< Return to Video

माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना

  • 0:00 - 0:05
    माझं नाव येन बर्गेनस्टेन, पण मला जेब म्हणतात. मी mojang.com मध्ये
  • 0:05 - 0:13
    मी mojang.com मध्येमाईनक्राफ्टचा लीड डेव्हलपर आहे. मी 11 किंवा 12 वर्षांचा असेन
  • 0:13 - 0:18
    असेन तेव्हा मी प्रोग्रॅमिंग करायला सुरुवात केली कारण मला गेम्स तयार करायचे होते. माझ्या वडीलांच्या एक मित्राने मला सांगितले
  • 0:18 - 0:26
    की गेम्स तयार करण्यासाठी तुला प्रोग्रॅमिंग शिकायला लागेल. अशाप्रकारे मी सुरुवात केली. मला डीझाइनिंग आवडते आणि गोष्टींचे
  • 0:26 - 0:33
    आर्किटेक्चर शोधायला आवडते. मला माईनक्राफ्टची ही गोष्ट खूप आवडते. पुढच्या तासाभरात
  • 0:33 - 0:39
    तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून
  • 0:39 - 0:46
    तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून
  • 0:46 - 0:51
    संगणक शास्त्रातल्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्स्ट असते,
  • 0:51 - 0:58
    पण आज आपण ब्लॉकली ही प्रणाली वापरणार आहोत: ही प्रणाली ब्लॉक्स वापरते, ते ओढून आणि सोडून तुम्ही
  • 0:58 - 1:03
    प्रोग्रॅम लिहू शकता. यात तुम्ही खरंतर जावास्क्रिप्ट कोड लिहीत असता. तुम्ही शिकणार असलेल्या संकल्पना कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स रोज वापरत असलेल्या संकल्पना आहेत आणि त्या विज्ञानाचा पाया आहेत.
  • 1:03 - 1:10
    इथे Mojang मध्ये आम्ही माईनक्राफ्ट चालण्यासाठी याच संकल्पना वापरतो. तुम्ही सुरू
  • 1:10 - 1:15
    करण्यापूर्वी, तुम्ही तुमचे कॅरॅक्टर निवडाल. मी अलेक्स निवडणार आहे. तिला स्क्रीनभर फिरायला मदत करण्यासाठी
  • 1:15 - 1:23
    आपण कोड लिहूया. तुमचा स्क्रीन तीन मुख्य भागात विभागला आहे.
  • 1:23 - 1:29
    डावीकडे माईनक्राफ्ट प्ले स्पेस आहे, तिथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना
  • 1:29 - 1:35
    खाली लिहीलेल्या आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यातला प्रत्येक ब्लॉक
  • 1:35 - 1:41
    म्हणजे एक कमांड आहे, ती अलेक्सच्या कृतीसाठी सूचना देते. उजवीकडच्या पांढऱ्या जागेला
  • 1:41 - 1:47
    वर्क स्पेस म्हणतात. इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. जर आपण moveForward(); ब्लॉक
  • 1:47 - 1:53
    आपल्या वर्कस्पेसमध्ये ओढला आणि मग रनवर क्लिक केले, तर काय होते? अलेक्स ग्रीडवर एक स्पेस पुढे जाते
  • 1:53 - 2:00
    आणि ती एक स्पेस पुढे गेल्यावर आपल्याला काहीतरी करायचे असेल तर? आपण
  • 2:00 - 2:05
    आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकतो. मी turnRight(); ब्लॉक निवडणार आहे,
  • 2:05 - 2:11
    आणि केशरी रेष दिसेपर्यंत मी तो
  • 2:11 - 2:17
    moveForward(); ब्लॉकच्या खाली ओढणार आहे. नंतर मी
  • 2:17 - 2:23
    तो सोडणार आहे, मग दोन्ही ब्लॉक जोडले जातील. आपण पुन्हा रन बटण दाबले की, अलेक्स
  • 2:23 - 2:29
    आपल्या वर्कस्पेसमधल्या वरपासून ते खालपर्यंतच्या कमांड्सनुसार कृती करेल. आणि जर तुम्हाला कधी
  • 2:29 - 2:34
    ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तो स्टॅकमधून ओढून परत टूलबॉक्समध्ये आणू शकता. तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी
  • 2:34 - 2:41
    आणि सुरुवातीच्या पातळीला मागे जाण्यासाठी वर्कस्पेसच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातले
  • 2:41 - 2:47
    स्टार्ट ओव्हर बटण वापरा. आणि अजून एक, तुम्हाला टर्न ब्लॉक्स वरचा छोटा त्रिकोण दिसतो का?
  • 2:47 - 2:49
    तुम्हाला हे त्रिकोण दिसतील तेव्हा, त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता. चला, कोडींग सुरू करूया!
Title:
माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: प्रस्तावना
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
02:51

Marathi subtitles

Revisions Compare revisions