माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - रिपीट लूप्स
-
0:04 - 0:08स्टँपी: स्टेसी काय करत असेल बरं?
-
0:13 - 0:17स्टेसी: वा, मला वाटतंय मी योग्य
ठिकाणी आलेय. -
0:17 - 0:19काय भारी आहे!
-
0:19 - 0:22मला वाटतंय, मी परत माईनक्राफ्टमध्ये आलेय!
-
0:22 - 0:24हॅलो
-
0:24 - 0:25कसा आहेस?
-
0:25 - 0:27हॅलो?
-
0:27 - 0:31बापरे, इथे वेल आहे. तू काही करणार नाहीस,
हो ना? -
0:31 - 0:31केटी: स्टेसी?
-
0:31 - 0:32स्टेसी: हाय, केटी?
-
0:32 - 0:33केटी: हो!
-
0:33 - 0:34माईनक्राफ्टमध्ये स्वागत.
-
0:34 - 0:35स्टेसी: धन्यवाद!
-
0:35 - 0:37केटी: ये आत!
-
0:38 - 0:40स्टेसी: काय मस्त आहे.
-
0:40 - 0:43मग, तू इथे रोज काम करतेस डेव्हलपर
म्हणून, हो ना? -
0:43 - 0:44केटी: हो, खूप मजा येते.
-
0:44 - 0:47मी माईनक्राफ्ट मार्केटप्लेस टीममध्ये
डेव्हलपर आहे. -
0:47 - 0:49स्टेसी: तुला कोडींगच्या किती भाषा येतात?
-
0:49 - 0:52केटी: माझ्या करीअरमध्ये मी बारापेक्षा
जास्त भाषांमध्ये काम केलंय. -
0:52 - 0:53स्टेसी: बारा?
-
0:53 - 0:54केटी: हो.
-
0:54 - 0:58स्टेसी: मग आता, तुला या छोट्या "द एजंट"
-
0:58 - 0:59नावाच्या मुलाबद्दल काहीच माहिती नसेल?
-
0:59 - 1:06केटी: ज्या गोष्टी स्टीव्ह किंवा अलेक्स करू शकत नाहीत, त्यासाठी आम्ही एजंट वापरतो, लाव्हावरून जाणं वगैरे.
-
1:06 - 1:10स्टेसी: बरं, मला कोडींग शिकायचंय, आणि
यांना कोडींग शिकायचंय, तर शिकत -
1:10 - 1:13असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी सर्वांत आधी
माहीत असाव्या लागतात? -
1:13 - 1:16केटी: अं, तुम्हाला लूप्स कसे वापरायचे ते शिकावे लागेल.
-
1:16 - 1:17स्टेसी: ठीकेय.
-
1:17 - 1:21केटी: कॉम्प्युटरला ज्या कमांड्स
पुन्हा पुन्हा करायला सांगायच्या आहेत -
1:21 - 1:22त्यासाठी डेव्हलपर लूप्स लिहीतात.
-
1:22 - 1:26स्टेसी: आलं लक्षात, मला वाटतंय, पुढच्या
पातळ्यांमध्ये यातले काही येणार आहे, -
1:26 - 1:29चला तर मग, लूप्स वापरून बघा.
-
1:29 - 1:33पुढच्या पातळीला तुम्ही एजंटला रस्त्यावरून चालवण्यासाठी लूप वापरू शकता.
-
1:33 - 1:38रिपीट ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढा
आणि त्याच्यात मूव्ह फॉरवर्ड -
1:38 - 1:39ब्लॉक ठेवा.
-
1:39 - 1:44त्याद्वारे सगळे ब्लॉक्स वर्कस्पेसमध्ये न
ओढता कॉम्प्युटरला एकच गोष्ट -
1:44 - 1:46एकापाठोपाठ एक अनेक वेळा करायला
सांगितली जाते. -
1:46 - 1:51रिपीट ब्लॉकमध्ये एक संख्या लिहून तुम्ही
कितीवेळा पुनरावृत्ती करायची ते ठरवू शकता. -
1:51 - 1:56तुम्ही रिपीट ब्लॉकमध्येसुद्धा टर्न्स आणि
अनेक कमांड्स लिहू शकता, पण सध्या -
1:56 - 1:59एजंटला काही पावले पुढे नेण्यासाठी रिपीट
वापरण्याचा प्रयत्न करा. -
1:59 - 2:03लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या कोड्यात अडकलात
तर नेहमी निळे "रीसेट" बटन दाबू शकता -
2:03 - 2:04आणि पुन्हा प्रयत्न करू शकता.
-
2:04 - 2:09जर केटीसारखा कूल जॉब तुम्हाला हवा असेल तर,
करून पहा आणि प्रत्येक पातळी पूर्ण झाली की -
2:09 - 2:11"show code" बटणावर क्लिक करा.
-
2:11 - 2:15म्हणजे तुम्हाला खरा जावास्क्रीप्ट कोड दिसेल.
केटीसारखे लोक -
2:15 - 2:17माईनक्राफ्ट प्रोग्रॅमिंग करताना
हा कोड वापरतात. -
2:17 - 2:18चला, तुला खूप खूप धन्यवाद!
-
2:18 - 2:20केटी: सगळ्यांना शुभेच्छा!
- Title:
- माईनक्राफ्ट अवर ऑफ कोड - रिपीट लूप्स
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 02:26
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Repeat Loops | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Repeat Loops | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Repeat Loops | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Repeat Loops | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Repeat Loops | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft Hour of Code - Repeat Loops |