निर्वासीतांसाठी उच्च शिक्षण आणि रोजगाराचा मार्ग
-
0:03 - 0:06सईदा अदेन सईद:माझ्या डोक्यामध्ये
अजूनही ते भयानक चित्र आहे . -
0:06 - 0:08मी लोकांना खाली पडताना बघतेय ,
-
0:08 - 0:10बंदुकीचे आवाज.
-
0:10 - 0:11मी खूप घाबरलेले होते .
-
0:11 - 0:13खरंच,मी खुप रडत होते .
-
0:13 - 0:16माझ्या आई वडिलांच्या ओळखीच्या
एकाने माझा हात धरला आणि म्हणाले , -
0:16 - 0:18"लवकर चल ,लवकर चल ,लवकर चल "
-
0:18 - 0:21मी म्हणत होते "माझी आई कुठे आहे ?
आई ?आई ?" -
0:21 - 0:25नोरिया डम्बरीन दुसाबिरेमे:रात्रीच्या
वेळी आम्हाला गोळ्यांचे आवाज येत असत , -
0:25 - 0:27आम्हाला बंदुकीचे आवाज येत होते.
-
0:27 - 0:28निवडणूक जवळ आली होती
-
0:28 - 0:31आमच्या इथे तरुण लोक रस्त्यावर उतरले होते ,
-
0:31 - 0:33ते विरोध करत होते
-
0:33 - 0:35आणि त्यातले बरेचसे आता मरून पडले होते .
-
0:35 - 0:37सईदा:आम्हाला एका गाडी मध्ये भरले.
-
0:37 - 0:39ज्यामध्ये खूप गर्दी होती .
-
0:39 - 0:41लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते.
-
0:41 - 0:44अशा पद्धतीने मी सोमालिया मधून पळाले .
-
0:44 - 0:46माझ्या आईची आणि माझी
चुकामुक झाली . -
0:46 - 0:48मी कुठे आहे ते तिला कोणीच सांगितले नाही.
-
0:48 - 0:50नोरिया:सांगण्याचे कारण असे आहे
कि आम्ही शाळेत गेलो नाही, -
0:50 - 0:53बाजारात जाता येत नव्हते घरातच
बसावे लागत होते -
0:53 - 0:58मला जाणीव झाली कि पर्याय असता तर
मी अजून काही तरी चांगले केले असते, -
0:58 - 1:01मी तो निवडला असता आणि माझं
भविष्य काही वेगळंच असलं असतं. -
1:01 - 1:02(संगीत)
-
1:02 - 1:05इग्नाझिओ मात्त्येंनी:सध्या जगात सगळीकडेच
-
1:05 - 1:07स्थलांतरित लोकांची संख्या
वाढते आहे . -
1:07 - 1:10आतापर्यंत ६० लक्ष लोक स्थलांतरित
झाले आहेत . -
1:10 - 1:13आणि दुर्दैवाने हे थांबतच नाहीय.
-
1:13 - 1:16क्रिस्टीना रसेल :मला वाटते मानवतावादी
संघटनेला -
1:16 - 1:18संशोधन आणि सत्य यातून समजले आहे कि
-
1:18 - 1:21हा तर कायमस्वरूपी प्रश्न आहे ,ज्यावर
आता आपण बोलत आहोत . -
1:21 - 1:24बेली दमतीए येशिता:या सगळ्या
विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची गरज आहे, -
1:24 - 1:27एक पदवी जी ते वापरू शकतील .
-
1:27 - 1:29समजा विद्यार्थी आता रवांडा मध्ये आहेत,
-
1:29 - 1:33ते जरी स्थलांतरित झाले तरी त्यांचे
शिक्षण सुरूच राहिले पाहिजे . -
1:33 - 1:35ते कुठेही गेले तरी त्यांची पदवी त्यांना
वापरता यायला हवी . -
1:35 - 1:39क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर च्या
ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंटच्या अंतर्गत -
1:39 - 1:43आमचा एक निर्भय प्रकल्प होता ,
ज्यामध्ये आम्ही वास्तविक तपासण्या केल्या , -
1:43 - 1:46अशा लोकांसाठी जे स्थलांतरित आहेत
किंवा शिक्षण नाही घेऊ शकत -
1:46 - 1:49रोजगारावर आधारित पदवी मिळवण्याचा
मार्ग त्यांना दाखवण्याचा , -
1:49 - 1:54तोही त्यांच्या क्षमतेनुसार.
-
1:54 - 1:58सईदा:स्थलांतरित व्यक्ती म्हणून
माझ्या साठी हे अश्यकच होते , -
1:58 - 2:01स्वतःचे शिक्षण पूर्ण करत पायावर उभे रहाणे.
-
2:01 - 2:03माझे नाव सईदा अदेन ,
-
2:03 - 2:06मी सोमालिया वरून आलीय.
-
2:06 - 2:09जेंव्हा मी ककुमाला आले तेंव्हा
९ वर्षांची होते, -
2:09 - 2:12आणि १७ व्या वर्षी मी शाळेत जायला
सुरुवात केली . -
2:12 - 2:15मी आता सौदर्न न्यू हॅम्पशायर
युनिव्हर्सिटी तुन -
2:15 - 2:16माझी पदवी घेतेय .
-
2:18 - 2:21नोरिया :माझे नाव नोरिया डम्बरीन दुसबरीम
-
2:21 - 2:26मी संभाषण कले मध्ये माझी पदवी घेतेय
-
2:26 - 2:28व्यावसायिक दृष्टिकोनामधून.
-
2:28 - 2:31क्रिस्टीना :आम्ही ५ देशातील विद्यार्थ्यां
सोबत काम करत आहोत: -
2:31 - 2:35लेबनान,केनिया ,मलावी ,रवांडा आणि
दक्षिणआफ्रिका. -
2:35 - 2:39सांगायला खूप अभिमान वाटतो कि ४०० पदवीधर,
८०० हुन जास्त पदवी घेणारे विद्यार्थी आहेत -
2:39 - 2:42१००० पेक्षा हि जास्त जणांनी नावनोंदणी
केली आहे -
2:42 - 2:50निर्वासित जिथे आहेत तिथेच
जाऊन आम्ही काम करतोय ,आहे ना जादू -
2:52 - 2:54तिथे कोणताच वर्ग नाही .
-
2:54 - 2:56कोणतेच व्याख्यान नाही .
-
2:56 - 2:57कोणताच ठराविक दिवस नाही .
-
2:57 - 2:59कोणतीच अंतिम परीक्षा नाही.
-
3:00 - 3:04हि पदवी कार्यक्षमतेवर आधारित
आहे वेळेवर नाही . -
3:04 - 3:06इथे तुम्हीच तुमचा प्रकल्प निवडायचा आहे .
-
3:06 - 3:08तो कसा हाताळायचा तेही तुम्हीच ठरवायचे .
-
3:08 - 3:12नोरिया:एकदा तुम्ही व्यासपीठ नक्की केले
कि तुम्हाला तुमचे उद्देश्य कळेल . -
3:12 - 3:15प्रत्येक उद्देश्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे
प्रकल्प सापडतील . -
3:15 - 3:17प्रत्येक प्रकल्प तुम्हाला सांगेल
-
3:17 - 3:20तुम्हाला कोणते कौशल्य आत्मसात
करायचे आहे , -
3:20 - 3:21त्याचा मार्ग ,
-
3:21 - 3:23प्रकल्पाचा आढावा .
-
3:23 - 3:26क्रिस्टीना :सौदर्न न्यू हॅम्पशायर
युनिव्हर्सिटीच्या यशाचे गमक आहे -
3:26 - 3:30ते त्यांचे कार्यक्षमतेवर आधारित
संगणकीय शिक्षण -
3:30 - 3:33ज्यामध्ये ते सहकाऱ्यासोबत शिकतात
-
3:33 - 3:36जिथे त्यांना सर्व प्रकारचे समर्थन मिळते .
-
3:36 - 3:38जिथे त्यांना व्यावसायिक शिक्षणा शिवाय
-
3:38 - 3:40मानसिक आधार ,
-
3:40 - 3:42वैद्यकीय आधार हि मिळतो,
-
3:42 - 3:45आणि शेवटी रोजगाराचा आधार हि मिळतोच
-
3:45 - 3:48म्हणूनच पदवी घेणाऱ्यांची संख्या ९५% आणि
-
3:48 - 3:50रोजगाराची संख्या ८८% एवढी आहे .
-
3:50 - 3:53नोरिया :मी सामाजिक माध्यम व्यवस्थापन
शिकत आहे . -
3:53 - 3:57तो माझ्या व्यावसायीक शिक्षणाचाच एक भाग आहे
-
3:57 - 4:00या प्रकल्पातून मी खऱ्या दुनियेला
समजू शकले -
4:01 - 4:04क्रिस्टीना :आमची स्थानबद्ध शिक्षणव्यवस्था
हि एक चांगली संधी आहे -
4:04 - 4:07विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य
वापरण्यासाठी . -
4:07 - 4:10आणि आमच्या साठी हि नवीन संधी आहे
-
4:10 - 4:14स्थानबद्ध शिक्षण आणि येणाऱ्या नवीन
रोजगार संधी यांची सांगड घालण्याची -
4:14 - 4:16(संगीत)
-
4:16 - 4:20हा एक चांगला नमुना आहे ज्यामध्ये
-
4:20 - 4:23वेळ आणि विद्यापीठाचे धोरण याना
महत्व न देता -
4:23 - 4:25विदयार्थी केंद्र स्थानी आहेत .
-
4:26 - 4:31इग्नाझिओ :ह्या "स. न .ह .यु."च्या धोरणाने
झाडाची मूळे हलवून टाकली आहेत . -
4:32 - 4:33हे खूप मोठे आहे .
-
4:33 - 4:38पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला हा
मोठा धक्का आहे . -
4:40 - 4:44बेली :याने निश्चितच त्या असुरक्षित ,
निर्वासित छावण्यां मधील -
4:44 - 4:47विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून जाईल .
-
4:47 - 4:48नोरिया :जर मला पदवी मिळाली,
-
4:48 - 4:52तर मी परत जाऊन जिथे मला हवे तिथे
काम करू शकेन -
4:52 - 4:55इंग्लिश वर प्रभुत्वव मिळवेन,
-
4:55 - 4:58ज्याचा कधी मी स्वप्नात हि विचार
केला नव्हता . -
4:58 - 5:02आता माझ्या कडे तो आत्मविश्वास
आणि कौशल्य आहे -
5:02 - 5:05कोणाला हि न घाबरता मी
-
5:05 - 5:09माझे काम व्यवस्थित हाताळू शकते .
-
5:09 - 5:11सादिया :मला नेहमीच समाजासाठी काम
करायचे होते. -
5:11 - 5:14स्त्री शिक्षणासाठी अशी संस्था स्थापन
करायची आहे -
5:14 - 5:18ना नफा तत्वावर.
-
5:18 - 5:21अशांसाठी मला दूत बनायचे आहे
-
5:21 - 5:24शिक्षणासाठी परावृत्त करायचे आहे
-
5:24 - 5:27स्वप्न पूर्ण करण्यासाठी
-
5:28 - 5:30अजूनही उशीर नाही झाला.
- Title:
- निर्वासीतांसाठी उच्च शिक्षण आणि रोजगाराचा मार्ग
- Speaker:
- क्रिस्टीना रस्सेल
- Description:
-
जगभरातील ७० लक्ष निर्वासित लोकांमधून फक्त ३% लोक उच्चशिक्षित आहेत .ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंट चे उद्यीष्टय आहे निर्वासितांना उच्चशिक्षण देत रोजगाराचा मार्ग दाखवणे.ऐकूयात विद्यार्थी आणि कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका क्रिस्टीना रस्सेल यांच्यातील संभाषण ,कसे ग्लोबल एज्युकेशन मुव्हमेंट चे कौश्यल्यावर आधारित शिक्षण निर्वासितांना पदवीधर बनवत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे .
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 05:44
![]() |
Arvind Patil approved Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for A path to higher education and employment for refugees |