशातील ताऱ्यांचा मागोवा घेणे अशा विचार करण्याच्या कामांमध्ये होतो,
  • 1:30 - 1:34
    आणि प्रत्यक्ष वस्तू म्हणजे धूळ किंवा दगड हलवण्यासाठी होत नाही,
  • 1:34 - 1:38
    तर ही मशीन्स माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी
    डिझाईन केली पाहिजेत.
  • 1:40 - 1:44
    कॉम्प्युटर सायन्समधल्या लोकांनी विचार करणारं मशीन कसं डिझाईन करायचं यावर काम केलं,
  • 1:44 - 1:47
    त्यांच्या लक्षात आलं की या मशीननं चार
    वेगवेगळ्या गोष्टी करायला हव्यात.
  • 1:48 - 1:50
    त्यानं इनपुट घ्यायला हवं,
  • 1:51 - 1:52
    माहिती साठवायला हवी
  • 1:53 - 1:56
    तिच्यावर काम करायला हवं आणि मग
    रिझल्ट्स आऊटपुट करायला हवेत.
  • 1:57 - 1:59
    आता हे सोपं वाटेल,
  • 1:59 - 2:02
    पण या चार गोष्टी सर्व कॉम्प्युटर्ससाठी
    सारख्या आहेत.
  • 2:03 - 2:06
    त्यामुळंच कॉम्प्युटर हा कॉम्प्युटर बनतो.
  • 2:08 - 2:10
    अगदी सुरुवातीचे कॉम्प्युटर्स लाकूड
    आणि धातूचे बनलेले होते.
  • 2:10 - 2:13
    आणि त्यात मेकॅनिकल लिव्हर्स आणि गियर्स होते.
  • 2:13 - 2:18
    20 व्या शतकाच्या काळात, मात्र, कॉम्प्युटर्सनी इलेक्ट्रीकल भाग वापरायला सुरुवात केली.
  • 2:18 - 2:21
    हे सुरुवातीचे कॉम्प्युटर्स खूपच मोठे आणि
    अतिशय सावकाश चालणारे होते.
  • 2:21 - 2:25
    एखाद्या खोलीच्या आकाराच्या कॉम्प्युटर्सना अगदी मूलभूत गणित सोडवण्यासाठी काही तास लागत.
  • 2:27 - 2:33
    ही मशीन्स म्हणजे चमकणारी, विविध रंगांचे धातू
    आणि अनेक चमकणाऱ्या दिव्यांनी बनलेली असत.
  • 2:33 - 2:36
    कॉम्प्युटर्सची सुरुवात अगदी मूलभूत
    कॅलक्युलेटर्स म्हणून झाली,
  • 2:36 - 2:41
    ही गोष्ट त्यावेळी खूपच भारी होती, आणि तेव्हा कॉम्प्युटर्स फक्त संख्यांवर काम करत असत.
  • 2:41 - 2:47
    पण आता आपण त्यांना एकमेकांशी बोलण्यासाठी वापरू शकतो, गेम्स खेळण्यासाठी वापरू शकतो, रोबो नियंत्रित करण्यासाठी वापरू शकतो,
  • 2:47 - 2:50
    आणि तुम्ही कल्पना करू शकाल, अशी कोणतीही विलक्षण गोष्ट करण्यासाठी वापरू शकतो.
  • 2:51 - 2:54
    आधुनिक कॉम्प्युटर्स त्या जुन्या मोठ्या
    मशीन्ससारखे दिसत नाहीत
  • 2:54 - 2:57
    पण ते त्याच चार गोष्टी करतात.
  • 3:03 - 3:05
    सुरुवातीला, आपण इनपुटबद्दल बोलणार आहोत.
  • 3:05 - 3:07
    ही माझी आवडती गोष्ट आहे कारण इनपुट म्हणजे
  • 3:07 - 3:12
    जग किंवा तुम्ही कॉम्प्युटरला जे करता आणि त्यामुळे कॉम्प्युटर काम करतो ते.
  • 3:12 - 3:14
    तुम्ही काय करायचं ते कॉम्प्युटरला कीबोर्डद्वारे
    सांगू शकता,
  • 3:14 - 3:19
    माऊसद्वारे, मायक्रोफोनद्वारे किंवा कॅमेऱ्याद्वारे
    सांगू शकता.
  • 3:19 - 3:22
    आणि आता तुम्ही कॉम्प्युटर तुमच्या मनगटावर घातलात तर तो तुमच्या हृदयाचे ठोके ऐकतो
  • 3:22 - 3:26
    किंवा तुमच्या कारमध्ये असेल तर कार काय करते
    आहे ते ऐकतो.
  • 3:26 - 3:31
    आणि टचस्क्रीन तुमच्या बोटाचा स्पर्श समजून घेतो आणि तुम्ही काय करत आहात, ते इनपुट म्हणून घेतो.
  • 3:36 - 3:41
    हे सगळे कॉम्प्युटर्सला वेगवेगळी माहिती देतात, ती नंतर मेमरीमध्ये साठवली जाते.
  • 3:42 - 3:45
    कॉम्प्युटरचा प्रोसेसर मेमरीमधून माहिती
    घेतो.
  • 3:45 - 3:48
    तो त्यावर प्रक्रिया करतो किंवा अल्गोरीदम
    वापरून ती बदलतो.
  • 3:48 - 3:50
    ही फक्त कमांड्सची एक मालिका असते.
  • 3:50 - 3:54
    आणि नंतर तो ही प्रक्रिया केलेली माहिती
    पुन्हा मेमरीमध्ये पाठवतो.
  • 3:54 - 3:59
    प्रक्रिया केलेली माहिती आऊटपुटसाठी
    तयार होईपर्यंत हे सुरूच राहते.
  • 4:03 - 4:07
    कॉम्प्युटर माहिती कोणत्याप्रकारे आऊटपुट करतो हे तो काय करण्यासाठी डिझाईन केले आहे, त्यावर अवलंबून असते.
  • 4:07 - 4:13
    कॉम्प्युटर टेक्स्ट, फोटो, व्हिडीओ, किंवा इंटरअॅक्टीव्ह गेम्स -- अगदी व्हर्च्युअल रियालिटीसुद्धा दाखवू शकतो!
  • 4:13 - 4:17
    कॉम्प्युटरच्या आऊटपुटमध्ये अगदी रोबोचे नियंत्रण करण्यासाठी दिलेल्या सिग्नलचासुद्धा समावेश असू शकतो.
  • 4:17 - 4:20
    आणि जेव्हा कॉम्प्युटर्स इंटरनेटला जोडले जातात,
  • 4:20 - 4:24
    तेव्हा एका कॉम्प्युटरचे आऊटपुट दुसऱ्याचे इनपुट
    बनते, आणि उलटेसुद्धा होते.
  • 4:26 - 4:30
    सध्या आपण वापरत असलेले कॉम्प्युटर सुरुवातीच्या विचार करणाऱ्या मशीन्सपेक्षा खूप वेगळे दिसतात.
  • 4:30 - 4:33
    आणि उद्याचे कॉम्प्युटर्स कसे असतील
    काय माहिती?
  • 4:33 - 4:37
    मला आशा आहे, उद्याचे कॉम्प्युटर्स कसे दिसतील
    हे तुम्हाला ठरवता येईल.
  • 4:37 - 4:41
    पण सर्व कॉम्प्युटर्समध्ये, ते कोणतेही तंत्रज्ञान वापरत असले तरीही,
  • 4:41 - 4:45
    ते नेहमीच याच चार गोष्टी करतात.
  • 4:45 - 4:46
    ते माहिती घेतात,
  • 4:46 - 4:48
    ती डेटा म्हणून स्टोअर करतात.
  • 4:48 - 4:50
    त्यावर प्रक्रिया करतात,
  • 4:50 - 4:51
    आणि नंतर ते रिझल्ट आऊटपुट करतात.
Title:
01 What Makes A Computer v7
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
05:10

Marathi subtitles

Revisions