0:00:01.000,0:00:03.000 तुम्हाला काय वाटतय याची मला माहिती आहे. 0:00:03.000,0:00:05.000 तुम्हाला वाटतय मी चुकलेय कुठेतरी. 0:00:05.000,0:00:07.000 आणि आता एक मिनिटात कोणीतरी या व्यासपीठावर येऊन 0:00:07.000,0:00:09.000 मला सोबत घेऊन माझे आसन दाखवण्यास मार्गदर्शन करेल. 0:00:09.000,0:00:15.000 (टाळ्यांचा गजर) 0:00:15.000,0:00:18.000 हे मला दुबईत नेहेमीच अनुभवास मिळते. 0:00:18.000,0:00:20.000 तुम्ही दुबईत सुट्टीवर आलात काय? 0:00:20.000,0:00:22.000 (हास्य) 0:00:22.000,0:00:25.000 मुलांना भेटावयास आल्या आहात का? 0:00:25.000,0:00:27.000 किती दिवस आहात तुम्ही इथे दुबईत? 0:00:27.000,0:00:30.000 खरे तर, आम्हाला आशा आहे तुम्ही काही दिवस रहाल इथे दुबईत. 0:00:30.000,0:00:33.000 मी तीस वर्षापासून खाडीप्रदेशातमध्ये (गल्फ मध्ये) राहतेय 0:00:33.000,0:00:35.000 आणि शिकवते आहे. 0:00:35.000,0:00:39.000 (टाळ्यांचा गजर) 0:00:39.000,0:00:43.000 आणि या काळात, मी बरेच बदल पाहिले आहेत. 0:00:43.000,0:00:45.000 आणि ती सांख्यिकी 0:00:45.000,0:00:47.000 जरा धक्कादायक आहे. 0:00:47.000,0:00:49.000 मला तुमच्याशी आज बोलायचय 0:00:49.000,0:00:51.000 (इतर) भाषांची हानी 0:00:51.000,0:00:54.000 आणि इंग्रजीच्या जागतिकीकरणाबाबत 0:00:54.000,0:00:56.000 मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीबाबत सांगते, 0:00:56.000,0:00:59.000 ती अबू धाबीत प्रौढांना इंग्रजी भाषा शिकवायची. 0:00:59.000,0:01:01.000 एक दिवस 0:01:01.000,0:01:03.000 ती सर्व विद्यार्थ्यांना बागेत 0:01:03.000,0:01:05.000 निसर्गासंबंधीचे (इंग्रजी) शब्द शिकवण्यासाठी घेऊन गेली. 0:01:05.000,0:01:07.000 पण खरे तर ती स्वतःच 0:01:07.000,0:01:09.000 स्थानिक झाडांची सर्व अरबी नावे 0:01:09.000,0:01:11.000 आणि उपयोग शिकून गेली -- 0:01:11.000,0:01:14.000 त्यांचे उपयोग - वैद्यकीय, सौंदर्यवर्धनातील, 0:01:14.000,0:01:17.000 स्वयंपाकातील, वनौषधींसंबंधी. 0:01:17.000,0:01:19.000 हे सर्व (स्थानिक झाडांचे) ज्ञान विद्यार्थ्यांना कुठे मिळाले? 0:01:19.000,0:01:21.000 त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई, वडील, आजोबा, पणजोबा वगैरे. 0:01:21.000,0:01:24.000 त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई, वडील, आजोबा, पणजोबा वगैरे. 0:01:24.000,0:01:27.000 या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये. 0:01:27.000,0:01:29.000 या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये. 0:01:29.000,0:01:31.000 या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये. 0:01:31.000,0:01:33.000 सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत. 0:01:33.000,0:01:35.000 सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत. 0:01:35.000,0:01:37.000 सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत. 0:01:37.000,0:01:40.000 प्रत्येक १४ दिवसात एक भाषा नष्ट होतेय. 0:01:41.000,0:01:43.000 आणि, याच आजच्या काळात, 0:01:43.000,0:01:45.000 इंग्रजी ही बिनविरोध जागतिक भाषा आहे. 0:01:45.000,0:01:47.000 (इतर भाषा मरण्याचे) इंग्रजीशी काही संबंध आहे? 0:01:47.000,0:01:49.000 मला माहित नाही. 0:01:49.000,0:01:52.000 परंतु मला हे माहिती आहे की मी बरेच बदल पाहिले आहेत. 0:01:52.000,0:01:55.000 मी जेंव्हा प्रथम गल्फला आले, मी कुवेतला आले 0:01:55.000,0:01:58.000 त्या काळात तिथे काम करणे अतिशय कठीण होते 0:01:58.000,0:02:00.000 फार काळ नाही झाला त्याला 0:02:00.000,0:02:03.000 ते बहुतेक लवकर झाले. 0:02:03.000,0:02:05.000 तरीही त्या काळात, 0:02:05.000,0:02:07.000 ब्रिटीश कौन्सिलने माझी नेमणूक केली 0:02:07.000,0:02:09.000 इतर २५ शिक्षकांबरोबर 0:02:09.000,0:02:11.000 आणि आम्ही कोणीही मुस्लीम नसणारे प्रथमच 0:02:11.000,0:02:14.000 कुवेतच्या शाळेत शिकवणारे शिक्षक होतो. 0:02:14.000,0:02:16.000 आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी आणले होते 0:02:16.000,0:02:20.000 कारण सरकारला देशाचे आधुनिकीकरण करायचे होते 0:02:20.000,0:02:23.000 आणि शिक्षणामार्फत नागरिकांचा विकास करावयाचा होता. 0:02:23.000,0:02:25.000 अर्थात, यात इंग्लंडचा फायदा झाला 0:02:25.000,0:02:28.000 त्या गल्फच्या पेट्रोलच्या संपत्तीपासून 0:02:28.000,0:02:30.000 ठीक आहे. 0:02:30.000,0:02:33.000 आणि हा प्रमुख बदल मी पहिला आहे - 0:02:33.000,0:02:35.000 इंग्रजी शिकवणे हे कसे 0:02:35.000,0:02:37.000 बदलले आहे 0:02:37.000,0:02:41.000 परस्परहिताच्या आचरणापासून ते♫ 0:02:41.000,0:02:44.000 आजचा प्रचंड आंतरराष्ट्रीय धंदा होण्यापर्यंत. 0:02:44.000,0:02:48.000 (इंग्रजी भाषा) आता परदेशी भाषा म्हणून कुठल्याही शाळेच्या अभ्यासक्रमात नाही. 0:02:48.000,0:02:50.000 आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर. 0:02:50.000,0:02:52.000 आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर. 0:02:52.000,0:02:54.000 ती मिळून गेलीय 0:02:54.000,0:02:57.000 जगातील प्रत्येक इंग्रजी बोलणाऱ्या देशात. 0:02:57.000,0:02:59.000 आणि का नाही? 0:02:59.000,0:03:02.000 शेवटी, अत्युत्तम शिक्षण 0:03:02.000,0:03:05.000 हे जागतिक विद्यापीठांच्या दर्जेनुसार 0:03:05.000,0:03:07.000 इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते. 0:03:07.000,0:03:11.000 इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते. 0:03:11.000,0:03:15.000 म्हणजे, आता सगळ्यांचे शिक्षण इंग्रजीत हवे हे साहजिकच झाले. 0:03:15.000,0:03:17.000 पण तुम्ही जर स्थानिक भाषा बोलणारे असाल तर, 0:03:17.000,0:03:19.000 तुम्हाला परीक्षा पास व्हावी लागणार 0:03:19.000,0:03:21.000 आता हे बरोबर आहे का? 0:03:21.000,0:03:23.000 विधार्थ्याला नकार देणे 0:03:23.000,0:03:25.000 त्याच्या फक्त (इंग्रजी) भाषेवरील क्षमतेवरून? 0:03:25.000,0:03:27.000 कदाचित, तो कोणी संगणक शास्त्रज्ञ असेल 0:03:27.000,0:03:29.000 अतिशय बुद्धीमान 0:03:29.000,0:03:32.000 उदा: त्याला वकील होण्यासाठी त्याच (इंग्रजी) भाषेची गरज आहे? 0:03:32.000,0:03:35.000 माझ्या मते नाही. 0:03:36.000,0:03:39.000 आम्ही इंग्रजी शिक्षक त्या (स्थानिक भाषा बोलणाऱ्या) विद्यार्थ्यांना कायम नाकारतो. 0:03:39.000,0:03:41.000 आम्ही त्यांना नकार देतो. 0:03:41.000,0:03:43.000 आणि त्याना रस्त्यातच थांबवतो. 0:03:43.000,0:03:45.000 त्यांची (शिक्षणाची) स्वप्ने त्या नकारामुळे ते पूर्ण करू शकत नाहीत. 0:03:45.000,0:03:48.000 जोपर्यंत त्यांना इंग्रजी येत नाही तोपर्यंत. 0:03:49.000,0:03:52.000 आता मी हे असे समजावून सांगते. 0:03:52.000,0:03:56.000 समजा, मी फक्त डच भाषा बोलणाऱ्या एका माणसाला भेटले 0:03:56.000,0:03:58.000 ज्याच्याकडे कॅन्सरचा उपाय आहे 0:03:58.000,0:04:01.000 मी त्याला ब्रिटीश विद्यापीठात प्रवेश करावयास/शिकण्यास आडवेन का? 0:04:01.000,0:04:03.000 नाही, बिलकुल नाही. 0:04:03.000,0:04:06.000 पण खरे तर, आम्ही नेमके तेच (प्रवेश न देणे) करतो. 0:04:06.000,0:04:09.000 आम्ही इंग्रजी शिक्षक हे त्या प्रवेशद्वारावरचे पहारेकरी आहोत. 0:04:09.000,0:04:12.000 आणि तुम्ही आमचे आधी समाधान केले पाहिजे 0:04:12.000,0:04:15.000 की तुम्हाला नीटनेटके इंग्रजी येते याचे 0:04:16.000,0:04:18.000 आता लोकांच्या छोट्या समूहाला 0:04:18.000,0:04:21.000 एवढी जास्त ताकद देणे 0:04:21.000,0:04:23.000 हे धोकादायक होऊ शकते. 0:04:23.000,0:04:26.000 कदाचित हा अटकाव सार्वत्रिक असावा. 0:04:26.000,0:04:28.000 ठीक आहे. 0:04:28.000,0:04:31.000 तुम्ही म्हणताय "पण, 0:04:31.000,0:04:33.000 संशोधनाचे काय? 0:04:33.000,0:04:35.000 ते सगळे इंग्रजीमध्ये आहे." 0:04:35.000,0:04:37.000 पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत. 0:04:37.000,0:04:39.000 संशोधनाची नियतकालिके इंग्रजीमध्ये आहेत. 0:04:39.000,0:04:42.000 ते स्वपुर्ततेचे भाकीत झाले. 0:04:42.000,0:04:44.000 ते इंग्रजी आवश्यकतेतून सुरू होते. 0:04:44.000,0:04:46.000 आणि मग (चक्र) चालू राहते. 0:04:46.000,0:04:49.000 मी हे विचारते - भाषांतराचे काय झाले? 0:04:49.000,0:04:53.000 तुम्ही जर इस्लामी सुवर्णयुगाचा विचार केला तर, 0:04:53.000,0:04:56.000 त्या काळात बरेच भाषांतर झाले. 0:04:56.000,0:04:59.000 त्यांनी लॅटीन आणि ग्रीकचे भाषांतर 0:04:59.000,0:05:01.000 अरबी आणि फारसीमध्ये केले. 0:05:01.000,0:05:03.000 आणि त्याचे भाषांतर 0:05:03.000,0:05:05.000 युरोपमध्ये जर्मन भाषेत 0:05:05.000,0:05:07.000 आणि रोमन भाषेत झाले. 0:05:07.000,0:05:11.000 आणि मग युरोपच्या अंधारमय युगावर प्रकाश पडला. 0:05:12.000,0:05:14.000 आता मला चुकीचे समजू नका 0:05:14.000,0:05:16.000 मी इंग्रजी शिकवण्याच्या विरुद्ध नाही 0:05:16.000,0:05:18.000 सर्व इंग्रजी शिक्षकांनो 0:05:18.000,0:05:20.000 आपली एक जागतिक भाषा आहे हे मला आवडते. 0:05:20.000,0:05:23.000 एक जागतिक भाषा असणे ही आजच्या काळाची गरज आहे. 0:05:23.000,0:05:25.000 पण माझा विरोध आहे त्या भाषेचा उपयोग 0:05:25.000,0:05:27.000 प्रतिबंध/अडथळा म्हणून करण्याचा. 0:05:27.000,0:05:30.000 खरच आपल्याला ६०० भाषा नष्ट करून 0:05:30.000,0:05:33.000 इंग्रजी किंवा चीनी प्रमुख भाषा करायची आहे का? 0:05:33.000,0:05:36.000 आपल्याला यापेक्षा जास्त काहीतरी हवे आहे. आणि याला (एकभाषीयतेला) सीमा आहे की नाही? 0:05:36.000,0:05:38.000 हि (एकभाषीयतेची) पद्धत 0:05:38.000,0:05:41.000 बुद्धिमत्तेला 0:05:41.000,0:05:44.000 इंग्रजी किती येते यास जोडते 0:05:44.000,0:05:46.000 हे खरे तर अवास्तविक आहे. 0:05:46.000,0:05:52.000 (टाळ्यांचा गजर) 0:05:52.000,0:05:54.000 आणि मला तुम्हाला याची आठवण करून द्यायची आहे की 0:05:54.000,0:05:57.000 ज्या श्रेष्ट लोकांच्या खांद्यावर 0:05:57.000,0:05:59.000 आजचे बुद्धीजीवी उभे आहेत, 0:05:59.000,0:06:01.000 त्या श्रेष्ठांना इंग्रजी आवश्यक नव्हते. 0:06:01.000,0:06:03.000 त्यांना इंग्रजी भाषेची परीक्षा पास व्हावी लागत नव्हती. 0:06:03.000,0:06:06.000 उदा: (आल्बर्ट) आइनस्टाइन (मातृ भाषा: जर्मन) 0:06:07.000,0:06:10.000 तो शाळेत शिक्षणात कठीण विद्यार्थी समजला जायचा. 0:06:10.000,0:06:12.000 त्याला खर तर डिस्लेक्सिया होता. (डिस्लेक्सिया म्हणजे लिहायला, वाचायला व समजून घ्यायला येणारी अडचण.) 0:06:12.000,0:06:14.000 या जगासाठी, सुदैवाने 0:06:14.000,0:06:17.000 त्याला इंग्रजी भाषेची परीक्षा द्यावी लागली नाही. 0:06:17.000,0:06:20.000 कारण त्याची सुरुवात १९६४ पर्यंत झाली नव्हती 0:06:20.000,0:06:22.000 टोफल (TOEFL) मार्फत. (TOEFL - Test Of English as Foreign Language), 0:06:22.000,0:06:24.000 अमेरिकेची इंग्रजी भाषेची परीक्षा 0:06:24.000,0:06:26.000 आता त्याचा अतिप्रसार झाला आहे. 0:06:26.000,0:06:29.000 इंग्रजी भाषेच्या आता अनेक परीक्षा आहेत. 0:06:29.000,0:06:31.000 आणि लाखो विद्यार्थी 0:06:31.000,0:06:33.000 दर वर्षी या परीक्षा देतात. 0:06:33.000,0:06:35.000 आता तुम्ही (आणि मी) असा विचार कराल 0:06:35.000,0:06:37.000 ती फी फार जास्त नाहीये, ठीकठाक आहे. 0:06:37.000,0:06:39.000 ती फी मनाई करणारी आहे 0:06:39.000,0:06:41.000 लाखो गरीब लोकांसाठी 0:06:41.000,0:06:43.000 आणि त्यामुळे आम्ही तत्काळ त्यांना नकार देतो. 0:06:43.000,0:06:46.000 (टाळ्यांचा गजर) 0:06:46.000,0:06:49.000 माझ्या मनात नुकतीच वाचलेली एक ठळक बातमी येतेय 0:06:49.000,0:06:51.000 शिक्षण - एक मोठी दुफळी. 0:06:51.000,0:06:53.000 आता मला समजतय 0:06:53.000,0:06:56.000 लोक इंग्रजीवर का लक्ष देतात. 0:06:56.000,0:06:59.000 त्यांच्या मुलांना ते उत्कृष्ट शिक्षण देऊ इच्छित आहेत. 0:07:00.000,0:07:03.000 त्यासाठी त्यांना हवे आहे - पाश्चात्य शिक्षण. 0:07:03.000,0:07:05.000 कारण, अर्थात, चांगल्या नोकऱ्या 0:07:05.000,0:07:08.000 पाश्चात्य विद्यापीठाच्या लोकांना मिळतात. 0:07:08.000,0:07:10.000 हे मी आधी सांगितले आहेच. 0:07:10.000,0:07:12.000 हे एक चक्र आहे. 0:07:12.000,0:07:14.000 ठीक. 0:07:14.000,0:07:16.000 मी तुम्हाला दोन शास्त्रज्ञांची गोष्ट सांगते. 0:07:16.000,0:07:18.000 दोन इंग्रजी शास्त्रज्ञ 0:07:18.000,0:07:20.000 प्रयोग करत होते, 0:07:20.000,0:07:22.000 जनुकशास्त्र (जेनेटिक्स) 0:07:22.000,0:07:25.000 आणि प्राण्यांच्या पुढच्या आणि मागच्या अवयवावर. 0:07:25.000,0:07:27.000 परंतु त्यांना जो परिणाम मिळायला हवा तो मिळत नव्हता. 0:07:27.000,0:07:29.000 त्यांना समजत नव्हते काय कराव याबाबत. 0:07:29.000,0:07:32.000 शेवटी एक जर्मन शास्त्रज्ञ आले. 0:07:32.000,0:07:35.000 त्यांच्या लक्षात आले की ती दोघे दोन शब्द (विभाग) वापरत होते 0:07:35.000,0:07:37.000 पुढचे अवयव आणि मागचे अवयव. 0:07:37.000,0:07:41.000 आणि जनुकशास्त्र तर अशी विभागणी करत नाही. 0:07:41.000,0:07:43.000 तसेच जर्मन भाषा देखील नाही. 0:07:43.000,0:07:45.000 अहा! 0:07:45.000,0:07:47.000 प्रश्न सुटला. 0:07:47.000,0:07:49.000 तुम्ही जर असा विचार करू शकला नाही, 0:07:49.000,0:07:52.000 तर तुम्ही अडकता (त्या एकाच जागेवर) 0:07:52.000,0:07:54.000 परंतु जर दुसरी भाषा त्या विचाराचा विचार करू शकत असेल, 0:07:54.000,0:07:56.000 तर सहकार्याने 0:07:56.000,0:07:59.000 आपण बरच शिकू आणि साध्य करून शकतो. 0:08:01.000,0:08:03.000 माझी मुलगी 0:08:03.000,0:08:06.000 कुवेतमधून इंग्लंडला आली आहे. 0:08:06.000,0:08:09.000 ती अरबी भाषेत शास्त्र आणि गणित शिकली आहे. 0:08:09.000,0:08:12.000 ती अरबी माध्यमाची शाळा आहे. 0:08:12.000,0:08:15.000 तिला अरबी भाषेचे इंग्लिश मध्ये भाषांतर करावे लागायचे. 0:08:15.000,0:08:17.000 आणि ती वर्गात प्रथम होती 0:08:17.000,0:08:19.000 त्या विषयात 0:08:19.000,0:08:21.000 हे सर्व आपल्याला सांगतय की 0:08:21.000,0:08:23.000 जेंव्हा विद्यार्थी परदेशातून आपल्याकडे येतात 0:08:23.000,0:08:25.000 आपण त्यांना फारसे महत्त्व देत नाही 0:08:25.000,0:08:27.000 त्यांच्या ज्ञानासाठी 0:08:27.000,0:08:30.000 आणि त्यांनी ते ज्ञान त्यांच्या स्वतःच्या भाषेत मिळवलेले असते. 0:08:30.000,0:08:32.000 जेंव्हा भाषा मरते, 0:08:32.000,0:08:35.000 आपल्याला हे माहिती नाही की त्या भाषेबरोबर काय काय हरवेल. 0:08:35.000,0:08:39.000 हे तुम्ही नुकतेच CNN वर पाहिले असेल - 0:08:39.000,0:08:41.000 त्यांनी नुकतेच बक्षीस दिले 0:08:41.000,0:08:44.000 एका केनयाच्या मेंढपाळाच्या मुलाला 0:08:44.000,0:08:47.000 तो गावात रात्री अभ्यास करू शकत नव्हता 0:08:47.000,0:08:49.000 गावातील सर्व मुलांसारखा. 0:08:49.000,0:08:51.000 कारण केरोसीनच्या कंदिलाच्या 0:08:51.000,0:08:53.000 धुरामुळे त्याचे डोळे खराब झाले. 0:08:53.000,0:08:56.000 आणि केरोसीनची/रॉकेलची कमतरता घरात नेहेमीच होती 0:08:56.000,0:08:59.000 कारण गरिबीच्या उत्पन्नात काय मिळणार आहे? 0:08:59.000,0:09:01.000 मग त्याने शोध लावला 0:09:01.000,0:09:04.000 निशुल्क सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्याचा. 0:09:04.000,0:09:06.000 आणि आता त्याच्या गावातल्या मुलांना 0:09:06.000,0:09:08.000 शाळेत सारखेच गुण मिळतात 0:09:08.000,0:09:12.000 इतर मुलांसारखे ज्यांच्या घरात वीज आहे. 0:09:12.000,0:09:18.000 (टाळ्यांचा गजर) 0:09:18.000,0:09:20.000 जेंव्हा त्याला हे बक्षीस मिळाले, 0:09:20.000,0:09:22.000 त्याने अतिशय सुंदर शब्दात सांगितले: 0:09:22.000,0:09:25.000 "मुले आजच्या आफ्रिकेला पुढे नेऊ शकतात, 0:09:25.000,0:09:27.000 अंधारमय खंडापासून 0:09:27.000,0:09:29.000 ते प्रकाशमान खंडापर्यंत." 0:09:29.000,0:09:31.000 एक साधी कल्पना, 0:09:31.000,0:09:34.000 पण तिचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. 0:09:35.000,0:09:37.000 ज्यांच्या घरात प्रकाश नाहीये - 0:09:37.000,0:09:40.000 ते भौतिक असो की रूपकात्मक, 0:09:40.000,0:09:43.000 जे आपल्या (इंग्रजीच्या) परीक्षा पास होऊ शकत नाही, 0:09:43.000,0:09:46.000 आणि आपल्याला हे कधीही कळणार नाही त्यांना काय माहिती आहे ते. 0:09:46.000,0:09:49.000 आपण त्यांना आणि आपल्याला 0:09:49.000,0:09:51.000 असे अंधारात ठेवायला नको. 0:09:51.000,0:09:54.000 ही विविधता साजरी करू या. 0:09:54.000,0:09:57.000 तुमच्या (स्वतःच्या) भाषेवर लक्ष द्या. 0:09:57.000,0:10:01.000 तिचा विशाल कल्पनांचा प्रसार करण्यासाठी उपयोग करा. 0:10:01.000,0:10:08.000 (टाळ्यांचा गजर) 0:10:08.000,0:10:10.000 आभारी आहे. 0:10:10.000,0:10:13.000 (टाळ्यांचा गजर)