माझं नाव मे-ली खो. मी डीझायनर आणि संशोधक आहे. मी काही गोष्टी अॅपलसाठी डिझाईन केल्या आहेत आणि आता मी मुलांसाठी उत्पादने डिझाईन करते, त्यांचा शाळेतला वेळ जास्त आरामदायक करण्यासाठी. माझे इतर जॉब्ज म्हणजे डीजेइंग आणि नृत्य. कॉम्प्युटर्स सगळीकडे आहेत! लोकांच्या खिशांमध्ये, लोकांच्या गाड्यांमध्ये, लोकांच्या मनगटावरसुद्धा. अगदी आत्ता ते तुमच्या बॅकपॅकमध्येसुद्धा असतील. पण तुमचा कॉम्प्युटर, कॉम्प्युटर कशामुळे होतो? कॉम्प्युटरला काय कॉम्प्युटर बनवतं? आणि तो काम कसं करतो? हाय. मी आहे नॅट! मी एक्सबॉक्सच्या मूळ डिझायनर्सपैकी एक आहे. मी बहुतेक सात वर्षांचा असल्यापासून कॉम्प्युटर्सवर काम करतो आहे. आता मी व्हर्च्युअल रियालिटीवर काम करतो. मानव म्हणून, आपण नेहमी आपल्या समस्या सोडवायला मदत होण्यासाठी हत्यारे तयार केली. चाकाची गाडी, हातोडा, किंवा प्रिंटींग प्रेस किंवा ट्रॅक्टर- ट्रेलर. या सगळ्या शोधांमुळं आपल्याला शारीरिक कामांसाठी मदत झाली. कालांतरानं, लोकांना वाटू लागलं की जर मशीन डिझाईन आणि तयार करता येतं, आणि त्याचा वापर आपल्याला समीकरणे सोडवणे किंवा आकाशातील ताऱ्यांचा मागोवा घेणे अशा विचार करण्याच्या कामांमध्ये होतो, आणि प्रत्यक्ष वस्तू म्हणजे धूळ किंवा दगड हलवण्यासाठी होत नाही, तर ही मशीन्स माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी डिझाईन केली पाहिजेत. कॉम्प्युटर सायन्समधल्या लोकांनी विचार करणारं मशीन कसं डिझाईन करायचं यावर काम केलं, त्यांच्या लक्षात आलं की या मशीननं चार वेगवेगळ्या गोष्टी करायला हव्यात. त्यानं इनपुट घ्यायला हवं, माहिती साठवायला हवी तिच्यावर काम करायला हवं आणि मग रिझल्ट्स आऊटपुट करायला हवेत. आता हे सोपं वाटेल, पण या चार गोष्टी सर्व कॉम्प्युटर्ससाठी सारख्या आहेत. त्यामुळंच कॉम्प्युटर हा कॉम्प्युटर बनतो. अगदी सुरुवातीचे कॉम्प्युटर्स लाकूड आणि धातूचे बनलेले होते. आणि त्यात मेकॅनिकल लिव्हर्स आणि गियर्स होते. 20 व्या शतकाच्या काळात, मात्र, कॉम्प्युटर्सनी इलेक्ट्रीकल भाग वापरायला सुरुवात केली. हे सुरुवातीचे कॉम्प्युटर्स खूपच मोठे आणि अतिशय सावकाश चालणारे होते. एखाद्या खोलीच्या आकाराच्या कॉम्प्युटर्सना अगदी मूलभूत गणित सोडवण्यासाठी काही तास लागत. ही मशीन्स म्हणजे चमकणारी, विविध रंगांचे धातू आणि अनेक चमकणाऱ्या दिव्यांनी बनलेली असत. कॉम्प्युटर्सची सुरुवात अगदी मूलभूत कॅलक्युलेटर्स म्हणून झाली, ही गोष्ट त्यावेळी खूपच भारी होती, आणि तेव्हा कॉम्प्युटर्स फक्त संख्यांवर काम करत असत. पण आता आपण त्यांना एकमेकांशी बोलण्यासाठी वापरू शकतो, गेम्स खेळण्यासाठी वापरू शकतो, रोबो नियंत्रित करण्यासाठी वापरू शकतो, आणि तुम्ही कल्पना करू शकाल, अशी कोणतीही विलक्षण गोष्ट करण्यासाठी वापरू शकतो. आधुनिक कॉम्प्युटर्स त्या जुन्या मोठ्या मशीन्ससारखे दिसत नाहीत पण ते त्याच चार गोष्टी करतात. सुरुवातीला, आपण इनपुटबद्दल बोलणार आहोत. ही माझी आवडती गोष्ट आहे कारण इनपुट म्हणजे जग किंवा तुम्ही कॉम्प्युटरला जे करता आणि त्यामुळे कॉम्प्युटर काम करतो ते. तुम्ही काय करायचं ते कॉम्प्युटरला कीबोर्डद्वारे सांगू शकता, माऊसद्वारे, मायक्रोफोनद्वारे किंवा कॅमेऱ्याद्वारे सांगू शकता. आणि आता तुम्ही कॉम्प्युटर तुमच्या मनगटावर घातलात तर तो तुमच्या हृदयाचे ठोके ऐकतो किंवा तुमच्या कारमध्ये असेल तर कार काय करते आहे ते ऐकतो. आणि टचस्क्रीन तुमच्या बोटाचा स्पर्श समजून घेतो आणि तुम्ही काय करत आहात, ते इनपुट म्हणून घेतो. हे सगळे कॉम्प्युटर्सला वेगवेगळी माहिती देतात, ती नंतर मेमरीमध्ये साठवली जाते. कॉम्प्युटरचा प्रोसेसर मेमरीमधून माहिती घेतो. तो त्यावर प्रक्रिया करतो किंवा अल्गोरीदम वापरून ती बदलतो. ही फक्त कमांड्सची एक मालिका असते. आणि नंतर तो ही प्रक्रिया केलेली माहिती पुन्हा मेमरीमध्ये पाठवतो. प्रक्रिया केलेली माहिती आऊटपुटसाठी तयार होईपर्यंत हे सुरूच राहते. कॉम्प्युटर माहिती कोणत्याप्रकारे आऊटपुट करतो हे तो काय करण्यासाठी डिझाईन केले आहे, त्यावर अवलंबून असते. कॉम्प्युटर टेक्स्ट, फोटो, व्हिडीओ, किंवा इंटरअॅक्टीव्ह गेम्स -- अगदी व्हर्च्युअल रियालिटीसुद्धा दाखवू शकतो! कॉम्प्युटरच्या आऊटपुटमध्ये अगदी रोबोचे नियंत्रण करण्यासाठी दिलेल्या सिग्नलचासुद्धा समावेश असू शकतो. आणि जेव्हा कॉम्प्युटर्स इंटरनेटला जोडले जातात, तेव्हा एका कॉम्प्युटरचे आऊटपुट दुसऱ्याचे इनपुट बनते, आणि उलटेसुद्धा होते. सध्या आपण वापरत असलेले कॉम्प्युटर सुरुवातीच्या विचार करणाऱ्या मशीन्सपेक्षा खूप वेगळे दिसतात. आणि उद्याचे कॉम्प्युटर्स कसे असतील काय माहिती? मला आशा आहे, उद्याचे कॉम्प्युटर्स कसे दिसतील हे तुम्हाला ठरवता येईल. पण सर्व कॉम्प्युटर्समध्ये, ते कोणतेही तंत्रज्ञान वापरत असले तरीही, ते नेहमीच याच चार गोष्टी करतात. ते माहिती घेतात, ती डेटा म्हणून स्टोअर करतात. त्यावर प्रक्रिया करतात, आणि नंतर ते रिझल्ट आऊटपुट करतात.