खुल्या जागा वातानुकूलित कशा कराव्यात?
-
0:01 - 0:02गुड इव्हिनिंग.
-
0:02 - 0:04इथे आपण या सुरेख, खुल्या
-
0:04 - 0:06अँफीथिएटर मध्ये
-
0:06 - 0:08संध्याकाळच्या
-
0:08 - 0:10सुखद हवेचा
-
0:10 - 0:11आनंद घेत आहोत.
-
0:11 - 0:15पण १० वर्षांनंतर
-
0:15 - 0:17कतार मध्ये जेव्हा
-
0:17 - 0:19फुटबॉल विश्व् करंडक सामने होतील,
-
0:19 - 0:20२०२२ मध्ये,
-
0:20 - 0:21आम्हाला ठाऊक आहे, की
-
0:21 - 0:25तेव्हा खूप खूप ऊन आणि उकाडा असेल.
-
0:25 - 0:27जून आणि जुलै महिन्यांतला कडक उन्हाळा.
-
0:27 - 0:30विश्व् करंडकासाठी जेव्हा
-
0:30 - 0:31कतारची निवड झाली ,
-
0:31 - 0:33तेव्हा जगभरातल्या
-
0:33 - 0:35अनेक लोकांना प्रश्न पडला,
-
0:35 - 0:37या वाळवंटी हवामानात,
-
0:37 - 0:39खेळाडू आपला नेत्रदीपक खेळ
-
0:39 - 0:40कसा खेळणार?
-
0:40 - 0:42इतक्या उकाड्यात,
-
0:42 - 0:45प्रेक्षक खुल्या मैदानांत बसून
-
0:45 - 0:48खेळाचा आनंद कसा लुटणार?
-
0:48 - 0:51हे शक्य आहे का?
-
0:51 - 0:52अल्बर्ट स्पियर अँड पार्टनर
-
0:52 - 0:54यांच्या आर्किटेक्ट्स बरोबर,
-
0:54 - 0:56ट्रान्ससोलर मधले आमचे इंजिनियर्स
-
0:56 - 0:58खुले स्टेडियम्स उभारताहेत.
-
0:58 - 1:02तिथली हवा थंड ठेवण्यासाठी
-
1:02 - 1:06१०० टक्के सौरशक्ती वापरण्यात येत आहे.
-
1:06 - 1:08मी त्याविषयी बोलणार आहे,
-
1:08 - 1:09पण आधी आरामापासून सुरुवात करू.
-
1:09 - 1:11आरामशीर
-
1:11 - 1:12म्हणजे काय ते आधी पाहू.
-
1:12 - 1:15अनेक लोक भोवतालचं तापमान
-
1:15 - 1:17आणि सुखद हवामान
-
1:17 - 1:19यात गल्लत करतात.
-
1:19 - 1:21हे असे तक्ते आम्ही नेहमी पाहतो,
-
1:21 - 1:23आणि ही लाल रेषा दिसते आहे,
-
1:23 - 1:24ती जून आणि जुलै मधलं
-
1:24 - 1:26तापमान दाखवते.
आणि हो, खरंच, -
1:26 - 1:28ते ४५ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचलं आहे.
-
1:28 - 1:31खरंच खूप उकाडा आहे.
-
1:31 - 1:33पण केवळ हवेचं तापमान
हा एकच निकष वापरून, -
1:33 - 1:35ती किती सुखद आहे,
-
1:35 - 1:37हे ठरवता येत नाही.
-
1:37 - 1:39माझ्या एका सहकाऱ्याने केलेलं
-
1:39 - 1:43विश्लेषण तुम्हाला दाखवतो.
-
1:43 - 1:45त्याने जगभरातले अनेक फुटबॉल विश्व् करंडक,
-
1:45 - 1:47ऑलिम्पिक सामने विचारात घेतले.
-
1:47 - 1:48तिथल्या
-
1:48 - 1:50प्रेक्षकांना जाणवलेला
-
1:50 - 1:53हवेचा सुखदपणा पाहिला
-
1:53 - 1:54आणि त्याचं विश्लेषण केलं.
-
1:54 - 1:56आपण मेक्सिकोपासून सुरुवात करू.
-
1:56 - 1:58मेक्सिकोतलं तापमान,
-
1:58 - 1:59हवेचं उष्णतामान,
-
1:59 - 2:02साधारण १५ ते ३० डिग्री सेल्सियस
पर्यंत असे -
2:02 - 2:04आणि लोक मजेत असत.
-
2:04 - 2:06मेक्सिको सिटीतला सामना
-
2:06 - 2:08लोकांनी आरामात पाहिला.
हा पहा. -
2:08 - 2:11ओरलँडो.
तशाच प्रकारचं -
2:11 - 2:13खुलं स्टेडियम.
-
2:13 - 2:16लोक तळपत्या उन्हात बसले होते.
-
2:16 - 2:18भरदुपारी, अत्यंत दमट हवेत.
-
2:18 - 2:19ते आरामात बसून
-
2:19 - 2:21सामन्याचा आनंद लुटू शकले नाहीत.
-
2:21 - 2:23या सामन्यांच्या वेळी तापमान जास्त नव्हतं,
-
2:23 - 2:26पण तरीही तिथे आरामात बसता येत नव्हतं.
-
2:26 - 2:27आणि सेऊल?
-
2:27 - 2:30प्रक्षेपण हक्कांच्या सोयीसाठी
-
2:30 - 2:31तिथले सगळे सामने
-
2:31 - 2:33संध्याकाळी उशिरा सुरु होत.
-
2:33 - 2:35सूर्यास्त होऊन गेलेला असल्याने
-
2:35 - 2:38त्यावेळची हवा सुखद वाटे.
-
2:38 - 2:41अथेन्समध्ये काय झालं?
-
2:41 - 2:43भूमध्य प्रदेशातलं हवामान.
-
2:43 - 2:46पण त्या उन्हात हवा आरामदायी भासली नाही.
-
2:46 - 2:47आणि स्पेन मुळे आपण जाणतो,
-
2:47 - 2:50"ऊन आणि सावली".
-
2:50 - 2:52सावलीतलं तिकीट हवं असेल,
-
2:52 - 2:54तर जास्त किंमत द्यावी लागते.
-
2:54 - 2:56कारण तिथली हवा
-
2:56 - 3:00जास्त आरामदायी असते.
-
3:00 - 3:01आणि बीजिंग?
-
3:01 - 3:03पुन्हा, दिवसभर ऊन
-
3:03 - 3:05आणि अतिशय दमट.
-
3:05 - 3:06आणि ते आरामदायी नव्हतं.
-
3:06 - 3:08जर मी हे सगळं एकत्र आणलं,
-
3:08 - 3:09आणि तुम्ही सगळी माहिती एकत्र पाहिली
-
3:09 - 3:11तर असं दिसेल, की
-
3:11 - 3:14हवेचं तापमान साधारण
-
3:14 - 3:17२५ ते ३५ च्या दरम्यान होतं.
-
3:17 - 3:19आणि जर तुम्ही
-
3:19 - 3:22३० डिग्री सेल्सियसची
-
3:22 - 3:24रेषा पाहिली, तर
-
3:24 - 3:25त्या रेषेवर
-
3:25 - 3:28खुल्या वातावरणातली
-
3:28 - 3:30हवा सुखद भासण्याचे
-
3:30 - 3:32सर्व प्रकार दिसतील.
-
3:32 - 3:33अत्यंत सुखद हवेपासून
-
3:33 - 3:35अगदी खराब हवेपर्यंत.
-
3:35 - 3:38तर असं का?
-
3:38 - 3:39कारण,
-
3:39 - 3:41हवा सुखद भासते ती
-
3:41 - 3:43अनेक घटकांच्या प्रभावामुळे.
-
3:43 - 3:46पहिला घटक आहे सूर्य.
-
3:46 - 3:48प्रत्यक्ष सूर्यप्रकाश आणि ऊन.
-
3:48 - 3:51दुसरा घटक, वारा.
मंद वारा, जोराचा वारा. -
3:51 - 3:53तिसरा घटक, हवेची आर्द्रता.
-
3:53 - 3:55चौथा घटक, सभोवतालच्या वातावरणातून
-
3:55 - 3:58प्रसारित होणारं तापमान.
-
3:58 - 3:59आणि हे आहे हवेचं तापमान.
-
3:59 - 4:00आपल्या शरीराला
-
4:00 - 4:02वाटण्याऱ्या सुखद भावनेवर
-
4:02 - 4:04या सगळ्या घटकांचा परिणाम होतो.
-
4:04 - 4:06शास्त्रज्ञांनी एक घटक निर्माण केला आहे,
-
4:06 - 4:08जाणवणारे तापमान.
-
4:08 - 4:10यात हे सर्व घटक येतात.
-
4:10 - 4:12आणि त्यामुळे रचनाकारांना समजतं,
-
4:12 - 4:15की यापैकी
-
4:15 - 4:17नेमक्या कोणत्या घटकामुळे
-
4:17 - 4:19हवा सुखद वाटली
-
4:19 - 4:20किंवा खराब वाटली.
-
4:20 - 4:22नेमका कोणता घटक
-
4:22 - 4:23"जाणवणारे तापमान" ठरवतो?
-
4:23 - 4:26आणि हे हवामानविषयक घटक
-
4:26 - 4:28मानवी चयापचयाशी
-
4:28 - 4:32निगडित आहेत.
-
4:32 - 4:34आपल्या चयापचयामुळे
-
4:34 - 4:36आपण
-
4:36 - 4:38उष्णता निर्माण करतो.
-
4:38 - 4:39मी इथे उत्साहित अवस्थेत आहे,
-
4:39 - 4:41तुमच्याशी बोलतो आहे.
या क्षणी -
4:41 - 4:42मी साधारण १५० वँट
-
4:42 - 4:43निर्माण करत असेन.
-
4:43 - 4:45तुम्ही शांत बसून
मला बघत आहात. -
4:45 - 4:46तुम्ही प्रत्येकी
-
4:46 - 4:48१०० वँट निर्माण करत असाल.
-
4:48 - 4:50ही ऊर्जा शरीरापासून दूर न्यायला हवी.
-
4:50 - 4:52ती तशी दूर नेणं,
-
4:52 - 4:53ही शारीरिक गरज आहे.
-
4:53 - 4:55ती दूर नेणं जेवढं जास्त कठीण होईल,
-
4:55 - 4:57तेवढा शरीराला वाटणारा
-
4:57 - 5:00आराम कमी होईल.
-
5:00 - 5:02आणि ही ऊर्जा जर
शरीरापासून दूर -
5:02 - 5:03गेलीच नाही,
-
5:03 - 5:05तर मरण ओढवेल.
-
5:05 - 5:09फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी काय घडतं ते
-
5:09 - 5:11आपण जर एकत्रितरीत्या पाहिलं,
-
5:11 - 5:13तर, जून आणि जुलै महिन्यात काय घडेल
-
5:13 - 5:14ते आपण पाहू शकू.
-
5:14 - 5:16हवेचं तापमान बरंच जास्त असेल.
-
5:16 - 5:17पण खेळ आणि सामने
-
5:17 - 5:20दुपारी असतील.
-
5:20 - 5:22त्यामुळे तिथली हवा,
-
5:22 - 5:23खराब ठरवल्या गेलेल्या
-
5:23 - 5:25इतर ठिकाणच्या
-
5:25 - 5:27हवेसारखीच असेल.
-
5:27 - 5:29म्हणून आम्ही एका टीमबरोबर बसून
-
5:29 - 5:31एक ध्येय ठरवलं.
-
5:31 - 5:34खुल्या मैदानात
-
5:34 - 5:36हवेचं उष्णतामान
-
5:36 - 5:38३२ डिग्री सेल्सियस असताना
-
5:38 - 5:40जे शक्य असेल त्यापैकी
-
5:40 - 5:43सर्वाधिक आरामदायी
-
5:43 - 5:45वाटणारं तापमान
-
5:45 - 5:47मिळवण्याचं ध्येय.
-
5:47 - 5:50खुल्या मोकळ्या वातावरणात
-
5:50 - 5:52लोकांना खरंच खूप छान वाटेल.
-
5:52 - 5:54पण याचा अर्थ काय?
-
5:54 - 5:56इथे नुसतं पहा,
-
5:56 - 5:58तापमान खूप जास्त आहे.
-
5:58 - 6:01कितीही चांगली स्थापत्यशास्त्रीय किंवा
-
6:01 - 6:02हवामानशास्त्रीय रचना वापरली
-
6:02 - 6:04तरीही फारसा फरक पडणार नाही.
-
6:04 - 6:07म्हणजे आपल्याला काहीतरी क्रिया
घडवून आणली पाहिजे. -
6:07 - 6:09उदाहरणार्थ, आपल्याला
-
6:09 - 6:11रेडियन्ट कूलिंग टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे.
-
6:11 - 6:13आणि ती तथाकथित सॉफ्ट कँडीशनिंग
-
6:13 - 6:15बरोबर वापरली पाहिजे.
-
6:15 - 6:16तर स्टेडियम मध्ये हे कसं असेल?
-
6:16 - 6:19स्टेडियम मध्ये खुल्या हवेतला
-
6:19 - 6:20आरामशीरपणा वाढवणारे
-
6:20 - 6:22काही घटक असतील.
-
6:22 - 6:24पहिला घटक, सावली.
-
6:24 - 6:26दुसरा घटक,
-
6:26 - 6:28जोरदार गरम वाऱ्यापासून
-
6:28 - 6:29संरक्षण.
-
6:29 - 6:31पण इतकं पुरणार नाही.
-
6:31 - 6:34आपल्याला काहीतरी क्रिया
-
6:34 - 6:36घडवून आणली पाहिजे.
-
6:36 - 6:38थंड वाऱ्याचा झंझावात
-
6:38 - 6:41स्टेडियममध्ये सोडण्याऐवजी
-
6:41 - 6:42आपण उष्णता दूर नेणारं
-
6:42 - 6:44तंत्रज्ञान वापरू शकतो.
-
6:44 - 6:47जमीन गरम ठेवण्यासाठी जसे
-
6:47 - 6:49जमिनीत गाडलेले पाण्याचे पाईप्स वापरतात,
तसंच. -
6:49 - 6:51केवळ त्या पाईप्स मधून थंड पाणी सोडून,
-
6:51 - 6:52त्यातून दिवसभरात
-
6:52 - 6:54स्टेडियममध्ये शोषली गेलेली
-
6:54 - 6:56उष्णता आपण बाहेर टाकू शकतो.
-
6:56 - 6:57अशा रीतीने आपण तिथली
-
6:57 - 6:59हवा आरामदायी बनवू शकतो.
-
6:59 - 7:02आणि मग थंड नव्हे,
-
7:02 - 7:04तर कोरडी हवा तिथे सोडल्यावर,
-
7:04 - 7:06प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडूला
-
7:06 - 7:08आपापल्या आवडीनुसार
-
7:08 - 7:10आणि ऊर्जेच्या पातळीनुसार
-
7:10 - 7:12हवा सुखद वाटेल.
-
7:12 - 7:13ते त्या वातावरणाला सरावतील
-
7:13 - 7:16आणि आराम अनुभवतील.
-
7:16 - 7:20साधारण १२ स्टेडियम्स
-
7:20 - 7:22बनणार आहेत.
-
7:22 - 7:25आणि ३२ प्रशिक्षण खेळपट्ट्या,
-
7:25 - 7:26जिथे सर्व सहभागी देश
-
7:26 - 7:27प्रशिक्षण घेतील.
-
7:27 - 7:29आम्ही हीच मूळ कल्पना वापरली.
-
7:29 - 7:32प्रशिक्षण खेळपट्टीवर सावली,
-
7:32 - 7:34वाऱ्यापासून बचाव,
-
7:34 - 7:36आणि हिरवळीचा वापर.
-
7:36 - 7:39नैसर्गिकरीत्या पाणी दिलेली हिरवळ,
-
7:39 - 7:40हा उत्तम थंड करणारा घटक आहे.
-
7:40 - 7:42तर, तापमान स्थिर ठेवणे
-
7:42 - 7:43आणि कोरडी हवा तिथे सोडणे,
-
7:43 - 7:45यामुळे हवा सुखद होईल.
-
7:45 - 7:48पण निष्क्रीय रचना उत्तम असली,
-
7:48 - 7:49तरी निरुपयोगी.
-
7:49 - 7:50सक्रिय रचना हवी.
-
7:50 - 7:51आणि हे कसं करायचं?
-
7:51 - 7:54आमची कल्पना होती,
-
7:54 - 7:55१००% सौरशक्तीने हवा थंड करण्याची.
-
7:55 - 7:57त्यामागची कल्पना होती,
-
7:57 - 7:59स्टेडियम्सची छपरं
-
7:59 - 8:01पीव्ही सिस्टिम्सनी
-
8:01 - 8:03झाकून टाकण्याची.
-
8:03 - 8:05आम्ही भूतकाळात बनवलेली ऊर्जा
-
8:05 - 8:07वापरणार नाही.
-
8:07 - 8:08आम्ही खनिज ऊर्जा वापरणार नाही.
-
8:08 - 8:10आमच्या शेजारी देशांची ऊर्जा
-
8:10 - 8:11उधार घेणार नाही.
-
8:11 - 8:13आम्ही तीच ऊर्जा वापरू,
-
8:13 - 8:16जी छपरावर निर्माण करता येईल.
-
8:16 - 8:18आणि प्रशिक्षण खेळपट्टयांवरही,
-
8:18 - 8:21त्यांवर मोठे लवचिक पापुद्रे पसरून.
-
8:21 - 8:23पुढील काही वर्षांत
-
8:23 - 8:24हा उद्योग फोफावेल.
-
8:24 - 8:26लवचिक फोटोव्होल्टाइक्सचा
-
8:26 - 8:27प्रखर उन्हात सावली देण्याची
-
8:27 - 8:29आणि त्याचवेळी
-
8:29 - 8:31विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची
-
8:31 - 8:33शक्यता असणारा.
-
8:33 - 8:35ही ऊर्जा वर्षभर निर्माण होईल
-
8:35 - 8:36आणि ती विजेच्या ग्रिडमध्ये
-
8:36 - 8:38पाठवली जाईल.
-
8:38 - 8:40ग्रिडमधला खनिज वापर
-
8:40 - 8:42ती कमी करेल.
-
8:42 - 8:45जेव्हा हवा थंड करण्यासाठी
-
8:45 - 8:47ऊर्जेची गरज भासेल,
-
8:47 - 8:49तेव्हा आम्ही ती ग्रिडमधून घेऊ.
-
8:49 - 8:51जी सौर ऊर्जा आम्ही
ग्रिडमध्ये पाठवली होती, -
8:51 - 8:53तीच आम्ही गरजेनुसार
-
8:53 - 8:53परत घेऊ.
-
8:53 - 8:55हे आम्ही पहिल्याच वर्षात
-
8:55 - 8:56करू शकतो. आणि
-
8:56 - 8:57पुढल्या १० वर्षांत
-
8:57 - 8:59आम्ही त्याचं संतुलन करू शकतो.
-
8:59 - 9:02आणि विश्वचषक स्पर्धा पार पाडण्यास
-
9:02 - 9:03गरजेची अशी ही ऊर्जा
-
9:03 - 9:05त्यापुढली २० वर्षं
-
9:05 - 9:08कतारच्या ग्रिड मध्ये पाठवली जाईल.
-
9:08 - 9:09(टाळ्या)
-
9:09 - 9:10खूप धन्यवाद. (टाळ्या)
-
9:10 - 9:13हे काही फक्त स्टेडियम्ससाठीच नव्हे.
-
9:13 - 9:15हे आपण खुल्या जागी
-
9:15 - 9:17आणि रस्त्यांसाठी सुद्धा वापरू शकतो.
-
9:17 - 9:18आम्ही मसदरमध्ये
-
9:18 - 9:20"भविष्यातलं शहर" घडवत आहोत.
-
9:20 - 9:21ते आहे संयुक्त अमिरातींमध्ये,
-
9:21 - 9:22अबु धाबी येथे.
तिथल्या -
9:22 - 9:24मध्यवर्ती संकुलावर काम करण्याचा
-
9:24 - 9:26आनंद मला लाभला.
-
9:26 - 9:28तिथेही हीच कल्पना वापरली.
-
9:28 - 9:29खुल्या हवेत
-
9:29 - 9:30आरामदायी वाटणारं
-
9:30 - 9:32वातावरण निर्माण केलं.
-
9:32 - 9:34लोक तिथे जास्त खूष असतात.
-
9:34 - 9:36थंड हवा सोडून
गारेगार केलेल्या -
9:36 - 9:37मॉलपेक्षाही जास्त.
-
9:37 - 9:39आम्हाला एक खुली जागा बनवायची होती,
-
9:39 - 9:41इतकी आरामदायी,
-
9:41 - 9:42की जिथे लोक
-
9:42 - 9:44भरदुपारी जातील,
-
9:44 - 9:46अगदी कडक उन्हाळ्यातसुद्धा,
-
9:46 - 9:48आणि आपल्या कुटुंबासहित
-
9:48 - 9:50तिथे मजा करतील.
-
9:50 - 9:51(टाळ्या )
-
9:51 - 9:53तीच कल्पना:
-
9:53 - 9:54उन्हापासून सावली,
-
9:54 - 9:55वाऱ्यापासून रक्षण,
-
9:55 - 9:59आणि सौरशक्तीचा वापर.
-
9:59 - 10:02सौरशक्ती वापरून आपल्या
ऊर्जेच्या वापराची -
10:02 - 10:03भरपाई.
-
10:03 - 10:05आणि या सुरेख छत्र्या.
-
10:05 - 10:09तर मी सुचवतो,
-
10:09 - 10:12की आज रात्री आणि उद्या
-
10:12 - 10:13आपल्याला भोवतालची हवा
-
10:13 - 10:14किती सुखद वाटते,
-
10:14 - 10:17याकडे लक्ष द्या.
-
10:17 - 10:19जास्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला
-
10:19 - 10:20भेट द्यायचं
-
10:20 - 10:21मी आपल्याला आमंत्रण देतो.
-
10:21 - 10:23जाणवणारे तापमान मोजण्यासाठी
-
10:23 - 10:26आम्ही एक सुलभ कॅलक्युलेटर अपलोड केला आहे.
-
10:26 - 10:27त्यामुळे खुली हवा
-
10:27 - 10:28किती सुखद आहे ते मोजता येईल.
-
10:28 - 10:31मला आशा वाटते,
की तुम्ही आमची कल्पना -
10:31 - 10:33इतरांना सांगाल.
-
10:33 - 10:35जर इंजिनियर्स आणि रचनाकारांनी
-
10:35 - 10:36हवामानशास्त्रातले
-
10:36 - 10:38हे सगळे घटक वापरले,
-
10:38 - 10:41तर खरोखरच खुल्या जागेतली हवा
-
10:41 - 10:44सुखद आणि आरामदायी करणं शक्य होईल.
-
10:44 - 10:46तसंच खुल्या जागेत
-
10:46 - 10:49शरीराला जाणवणारं
-
10:49 - 10:51तापमान बदलता येईल.
-
10:51 - 10:53हे सर्व
-
10:53 - 10:55एखादी उत्तम
-
10:55 - 10:57निष्क्रीय रचना
-
10:57 - 11:00वापरून करता येईल,
-
11:00 - 11:03तसंच कतारचा ऊर्जास्रोत वापरूनही.
-
11:03 - 11:04म्हणजेच सूर्य.
-
11:04 - 11:06(टाळ्या)
-
11:06 - 11:08खूप खूप धन्यवाद. (टाळ्या)
-
11:08 - 11:11शुक्रन.(टाळ्या)
- Title:
- खुल्या जागा वातानुकूलित कशा कराव्यात?
- Speaker:
- वुल्फगँग केसलिंग
- Description:
-
कडक उन्हाळ्याच्या महिन्यांत, खुल्या जागेत एखादा खेळाचा सामना पाहणं किंवा एखादी मैफिल ऐकणं म्हणजे जणु उन्हात भाजून हैराण होणं. त्यावर तोडगा आहे. दोहा मधल्या टेड एक्स संमेलनात, भौतिकशास्त्रज्ञ वुल्फगँग केसलिंग सांगताहेत, नवनिर्मित स्वयंपोषी रचनांबद्दल. त्या वापरून आपण वरून आणि खालून हवा थंड करू शकतो, शिवाय भविष्यात वापरण्यासाठी सौरऊर्जा साठवू शकतो.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 11:35
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for How to air-condition outdoor spaces |