< Return to Video

AI: What is Machine Learning?

  • 0:08 - 0:12
    माझे नाव आहे आली फ्लोरेस,
    आणि मी अलेक्सामध्ये प्रॉडक्ट मॅनेजर आहे.
  • 0:12 - 0:15
    माझे नाव डॉ. चेलसी हाउप्ट आहे. मी एलेन इन्स्टीट्यूट फॉर
    आर्टिफिशियल इंटेलिजंसमध्ये कामाला आहे,
  • 0:15 - 0:20
    आणि माझे काम AI द्वारे चालणाऱ्या
    शैक्षणिक शोध इंजिनवर सुरू आहे.
  • 0:21 - 0:26
    तुमच्या भोवती कॉम्प्युटर निर्णय
    घेत आहेत, आणि ते निर्णय
  • 0:26 - 0:31
    तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकतात. जेव्हा तुम्ही
    इंटरनेटवर काही शोधता, किंवा तुमच्या न्यूजफीडवर स्क्रोल करता,
  • 0:31 - 0:34
    तेव्हा कॉम्प्युटर ठरवतात की
    तुम्हाला काय दाखवायचे आहे.
  • 0:34 - 0:39
    कॉम्प्युटर तुमचा चेहरा ओळखतात
    आणि आवाज सुद्धा ओळखतात,
  • 0:39 - 0:44
    लवकरच ते कार चालवणे आणि आजारांचे निदान करण्यासारखी
    कामे सुद्धा करतील, माणसांपेक्षा चांगल्या रीतिने.
  • 0:44 - 0:47
    तर हे सर्व कसे शक्य आहे?
  • 0:48 - 0:53
    तुम्ही AI म्हणजेच
    कृत्रिम बुद्धीबद्दल ऐकले असेल.
  • 0:53 - 0:57
    खरोखरच्या कृत्रिम बुद्धीचा शोध व्हायला
    अजून काही दशके आहेत.
  • 0:57 - 1:02
    पण एका प्रकारचा AI आज
    आपल्यात आहे, त्याला मशीन अभ्यास म्हणतात.
  • 1:02 - 1:05
    तुम्ही अशा AI सोबत रोजच नकळत संवाद साधता.
  • 1:05 - 1:11
    जगातील सर्वात मोठ्या आव्हानांची उत्तरे
    शोधण्यासाठी ते आपल्याला मदत करीत आहे.
  • 1:13 - 1:18
    मशीन अभ्यासामुळे कॉम्प्युटर पॅटर्न ओळखतात
    आणि विविक्षित प्रोग्रामिंग शिवाय
  • 1:18 - 1:21
    निर्णय घेऊ शकतात.
  • 1:22 - 1:28
    आपण आतापर्यंत कॉम्प्युटर प्रोग्रामिंग जसे करीत होतो,
    त्यापेक्षा ही फार निराळी पद्धत आहे
  • 1:28 - 1:30
    आणि तीच तर याची मजा आहे.
  • 1:31 - 1:37
    मशीन अभ्यासामुळे, कॉम्प्युटरला
    एका नंतर एक असे मार्गदर्शन न करता
  • 1:37 - 1:44
    तुम्ही त्याला तुमच्यासारखेच शिकायला शिकवता, करून पाहा
    आणि चुकांपासून शिका, आणि खूप सराव करा.
  • 1:45 - 1:49
    अनुभवातून शिकले जाते,
    आणि मशीन अभ्यास सुद्धा तसेच करते.
  • 1:49 - 1:54
    या बाबतीत, "अनुभवा"चा अर्थ आहे
    खूप-खूप डेटा.
  • 1:54 - 1:58
    मशीन अभ्यासामध्ये
    कुठल्याही प्रकारचा डेटा घेतला जाऊ शकतो.
  • 1:58 - 2:05
    चित्र, व्हिडिओ, आवाज, लिहीलेली अक्षरे -
    आणि मग त्या डेटामधील पॅटर्न ओळखणे सुरू होते.
  • 2:06 - 2:11
    एकदा याला डेटामधील पॅटर्न
    ओळखता यायला लागली, की मग
  • 2:11 - 2:13
    त्या पॅटर्नप्रमाणे याला
    निर्णयसुद्धा घ्यायला शिकवता येते.
  • 2:13 - 2:18
    जसे, कारचे चित्र आणि
    सायकलचे चित्र यांच्यातील फरक ओळखणे.
  • 2:21 - 2:26
    AI आणि मशीन अभ्यास आजच्या समाजात
    अधिकाधिक मोठी भूमिका वठवीत आहेत
  • 2:27 - 2:29
    आणि आपले सर्वांचे भवितव्य ठरवीत आहेत.
  • 2:29 - 2:35
    त्यामुळेच हे अतिशय महत्त्वाचे आहे की आपण हे
    कसे काम करते ते शिकावे, स्वतः करून पाहाण्याचा अनुभव घ्यावा.
  • 2:35 - 2:39
    आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मशीन अभ्यासाच्या
    मॉडेलला शिकवायची संधी मिळणार आहे.
  • 2:41 - 2:47
    लक्षात ठेवा, AI इतर उपकरणांसारखाच आहे:
    आधी तुम्ही ज्ञान मिळवता, नंतर तुम्हाला त्याची शक्ती मिळते.
Title:
AI: What is Machine Learning?
Description:

AI is all around us. The most widely used form of AI is called Machine Learning and you probably interact with it every day. Find out what Machine Learning is and how it's changing our world.

Start learning at http://code.org/

Stay in touch with us!
• on Twitter https://twitter.com/codeorg
• on Facebook https://www.facebook.com/Code.org
• on Instagram https://instagram.com/codeorg
• on Tumblr https://blog.code.org
• on LinkedIn https://www.linkedin.com/company/code-org
• on Google+ https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
02:56

Marathi subtitles

Revisions