< Return to Video

राजेश रावः सिंधू लिपीची गुरुकिल्ली

  • 0:00 - 0:03
    मला एका वैचारिक प्रयोगापासून सुरूवात करावीशी वाटते.
  • 0:04 - 0:07
    अशी कल्पना करा की आतापासून ४००० वर्षं लोटली आहेत,
  • 0:07 - 0:09
    आपल्याला माहित असणारा आताचा समाज
  • 0:09 - 0:11
    लोप पावला आहे.
  • 0:11 - 0:13
    (आपल्याकडे) कोणतंही पुस्तक नाही
  • 0:13 - 0:16
    कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण नाही
  • 0:16 - 0:19
    फेसबुक नाही वा ट्विटरही नाही
  • 0:19 - 0:22
    इंग्रजी भाषा आणि इंग्रजी आद्याक्षरं ह्याबाबतीतलं सर्व ज्ञान
  • 0:22 - 0:24
    लोप पावलं आहे.
  • 0:24 - 0:26
    आणि आता कल्पना करा की (भविष्यातले) पुराणवस्तुसंशोधक
  • 0:26 - 0:28
    आपल्या एखाद्या शहराच्या पडझडीचे उत्खनन करत आहेत.
  • 0:28 - 0:30
    त्यांना काय सापडू शकेल?
  • 0:30 - 0:33
    कदाचित हे प्लास्टिकचे आयताकृती तुकडे
  • 0:33 - 0:36
    ज्यांवर काही विचित्र चिन्हं आहेत.
  • 0:36 - 0:39
    किंवा धातूच्या गोलाकार चकत्या
  • 0:39 - 0:41
    कदाचित दंडगोलाकार पेले,
  • 0:41 - 0:43
    ज्यांवरही काही चिन्हं आहेत.
  • 0:43 - 0:46
    कदाचित एखादी पुराणवस्तुसंशोधक अचानक रातोरात ख्यातनाम बनेल.
  • 0:46 - 0:48
    जेव्हा तिला सापडेल
  • 0:48 - 0:50
    उत्तर अमेरिकेच्या टेकड्यांवर दडलेल्या
  • 0:50 - 0:53
    ह्याच चिन्हांच्या मोठ्या प्रतिकृती!
  • 0:55 - 0:57
    आता आपण स्वतःला विचारू
  • 0:57 - 1:00
    अश्या वस्तू आपल्याबद्दल काय सांगतील?
  • 1:00 - 1:03
    अजून ४००० वर्षांनंतरच्या मानवाला?
  • 1:03 - 1:05
    हा काल्पनिक प्रश्न नाही
  • 1:05 - 1:08
    खरंतर, नेमका हाच प्रश्न आज आपल्याला पडतो
  • 1:08 - 1:11
    जेव्हा आपण सिंधू संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतो,
  • 1:11 - 1:13
    जी ४००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती.
  • 1:13 - 1:16
    ही सिंधू संस्कृती साधारण समकालीन होती,
  • 1:16 - 1:19
    आपल्याला जास्त प्रकारे ज्ञात असलेल्या इजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृतींना.
  • 1:19 - 1:22
    पण वस्तविकतः ह्या दोन्ही संस्कृतींपेक्षा जास्त मोठी होती.
  • 1:22 - 1:24
    हिने व्यापलेलं क्षेत्रफळ
  • 1:24 - 1:26
    सुमारे एक दशलक्ष चौरस किलोमीटर एवढं असावं
  • 1:26 - 1:28
    ज्यात सामावतो आजचा पाकिस्तान,
  • 1:28 - 1:30
    वायव्य(उत्तर-पश्चिम)भारत,
  • 1:30 - 1:32
    आणि अफगाणिस्तान आणि इराणचा काही भाग.
  • 1:32 - 1:34
    समजा ही इतकी विस्तीर्ण संस्कृती असेल,
  • 1:34 - 1:38
    तर सहाजिकच तिथे शक्तिशाली राज्यकर्ते आणि राजे सापडतील
  • 1:38 - 1:41
    आणि त्यांना गौरवणारी मोठी स्मारकं सापडतील असं वाटतं
  • 1:41 - 1:43
    पण खरं म्हणजे,
  • 1:43 - 1:45
    पुरातत्व शास्त्रज्ञांना ह्यातलं काहीच सापडलं नाही.
  • 1:45 - 1:48
    त्यांना ह्यासारख्या अनेक छोट्या वस्तू मिळाल्या आहेत.
  • 1:48 - 1:51
    उदाहरणादाखल त्यांतली ही एक वस्तू आहे.
  • 1:51 - 1:53
    सहाजिकच ही (हातामधली वस्तू) एक प्रतिकृति आहे!
  • 1:53 - 1:56
    कोण आहे ही व्यक्ती?
  • 1:56 - 1:58
    कोणी राजा? देवता?
  • 1:58 - 2:00
    पुजारी?
  • 2:00 - 2:02
    का कोणी सामान्य माणूस,
  • 2:02 - 2:04
    तुमच्या आणि माझ्यासारखा?
  • 2:04 - 2:06
    आपल्याला माहित नाही.
  • 2:06 - 2:09
    पण सिंधू लोकांनी लिखाण असलेल्या काही वस्तू मागे ठेवल्या
  • 2:09 - 2:11
    म्हणजे प्लस्टिकचे तुकडे नव्हे,
  • 2:11 - 2:14
    तर दगडी मोहरा, ताम्रपट,
  • 2:14 - 2:16
    कुंभारकाम आणि आश्चर्यकारकरित्या,
  • 2:16 - 2:18
    एक मोठा चिन्ह-फलक.
  • 2:18 - 2:20
    जो एका शहराच्या वेशीजवळ सापडला.
  • 2:20 - 2:22
    आता आपल्याला हे माहित नाही, की त्यावर 'हॉलीवूड' लिहिलं आहे
  • 2:22 - 2:24
    का 'बॉलीवूड'!
  • 2:24 - 2:26
    खरंतर, आपल्याला हेसुद्धा माहित नाही,
  • 2:26 - 2:28
    की त्यातल्या कुठल्याही वस्तूचा काय अर्थ आहे.
  • 2:28 - 2:31
    कारण सिंधू लिपीची अजून उकल झालेली नाही.
  • 2:31 - 2:33
    ह्यांपैकी एकाही चिन्हाचा अर्थ माहित नाही.
  • 2:33 - 2:36
    ही चिन्हं सगळ्यात जास्त शिक्क्यांवर सापडतात.
  • 2:36 - 2:38
    तर, तिथे अशी एक वस्तू सापडते,
  • 2:38 - 2:41
    जी चौरसाकृती असून त्यावर एका एकशिंगी घोड्यासारखी प्रतिमा आहे.
  • 2:41 - 2:43
    ही अतिशय सुंदर कलाकृती आहे.
  • 2:43 - 2:45
    ती किती मोठी आहे असं वाटतं?
  • 2:45 - 2:47
    एवढी मोठी?
  • 2:47 - 2:49
    का एवढी?
  • 2:49 - 2:51
    तर, मी दाखवतो.
  • 2:52 - 2:55
    ही अश्या एका शिक्क्याची प्रतिकृति आहे.
  • 2:55 - 2:57
    फक्त एक इंच लांबी रुंदी एवढीच!
  • 2:57 - 2:59
    खूपच लहानशी.
  • 2:59 - 3:01
    तर हे शिक्के कशासाठी वापरत असतील बरं?
  • 3:01 - 3:04
    आपल्याला हे माहित आहे की हे मातीच्या चिठ्ठीवर शिक्के छापण्यासाठी वापरले जात.
  • 3:04 - 3:07
    एकीकडून दुसरीकडे जाणार्या मालाच्या गठ्ठ्यांना हे बांधले जात.
  • 3:07 - 3:10
    जसं, तुम्ही FedEx च्या खोक्यांवरची वेष्टनपावती बघितली आहे?
  • 3:10 - 3:13
    तसं त्या काळी ते (शिक्के) पावतीसाठी वापरत असावेत.
  • 3:13 - 3:16
    तुम्ही जाणून घेण्यास उत्सुक असाल की ह्या वस्तूंच्या
  • 3:16 - 3:18
    मजकूरात काय लिहिलं असेल?
  • 3:18 - 3:20
    कदाचित त्यात प्रेषकाचं नाव
  • 3:20 - 3:22
    किंवा मालाबद्दल माहिती असेल,
  • 3:22 - 3:25
    जो माल इकडून तिकडे पाठवला जातो- आपल्याला आज माहित नाही.
  • 3:25 - 3:27
    ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला त्यांच्या लिपीचा अर्थ लावला पाहिजे.
  • 3:27 - 3:29
    लिपीचा अर्थ लावणं
  • 3:29 - 3:31
    हे केवळ एक बौद्धिक कोडंच नसून
  • 3:31 - 3:33
    तो एक प्रश्न बनला आहे
  • 3:33 - 3:35
    जो खोलवर गुंतला आहे
  • 3:35 - 3:38
    दक्षिण आशियाच्या राजकारण आणि संस्कृतीमध्ये
  • 3:38 - 3:41
    सध्या ही लिपी म्हणजे एक प्रकारचं रणांगण बनलं आहे,
  • 3:41 - 3:43
    लोकांच्या तीन वेगवेगळ्या गटांमध्ये
  • 3:43 - 3:45
    प्रथम असे लोक
  • 3:45 - 3:47
    ज्यांचा दृढ विश्वास आहे,
  • 3:47 - 3:49
    की ही सिंधू लिपी
  • 3:49 - 3:51
    कोणतीही भाषा दर्शवत नाही.
  • 3:51 - 3:53
    ह्या लोकांचा विश्वास आहे की,
  • 3:53 - 3:56
    ती चिन्हं वाहतूकीच्या दिव्यांवरच्या चिन्हांसारखी आहेत,
  • 3:56 - 3:59
    किंवा ढालींवरच्या प्रतीकांप्रमाणे आहेत.
  • 3:59 - 4:01
    आता लोकांचा दुसरा गट आहे
  • 4:01 - 4:04
    ज्यांची समजूत आहे की सिंधू लिपी ही एखादी जुनी इंडो-युरोपियन भाषा दर्शवते.
  • 4:04 - 4:06
    आज जर भारताचा नकाशा पाहिला
  • 4:06 - 4:09
    तर असं दिसेल की उत्तर-भारतात बोलल्या जाणार्या जवळपास सगळ्याच भाषा
  • 4:09 - 4:12
    इंडो-युरोपियन भाषासमूहात अंतर्भूत होतात.
  • 4:12 - 4:14
    म्हणून काही लोकांच्या मते सिंधू लिपी
  • 4:14 - 4:17
    संस्कृत ह्या प्राचीन इंडो-युरोपियन भाषेचं प्रतिनिधित्व करते.
  • 4:17 - 4:19
    शेवटी लोकांचा तिसरा गट आहे,
  • 4:19 - 4:22
    ज्यांचा विश्वास आहे की सिंधू संस्कृतीतले लोक
  • 4:22 - 4:25
    म्हणजे आजच्या दक्षिण भारतात राहणार्या लोकांचे पूर्वज होते.
  • 4:25 - 4:27
    ह्या लोकांच्या मते सिंधू लिपी
  • 4:27 - 4:29
    एका प्राचीन
  • 4:29 - 4:31
    द्रविड भाषासमूहाचा प्रकार असून
  • 4:31 - 4:34
    या समूहातल्या भाषा आज पूर्ण दक्षिण भारतात बोलल्या जातात.
  • 4:34 - 4:36
    आणि ह्या सिद्धांताचे पुरस्कर्ते बोट दाखवतात
  • 4:36 - 4:39
    उत्तरेतल्या द्राविडी भाषा बोलणार्या एका छोट्या मानवसमूहाकडे
  • 4:39 - 4:41
    प्रत्यक्षात अफगाणिस्तानच्या जवळ
  • 4:41 - 4:44
    आणि म्हणतात की कदचित पूर्वी कधीतरी
  • 4:44 - 4:47
    द्राविडी भाषा संपूर्ण भारतात बोलल्या जात असाव्या
  • 4:47 - 4:49
    ह्याचाच अर्थ असा की,
  • 4:49 - 4:52
    सिंधू संस्कृती हीसुद्धा द्राविडी असण्याची शक्यता आहे.
  • 4:52 - 4:55
    ह्यांतलं कोणतं गृहीतक खरं असेल?
  • 4:55 - 4:57
    आपल्याला माहित नाही, पण कदाचित ह्या लिपीचा अर्थ उकलून काढला,
  • 4:57 - 4:59
    तर ह्या प्रश्नाचं उत्तर देता येईल.
  • 4:59 - 5:01
    परंतू ह्या लिपीचा अर्थ शोधून काढणं हे एक मोठं आव्हान आहे.
  • 5:01 - 5:03
    सगळ्यात पहिलं, म्हणजे कोणताही 'रोझेटा स्टोन' उपलब्ध नाही.
  • 5:03 - 5:05
    मी आताच्या संगणकप्रणालीबद्दल बोलत नाही
  • 5:05 - 5:07
    तर माझ्या म्हणण्याचा अर्थ, अशी कोणतीही प्राचीन वस्तू नाही
  • 5:07 - 5:09
    जिच्यावर तोच मजकूर,
  • 5:09 - 5:12
    ज्ञात आणि अज्ञात स्वरूपात असेल.
  • 5:12 - 5:15
    असं कोणतंही दस्तऐवज सिंधू लिपीत नाही.
  • 5:15 - 5:18
    शिवाय, आपल्याला ते कोणती भाषा बोलत असावेत हे माहित नाही.
  • 5:18 - 5:20
    त्याहीशिवाय जणू काही सगळं अजून अवघड करण्यासाठी,
  • 5:20 - 5:22
    तो मजकूर अत्यंत मोजका आहे!
  • 5:22 - 5:24
    मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे, हा साधारणतः शिक्क्यांवर सापडतो.
  • 5:24 - 5:26
    जे अतिशय छोट्या आकाराचे आहेत.
  • 5:26 - 5:28
    म्हणूनच हे प्रचंड अडथळे बघितल्यावर,
  • 5:28 - 5:30
    एखाद्याला आश्चर्य वाटेल आणि चिंता देखील
  • 5:30 - 5:33
    की आपण ह्या लिपीचा अर्थ लावू शकणार आहोत का?
  • 5:33 - 5:35
    माझ्या उरलेल्या भाषणात,
  • 5:35 - 5:37
    मला हे सांगायला आवडेल की मी कसं काळजी करणं सोडून दिलं.
  • 5:37 - 5:39
    आणि सिंधू लिपीनं उभं केलेलं आव्हान कसं स्वीकारलं.
  • 5:39 - 5:42
    मला सिंधू लिपीबद्दल नेहेमीच कुतूहल वाटत आलं आहे.
  • 5:42 - 5:44
    मी शाळेत असताना अभ्यासाच्या पुस्तकामध्ये ह्याबद्द्ल वाचल्यापासून
  • 5:44 - 5:46
    आणि मी का एवढा भारावून गेलो?
  • 5:46 - 5:50
    खरं म्हणजे, ही जगातली शेवटची अर्थ न उलगडलेली लिपी आहे.
  • 5:50 - 5:53
    माझ्या कारकीर्दीत मी एक संगणनात्मक मेंदूतज्ञ बनलो.
  • 5:53 - 5:55
    म्हणूनच माझ्या दिवसातल्या कामात,
  • 5:55 - 5:57
    मी मेंदूचे संगणकीय नमूने तयार करतो
  • 5:57 - 6:00
    आणि समजण्याचा प्रयत्न करतो की मेंदू कसे अंदाज बांधत असेल.
  • 6:00 - 6:02
    मेंदू कसा निर्णय घेत असेल.
  • 6:02 - 6:04
    मेंदू कसा शिकत असेल आणि असंच काही.
  • 6:04 - 6:07
    पण २००७ मध्ये परत एकदा माझा मार्ग सिंधू लिपीला ओलांडू लागला.
  • 6:07 - 6:09
    तेव्हा मी भारतात होतो
  • 6:09 - 6:11
    आणि मला एक सुवर्णसंधी मिळाली
  • 6:11 - 6:13
    काही भारतीय शास्त्रज्ञांना भेटण्याची,
  • 6:13 - 6:16
    जे लिपीची उकल करण्यासाठी संगणकीय नमूने बनवून वापरत होते.
  • 6:16 - 6:18
    तेव्हा मला लक्षात आलं
  • 6:18 - 6:21
    की, ह्या शास्त्रज्ञांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी चांगली संधी आहे
  • 6:21 - 6:23
    आणि मी ती संधी ताबडतोब घेतली.
  • 6:23 - 6:25
    आणि त्यातल्याच काही निकालांबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे.
  • 6:25 - 6:28
    किंवा अजून चांगलं- एकत्रितरित्या उकल करूयात.
  • 6:28 - 6:30
    तयार आहात?
  • 6:30 - 6:33
    माहित नसलेल्या लिपीची उकल करताना पहिली गोष्ट म्हणजे,
  • 6:33 - 6:35
    लिखाणाची दिशा शोधून काढण्याचा प्रयत्न करणं.
  • 6:35 - 6:38
    इथे दोन संहिता आहेत ज्यांवर काही चिन्हं आहेत.
  • 6:38 - 6:40
    तुम्ही सांगू शकाल,
  • 6:40 - 6:43
    लेखनाची दिशा उजवीकडून डावीकडे आहे का डावीकडून उजवीकडे?
  • 6:43 - 6:46
    मी तुम्हाला एक-दोन सेकंद देतो.
  • 6:46 - 6:49
    बर, 'उजवीकडून डावीकडे' म्हणणारे किती?
  • 6:49 - 6:51
    बर, आणि 'डावीकडून उजवीकडे' किती?
  • 6:51 - 6:53
    अरे, जवळजवळ अर्धे-अर्धे आहेत, ठीक आहे.
  • 6:53 - 6:55
    उत्तर आहे:
  • 6:55 - 6:57
    जर संहितेच्या डाव्या बाजूला पाहिलं,
  • 6:57 - 7:00
    तर असं दिसेल की तिथे चिन्हांची गीचमीड झाली आहे
  • 7:00 - 7:02
    आणि असं वाटत आहे की जवळपास ४००० वर्षांपूर्वी
  • 7:02 - 7:04
    जेव्हा लेखक उजवीकडून डावीकडे लिहीत होता
  • 7:04 - 7:06
    तेव्हा त्याला जागा अपूरी पडली.
  • 7:06 - 7:08
    म्हणूनच त्याला गीचमीड करावी लागली.
  • 7:08 - 7:10
    एक चिन्ह तर असंच वरच्या मजकूराखाली आहे.
  • 7:10 - 7:12
    हे आपल्याला लेखनाची दिशा दाखवतं
  • 7:12 - 7:14
    जी संभाव्यतः उजवीकडून डावीकडे होती.
  • 7:14 - 7:16
    हीच आपल्याला माहित असणारी पहिली गोष्ट आहे.
  • 7:16 - 7:19
    की लेखनाची दिशा हा भाषेच्या लिपीची महत्त्वाचा भाग आहे.
  • 7:19 - 7:21
    सिंधू लिपीचा
  • 7:21 - 7:23
    हा असा गुणधर्म आहे.
  • 7:23 - 7:25
    भाषेचे कोणते गुणधर्म ही लिपी दाखवते?
  • 7:25 - 7:27
    भाषांमध्ये आकृतीबंध असतात.
  • 7:27 - 7:29
    जर मी तुम्हाला Q हे अक्षर दिलं तर
  • 7:29 - 7:32
    आणि सांगितलं की त्यानंतरचं अक्षर कोणतं येईल हे अंदाजाने सांगा,तर तुमच्या मते कोणतं येईल?
  • 7:32 - 7:34
    बहुतांश लोक म्हणतील U आणि ते बरोबर असेल.
  • 7:34 - 7:36
    आता मी म्हटलं की, त्याही पुढचं अक्षर ओळखा,
  • 7:36 - 7:38
    तर तुमच्या मते कोणतं येईल?
  • 7:38 - 7:41
    आता बरीच उत्तरं आहेत. E असू शकतो किंवा A ही.
  • 7:41 - 7:44
    पण नक्कीच B,C किंवा D नाही, बरोबर?
  • 7:44 - 7:47
    सिंधू लिपी सुद्धा अशाच प्रकारचे आकृतीबंध दर्शवते.
  • 7:47 - 7:50
    असे अनेक मजकूर आहेत जे ह्या शंकरपाळीच्या आकाराच्या चिन्हांनी चालू होतात.
  • 7:50 - 7:52
    आणि बरेचदा ह्या चिन्हानंतर
  • 7:52 - 7:54
    हे संवादचिन्हासारखं चिन्ह दिसतं.
  • 7:54 - 7:56
    हे आपण बघितलेल्या Q आणि U च्या उदाहरणासारखं आहे.
  • 7:56 - 7:58
    ह्या चिन्हानंतर मात्र
  • 7:58 - 8:01
    हे माश्यासारखं दिसणारं किंवा बाकी वेगळी चिन्हं येऊ शकतात.
  • 8:01 - 8:03
    पण ह्या तळाशी असलेली चिन्हं कधीच येत नाहीत.
  • 8:03 - 8:05
    याशिवाय, अशी काही चिन्हं आहेत,
  • 8:05 - 8:07
    जी नेहमी वाक्याच्या शेवटी वापरत असावेत,
  • 8:07 - 8:09
    जसं की हे कुंभासारखं चिन्ह
  • 8:09 - 8:11
    आणि खरं तर हे चिन्ह
  • 8:11 - 8:13
    ह्या लिपीतलं सर्वात जास्त वापरलं जाणारं चिन्ह आहे
  • 8:13 - 8:16
    हे सगळे आकृतीबंध पाहिल्यावर आम्हाला एक कल्पना सुचली.
  • 8:16 - 8:18
    कल्पना होती संगणक वापरण्याची,
  • 8:18 - 8:20
    हे आकृतीबंध शिकून घेण्याची.
  • 8:20 - 8:23
    म्हणून आम्ही संगणकाला अस्तित्वात असलेले हे सगळे मजकूर दिले
  • 8:23 - 8:25
    आणि संगणक एक संख्याशास्त्रोक्त नमुना शिकला
  • 8:25 - 8:27
    की कोणती चिन्हं नेहमी एकत्र येतात
  • 8:27 - 8:29
    आणि कोणती चिन्हं कोणत्या चिन्हांनंतर येतात.
  • 8:29 - 8:31
    संगणकानं बनवलेला हा नमुना
  • 8:31 - 8:34
    आपण त्यालाच प्रश्न विचारून तपासून पाहू शकतो.
  • 8:34 - 8:36
    म्हणून आम्ही मुद्दामच काही चिन्हं पुसून टाकली,
  • 8:36 - 8:39
    आणि ही गायब झालेली चिन्हं पुन्हा अंदाजानं ओळखायला सांगितली.
  • 8:39 - 8:42
    त्याची ही काही उदाहरणं आहेत.
  • 8:45 - 8:47
    तुम्ही ह्याला,
  • 8:47 - 8:49
    कदाचित सर्वात प्राचीन
  • 8:49 - 8:52
    नशीबाच्या चक्राचा खेळ म्हणाल.
  • 8:53 - 8:55
    आम्हाला समजलं की,
  • 8:55 - 8:57
    संगणकानं वर्तवलेले अंदाज ७५% बरोबर होते,
  • 8:57 - 8:59
    पुढचं चिन्ह बरोबर ओळखण्यात.
  • 8:59 - 9:01
    इतर बाबतींतही
  • 9:01 - 9:04
    संगणकाचं दुसरं किंवा तिसरं उत्तर बरोबर होतं.
  • 9:04 - 9:06
    ह्या प्रक्रियेचा व्यवहारातही
  • 9:06 - 9:08
    उपयोग आहे
  • 9:08 - 9:10
    असे खराब झालेले अनेक मजकूर आहेत.
  • 9:10 - 9:12
    उदाहरणादखल हाच तो आहे
  • 9:12 - 9:15
    ह्यावर आपण संगणकीय नमुना वापरून हा मजकूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करून शकतो.
  • 9:15 - 9:17
    एक चांगला तर्क लावून अंदाज बांधू शकतो.
  • 9:17 - 9:20
    हे तर्क लावलेल्या चिन्हाचं एक उदाहरण आहे
  • 9:20 - 9:22
    आणि लिपीची उकल करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी ठरू शकतं
  • 9:22 - 9:25
    जास्त माहिती संगणकीय पद्धतीनं उत्पन्न करून त्यावर विश्लेषण करणं.
  • 9:25 - 9:28
    संगणकीय नमुना अजून एका तर्हेनं वापरता येतो.
  • 9:28 - 9:30
    तर अशी कल्पना करा की एक माकड
  • 9:30 - 9:32
    संगणकाचा कळफलक वापरत आहे
  • 9:32 - 9:35
    मला वाटतं की त्यातून तुम्हाला एक अक्षरांचा एक चित्रविचित्र गुंता मिळेल, जो असा दिसेल
  • 9:35 - 9:37
    हा अक्षरांचा एक चित्रविचित्र गुंता
  • 9:37 - 9:39
    'माहितीचा अतिविस्कळीतपणा' दर्शवतो.
  • 9:39 - 9:41
    ही भौतिकशास्त्र आणि माहितीशास्त्रातली संज्ञा आहे.
  • 9:41 - 9:44
    पण, कल्पना करा की खरंच हा अक्षरांचा एक चित्रविचित्र गुंताच आहे.
  • 9:44 - 9:48
    आपल्यापैकी किती जणांनी कीबोर्डवर कॉफी सांडली आहे?
  • 9:48 - 9:50
    तुम्ही कीबोर्ड मध्ये कळ अडकून बसण्याची अडचण अनुभवली असेल.
  • 9:50 - 9:53
    ज्यात एकच चिन्ह वारंवार दाबलं जातं.
  • 9:53 - 9:56
    अश्या चिन्हक्रमाला कमी विस्कळीतपणा असल्यांच म्हटलं जातं.
  • 9:56 - 9:58
    कारण त्यात (क्रमात) चिन्हांची विविधता अजिबात नसते.
  • 9:58 - 10:01
    उलटपक्षी, भाषेमध्ये मध्यम दर्जाचा विस्कळीतपणा असल्यांच म्हटलं जातं
  • 10:01 - 10:03
    कारण ती खूप कडकही नाही
  • 10:03 - 10:05
    आणि खूप अव्यवस्थितही नाही.
  • 10:05 - 10:07
    सिंधू लिपीबाबत काय म्हणता येईल?
  • 10:07 - 10:11
    हा एक आलेख आहे ज्यात वेगवेगळ्या अनेक चिन्हक्रमांमध्ये असलेला 'विस्कळीतपणा' आलेखला आहे.
  • 10:11 - 10:13
    ह्यात सर्वात वर दिसेल एकसारखी विविधता असणारा चिन्हक्रम,
  • 10:13 - 10:15
    जो अनियमित अक्षरांचा केवळ एक गुंता आहे.
  • 10:15 - 10:17
    ह्यात मनोरंजक म्हणजे आपल्याला अजून सापडतात,
  • 10:17 - 10:20
    ते म्हणजे DNA चा मानवी जनुकीय चिन्हक्रमातला क्रम आणि वाद्यसंगीतातला क्रम.
  • 10:20 - 10:22
    हे दोन्हीही क्रम अतिशय लवचिक आहेत
  • 10:22 - 10:24
    आणि म्हणूनच ते मोठ्या व्याप्तीमध्ये दिसतात.
  • 10:24 - 10:26
    ह्या मोजपट्टीच्या खालच्या भागात
  • 10:26 - 10:28
    दिसतात ते न बदलणारे चिन्हक्रम, जसे A ह्या चिन्हाचा सलग क्रम
  • 10:28 - 10:30
    ह्यात संगणकाची आज्ञावलीही दिसते
  • 10:30 - 10:32
    ह्या ठिकाणी, Fortran भाषेतली
  • 10:32 - 10:34
    जी आज्ञावली नियमांना अनुसरून आहे.
  • 10:34 - 10:36
    भाषांमधल्या लिपी
  • 10:36 - 10:38
    मधल्या फळीत दिसतात
  • 10:38 - 10:40
    मग सिंधू लिपी कुठे दिसेल बरं?
  • 10:40 - 10:42
    आम्हाला असं दिसून आलं,
  • 10:42 - 10:44
    की तीही इतर भाषांमधल्या लिपींबरोबरच्या व्याप्तीमध्ये दिसते.
  • 10:44 - 10:46
    जेव्हा हा निकाल पहिल्यांदा प्रकाशित केला गेला,
  • 10:46 - 10:49
    तेव्हा तो वादग्रस्त ठरला.
  • 10:49 - 10:52
    काही लोकांनी वादंग माजवले
  • 10:52 - 10:54
    आणि हेच ते लोक होते ज्यांचा ठाम विश्वास होता
  • 10:54 - 10:57
    की सिंधू लिपी कोणतीही भाषा दाखवत नाही.
  • 10:57 - 10:59
    मला काही द्वेषात्मक इमेलही येणं चालू झालं.
  • 10:59 - 11:01
    माझे विद्यार्थी म्हणाले
  • 11:01 - 11:04
    की मी स्वतःच्या संरक्षणाचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.
  • 11:04 - 11:06
    कोणाला कल्पना असेल की
  • 11:06 - 11:08
    प्राचीन लिपींची उकल करणं हा खूप भयानक व्यवसाय ठरेल?
  • 11:08 - 11:10
    हा निकाल नक्की काय दाखवतो?
  • 11:10 - 11:12
    हेच दाखवतो की, सिंधू लिपी
  • 11:12 - 11:14
    भाषा असण्याचा गुणधर्म बाळगते.
  • 11:14 - 11:16
    तर पूर्वीच्या एखाद्या म्हणीप्रमाणे,
  • 11:16 - 11:18
    जर ही एखाद्या भाषेच्या लिपी सारखी दिसत असेल,
  • 11:18 - 11:20
    जर ही एखाद्या भाषेच्या लिपी सारखी काम करत असेल,
  • 11:20 - 11:23
    तर कदाचित खरंच आपल्या हातात भाषेची लिपी आहे!
  • 11:23 - 11:25
    अजून कोणता पुरावा असेल,
  • 11:25 - 11:27
    जो ही लिपी भाषादर्शक आहे ह्याचा?
  • 11:27 - 11:30
    खरंतर एका लिपीमधून वेगवेगळ्या भाषा डोकावू शकतात.
  • 11:30 - 11:33
    उदाहरणार्थ, हे एकच वाक्य इंग्रजीमध्ये लिहिलं आहे
  • 11:33 - 11:35
    आणि तेच डच भाषेत लिहिलं आहे
  • 11:35 - 11:37
    तीच अक्षरं वापरून
  • 11:37 - 11:40
    जर तुम्हाला डच भाषा येत नसेल आणि फक्त इंग्रजी येत असेल
  • 11:40 - 11:42
    आणि समजा तुम्हाला काही डच शब्द दिले
  • 11:42 - 11:44
    तर तुम्ही म्हणाल ह्या शब्दांमध्ये
  • 11:44 - 11:46
    काही वेगळे आकृतीबंध आहेत.
  • 11:46 - 11:48
    ह्यातल्या काही गोष्टी बरोबर नाही
  • 11:48 - 11:51
    आणि तुम्ही म्हणाल हे शब्द इंग्रजी नाहीत.
  • 11:51 - 11:53
    सिंधू लिपीबद्दलही हीच गोष्ट होते
  • 11:53 - 11:55
    संगणकाला अनेक मजकूर सापडले.
  • 11:55 - 11:57
    त्यातले दोन इथे दाखवले आहेत
  • 11:57 - 11:59
    ज्यांच्यामध्ये असे विचित्र आकृतीबंध आहेत.
  • 11:59 - 12:01
    उदाहरणार्थ, हा पहिला मजकूर
  • 12:01 - 12:04
    ज्यात हे कुंभासारखं चिन्ह दोनदा आलं आहे
  • 12:04 - 12:06
    हे चिन्ह वारंवार येणारं चिन्ह आहे
  • 12:06 - 12:08
    सिंधू लिपीत
  • 12:08 - 12:10
    आणि फक्त ह्याच मजकूरात
  • 12:10 - 12:12
    हे जोडीनं येतं
  • 12:12 - 12:14
    असं का असेल बरं?
  • 12:14 - 12:17
    हा मजकूर जिथे सापडला तिथे जाउन आम्ही परत पाहिलं
  • 12:17 - 12:19
    आणि असं लक्षात आलं की जिथे हे मिळालं
  • 12:19 - 12:21
    ती जागा सिंधू नदीच्या खोर्यापासून खूप खूप दूर आहे
  • 12:21 - 12:24
    हे मजकूर मिळाले आहेत आत्ताच्या इराक आणि इराण मध्ये
  • 12:24 - 12:26
    हे तिथे कसे बरं सापडले?
  • 12:26 - 12:28
    मी जी एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही
  • 12:28 - 12:30
    ती अशी की हे सिंधू लोक खूप खूप धाडसी होते
  • 12:30 - 12:33
    त्यांच्यापासून खूप दूर राहणार्या लोकांशी त्यांचा व्यापार चालू होता
  • 12:33 - 12:36
    ह्या बाबतीत ते समुद्रामार्गे सफर करत असत
  • 12:36 - 12:39
    अगदी मेसोपोटेमियापर्यंत, म्हणजे आजचे इराक.
  • 12:39 - 12:41
    इथे असं घडल्याचं दिसतंय की
  • 12:41 - 12:44
    हे सिंधू व्यापारी आणि व्यावसायिक,
  • 12:44 - 12:47
    ह्या लिपीचा उपयोग परकी भाषा लिहिण्यासाठी वापरत
  • 12:47 - 12:49
    अगदी आपल्या इंग्रजी आणि डच च्या उदाहरणासारखं
  • 12:49 - 12:51
    आणि हेच त्या विचित्र आकृतीबंधांचं स्पष्टीकरण असू शकेल.
  • 12:51 - 12:54
    जे इतर मजकूरांतल्या रचनांपेक्षा भिन्न आहेत.
  • 12:54 - 12:57
    आणि सिंधू खोर्यात सापडले.
  • 12:57 - 12:59
    ह्यावरून असा निष्कर्ष निघू शकतो की तीच लिपी, सिंधू लिपी
  • 12:59 - 13:02
    वेगवेगळ्या भाषा लिहिण्यासाठी वापरात असावी.
  • 13:02 - 13:05
    आत्तापर्यंतचे निकाल आपल्याला ह्या निष्कर्षाप्रत पोहोचवतात
  • 13:05 - 13:08
    की सिंधू लिपी खरोखरच भाषादर्शक असावी.
  • 13:08 - 13:10
    जर त्यातून एखादी भाषा खरोखरच दिसत असेल,
  • 13:10 - 13:12
    तर त्यातली चिन्हं कशी वाचावी?
  • 13:12 - 13:14
    हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे.
  • 13:14 - 13:16
    तर तुम्हाला लक्षात येईल की बरीच चिन्हं
  • 13:16 - 13:18
    माणसांच्या, कीटकांच्या चित्रांसारखी दिसतात.
  • 13:18 - 13:21
    किंवा माशांच्या, पक्ष्यांच्या चित्रांसारखी.
  • 13:21 - 13:23
    प्राचीन लिपींपैकी बहुतांश
  • 13:23 - 13:25
    चित्रलिपीचं तत्व वापरतात.
  • 13:25 - 13:28
    म्हणजे, चित्रांचा उपयोग शब्दांसारखा करणं
  • 13:28 - 13:31
    उदाहरणादाखल ही एक तलवार आहे
  • 13:31 - 13:33
    तुम्ही हे चित्र वापरून लिहू शकाल?
  • 13:33 - 13:35
    मी तुम्हांला दोन सेकंद देतो.
  • 13:35 - 13:37
    जमलं?
  • 13:37 - 13:39
    अरे वा!
  • 13:39 - 13:41
    हे माझं उत्तर आहे
  • 13:41 - 13:43
    तुम्ही एक मधमाशीचं चित्र (बी-इंग्रजी मध्ये) आणि एक पान (लीफ-इंग्रजी मध्ये) हे एकत्र करू शकतो
  • 13:43 - 13:45
    आणि त्याचा अर्थ 'बीलीफ'(विश्वास) असा होतो, बरोबर?
  • 13:45 - 13:47
    ह्याची अनेक उत्तरं असू शकतात.
  • 13:47 - 13:49
    सिंधू लिपीच्या बाबत
  • 13:49 - 13:51
    अडचण मात्र उलटी आहे
  • 13:51 - 13:54
    तुम्हाला शोधून काढावं लागेल की ह्या चित्रांचा आवाज कसा होतो
  • 13:54 - 13:56
    आणि त्यानुसार पूर्ण चित्रक्रमाचा काय अर्थ आहे
  • 13:56 - 13:59
    तर हे अगदी शब्दकोड्यासारखंच आहे
  • 13:59 - 14:02
    फरक एवढाच की ही 'सगळ्या शब्दकोड्यांची माता' आहे.
  • 14:02 - 14:06
    कारण ते कोडं सोडवलं तर मिळणारं बक्षीस खूप मोठं आहे
  • 14:06 - 14:09
    माझे सहकारी इरावतम महादेवन आणि अशोक पारपोला
  • 14:09 - 14:11
    हे ह्या समस्येचं उत्तर शोधण्यात प्रगती करत आहेत.
  • 14:11 - 14:13
    आणि मला पारपोलाच्या कामाचं एक उदाहरण द्यावसं वाटतं
  • 14:13 - 14:15
    हा एक खूपच छोटासा मजकूर आहे
  • 14:15 - 14:18
    त्यात सात उभे फटकारे आणि त्यानंतर हे माश्यासारखं चिन्हं आहेत.
  • 14:18 - 14:20
    आणि मला इथे नमूद करावसं वाटतं की ही चिन्हं
  • 14:20 - 14:22
    मातीच्या खूणेच्या चिठ्ठीवर छापण्यासाठी वापरत असावेत.
  • 14:22 - 14:24
    जे मालाच्या गठ्ठ्यांना बांधले जात असावेत
  • 14:24 - 14:27
    म्हणून हे सहज शक्य आहे की त्यातल्या किमान एकावर तरी
  • 14:27 - 14:29
    व्यापार्याचं नाव छापलेलं आहे
  • 14:29 - 14:31
    आणि असं लक्षात येईल की भारतात
  • 14:31 - 14:33
    खूप मोठी परंपरा आहे
  • 14:33 - 14:35
    व्यक्तीचं नाव पत्रिकेवरून ठेवण्याची
  • 14:35 - 14:38
    आणि जन्माच्या वेळी जे नक्षत्र आकाशात असेल त्यावरून
  • 14:38 - 14:40
    द्रविडी भाषांमध्ये
  • 14:40 - 14:42
    माशाला 'मीन' म्हटलं जातं
  • 14:42 - 14:45
    आणि नेमका त्याच शब्दाचा ध्वनी 'तारा' हा शब्द म्हणल्यावर होतो तसाच होतो
  • 14:45 - 14:47
    तर सात तारे
  • 14:47 - 14:49
    असं म्हणायचं असेल तर 'एलू मीन' म्हणता येईल.
  • 14:49 - 14:51
    जो द्राविडी भाषेत
  • 14:51 - 14:53
    'सप्तर्षी' नक्षत्रासाठी शब्द आहे
  • 14:53 - 14:56
    ह्यासदृश अजून एक सहा तारकांचा समूह आहे
  • 14:56 - 14:58
    ज्याचं भाषांतर 'अरू मीन' होऊ शकतं
  • 14:58 - 15:00
    जुन्या द्राविडी भाषेत
  • 15:00 - 15:02
    'कृत्तिका' नक्षत्राचं नाव आहे.
  • 15:02 - 15:05
    शिवाय ह्या चित्रांचे अजूनही काही क्रम आहेत
  • 15:05 - 15:08
    जसं की हे माश्यासारखं दिसणारं चिन्ह आणि त्यावर छप्पर असावं असं दिसणारं चिन्ह
  • 15:08 - 15:11
    ह्याचं भाषांतर 'मेय मीन' असं होऊ शकतं.
  • 15:11 - 15:14
    जे 'शनी' ग्रहाचं प्राचीन द्राविडी भाषेतलं नाव आहे
  • 15:14 - 15:16
    तर हे खूपच रोमांचक होतं.
  • 15:16 - 15:18
    असं दिसतंय की आपली प्रगती होत आहे
  • 15:18 - 15:20
    पण काय हा पुरावा म्हणून मानला जाईल,
  • 15:20 - 15:22
    की ह्या शिक्क्यांवर द्राविडी नावं आहेत,
  • 15:22 - 15:24
    जी ग्रह आणि नक्षत्रांवरून बेतली आहेत?
  • 15:24 - 15:26
    तर, अजून नाही
  • 15:26 - 15:28
    आपल्याकडे ही अशी निरीक्षणं पडताळून पाहण्याचा
  • 15:28 - 15:30
    कोणताही मार्ग नाही
  • 15:30 - 15:33
    पण जर अश्या अनेक निरीक्षणांचा अर्थ लागत गेला
  • 15:33 - 15:35
    आणि अजून मोठे मोठे चिन्हक्रम बरोबर आहेत
  • 15:35 - 15:37
    असं दिसत गेलं
  • 15:37 - 15:39
    तर आपण बरोबर मार्गावर आहोत असं मानायला हरकत नाही
  • 15:39 - 15:41
    आज
  • 15:41 - 15:44
    आपण TED सारखा शब्द
  • 15:44 - 15:47
    इजिप्शियन चित्रलिपी आणि क्यूनीफॉर्म लिपीमध्ये लिहू शकतो
  • 15:47 - 15:49
    कारण ह्या दोन्ही लिपींची उकल
  • 15:49 - 15:51
    १९ व्या शतकातच झाली होती
  • 15:51 - 15:53
    ह्या दोन्ही लिपींची उकल झाल्यामुळे
  • 15:53 - 15:56
    जणू काही त्या संस्कृती आपल्याशी थेट बोलू शकल्या
  • 15:56 - 15:58
    मय संस्कृतीतल्या लोकांनी
  • 15:58 - 16:00
    आपल्याशी २०व्या शतकात बोलणं सुरू केलं
  • 16:00 - 16:03
    पण सिंधू संस्कॄती अजूनही नि:शब्द आहे
  • 16:03 - 16:05
    आपण ह्याची काळजी का करावी?
  • 16:05 - 16:07
    सिंधू संस्कृती फक्त
  • 16:07 - 16:09
    दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीयांच्याच संस्कृतीचा
  • 16:09 - 16:11
    किंवा पाकिस्तानी लोकांच्या संस्कृतीचा भाग नसून,
  • 16:11 - 16:13
    आपल्या सगळ्यांची आहे.
  • 16:13 - 16:15
    हे पूर्वज आहेत
  • 16:15 - 16:17
    तुमचे आणि माझे
  • 16:17 - 16:19
    त्यांचा आवाज बंद झाला
  • 16:19 - 16:21
    तो इतिहासातल्या एका दुर्दैवी अपघातानं
  • 16:21 - 16:23
    जर आपण ती लिपी शोधून काढली
  • 16:23 - 16:25
    तर आपण त्यांना परत बोलतं करू शकू
  • 16:25 - 16:28
    आणि आपल्याला ते काय सांगतील?
  • 16:28 - 16:31
    आपल्याला त्यांच्याबद्दल काय शोध लागतील? आणि आपल्याबद्दल?
  • 16:31 - 16:34
    मी ते जाणून घ्यायचं थांबू शकत नाही
  • 16:34 - 16:36
    धन्यवाद.
  • 16:36 - 16:40
    (टाळ्या)
Title:
राजेश रावः सिंधू लिपीची गुरुकिल्ली
Speaker:
Rajesh Rao
Description:

राजेश राव भारावून गेले आहेत 'जगातल्या सर्वात कठीण शब्दकोड्यामुळे'. (ते म्हणजे) ४००० वर्षांपूर्वीच्या सिंधू लिपीची उकल करणे.'TED 2011' या कार्यक्रमात ते सांगतात आधुनिक गणनात्मक कार्यप्रणालीच्या वापराबद्दल, ज्याची मदत ह्या प्राचीन संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यात होऊ शकते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
16:41
Sarang B added a translation

Marathi subtitles

Revisions