-
डीबगिंग म्हणजे समस्या शोधणे आणि दुरुस्त करणे. समस्या डीबग करण्याचे अनेक मार्ग आहेत.
-
एक सर्वांत सोपा मार्ग म्हणजे काहीतरी चुकीचे घडेपर्यंत
पायरी पायरीने पुढे जाणे.
-
इथे मी बीमवर बॅक हँडस्प्रिंग करायचा प्रयत्न करते आहे.
पण सारखी खाली पडते आहे. मी प्रत्येक गोष्ट
-
पायरी पायरीने करून पाहिली आणि माझी चूक
माझ्या लक्षात आली. मी माझे हात
-
बीमवर योग्यप्रकारे ठेवत नव्हते. त्यामुळे मी नवीन स्थितीत पुन्हा बॅक हँडस्प्रिंग
-
करून बघितला आणि तो जमला. डीबगिंगबद्दल शिकण्यासाठी,
-
आपण स्टेजवर आधीपासून असलेल्या ब्लॉक्सच्या संचापासून सुरुवात करू. तुमच्या लक्षात येईल की
-
हे ब्लॉक्स तुम्हाला ध्येयापर्यंत पोचवणार नाहीत. आपल्याला सोल्युशन डीबग करून दुरुस्ती करायला हवी. काय चुकलं?
-
तुमच्या लक्षात येईल की तुम्ही अजून एक ब्लॉक पश्चिमेकडं जाणं सुरू ठेवायला हवं होतं त्यामुळं
-
अजून एक पश्चिम ब्लॉक जोडून हे दुरुस्त करूया आणि
रन दाबून तुम्ही बरोबर केलं आहेत, हा बहुया. होय, जमलं तुम्हाला!