Return to Video

Dance Party - Warm Up

  • 0:02 - 0:07
    नमस्कार. माझे नाव मिरल कोबट आहे.
  • 0:08 - 0:12
    मी एक नृत्यांगना, एक सॉफ्टवेअर विकसक, आणि 'आयल्युमिनेट' ची निर्माती आहे.
  • 0:12 - 0:16
    संगणक विज्ञान असंख्य मार्गांनी कल्पकतेशी संबंधित आहे.
  • 0:16 - 0:22
    इतके कि मोजणे सुद्धा कठिण आहे.
  • 0:22 - 0:23
    जेव्हा तुमच्याकडे सॉफ्टवेअर लिहिण्याची क्षमता असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनेला कुठेही सहज जोडू शकता.
  • 0:23 - 0:28
    मी यासाठी 'लाईट सूट' चा वापर करते.
  • 0:28 - 0:31
    तुम्ही खूप काही करू शकता, जेव्हा तुमच्याकडे सॉफ्टवेअर लिहिण्याचे उपकरण असेल.
  • 0:31 - 0:36
    आणि यात अमर्याद संधी आहेत.
  • 0:36 - 0:39
    काही तासात तुम्ही संगणक विज्ञान शिकू लागाल,
  • 0:39 - 0:44
    ते सुद्धा तुमच्या स्वतःच्या 'डान्स पार्टी' ला प्रोग्राम करून.
  • 0:44 - 0:45
    आम्ही तुमच्यासाठी काही प्रसिद्ध गाणी आणि कुशल नर्तकांची एक टीम एकत्र केली आहे.
  • 0:45 - 0:49
    वेगवेगळ्या नर्तकांची निवड करण्यासाठी तुम्ही विभिन्न 'कोड' ब्लॉक्सचा वापर करू शकता.
  • 0:49 - 0:56
    तुमच्या 'डान्स मूव्हस' बदलू शकता.
  • 0:56 - 1:00
    त्यांना संगीताविषयी अधिक प्रतिसादात्मक, आणि संवादात्मक बनवू शकता.
  • 1:00 - 1:05
    तुम्हाला दिसेल कि तुमची 'स्क्रीन' तीन मुख्य भागांमध्ये विभागली गेली आहे.
  • 1:05 - 1:07
    डाव्या बाजूला 'प्ले स्पेस' आहे.
  • 1:07 - 1:10
    जिथे तुम्हाला नर्तक दिसतील.
  • 1:10 - 1:13
    मध्यभागी 'टूलबॉक्स' आहे.
  • 1:13 - 1:18
    जसे जसे तुम्ही या धड्यातून पुढे शिकत जाल, तसे तसे 'कोड'चे नवीन 'ब्लॉक्स' येथे उपलब्ध होतील.
  • 1:18 - 1:22
    तुमच्या उजव्या बाजूला 'वर्कस्पेस' आहे.
  • 1:22 - 1:28
    तुमचा 'प्रोग्राम' तयार करण्यासाठी 'टूलबॉक्स'मधून 'ब्लॉक्स' ला खेचून 'वर्कस्पेस' मध्ये टाकू शकता.
  • 1:28 - 1:34
    प्रत्येक स्तरासाठीची सूचना तुमच्या स्क्रीनवर येथे दिली जाईल.
  • 1:34 - 1:41
    जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर 'लाईट बल्ब' वर क्लिक करा.
  • 1:41 - 1:46
    आपण सुरुवात करण्यासाठी, या लाल ब्लॉक चा वापर करून एक नवीन नर्तक तयार करूया.
  • 1:46 - 1:53
    पहिले त्याला 'टूलबॉक्स' मधून बाहेर खेचा.
  • 1:53 - 1:58
    आणि त्याला नारिंगी 'सेटअप' ब्लॉकमध्ये घुसवा.
  • 1:58 - 2:04
    हा नर्तक एक मांजर आहे.
  • 2:04 - 2:10
    आणि त्याचे नाव "माय फर्स्ट डान्सर" आहे.
  • 2:10 - 2:13
    तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे नाव येथे दाबून बदलू शकता.
  • 2:13 - 2:19
    तुमच्या 'प्ले स्पेस' मध्ये नर्तक कोठे दिसला पाहिजे, त्यानुसार तुम्ही बदल करू शकता.
  • 2:19 - 2:21
    'प्ले स्पेस' च्या वर संगीत निवडण्यासाठी एक मेनू ठेवला आहे.
  • 2:21 - 2:26
    इथे तुम्हाला खूप गाणी मिळतील, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाणी निवडू शकता.
  • 2:26 - 2:31
    'प्ले स्पेस'च्या खाली तुम्हाला 'रन' नावाचे बटण दिसेल.
  • 2:31 - 2:36
    जेव्हा तुम्ही 'रन' दाबाल, तुम्ही तुमच्या 'प्रोग्राम' मधील नर्तकांना 'प्ले स्पेस' मध्ये पाहू शकता.
  • 2:36 - 2:37
    आणि संगीत सुरू होईल.
  • 2:37 - 2:39
    तुम्ही स्वतः प्रयत्न करा.
  • 2:39 - 2:44
    जरी तुम्ही कुठे अडकलात, तरी काही हरकत नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करा.
  • 2:44 - 2:45
    आणि तुम्हाला सगळे समजण्यापूर्वीच, तुम्ही स्वतःची 'डान्स पार्टी' तयार कराल.
  • 2:45 - 2:49
    तर, आपण काय बनवाल?
Title:
Dance Party - Warm Up
Description:

Start learning at http://code.org/

Stay in touch with us!
• on Twitter https://twitter.com/codeorg
• on Facebook https://www.facebook.com/Code.org
• on Instagram https://instagram.com/codeorg
• on Tumblr https://blog.code.org
• on LinkedIn https://www.linkedin.com/company/code-org
• on Google+ https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Duration:
02:56
TranslateByHumans edited Marathi subtitles for Dance Party - Warm Up

Marathi subtitles

Revisions