< Return to Video

Dividing decimal

  • 0:01 - 0:04
    दशमान भागाकार पद्धत दाखवणाऱ्या उदाहरणात आपले स्वागत आहे.
  • 0:04 - 0:06
    आपण सुरुवात उदाहरणापासून करूया.
  • 0:06 - 0:25
    जर मला म्हणायचा असेल की, शून्य दशांश अठ्ठावीस हे तेवीस दशांश आठशे अठ्ठावीसमध्ये कित्ती वेळा जातील?
  • 0:25 - 0:26
    तर तुम्ही पाहाल की, हि जी दशमान भागाकाराची उदाहरणे आहेत
  • 0:26 - 0:28
    ती खरं तर चौथ्या पातळीच्या भागाकाराच्या उदाहरणासारखीच आहेत.
  • 0:28 - 0:31
    तुम्हाला हेच शोधायचं आहे कि दशांश चिन्ह कुठे लावायचं आहे.
  • 0:31 - 0:34
    मग आता तुम्हाला काय करायचं कि हे दशांश चिन्ह घ्यायचय,
  • 0:34 - 0:39
    आणि ते अशा प्रकारे जागचं हलवायचं आहे कि तुम्हाला पूर्णांक प्राप्त होईल.
  • 0:39 - 0:43
    तर ह्या उदाहरणात, आपल्याला ते एक स्थान, दोन स्थान जागचं हलवायचं आहे,
  • 0:43 - 0:45
    इथे दशांश चिन्ह ठेवण्यासाठी.
  • 0:45 - 0:47
    आता, जर मी हे ह्या अंकाबरोबर केलं,
  • 0:47 - 0:48
    तर मला हे ह्या अंकासोबतसुद्धा तसंच करावं लागेल.
  • 0:48 - 0:50
    म्हणून मी त्याला दोन स्थान उजवीकडे हलवलं,
  • 0:50 - 0:54
    मग मला आता हे दशांश चिन्ह दोन स्थळं उजवीकडे हलवावं लागेल-- एक,दोन.
  • 0:54 - 0:56
    दशांश चिन्ह गेलं इकडे,
  • 0:56 - 0:58
    आणि मी दशांश चिन्ह इथे पुढे लावलं, एकदम इथे.
  • 0:58 - 1:04
    आता मी ह्या अठ्ठावीसला पूर्णांकासारखा वापरू शकतो.
  • 1:04 - 1:07
    आणि जर मला हवा असेल, मला पाहू द्या जर मी करू शकेन--
  • 1:07 - 1:08
    तर, मी हे जुनं दशांश चिन्हं खोडणार नाही
  • 1:08 - 1:12
    कारण जर तुम्ही हे पेनाने करत असता तर तुम्हाला साधारणपणे माझ्यासारखाच अडथळा आला असता.
  • 1:12 - 1:14
    तर आता आपण हे चौथ्या पातळीच्या भागाकाराच्या उदाहरणासरखे सोडवतो.
  • 1:14 - 1:18
    तर आपण म्हणु, अठ्ठावीस गुणिले किती केल्यावर दोन होतील?
  • 1:18 - 1:19
    तर, कितीही नाही.
  • 1:19 - 1:21
    दोन हा अठ्ठावीस पेक्षा लहान आहे.
  • 1:21 - 1:24
    अठ्ठावीस हा तेवीसमध्ये किती वेळा जाईल?
  • 1:24 - 1:27
    पुन्हा एकदा, तरीही, तो त्यामध्ये शून्य वेळा जातो,
  • 1:27 - 1:30
    कारण तेवीस हा अठ्ठावीस पेक्षा लहान आहे.
  • 1:30 - 1:35
    अठ्ठावीस हा दोनशे अडतीस मध्ये किती वेळा जातो?
  • 1:35 - 1:37
    जरा विचार करूया ह्याबद्दल.
  • 1:37 - 1:39
    अठ्ठावीस हा जवळ-जवळ तीसच आहे.
  • 1:39 - 1:44
    दोनशे अडतीस हे साधारण दोनशे चाळीसंच आहेत.
  • 1:44 - 1:47
    तर दोनशे चाळीसमध्ये तीस आठ वेळा जातात,
  • 1:47 - 1:50
    कारण चोवीसमध्ये तीन आठ वेळा जातात.
  • 1:50 - 1:54
    तर आता मी अंदाज लावणार आहे कि दोनशे अडतीसमध्ये अठ्ठावीस आठ वेळा जातील.
  • 1:55 - 1:56
    आणि हा स्पष्टपणे एक अंदाज आहे.
  • 1:56 - 1:58
    तुम्हाला काही वेळा अंकांचा सराव करावा लागतो.
  • 1:58 - 2:03
    आठ गुणिले आठ अडूसष्ठ.
  • 2:03 - 2:06
    आठ गुणिले दोन सोळा.
  • 2:06 - 2:10
    अधिक दोन म्हणजे बावीस.
  • 2:10 - 2:12
    वजाबाकी करा.
  • 2:12 - 2:15
    मला मिळतात चौदा.
  • 2:15 - 2:21
    माझा अंदाज खरा होता, कारण जेव्हा मी दोनशे अडतीसला अठ्ठावीसने भागतो
  • 2:21 - 2:23
    आणि म्हणतो कि तो त्यामध्ये आठ वेळा जातो, तेव्हा बाकी चौदा राहते,
  • 2:23 - 2:24
    जी अठ्ठावीस पेक्षा कमी आहे.
  • 2:24 - 2:28
    म्हणून आठ हा जास्तीत जास्त मोठा अंक होता कि जितक्या वेळा
  • 2:28 - 2:31
    अठ्ठावीस हा दोनशे अडतीस मध्ये जावू शकत होता, जास्त होण्यावाचून.
  • 2:31 - 2:33
    मग मी हा दोन खाली आणतो.
  • 2:33 - 2:37
    पुन्हा एकदा, तुम्हाला हे ध्यानात येईल कि हे एक दुसऱ्या पातळीचे भागाकाराचे उदाहरण आहे--
  • 2:37 - 2:39
    चौथ्या पातळीचे भागाकाराचे उदाहरण.
  • 2:39 - 2:42
    मग मी आता म्हणीन, एकशे बेचाळीसमध्ये अठ्ठावीस हे किती वेळा जातील?
  • 2:42 - 2:44
    तर, पुन्हा एकदा, मी अंदाज लावणार आहे.
  • 2:44 - 2:47
    अठ्ठावीस हा जवळ-जवळ तीसच आहे.
  • 2:47 - 2:51
    तर बघूया, तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस.
  • 2:51 - 2:53
    तर हो, मी अंदाज घेऊन म्हणीन कि
  • 2:53 - 2:54
    आपण म्हणूया ते चार वेळा जातील.
  • 2:54 - 2:59
    मी चूक असू शकतो, पण बघूया ते चालेल का.
  • 2:59 - 3:00
    मला हा जुना सहा काढू द्या.
  • 3:00 - 3:04
    आठ गुणिले चार बत्तीस.
  • 3:04 - 3:07
    आणि दोन गुणिले चार आठ.
  • 3:07 - 3:13
    अधिक तीन अकरा.
  • 3:13 - 3:14
    दोन वजा दोन शून्य.
  • 3:14 - 3:17
    चार वजा एक तीन.
  • 3:17 - 3:19
    हम्म! रोचक आहे!
  • 3:19 - 3:23
    तर असं होतंय कि माझी बाकी इथे अठ्ठावीस पेक्षा मोठी आहे,
  • 3:23 - 3:29
    म्हणून मी एकशे बेचाळीसला पुन्हा एकदा अठ्ठावीसने भागू शकलो असतो.
  • 3:29 - 3:31
    म्हणून मला पुन्हा जाऊन ते बदलू द्या.
  • 3:31 - 3:34
    पहा, ही काय यांत्रिक बाब नाही आहे.
  • 3:34 - 3:37
    आणि जर तुम्ही एखाद्या वेळेस साशंक असाल,
  • 3:37 - 3:39
    तुम्हाला फक्त काही आकडेमोड करायची आहे आणि पाहायचं आहे.
  • 3:39 - 3:41
    आणि अथवा, आकडा वाढवायचा किव्वा कमी करायचा आहे.
  • 3:41 - 3:46
    म्हणून मला तो चार अंक खोडू द्या.
  • 3:46 - 3:52
    मी प्रयत्न करणार आहे कि खाडाखोड होणार नाही.
  • 3:52 - 3:57
    हे खालचं सर्व खोडायचं आहे.
  • 3:57 - 4:00
    मी हे सर्व आधी एका बाजूला करून ठेवायला हवं होतं
  • 4:00 - 4:03
    आणि मला पुन्हा जाऊन खोडावं नसतं लागलं.
  • 4:03 - 4:06
    आणि मला पुन्हा एकदा जे काय मी करत होतो तिथे जावू देत.
  • 4:06 - 4:09
    तर मी जेव्हा त्यात चार वेळा गेलो तेव्हा बाकी खूप जास्तं उरत होती,
  • 4:09 - 4:13
    म्हणून आता पाच वापरून पाहू देत.
  • 4:13 - 4:18
    आठा पंचे चाळीस.
  • 4:18 - 4:19
    बे पंचे दहा.
  • 4:19 - 4:23
    अधिक चार चवदा.
  • 4:23 - 4:26
    एकशे बेचाळीस वजा एकशे चाळीस म्हणजे दोन.
  • 4:26 - 4:26
    चांगलंय!
  • 4:26 - 4:28
    दोन हा अठ्ठावीसपेक्षा लहान आहे.
  • 4:28 - 4:30
    हे पाच बरोबर आहेत.
  • 4:30 - 4:33
    आता मी फक्त आठ खाली आणले.
  • 4:33 - 4:37
    अठ्ठावीस हे अठ्ठावीसमध्ये फक्त एकदाच जातात.
  • 4:37 - 4:41
    अठ्ठावीस एके अठ्ठावीस,
  • 4:41 - 4:42
    बाकी शून्य आहे. झाले!
  • 4:42 - 4:50
    म्हणून अठ्ठावीस हे दोन हजार तीनशे ब्यांशी पूर्णांक आठ मध्ये पंच्यांशी पूर्णांक एक वेळा जातात.
  • 4:50 - 5:04
    किंवा तुम्ही म्हणू शकता, शून्य पूर्णांक अठ्ठावीस हे तेवीस पूर्णांक आठशे अठ्ठावीसमध्ये, पंच्यांशी पूर्णांक एक वेळा जातात.
  • 5:04 - 5:05
    हे उत्तर आपल्याला मिळालं आहे.
  • 5:05 - 5:07
    आणि हे समंजस आहे.
  • 5:07 - 5:08
    वास्तविकता पडताळणे हे नेहमीच चांगले.
  • 9:12 - 9:13
    त्यानुसार त्यांची तडजोड करा.
  • 9:16 - 9:18
    तुम्हाला जरासा अंदाज बांधावाच लागेल.
  • 9:21 - 9:26
    तर जाऊद्यात, मला वाटतं कि तुम्ही दशमान भागाकाराच्या उदाहरणांसाठी तयार आहात.
  • 9:26 - 9:27
    मी आशा करतो तुम्हाला मजा येईल.
Title:
Dividing decimal
Description:

Dividing decimal numbers

more » « less
Video Language:
English
Duration:
09:27
prathameshcena edited Marathi subtitles for Dividing decimal
prathameshcena added a translation

Marathi subtitles

Incomplete

Revisions