< Return to Video

If/Else with the Bee in Code Studio

  • 0:05 - 0:11
    आपल्याकडं नवा ब्लॉक आहे, त्याचं नाव आहे if/else ब्लॉक. तुम्ही आधी कोड्यांमध्ये वापरलेल्या कंडीशनल
  • 0:11 - 0:16
    स्टेटमेंटप्रमाणं हे कंडीशनल स्टेटमेंट आहे. पण else असा दुसरा ब्लॉक खाली आहे.
  • 0:16 - 0:23
    if/else ब्लॉक्समुळे मधमाशीला दोन
    कृतींच्या संचांपैकी एक निर्णय घेता येतो.
  • 0:23 - 0:28
    जर मधमाशी फुलाजवळ असेल तर तुम्ही पहिल्या भागात लिहिलेल्या कृती करेल.
  • 0:28 - 0:34
    जर मधमाशी फुलाजवळ नसेल तर तुम्ही else
  • 0:34 - 0:42
    ब्लॉकमध्ये लिहिलेल्या कृती ती करेल. if स्टेटमेंटमुळे
    कॉम्प्युटर्सना निर्णय घेता येतात.
  • 0:42 - 0:47
    माणूस कॉम्प्युटरसाठी कंडीशन्स तयार करतो की
    जर कॉम्प्युटरला एखादी विशिष्ट स्थिती दिली
  • 0:47 - 0:55
    तर हे कर, नाहीतर ते कर. आपल्या if/else
    ब्लॉकच्या वर
  • 0:55 - 1:02
    जर फुलाजवळ असेल तर असे लिहिले आहे. पण आपल्या ब्लॉकच्या वर इतरही काही लिहिता येईल
  • 1:02 - 1:08
    म्हणजे जर मधुरस 2 असेल किंवा जर पुढे रस्ता असेल, तर आपला ब्लॉक एकाप्रकारे वागेल. जर वरचे if स्टेटमेंट
  • 1:08 - 1:13
    खरे असेल तर ते कृतींचा पहिला संच करेल. पण जर वरचे if स्टेटमेंट खोटे असेल तर
  • 1:13 - 1:16
    ते कृतींचा दुसरा संच करेल.
Title:
If/Else with the Bee in Code Studio
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:18

Marathi subtitles

Revisions