-
यापूर्वी तुम्ही फंक्शन ब्लॉक्स एडीट केलेले असल्यामुळे, आता वेळ आहे मुळातून नवीन फंक्शन ब्लॉक लिहिण्याची.
-
हे खरंच सोपं आहे. तुम्हाला टूलबॉक्समध्ये फंक्शन्स नावाची कॅटेगरी दिसेल. जर तुम्ही यावर क्लिक केलंत
-
तर तुम्हाला create a function नावाचं केशरी बटण दिसेल. त्यावर क्लिक केलं की
-
तुम्ही सध्याचे फंक्शन ब्लॉक्स एडीट करायला
वापरलेला फंक्शन एडीटर दिसेल. आधी प्रमाणेच
-
तुम्ही तुमच्या फंक्शनला नाव देऊन, त्यानं काय करणं अपेक्षित आहे, त्याचं वर्णन
-
लिहून सुरुवात कराल. उदाहरणार्थ, त्यानं एक चौरस काढणं किंवा त्रिकोण काढणं अपेक्षित आहे आणि
-
नंतर खालच्या पांढऱ्या वर्क स्पेसमध्ये टूलबॉक्समधून
ब्लॉक्स ड्रॅग करा. हे ब्लॉक्स हिरव्या रॅपिंग
-
ब्लॉक्सच्या आत ड्रॅग करायचं लक्षात ठेवा. ते झालं
की save and exit वर क्लिक करा.
-
मग तुम्ही मेन कोड्याच्या वर्कस्पेसमध्ये जाल. तुम्ही तयार केलेलं नवं फंक्शन तुमच्या टूलबॉक्समधल्या
-
फंक्शन कॅटेगरीमध्ये नवं फंक्शन म्हणून दिसेल. ते मुख्य वर्कस्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा
-
आणि इतर कोणत्याही ब्लॉकसारखंच कोडं सोडवायला वापरा.