इंग्रजी भाषेचा/माध्यमाचा आग्रह करू नका.
-
0:01 - 0:03तुम्हाला काय वाटतय याची मला माहिती आहे.
-
0:03 - 0:05तुम्हाला वाटतय मी चुकलेय कुठेतरी.
-
0:05 - 0:07आणि आता एक मिनिटात कोणीतरी या व्यासपीठावर येऊन
-
0:07 - 0:09मला सोबत घेऊन माझे आसन दाखवण्यास मार्गदर्शन करेल.
-
0:09 - 0:15(टाळ्यांचा गजर)
-
0:15 - 0:18हे मला दुबईत नेहेमीच अनुभवास मिळते.
-
0:18 - 0:20तुम्ही दुबईत सुट्टीवर आलात काय?
-
0:20 - 0:22(हास्य)
-
0:22 - 0:25मुलांना भेटावयास आल्या आहात का?
-
0:25 - 0:27किती दिवस आहात तुम्ही इथे दुबईत?
-
0:27 - 0:30खरे तर, आम्हाला आशा आहे तुम्ही काही दिवस रहाल इथे दुबईत.
-
0:30 - 0:33मी तीस वर्षापासून खाडीप्रदेशातमध्ये (गल्फ मध्ये) राहतेय
-
0:33 - 0:35आणि शिकवते आहे.
-
0:35 - 0:39(टाळ्यांचा गजर)
-
0:39 - 0:43आणि या काळात, मी बरेच बदल पाहिले आहेत.
-
0:43 - 0:45आणि ती सांख्यिकी
-
0:45 - 0:47जरा धक्कादायक आहे.
-
0:47 - 0:49मला तुमच्याशी आज बोलायचय
-
0:49 - 0:51(इतर) भाषांची हानी
-
0:51 - 0:54आणि इंग्रजीच्या जागतिकीकरणाबाबत
-
0:54 - 0:56मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीबाबत सांगते,
-
0:56 - 0:59ती अबू धाबीत प्रौढांना इंग्रजी भाषा शिकवायची.
-
0:59 - 1:01एक दिवस
-
1:01 - 1:03ती सर्व विद्यार्थ्यांना बागेत
-
1:03 - 1:05निसर्गासंबंधीचे (इंग्रजी) शब्द शिकवण्यासाठी घेऊन गेली.
-
1:05 - 1:07पण खरे तर ती स्वतःच
-
1:07 - 1:09स्थानिक झाडांची सर्व अरबी नावे
-
1:09 - 1:11आणि उपयोग शिकून गेली --
-
1:11 - 1:14त्यांचे उपयोग - वैद्यकीय, सौंदर्यवर्धनातील,
-
1:14 - 1:17स्वयंपाकातील, वनौषधींसंबंधी.
-
1:17 - 1:19हे सर्व (स्थानिक झाडांचे) ज्ञान विद्यार्थ्यांना कुठे मिळाले?
-
1:19 - 1:21त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई, वडील, आजोबा, पणजोबा वगैरे.
-
1:21 - 1:24त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई, वडील, आजोबा, पणजोबा वगैरे.
-
1:24 - 1:27या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये.
-
1:27 - 1:29या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये.
-
1:29 - 1:31या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये.
-
1:31 - 1:33सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत.
-
1:33 - 1:35सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत.
-
1:35 - 1:37सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत.
-
1:37 - 1:40प्रत्येक १४ दिवसात एक भाषा नष्ट होतेय.
-
1:41 - 1:43आणि, याच आजच्या काळात,
-
1:43 - 1:45इंग्रजी ही बिनविरोध जागतिक भाषा आहे.
-
1:45 - 1:47(इतर भाषा मरण्याचे) इंग्रजीशी काही संबंध आहे?
-
1:47 - 1:49मला माहित नाही.
-
1:49 - 1:52परंतु मला हे माहिती आहे की मी बरेच बदल पाहिले आहेत.
-
1:52 - 1:55मी जेंव्हा प्रथम गल्फला आले, मी कुवेतला आले
-
1:55 - 1:58त्या काळात तिथे काम करणे अतिशय कठीण होते
-
1:58 - 2:00फार काळ नाही झाला त्याला
-
2:00 - 2:03ते बहुतेक लवकर झाले.
-
2:03 - 2:05तरीही त्या काळात,
-
2:05 - 2:07ब्रिटीश कौन्सिलने माझी नेमणूक केली
-
2:07 - 2:09इतर २५ शिक्षकांबरोबर
-
2:09 - 2:11आणि आम्ही कोणीही मुस्लीम नसणारे प्रथमच
-
2:11 - 2:14कुवेतच्या शाळेत शिकवणारे शिक्षक होतो.
-
2:14 - 2:16आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी आणले होते
-
2:16 - 2:20कारण सरकारला देशाचे आधुनिकीकरण करायचे होते
-
2:20 - 2:23आणि शिक्षणामार्फत नागरिकांचा विकास करावयाचा होता.
-
2:23 - 2:25अर्थात, यात इंग्लंडचा फायदा झाला
-
2:25 - 2:28त्या गल्फच्या पेट्रोलच्या संपत्तीपासून
-
2:28 - 2:30ठीक आहे.
-
2:30 - 2:33आणि हा प्रमुख बदल मी पहिला आहे -
-
2:33 - 2:35इंग्रजी शिकवणे हे कसे
-
2:35 - 2:37बदलले आहे
-
2:37 - 2:41परस्परहिताच्या आचरणापासून ते♫
-
2:41 - 2:44आजचा प्रचंड आंतरराष्ट्रीय धंदा होण्यापर्यंत.
-
2:44 - 2:48(इंग्रजी भाषा) आता परदेशी भाषा म्हणून कुठल्याही शाळेच्या अभ्यासक्रमात नाही.
-
2:48 - 2:50आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर.
-
2:50 - 2:52आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर.
-
2:52 - 2:54ती मिळून गेलीय
-
2:54 - 2:57जगातील प्रत्येक इंग्रजी बोलणाऱ्या देशात.
-
2:57 - 2:59आणि का नाही?
-
2:59 - 3:02शेवटी, अत्युत्तम शिक्षण
-
3:02 - 3:05हे जागतिक विद्यापीठांच्या दर्जेनुसार
-
3:05 - 3:07इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते.
-
3:07 - 3:11इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते.
-
3:11 - 3:15म्हणजे, आता सगळ्यांचे शिक्षण इंग्रजीत हवे हे साहजिकच झाले.
-
3:15 - 3:17पण तुम्ही जर स्थानिक भाषा बोलणारे असाल तर,
-
3:17 - 3:19तुम्हाला परीक्षा पास व्हावी लागणार
-
3:19 - 3:21आता हे बरोबर आहे का?
-
3:21 - 3:23विधार्थ्याला नकार देणे
-
3:23 - 3:25त्याच्या फक्त (इंग्रजी) भाषेवरील क्षमतेवरून?
-
3:25 - 3:27कदाचित, तो कोणी संगणक शास्त्रज्ञ असेल
-
3:27 - 3:29अतिशय बुद्धीमान
-
3:29 - 3:32उदा: त्याला वकील होण्यासाठी त्याच (इंग्रजी) भाषेची गरज आहे?
-
3:32 - 3:35माझ्या मते नाही.
-
3:36 - 3:39आम्ही इंग्रजी शिक्षक त्या (स्थानिक भाषा बोलणाऱ्या) विद्यार्थ्यांना कायम नाकारतो.
-
3:39 - 3:41आम्ही त्यांना नकार देतो.
-
3:41 - 3:43आणि त्याना रस्त्यातच थांबवतो.
-
3:43 - 3:45त्यांची (शिक्षणाची) स्वप्ने त्या नकारामुळे ते पूर्ण करू शकत नाहीत.
-
3:45 - 3:48जोपर्यंत त्यांना इंग्रजी येत नाही तोपर्यंत.
-
3:49 - 3:52आता मी हे असे समजावून सांगते.
-
3:52 - 3:56समजा, मी फक्त डच भाषा बोलणाऱ्या एका माणसाला भेटले
-
3:56 - 3:58ज्याच्याकडे कॅन्सरचा उपाय आहे
-
3:58 - 4:01मी त्याला ब्रिटीश विद्यापीठात प्रवेश करावयास/शिकण्यास आडवेन का?
-
4:01 - 4:03नाही, बिलकुल नाही.
-
4:03 - 4:06पण खरे तर, आम्ही नेमके तेच (प्रवेश न देणे) करतो.
-
4:06 - 4:09आम्ही इंग्रजी शिक्षक हे त्या प्रवेशद्वारावरचे पहारेकरी आहोत.
-
4:09 - 4:12आणि तुम्ही आमचे आधी समाधान केले पाहिजे
-
4:12 - 4:15की तुम्हाला नीटनेटके इंग्रजी येते याचे
-
4:16 - 4:18आता लोकांच्या छोट्या समूहाला
-
4:18 - 4:21एवढी जास्त ताकद देणे
-
4:21 - 4:23हे धोकादायक होऊ शकते.
-
4:23 - 4:26कदाचित हा अटकाव सार्वत्रिक असावा.
-
4:26 - 4:28ठीक आहे.
-
4:28 - 4:31तुम्ही म्हणताय "पण,
-
4:31 - 4:33संशोधनाचे काय?
-
4:33 - 4:35ते सगळे इंग्रजीमध्ये आहे."
-
4:35 - 4:37पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत.
-
4:37 - 4:39संशोधनाची नियतकालिके इंग्रजीमध्ये आहेत.
-
4:39 - 4:42ते स्वपुर्ततेचे भाकीत झाले.
-
4:42 - 4:44ते इंग्रजी आवश्यकतेतून सुरू होते.
-
4:44 - 4:46आणि मग (चक्र) चालू राहते.
-
4:46 - 4:49मी हे विचारते - भाषांतराचे काय झाले?
-
4:49 - 4:53तुम्ही जर इस्लामी सुवर्णयुगाचा विचार केला तर,
-
4:53 - 4:56त्या काळात बरेच भाषांतर झाले.
-
4:56 - 4:59त्यांनी लॅटीन आणि ग्रीकचे भाषांतर
-
4:59 - 5:01अरबी आणि फारसीमध्ये केले.
-
5:01 - 5:03आणि त्याचे भाषांतर
-
5:03 - 5:05युरोपमध्ये जर्मन भाषेत
-
5:05 - 5:07आणि रोमन भाषेत झाले.
-
5:07 - 5:11आणि मग युरोपच्या अंधारमय युगावर प्रकाश पडला.
-
5:12 - 5:14आता मला चुकीचे समजू नका
-
5:14 - 5:16मी इंग्रजी शिकवण्याच्या विरुद्ध नाही
-
5:16 - 5:18सर्व इंग्रजी शिक्षकांनो
-
5:18 - 5:20आपली एक जागतिक भाषा आहे हे मला आवडते.
-
5:20 - 5:23एक जागतिक भाषा असणे ही आजच्या काळाची गरज आहे.
-
5:23 - 5:25पण माझा विरोध आहे त्या भाषेचा उपयोग
-
5:25 - 5:27प्रतिबंध/अडथळा म्हणून करण्याचा.
-
5:27 - 5:30खरच आपल्याला ६०० भाषा नष्ट करून
-
5:30 - 5:33इंग्रजी किंवा चीनी प्रमुख भाषा करायची आहे का?
-
5:33 - 5:36आपल्याला यापेक्षा जास्त काहीतरी हवे आहे. आणि याला (एकभाषीयतेला) सीमा आहे की नाही?
-
5:36 - 5:38हि (एकभाषीयतेची) पद्धत
-
5:38 - 5:41बुद्धिमत्तेला
-
5:41 - 5:44इंग्रजी किती येते यास जोडते
-
5:44 - 5:46हे खरे तर अवास्तविक आहे.
-
5:46 - 5:52(टाळ्यांचा गजर)
-
5:52 - 5:54आणि मला तुम्हाला याची आठवण करून द्यायची आहे की
-
5:54 - 5:57ज्या श्रेष्ट लोकांच्या खांद्यावर
-
5:57 - 5:59आजचे बुद्धीजीवी उभे आहेत,
-
5:59 - 6:01त्या श्रेष्ठांना इंग्रजी आवश्यक नव्हते.
-
6:01 - 6:03त्यांना इंग्रजी भाषेची परीक्षा पास व्हावी लागत नव्हती.
-
6:03 - 6:06उदा: (आल्बर्ट) आइनस्टाइन (मातृ भाषा: जर्मन)
-
6:07 - 6:10तो शाळेत शिक्षणात कठीण विद्यार्थी समजला जायचा.
-
6:10 - 6:12त्याला खर तर डिस्लेक्सिया होता. (डिस्लेक्सिया म्हणजे लिहायला, वाचायला व समजून घ्यायला येणारी अडचण.)
-
6:12 - 6:14या जगासाठी, सुदैवाने
-
6:14 - 6:17त्याला इंग्रजी भाषेची परीक्षा द्यावी लागली नाही.
-
6:17 - 6:20कारण त्याची सुरुवात १९६४ पर्यंत झाली नव्हती
-
6:20 - 6:22टोफल (TOEFL) मार्फत. (TOEFL - Test Of English as Foreign Language),
-
6:22 - 6:24अमेरिकेची इंग्रजी भाषेची परीक्षा
-
6:24 - 6:26आता त्याचा अतिप्रसार झाला आहे.
-
6:26 - 6:29इंग्रजी भाषेच्या आता अनेक परीक्षा आहेत.
-
6:29 - 6:31आणि लाखो विद्यार्थी
-
6:31 - 6:33दर वर्षी या परीक्षा देतात.
-
6:33 - 6:35आता तुम्ही (आणि मी) असा विचार कराल
-
6:35 - 6:37ती फी फार जास्त नाहीये, ठीकठाक आहे.
-
6:37 - 6:39ती फी मनाई करणारी आहे
-
6:39 - 6:41लाखो गरीब लोकांसाठी
-
6:41 - 6:43आणि त्यामुळे आम्ही तत्काळ त्यांना नकार देतो.
-
6:43 - 6:46(टाळ्यांचा गजर)
-
6:46 - 6:49माझ्या मनात नुकतीच वाचलेली एक ठळक बातमी येतेय
-
6:49 - 6:51शिक्षण - एक मोठी दुफळी.
-
6:51 - 6:53आता मला समजतय
-
6:53 - 6:56लोक इंग्रजीवर का लक्ष देतात.
-
6:56 - 6:59त्यांच्या मुलांना ते उत्कृष्ट शिक्षण देऊ इच्छित आहेत.
-
7:00 - 7:03त्यासाठी त्यांना हवे आहे - पाश्चात्य शिक्षण.
-
7:03 - 7:05कारण, अर्थात, चांगल्या नोकऱ्या
-
7:05 - 7:08पाश्चात्य विद्यापीठाच्या लोकांना मिळतात.
-
7:08 - 7:10हे मी आधी सांगितले आहेच.
-
7:10 - 7:12हे एक चक्र आहे.
-
7:12 - 7:14ठीक.
-
7:14 - 7:16मी तुम्हाला दोन शास्त्रज्ञांची गोष्ट सांगते.
-
7:16 - 7:18दोन इंग्रजी शास्त्रज्ञ
-
7:18 - 7:20प्रयोग करत होते,
-
7:20 - 7:22जनुकशास्त्र (जेनेटिक्स)
-
7:22 - 7:25आणि प्राण्यांच्या पुढच्या आणि मागच्या अवयवावर.
-
7:25 - 7:27परंतु त्यांना जो परिणाम मिळायला हवा तो मिळत नव्हता.
-
7:27 - 7:29त्यांना समजत नव्हते काय कराव याबाबत.
-
7:29 - 7:32शेवटी एक जर्मन शास्त्रज्ञ आले.
-
7:32 - 7:35त्यांच्या लक्षात आले की ती दोघे दोन शब्द (विभाग) वापरत होते
-
7:35 - 7:37पुढचे अवयव आणि मागचे अवयव.
-
7:37 - 7:41आणि जनुकशास्त्र तर अशी विभागणी करत नाही.
-
7:41 - 7:43तसेच जर्मन भाषा देखील नाही.
-
7:43 - 7:45अहा!
-
7:45 - 7:47प्रश्न सुटला.
-
7:47 - 7:49तुम्ही जर असा विचार करू शकला नाही,
-
7:49 - 7:52तर तुम्ही अडकता (त्या एकाच जागेवर)
-
7:52 - 7:54परंतु जर दुसरी भाषा त्या विचाराचा विचार करू शकत असेल,
-
7:54 - 7:56तर सहकार्याने
-
7:56 - 7:59आपण बरच शिकू आणि साध्य करून शकतो.
-
8:01 - 8:03माझी मुलगी
-
8:03 - 8:06कुवेतमधून इंग्लंडला आली आहे.
-
8:06 - 8:09ती अरबी भाषेत शास्त्र आणि गणित शिकली आहे.
-
8:09 - 8:12ती अरबी माध्यमाची शाळा आहे.
-
8:12 - 8:15तिला अरबी भाषेचे इंग्लिश मध्ये भाषांतर करावे लागायचे.
-
8:15 - 8:17आणि ती वर्गात प्रथम होती
-
8:17 - 8:19त्या विषयात
-
8:19 - 8:21हे सर्व आपल्याला सांगतय की
-
8:21 - 8:23जेंव्हा विद्यार्थी परदेशातून आपल्याकडे येतात
-
8:23 - 8:25आपण त्यांना फारसे महत्त्व देत नाही
-
8:25 - 8:27त्यांच्या ज्ञानासाठी
-
8:27 - 8:30आणि त्यांनी ते ज्ञान त्यांच्या स्वतःच्या भाषेत मिळवलेले असते.
-
8:30 - 8:32जेंव्हा भाषा मरते,
-
8:32 - 8:35आपल्याला हे माहिती नाही की त्या भाषेबरोबर काय काय हरवेल.
-
8:35 - 8:39हे तुम्ही नुकतेच CNN वर पाहिले असेल -
-
8:39 - 8:41त्यांनी नुकतेच बक्षीस दिले
-
8:41 - 8:44एका केनयाच्या मेंढपाळाच्या मुलाला
-
8:44 - 8:47तो गावात रात्री अभ्यास करू शकत नव्हता
-
8:47 - 8:49गावातील सर्व मुलांसारखा.
-
8:49 - 8:51कारण केरोसीनच्या कंदिलाच्या
-
8:51 - 8:53धुरामुळे त्याचे डोळे खराब झाले.
-
8:53 - 8:56आणि केरोसीनची/रॉकेलची कमतरता घरात नेहेमीच होती
-
8:56 - 8:59कारण गरिबीच्या उत्पन्नात काय मिळणार आहे?
-
8:59 - 9:01मग त्याने शोध लावला
-
9:01 - 9:04निशुल्क सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्याचा.
-
9:04 - 9:06आणि आता त्याच्या गावातल्या मुलांना
-
9:06 - 9:08शाळेत सारखेच गुण मिळतात
-
9:08 - 9:12इतर मुलांसारखे ज्यांच्या घरात वीज आहे.
-
9:12 - 9:18(टाळ्यांचा गजर)
-
9:18 - 9:20जेंव्हा त्याला हे बक्षीस मिळाले,
-
9:20 - 9:22त्याने अतिशय सुंदर शब्दात सांगितले:
-
9:22 - 9:25"मुले आजच्या आफ्रिकेला पुढे नेऊ शकतात,
-
9:25 - 9:27अंधारमय खंडापासून
-
9:27 - 9:29ते प्रकाशमान खंडापर्यंत."
-
9:29 - 9:31एक साधी कल्पना,
-
9:31 - 9:34पण तिचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.
-
9:35 - 9:37ज्यांच्या घरात प्रकाश नाहीये -
-
9:37 - 9:40ते भौतिक असो की रूपकात्मक,
-
9:40 - 9:43जे आपल्या (इंग्रजीच्या) परीक्षा पास होऊ शकत नाही,
-
9:43 - 9:46आणि आपल्याला हे कधीही कळणार नाही त्यांना काय माहिती आहे ते.
-
9:46 - 9:49आपण त्यांना आणि आपल्याला
-
9:49 - 9:51असे अंधारात ठेवायला नको.
-
9:51 - 9:54ही विविधता साजरी करू या.
-
9:54 - 9:57तुमच्या (स्वतःच्या) भाषेवर लक्ष द्या.
-
9:57 - 10:01तिचा विशाल कल्पनांचा प्रसार करण्यासाठी उपयोग करा.
-
10:01 - 10:08(टाळ्यांचा गजर)
-
10:08 - 10:10आभारी आहे.
-
10:10 - 10:13(टाळ्यांचा गजर)
- Title:
- इंग्रजी भाषेचा/माध्यमाचा आग्रह करू नका.
- Speaker:
- Patricia Ryan
- Description:
-
दुबईतील TEDx मध्ये, अनुभवी इंग्रजी शिक्षिका पेट्रीशिआ रायन हा जिज्ञासा निर्माण करणारा प्रश्न विचारतायत: जगाच्या इंग्रजी भाषेवर असणाऱ्या अतिप्रभावामुळे इतर भाषांमध्ये व्यक्त होणाऱ्या कल्पनांकडे दुर्लक्ष होत आहे काय? (उदा: जर आइनस्टाइनला टोफेल परीक्षा पास व्हावी लागली असती तर?) हा इतर भाषांमध्येही कल्पना मांडू द्याव्यात असा आधार देणारा संवाद आहे.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 10:14