माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना
-
0:00 - 0:05माझं नाव येन बर्गेनस्टेन, पण मला जेब म्हणतात. मी mojang.com मध्ये
-
0:05 - 0:13माईनक्राफ्टचा लीड डेव्हलपर आहे. 11 किंवा 12 व्या
वर्षी मी प्रोग्रॅमिंगला सुरुवात केली -
0:13 - 0:18कारण मला गेम्स तयार करायचे होते. माझ्या वडीलांच्या एक मित्राने मला सांगितले की
-
0:18 - 0:26गेम्स तयार करण्यासाठी तुला प्रोग्रॅमिंग शिकायला लागेल. अशाप्रकारे मी सुरुवात केली. मला डीझाइनिंग आवडते आणि गोष्टींचे
-
0:26 - 0:33आर्किटेक्चर शोधायला आवडते. मला माईनक्राफ्टमधली ही गोष्ट खूप आवडते.
-
0:33 - 0:39पुढच्या तासाभरात तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून
-
0:39 - 0:46संगणक शास्त्रातल्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्स्ट असते,
-
0:46 - 0:51पण आज आपण ब्लॉकली ही प्रणाली वापरणार आहोत: ही प्रणाली ब्लॉक्स वापरते,
-
0:51 - 0:58ते ओढून आणि सोडून तुम्ही प्रोग्रॅम लिहू शकता. यात तुम्ही खरंतर जावास्क्रिप्ट कोड लिहीत असता.
-
0:58 - 1:03तुम्ही शिकणार असलेल्या संकल्पना कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स रोज वापरत असतात. त्या संगणक विज्ञानाचा पाया आहेत.
-
1:03 - 1:10मोजँगमध्ये आम्ही माईनक्राफ्ट चालवण्यासाठी याच संकल्पना वापरतो. तुम्ही सुरू
-
1:10 - 1:15करण्यापूर्वी, तुमचे कॅरॅक्टर निवडा. मी अलेक्स निवडणार आहे. तिला स्क्रीनभर फिरायला मदत करण्यासाठी
-
1:15 - 1:23आपण कोड लिहूया.
-
1:23 - 1:29तुमचा स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे माईनक्राफ्ट प्ले स्पेस, तिथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना
-
1:29 - 1:35खाली आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यातला प्रत्येक ब्लॉक
-
1:35 - 1:41म्हणजे एक कमांड आहे, ती अलेक्सच्या कृतीसाठी सूचना देते. उजवीकडच्या पांढऱ्या जागेला
-
1:41 - 1:47वर्क स्पेस म्हणतात. इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. जर आपण moveForward(); ब्लॉक
-
1:47 - 1:53वर्कस्पेसमध्ये ओढला आणि रनवर क्लिक केले, तर काय होते? अलेक्स ग्रीडवर एक स्पेस पुढे जाते
-
1:53 - 2:00आणि ती एक स्पेस पुढे गेल्यावर आपल्याला काहीतरी करायचे असेल तर? आपण
-
2:00 - 2:05आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकतो. मी turnRight(); ब्लॉक निवडणार आहे,
-
2:05 - 2:11आणि केशरी रेष दिसेपर्यंत मी तो moveForward(); ब्लॉकच्या खाली ओढणार आहे.
-
2:11 - 2:17नंतर मी तो सोडणार आहे, मग दोन्ही ब्लॉक जोडले जातील.
-
2:17 - 2:23आपण पुन्हा रन बटण दाबले की, अलेक्स आपल्या वर्कस्पेसमधल्या वरपासून ते खालपर्यंतच्या कमांड्सनुसार कृती करेल.
-
2:23 - 2:29आणि जर ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तुम्ही तो स्टॅकमधून ओढून परत टूलबॉक्समध्ये आणू शकता.
-
2:29 - 2:34तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी आणि सुरुवातीच्या पातळीला मागे जाण्यासाठी वर्कस्पेसच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातले
-
2:34 - 2:41स्टार्ट ओव्हर बटण वापरा. आणि अजून एक, तुम्हाला टर्न ब्लॉक्सवरचा छोटा त्रिकोण दिसतो का?
-
2:41 - 2:47तुम्हाला हे त्रिकोण दिसतील तेव्हा, त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता.
-
2:47 - 2:49चला, कोडींग सुरू करूया!
- Title:
- माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 02:51
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: INTRO | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: INTRO | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: INTRO | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: INTRO | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: INTRO | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: INTRO |