सामाजिक परताव्याने कर्ज फेडण्यामुळे समाजाचा कसा विकास होतो।
-
0:01 - 0:03माझा आवडता आफ्रिका
खंड कोणत्या आव्हानांना -
0:03 - 0:08सामोरा जात आहे ते तुमच्यापैकी
बऱ्याचना माहिती असेल -
0:08 - 0:11खूप माणसे गरीब आहेत.
-
0:11 - 0:14लाखो मुलींना शाळेत जाता येत नाही।
-
0:14 - 0:18वेगाने वाढणारया लोकसंख्येसाठी
पुरेसे कामधंदे नाहीत. -
0:19 - 0:21दररोज,
-
0:21 - 0:25३३००० नवीन तरुण माणसांची
नोकरी शोधणार्यांमधे भर पडते,म्हणजे -
0:25 - 0:29३ दशलक्ष ओउपाचारिक नोकर्या
आणि १२ दशलक्ष उमेदवार -
0:29 - 0:31सहारा उप-प्रदेश? आफ्रिका इथे,
-
0:31 - 0:37चारपैकी एकापेक्षा कमी तरुणाला
मोबदला असलेले काम मिळू शकते. -
0:37 - 0:39खात्रीचे उदरनिर्वाहाचे
साधन मिळण्याची संधी -
0:39 - 0:43ह्या गरीब आणि खेड्यातल्या
तरुणींसाठी अजूनच कमी असतात. -
0:43 - 0:46त्यांना शिक्षण घेणे परवडत नाही।
-
0:46 - 0:51आणि त्यांना पुरुषांइतक्या
रोजगार, कर्ज किंवा जमीन -
0:51 - 0:52असण्याच्या संधी नसतात.
-
0:52 - 0:55त्यामुळे सर्वच समाज दारिदर्य,
विषमता आणि निराशेच्या -
0:55 - 0:59दुष्टचक्रात अडकलेला रहातो.
-
1:00 - 1:04पण मी इथे हे दुःख आणि
दैन्यावस्था सांगायला आले नाही, -
1:04 - 1:07कारण आपल्याला माहिती आहे
की तरुण माणसे म्हणजे -
1:07 - 1:10आर्थिक वाढ आणि
जागतिक आव्हाने सोडवण्याची -
1:10 - 1:12उत्तम संधी असते.
-
1:12 - 1:14आणि खरंच,
-
1:14 - 1:19आफ्रिकेमधे शिकलेल्या तरुणींमधे
असा उपक्रम/चळवळ वाढतो आहे, जिथे -
1:19 - 1:23त्या पुढे येत आहेत आणि त्यांच्या
गटाची ताकद आणि आम्ही ज्याला -
1:23 - 1:25सामाजिक परतावा म्हणतो
ते साधन वापरुन समाजाची -
1:25 - 1:27उन्नती करत आहेत.
-
1:27 - 1:32ह्या उपक्रमाच्या पाठीशी असलेल्या
संस्थेची एक नेता मी आहे. -
1:32 - 1:37ह्यांनी माझ्या शिक्षणाला आधार दिला
सामाजिक परतावा केल्याने -
1:37 - 1:44आमच्या कामाचा परीणाम
अनेकपटीने वाढलेला मी पाहिला. -
1:44 - 1:48सामाजिक परतावा म्हणजे
कर्जावरचे व्याज पैशांऐवजी -
1:48 - 1:51सेवेने परत करण्याची एक पद्धत आहे.
-
1:51 - 1:53ह्यात वेळ आणि द्न्यान देऊन
मार्गदर्शन केले जाते, -
1:53 - 1:55शिक्षणात मदत केली जाते,
-
1:55 - 1:57गरज असलेल्यांना
धंद्याचे प्रशिक्षण देतात. -
1:57 - 2:03याचा अर्थ कर्जाचा परिणाम एकावर
नाही तर अनेक जणांवर होतो. -
2:04 - 2:05ह्या पद्धतीमुळे,
-
2:05 - 2:09आम्ही जास्त जास्त मुलींना
शाळेत पाठवत आहोत, -
2:09 - 2:11त्यांना शिकत असताना
आधार देत आहोत, -
2:11 - 2:13त्यांना धंदा सुरु
करण्यासाठी मदत करतोय -
2:13 - 2:17समाजाचे नेत्रुत्व
करण्यासाठीही मदत करतोय, -
2:17 - 2:21आणि हे सर्व पुढच्या पिढीला
आर्थिक मदत करतानाच. -
2:21 - 2:23सामाजिक परतावा
कोणत्याही कामाला -
2:23 - 2:28मोठी प्रेरणा देण्यासाठी वापरता येते,
जिथे फायदे पुढे जातच रहातात? -
2:28 - 2:30मला एक उदाहरण सांगू द्या,
-
2:30 - 2:33ही ग्रामीण टांझानियामधली
स्तुमाई आहे, -
2:33 - 2:37ती फक्त तीन वर्षांची
असतानाच तिचे वडील वारले। -
2:37 - 2:40त्यांच्या मागे,तिला आणि
पाच भावंडांना वाढवायला -
2:40 - 2:42तिची अपंग आई एकटीच उरली.
-
2:42 - 2:44जेव्हा स्तुमाईने प्राथमिक
शिक्षण पूर्ण केले, -
2:44 - 2:47तेव्हा तिचे शाळा शिकणे
जवळजवळ थांबतच होते -
2:47 - 2:52आणि ती उप-सहारा मधील
९२ टक्के मुलींमधली एक होणार होती -
2:52 - 2:54ज्या हायस्कूल कधीच पूर्ण करत नाहीत.
-
2:54 - 2:56पण तिचे नशीब चांगले होते.
-
2:56 - 2:59तिला एक अशी संस्था भेटली
ज्यांनी तिची फी भरली आणि -
2:59 - 3:01तिचे शाळा शिकणे सुरु ठेवले.
-
3:01 - 3:03पण हायस्कूलमधून पास झाल्यावर,
-
3:03 - 3:07पुढे काय याचे छाती दडपून
टाकणारे आव्हान उभे राहिले. -
3:07 - 3:10तिला माहित होते की जगण्यासाठी
स्वत:चा उद्योग सुरु करायला हवा. -
3:10 - 3:12आणि तिच्या आईला
मदत करायला हवी, -
3:12 - 3:15जिने तिची शाळा सुरु ठेवायला
प्रचंड कष्ट घेतले होते -
3:15 - 3:17अगदी तिची शेवटची मालमत्ता म्हणजे
-
3:17 - 3:20घड्या असलेले अनेक, पत्रे विकले,
जे ती मुलांसाठी कधीतरी -
3:20 - 3:24चांगले घर बांधण्याच्या आशेने
साठवत आली होती. -
3:24 - 3:28स्तुमाईला हेही माहित होते की तिला
पारंपरिक बेंकेतून कर्ज मिळणार नाही, -
3:28 - 3:31जे तिच्यासारख्या गावातल्या
तरुण बाईला, जमीन व मालमत्ता -
3:31 - 3:36नसल्यामुळे बेंक व्यवहार
करायला अपात्र समजतात. -
3:36 - 3:39कर्ज देणार्या भागीदारांच्या
एका विषेश गटाच्या मदतीने -
3:39 - 3:42तिने एक खाद्यपदार्थाचे दुकान सुरु
करायला ३५० डोलर मिळवले, -
3:42 - 3:47तिथे भाज्या, तेल, तांदूळ, टोमेटो,
कांदे आणि शेंगा विकायला ठेवल्या। -
3:47 - 3:50तिच्या गटातल्या लोकांनी तिला धंद्याची
कोउशल्ये शिकायला मदत केली, -
3:50 - 3:52जसे उद्योगाचे नियोजन करणे,
-
3:52 - 3:55नफ्याचा हिशोब, विक्रीची कला,
-
3:55 - 3:56धंद्याच्या नोंदी ठेवणे,
-
3:56 - 3:58आणि बचतीचे महत्व.
-
3:58 - 4:00आणि तिचा उद्योग जोरात सुरु झाला।
-
4:00 - 4:04तिने आठ महिन्यात मूळच्या
कर्जाची परतफेड केली, -
4:04 - 4:06आणि नंतर २००० डोलर कर्ज घेउन
-
4:06 - 4:11मोटारसायकल टेक्सी आणि
कुरियर उद्योग सुरु केला. -
4:11 - 4:14आता स्तुमाईकडे दोन
मोटारसायकली आहेत -
4:14 - 4:17आणि दोन माणसे नोकरीला आहेत.
-
4:17 - 4:20तिला आता जमीन घेऊन
घरही बांधता आले आहे, -
4:20 - 4:22तिचा उद्योगही वाढत आहे।
-
4:22 - 4:25अधिकाधीक मजबूत होत आहे.
-
4:25 - 4:30स्तुमाईने तिचे व्याज
सामाजिक परताव्याने फेडले. -
4:30 - 4:32स्थानिक शाळेतल्या
मुलींना मदत करुन -
4:32 - 4:36तिने सामाजिक परतावा केला.
-
4:36 - 4:40तिने दर आठवड्याला
शिक्षण-मदतनीसाचे काम केले. -
4:40 - 4:43ती जगण्याची कोउशल्ये, आणि
आरोग्य यांचा अभ्यासक्रम घेत होती -
4:43 - 4:47त्यामुळे मुलांना बरीच मदत होते -
आत्मविश्वासाने प्रश्न विचारायला, -
4:47 - 4:49एकमेकांना आधार द्यायला,
आणि काळजी घ्यायला, -
4:49 - 4:51आरोग्य व आहाराबद्दल शिकायला,
-
4:51 - 4:54आणि आपले ध्येय
ठरवून ते गाठायला। -
4:54 - 5:00स्तुमाई म्हणते, तिच्या मार्गदर्शनामुळे
मुली स्वतःवर आणि यशस्वी होण्यावर -
5:00 - 5:03विश्वास ठेवू लागतात हे
तिचे सर्वात मोठे बक्षिस आहे. -
5:03 - 5:07हल्ली स्तुमाई इतर शिक्षण
मार्गदर्शकांनाही मार्गदर्शन करते. -
5:07 - 5:11त्यामुळे तिच्याप्रमाणे शाळा शिकलेल्या
आणि सुरक्षित उपजिवीका करणार्या -
5:11 - 5:15मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.
-
5:15 - 5:18तिच्या उद्योगातल्या नफ्यामुळे तिला
तिच्या भावंडांना आधार देता आला, -
5:18 - 5:22तिचे तीन भाचे,भाच्या आणि
तिच्या समाजातली काही मुले -
5:22 - 5:23यांना शाळेत पाठवता आले.
-
5:23 - 5:26ती गटाच्या इतर सभासदांनाही
नियमीत मदत करते. -
5:26 - 5:27उदाहरणार्थ,
-
5:27 - 5:32समाज विकासाचा पदविका अभ्यास
करणार्या एका तरुण बाईला -
5:32 - 5:34गेली दोन वर्षे,
-
5:34 - 5:37स्तुमोईने पैशाची मदत केली -
बस प्रवास, -
5:37 - 5:39सेनिटरी पेड आणि साबणासाठी,
-
5:39 - 5:42आणि तिला प्रयत्नात सातत्य
ठेवायला प्रोत्साहन दिले. -
5:43 - 5:49स्तुमोई दरवर्षी इतरांच्या शिक्षणाला
३७० डोलरचा आधार देते. -
5:50 - 5:57हा तिच्या मोटारसायकल उद्योगातल्या
एकूण उत्पन्नाचा १७ टक्के हिस्सा आहे. -
5:57 - 6:00हीच सामाजिक परताव्याची शक्ती आहे।
-
6:00 - 6:06स्तुमाईचे उदाहरण असे दाखवते की
तुम्ही एका मुलीला मदत केलीत, -
6:06 - 6:07केवळ शाळेत जाण्यासाठी नाही,
-
6:07 - 6:10तर पदवी मिळवून उद्योग सुरु करायला,
-
6:10 - 6:13तर पुढे तिच्यामुळे इतरांच्या
आयुष्यात आणि समाजातही -
6:13 - 6:16फार मोठा फरक पडतो.
-
6:16 - 6:20जर स्तुमाईने व्याजाची परतफेड
डोलरने/ पैशाने केली असती, -
6:20 - 6:24तर तिचे यश तिला आणि तिच्या
कुटुंबालाच जाणवले असते. -
6:24 - 6:28पण तिने व्याज सामाजिक
परतावा करुन दिल्यामुळे, -
6:28 - 6:31त्याचा परिणाम अनेकांना झाला,
जसे तिचे मार्गदर्शक, -
6:31 - 6:33तिच्या भाच्या, भाचे,
तिच्याकडे नोकरी करणारे -
6:33 - 6:36आणि तिच्या आजूबाजूचे बरेच जण.
-
6:36 - 6:39स्तुमाई ही अनेकांमधले
एक उदाहरण आहे. -
6:40 - 6:45आज, आमच्याकडे स्तुमाईसारखे
७००० शिक्षण मार्गदर्शक आहेत, -
6:45 - 6:47पूर्ण मालावीमधे काम करणारे,
-
6:47 - 6:51टांझानिया, घाना,
झांबिया आणि झिंबाब्वे। -
6:51 - 6:52आणि एकत्रितपणे,
-
6:52 - 6:55त्यांनी मुलांचे शिकणे जास्त
चांगले होण्यासाठी मदत केली। -
6:55 - 7:00आम्ही ज्या मुलींबरोबर काम केले
त्यांची शाळेतून होणारी गळती -
7:00 - 7:01तीन पट कमी झाली?
-
7:01 - 7:06कारण मुली शाळेत गेल्या नाहीत की
शिक्षण मार्गदर्शक त्यांच्या घरी जातात -
7:06 - 7:07आणि त्या शाळेत जातील
असे बघतात. -
7:07 - 7:11ते वस्ती आणि जिल्हा प्रशासन
यांच्याबरोबरही काम करतात -
7:11 - 7:14मुलांना असणार्या आव्हानांशी
मुकाबला करण्यासाठी, -
7:14 - 7:18यात बालविवाह अडवणे आणि
तो रद्द करणेपण असते, -
7:18 - 7:21घरात उपासमार किंवा काबाडकष्ट
असणार्या मुलांना जोडून घेणे, -
7:21 - 7:22स्थानिक मदत घेऊन,
-
7:22 - 7:24किंवा अभ्यासगट चालवणे,
-
7:24 - 7:27ज्याने अभ्यासात मागे पडणार्या
मुलांना आधार देऊन -
7:27 - 7:30प्रगतीच्या मार्गावर नेले जाते.
-
7:30 - 7:35त्या विश्वासू बहीण, मैत्रीण आणि
पालकांसारख्या असतात. -
7:35 - 7:40आजपर्यंत, गटाच्या जवळजवळ
६३०० सभासदांनी -
7:40 - 7:43तिने मिलियन? डोलरपर्यंत
पैसे कर्जाऊ घेतले आहेत, -
7:43 - 7:50ते परत करण्याचे प्रमाण
सातत्याने ९५ टक्क्यांच्या वर आहे. -
7:52 - 7:54आणि आमच्या १४००० सभासदांनी,
-
7:54 - 7:58त्यांच्या संसाधनांची गुंतवणुक करुन
-
7:58 - 8:00९३७००० पेक्षा जास्त मुलांना
-
8:00 - 8:05प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत
जायला मदत केली आहे. -
8:05 - 8:08आम्ही ज्यांच्यबरोबर काम करतो
त्यातली प्रत्येक तरुण बाई -
8:08 - 8:11साधारणपणे तिच्या कुटुंबाखेरीज
-
8:11 - 8:14इतर तीन मुलांना शाळेत जाण्यासाठी
-
8:14 - 8:15आधार देते.
-
8:15 - 8:18ही मदत आमच्याकडून
जास्तीचा पैसा न घेता होते. -
8:18 - 8:22आम्ही एक प्रबळ शक्ती
उभारत आहोत. -
8:22 - 8:25ही शक्ती अधिकच वाढते आहे,
जसजसे आम्ही अधिकाधिक -
8:25 - 8:28मुलींना शाळेत जाण्याची
दारे खुली केली, -
8:28 - 8:30त्यांनी यश मिळवले, नेत्रुत्व केले
-
8:30 - 8:34आणि हजारोंना आधार दिला.
-
8:34 - 8:36ही व्यवस्था,
-
8:36 - 8:39जी स्वतःचे आयुष्य बदलण्याची
संधी नसलेल्यांना आधार देते, -
8:39 - 8:41आणि नंतर इतरांनाही मदत करते,
-
8:41 - 8:44ती मुलींच्या शिक्षणापेक्षा
कितीतरी मोठे काम करु शकते. -
8:44 - 8:48अर्थातच कर्जाने पैसे दिलेल्याला
ते परत मिळायला हवेत. -
8:48 - 8:52पण त्यावरचे व्याज
डोलरमधे? मागण्यापेक्षा तुम्ही -
8:52 - 8:55सामाजिक परतावा ह्या पद्धतीचा
विचार करु शकता का? -
8:56 - 8:58उदाहरणार्थ,
-
8:58 - 9:00तरुण माणसे
-
9:00 - 9:03प्रशिक्षणात शिकलेले कोउशल्य
इतरांना शिकवू शकतील का? -
9:03 - 9:05मिशेलप्रमाणे,
-
9:05 - 9:08जी ग्रामीण झिंबाब्वेमधे विटा
करायला शिकवते. -
9:08 - 9:09किंवा लुईसा,
-
9:09 - 9:12जी मालवीमधे इतरांना
वातावरणाला अनुरुप अशी -
9:12 - 9:14शेती शिकवते.
-
9:14 - 9:15किंवा घानामधली फातिमा,
-
9:15 - 9:18जी बायकांना बाळंतपणात
मदत कशी करावी हे शिकवते -
9:18 - 9:20कारण गरोदर बायकांना
-
9:20 - 9:23वेळेवर दवाखान्यात जाणे जमत नाही.
-
9:24 - 9:26मी मोठी होत असताना,
-
9:26 - 9:29ग्रामीण झिंबाब्वेतल्या माझ्या
गावातल्या एका वयोव्रुद्दांनी -
9:29 - 9:33माझ्या शाळेत जाण्यामधल्या
अडचणींचं वर्णन केलं होतं, -
9:33 - 9:34ती म्हणाली,
-
9:36 - 9:39जे लोक जास्त भोपळे
पिकवतात त्यांच्याकडे -
9:39 - 9:43बहुदा ते शिजवायला मडकी नसतात.
-
9:43 - 9:44( हशा )
-
9:44 - 9:47तिच्या म्हणण्याचा अर्थ होता,
-
9:47 - 9:53जरी माझ्या परीक्षेचा निकाल
कितीही चांगला लागला तरी -
9:53 - 9:56जेव्हा मी प्रथमिक शिक्षण पूर्ण केले,
-
9:56 - 9:58माझ्या गुणांना काहिही किंमत नव्हती
-
9:58 - 10:03जोवर माझ्या कुटुंबाला माझे शिक्षण
सुरु ठेवणे परवडणार नसेल. -
10:03 - 10:06बरं, ह्या व्यवस्थेमुळे,
-
10:06 - 10:08आपण नुसती मडकीच देत नाही
-
10:08 - 10:11किंवा एका भोपळ्याचे
एक जेवण शिजवत नाही. -
10:11 - 10:13सरतेशेवटी,
-
10:13 - 10:16एका भोपळ्यात शेकडो
बिया असतात. -
10:16 - 10:18आम्ही बिया साठवून ठेवत आहोत,
-
10:18 - 10:19त्या बिया रुजवून
-
10:19 - 10:21त्या प्रत्येकीचे पोषण करत आहोत.
-
10:21 - 10:23ह्यामुळे काय होईल?
-
10:24 - 10:29समृद्धीचे एक वर्तुळच तयार होईल,
-
10:29 - 10:31समानता आणि आशा,
-
10:31 - 10:33ज्याचे तरुण बायका नेतृत्व करतील.
-
10:33 - 10:34कारण एकत्रितपणे,
-
10:34 - 10:37आम्ही जग हलवून टाकतो आहे.
-
10:37 - 10:39पामोजा टुनावेझा । ।
-
10:39 - 10:42हे आमच्या गटाचं स्वाहिली ब्रीदवाक्य आहे
"आपण एकसाथ करु शकतो!" -
10:42 - 10:44धन्यवाद
-
10:44 - 10:50( प्रोत्साहन )
सामाजिक परताव्याने कर्ज फेडण्यामुळे समाजाचा कसा
विकास होतो। तुम्ही कर्जाची परतफेड समाजाची व मार्गदर्शन करुन शकलात तर? अंजी मुरीमिरवा सामाजिक परतावा या मोठाच बदल करणर्या आर्थिक साधनाबद्दल सांगतात। दारिद्र्याच्या दुष्टाचक्रामधे अडकलेल्या उप-सहारा समाजाला त्याने नवजीवन दिले आहे। आफ्रिकेतल्या स्त्रीया व मुलींना ह्यामुळे नवनवीन संधी तयार होत आहेत। मुरिमिरवा म्हणतात की हे साधन जगात कुठेही वापरता येऊन दिर्धकालीन परिणाम करेल.
- Title:
- सामाजिक परताव्याने कर्ज फेडण्यामुळे समाजाचा कसा विकास होतो।
- Speaker:
- अंजी मुरिमिरवा
- Description:
-
तुम्ही कर्जाची परतफेड समाजाची व मार्गदर्शन करुन शकलात तर? अंजी मुरीमिरवा सामाजिक परतावा या मोठाच बदल करणर्या आर्थिक साधनाबद्दल सांगतात। दारिद्र्याच्या दुष्टाचक्रामधे अडकलेल्या उप-सहारा समाजाला त्याने नवजीवन दिले आहे। आफ्रिकेतल्या स्त्रीया व मुलींना ह्यामुळे नवनवीन संधी तयार होत आहेत। मुरिमिरवा म्हणतात की हे साधन जगात कुठेही वापरता येऊन दिर्धकालीन परिणाम करेल.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 11:03
Abhinav Garule approved Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities | ||
sonia virkar edited Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities | ||
sonia virkar edited Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities | ||
sonia virkar edited Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities | ||
sonia virkar edited Marathi subtitles for How repaying loans with social service transforms communities |