महान नेते कृती करण्यास कसे प्रेरित करतात
-
0:01 - 0:05आपल्या गृहितकानुसार गोष्टी घडत नाहीत
तेव्हा काय म्हणाल? -
0:05 - 0:08खरेतर ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण कसं द्याल
-
0:08 - 0:12जेव्हा सर्व गृहीतकांना झुगारुन काहीजण
यश संपादन करु शकतात? -
0:12 - 0:14उदाहरणार्थ:
-
0:14 - 0:16ऍपल हि कंपनी एवढी नाविन्यपूर्ण का आहे?
-
0:16 - 0:18वर्षानुवर्षे,
-
0:18 - 0:21तिच्या सर्व स्पर्धकांपेक्षा ती
अधिक नाविन्यपूर्ण आहे. -
0:21 - 0:23आणि तरीसुद्धा ती एक
संगणक बनवणारी कंपनी आहे. -
0:23 - 0:25ती इतर सगळ्यांसारखीच आहे.
-
0:25 - 0:27तिच्याकडेही तीच प्रतिभा उपलब्ध आहे,
-
0:27 - 0:29त्याच सहकारी कंपन्या आहेत,
-
0:29 - 0:31तेच सल्लागार, तीच माध्यमं आहेत.
-
0:31 - 0:34तरीसुद्धा तिच्याकडे काहीतरी
वेगळं आहे असं का वाटतं? -
0:35 - 0:39मार्टिन ल्युथर किंग यांनी नागरी हक्क
चळवळीचे नेतृत्व का केलं? -
0:39 - 0:43अमेरिकेतील नागरी हक्कांच्या चळवळीपूर्वी
दुःख सहन केलेले ते एकमेव नव्हते -
0:43 - 0:46आणि त्या काळातील एकमेव महान
वक्ता तर नक्कीच नव्हते. -
0:46 - 0:47मग तेच का?
-
0:47 - 0:50आणि राईट बंधूंनाच का कळलं
-
0:50 - 0:53नियंत्रीत, शक्तीशाली मानवी उड्डाणाबद्दल
-
0:53 - 0:55जेव्हा इतरही संघ होते,
-
0:55 - 0:58जे अधिक पात्रतेचे होते, ज्यांच्याकडे
अधिक पैसा होता -- -
0:58 - 1:01आणि ज्यांना शक्तीशाली मानवी
उड्डाण करता आलं नाही, -
1:01 - 1:03आणि राईट बंधूंनी ज्यांना पराभूत केलं.
-
1:03 - 1:05हे काहीतरी वेगळं आहे.
-
1:06 - 1:10साधारण साडेतीन वर्षांपूर्वी
मला एक शोध लागला. -
1:10 - 1:16आणि जग कसं चालतं याबद्दलचे माझे
विचार या शोधामुळे पूर्णतः बदलले, -
1:16 - 1:20आणि जगात मी कसा वावरतो
यातही खूपच बदल झाला. -
1:22 - 1:25असं लक्षात येतं कि, त्याचा एक नमुना आहे.
-
1:25 - 1:29असं लक्षात येतं कि, जगातील
सर्व प्रेरणादायी नेते आणि संस्था, -
1:29 - 1:32मग ती एपल असो किंवा मार्टिन ल्युथर किंग
किंवा राईट बंधू असोत, -
1:32 - 1:36ते सगळे एकाच पद्धतीने विचार,
कृती आणि संवाद करतात. -
1:36 - 1:40आणि ते इतर प्रत्येकापेक्षा
पूर्णतः विरुद्ध आहे. -
1:40 - 1:42मी फक्त ते सुसूत्रित केलं,
-
1:42 - 1:46आणि कदाचित ती जगातील
सर्वांत सोपी कल्पना आहे. -
1:46 - 1:48मी त्याला सुवर्ण वर्तुळ म्हणतो.
-
1:56 - 1:59का? कसं? काय?
-
1:59 - 2:01या सोप्या कल्पनेवरून कळतं
-
2:01 - 2:05कि काही संस्था आणि काही नेते प्रेरित का
करू शकतात जे इतरांना जमत नाही. -
2:05 - 2:07मी पटकन संज्ञा सांगतो.
-
2:07 - 2:10या ग्रहावरील प्रत्येक माणसाला,
प्रत्येक संघटनेला -
2:10 - 2:13ते काय करतात हे माहित आहे, १०० टक्के.
-
2:14 - 2:16ते कसं करतात हे काहींना माहित आहे,
-
2:16 - 2:19त्याला तुम्ही तुमचं विशिष्ट
मूल्य विधान म्हणा -
2:19 - 2:21किंवा मालकी प्रक्रिया किंवा
अद्वितीय गुण म्हणा. -
2:21 - 2:26पण अगदी थोड्या लोकांना किंवा संस्थांना
कळतं ते जे करतात ते का करतात. -
2:26 - 2:28आणि "का" यावर माझं म्हणणं
"नफा कमवण्यासाठी" असं नाही. -
2:28 - 2:31ती निष्पत्ती आहे. ती
नेहमी निष्पत्तीच असते. -
2:31 - 2:33"का" म्हणजे मला म्हणायचं
आहे: तुमचा उद्देश काय? -
2:33 - 2:35तुमचं निमित्त काय? तुमची
कशावर श्रद्धा आहे? -
2:35 - 2:38तुमची संघटना अस्तित्वात का आहे?
-
2:38 - 2:40तुम्ही सकाळी बिछान्यातून का उठता?
-
2:40 - 2:43आणि कोणाला कशाला काय वाटायला हवं?
-
2:43 - 2:45याचा परिणाम, आपली विचारपद्धती,
आपली कृती, -
2:45 - 2:49आपली संवादपद्धती बाह्यरंगातून अंतरंगात
जाणारी आहे, हे स्वाभाविक आहे. -
2:49 - 2:51आपण सुस्पष्टतेकडून अस्पष्टतेकडे जातो.
-
2:51 - 2:54पण प्रेरित नेते आणि प्रेरित संघटना --
-
2:54 - 2:58त्यांचे आकारमान, त्यांचा
उद्योग लक्षात न घेता -- -
2:58 - 3:01सर्वजण विचार, कृती आणि संवाद
अंतरंगातून बाहेर करतात. -
3:03 - 3:04मी एक उदाहरण देतो.
-
3:04 - 3:07मी एपलबद्दल सांगतो कारण ते समजायला
सोपं आणि प्रत्येकाला कळू शकतं. -
3:07 - 3:10जर एपल कंपनी इतर प्रत्येकासारखी असती,
-
3:10 - 3:13तिचा विपणन संदेश असा असला असता:
-
3:14 - 3:15"आम्ही अप्रतिम संगणक बनवतो.
-
3:16 - 3:20त्यांची रचना सुंदर आहे, ते वापरायला सोपे
आहेत आणि वापरणाऱ्यासाठी सोयीचे आहेत. -
3:20 - 3:21एक घ्यायचा का?"
-
3:22 - 3:23"एकदम रटाळ."
-
3:23 - 3:25आपल्यातले बरेचजण असाच संवाद साधतात.
-
3:25 - 3:27बरंचसं विपणन आणि विक्री अशीच होते,
-
3:28 - 3:30आपण एकमेकांशी असाच संवाद साधतो.
-
3:30 - 3:31आपण जे करतो ते आपण सांगतो,
-
3:31 - 3:34आपण कसे वेगळे आणि अधिक
चांगले आहोत ते सांगतो -
3:34 - 3:36आणि आपण कुठल्यातरी
कृतीची अपेक्षा करतो, -
3:36 - 3:37खरेदी, मत, तत्सम काहीतरी.
-
3:37 - 3:39हि आमची विधी सल्लागार
कंपनी आहे: -
3:39 - 3:41आमच्या उत्तम कायदेपंडितांचे
मोठमोठे पक्षकार आहेत, -
3:41 - 3:43आम्ही नेहमी आमच्या
पक्षकारांसाठी काम करतो. -
3:43 - 3:45हि आमची नवीन गाडी आहे:
-
3:45 - 3:48तिची इंधनक्षमता उत्तम आहे, तिच्या
आसनांना चामड्याची आवरणं आहेत. -
3:48 - 3:49आमची गाडी विकत घ्या.
-
3:49 - 3:51पण ते कंटाळवाणं आहे.
-
3:51 - 3:53एपल कंपनी कसा संवाद साधते ते बघा.
-
3:53 - 3:57"आम्ही जे करतो त्यामागे सद्यःस्थितीला
आव्हान देण्याचा आमचा मानस असतो. -
3:57 - 3:59आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार
करण्यावर विश्वास ठेवतो. -
3:59 - 4:02सद्यःस्थितीला आव्हान देण्याचा
आमचा मार्ग म्हणजे -
4:02 - 4:06आमच्या उत्पादनांची रचना सुंदर करणे,
-
4:06 - 4:08ती वापरायला सोपी आणि सोयीची बनवणे.
-
4:08 - 4:11आम्ही उत्तम संगणक बनवतो हा
निव्वळ योगायोग आहे. -
4:11 - 4:12एक हवाय का?"
-
4:13 - 4:14अगदीच वेगळं, बरोबर?
-
4:14 - 4:16तुम्ही माझ्याकडून संगणक
खरेदी करायला तयार आहात. -
4:16 - 4:18मी माहितीची क्रमवारी फक्त उलटी केली.
-
4:18 - 4:22यावरून आपल्याला काय सिद्ध होतं कि
लोक तुम्ही काय करता याला मोल देत नाहीत; -
4:22 - 4:25लोक तुम्ही ते करता हे खरेदी करतात.
-
4:25 - 4:29यावरून हे स्पष्ट होतं कि या
सभागृहातील प्रत्येक व्यक्ती -
4:29 - 4:32एपलकडून संगणक किती आरामात घेऊ शकते.
-
4:32 - 4:34पण आपण अगदी आरामात
-
4:34 - 4:37एपलचा MP3 प्लेयर किंवा एपलचा फोन,
-
4:37 - 4:39किंवा एपलचा DVR घेऊ शकतो.
-
4:39 - 4:42मी आधी म्हणल्याप्रामणे, एपल हि एक
फक्त संगणक बनवणारी कंपनी आहे. -
4:42 - 4:45संरचनेनुसार त्यांच्यात आणि त्यांच्या
स्पर्धकांमध्ये काहीही फरक नाही. -
4:45 - 4:49त्यांचे स्पर्धकही हि सगळी उत्पादनं
बनवण्यासाठी तेवढेच पात्र आहेत. -
4:49 - 4:50वस्तुस्थितीत, त्यांनी प्रयत्न केला.
-
4:50 - 4:53काही वर्षांपूर्वी, गेटवे कंपनीने सपाट
पडद्याचे टिव्ही आणले. -
4:53 - 4:57सपाट पडद्याचे दूरचित्रवाणी संच
बनवण्यास ते पूर्णतः पात्र आहेत. -
4:57 - 4:59अनेक वर्षांपासून ते सपाट पडद्याचे
दूरचित्रवाणी संच बनवताहेत. -
4:59 - 5:01कुणीच एकही संच विकत घेतला नाही.
-
5:03 - 5:08डेल कंपनीने MP3 प्लेयर आणि PDA आणले,
-
5:08 - 5:10आणि ते उत्तम प्रतीची उत्पादनं बनवतात,
-
5:10 - 5:13आणि ते अगदी योग्य रचना
असलेली उत्पादनं बनवतात -- -
5:13 - 5:15आणि कुणीच एकही उत्पादन घेतलं नाही.
-
5:15 - 5:18वस्तुस्थितीत, त्याविषयी बोलताना, आपण
कल्पनाही करू शकत नाही -
5:18 - 5:19डेलचा MP3 प्लेयर विकत घेण्याचा.
-
5:19 - 5:22एका संगणक बनवणाऱ्या कंपनीकडून
तुम्ही तो का विकत घ्याल? -
5:22 - 5:24पण आपण रोज खरेदी करतो.
-
5:24 - 5:28लोक तुम्ही काय करता याला मोल देत
नाहीत; ते तुम्ही का करता याला मोल देतात. -
5:28 - 5:32तुमच्याकडे जे आहे त्याची गरज ज्याला
आहे त्यासोबत व्यवसाय करणे हे लक्ष्य नाही. -
5:32 - 5:36तुम्ही जे मानता त्यावर विश्वास ठेवणाऱ्या
लोकांबरोबर व्यवसाय करणे हे लक्ष्य आहे. -
5:36 - 5:38हे उत्तम आहे कि:
-
5:38 - 5:41मी जे काही तुम्हांला सांगतो आहे
ते माझं वैयक्तिक मत नाही. -
5:41 - 5:43त्याचं मूळ जीवशास्त्रीय तत्त्वांमध्ये आहे.
-
5:43 - 5:45मानसशास्र नव्हे, जीवशास्त्र.
-
5:45 - 5:48मानवी मेंदूला जर आडवा छेद
देऊन तुम्ही बघितलंत, -
5:48 - 5:50वरपासून खाली, मानवी मेंदू
खरंतर भंगलेला आहे -
5:50 - 5:52तीन मुख्य घटकांमध्ये
-
5:52 - 5:55ज्याचा सुयोग्य संबंध सुवर्ण वर्तुळाशी आहे.
-
5:55 - 5:58आपला नवीनतम मेंदू, मानवी मेंदू,
-
5:58 - 6:00आपल्या मोठ्या मेंदूचा बाहेरील थर,
-
6:00 - 6:02"काय" या पातळीशी संबंधीत आहे.
-
6:02 - 6:04मोठया मेंदूचा बाहेरील थर जबाबदार असतो
-
6:04 - 6:08तो तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक विचार
आणि बोलीसाठी. -
6:08 - 6:11मधले दोन भाग हे लिंबिक मेंदूचे असतात,
-
6:11 - 6:15आणि आपले लिंबिक मेंदू जबाबदार असतात
ते आपल्या सगळ्या भावनांसाठी, -
6:15 - 6:17जसा विश्वास आणि निष्ठा.
-
6:17 - 6:19मानवी वर्तनालादेखील तोच कारणीभूत असतो,
-
6:19 - 6:21सर्व निर्णय घेणे,
-
6:21 - 6:24आणि भाषेसाठी त्याची क्षमता नसते.
-
6:24 - 6:28दुसऱ्या शब्दांत, जेव्हा आपण बाह्यरंगातून
अंतरंगाशी संवाद साधतो, -
6:28 - 6:30लोकांना पुष्कळश्या अवघड माहितीचे आकलन होते
-
6:30 - 6:33जसं कि वैशिष्ट्ये आणि फायदे आणि
तथ्य आणि आकडे. -
6:33 - 6:35त्याच्याने वर्तन ठरत नाही.
-
6:35 - 6:37जेव्हा आपण अंतरंगातून बाहेर
संवाद साधू शकतो, -
6:37 - 6:39आपण मेंदूच्या त्या भागाशी बोलत असतो जो
-
6:39 - 6:41वर्तन नियंत्रित करतो,
-
6:41 - 6:45आणि मग आपल्या उक्ती आणि कृतीच्या मूर्त
गोष्टींनी लोकांना युक्तीवाद करू देतो. -
6:45 - 6:48ह्याच जागेतून महत्त्वाचे निर्णय
घेतले जातात. -
6:48 - 6:51कधीकधी तुम्ही कोणालातरी सर्व सत्य
आणि आकडेमोड सांगू शकता, -
6:51 - 6:54आणि ते म्हणतात, "मला ते सगळं माहीत आहे,
-
6:54 - 6:55पण ते योग्य वाटत नाही"
-
6:55 - 6:58आपण योग्य "वाटत" नाही असं
क्रियापद का वापरतो? -
6:58 - 7:01कारण मेंदूचा जो भाग निर्णय
प्रक्रिया नियंत्रित करतो -
7:01 - 7:02तो भाषा नियंत्रित करत नाही.
-
7:02 - 7:03आपण म्हणू शकतो कि,
-
7:03 - 7:06"मला माहीत नाही. हे काही योग्य वाटत नाही"
-
7:06 - 7:09किंवा तुम्ही कधी म्हणता तुम्ही तुमच्या
मनाचं किंवा आत्म्याचं ऐकत आहात. -
7:09 - 7:12हे सांगणारा पहिला मी नाही
कि ते शरीराचे वेगळे अवयव नाहीत -
7:12 - 7:13वर्तन नियंत्रित करणारे.
-
7:13 - 7:15हे सगळं इथे घडतं, तुमच्या
लिंबिक मेंदूमध्ये, -
7:15 - 7:18मेंदूचा तो भाग जो निर्णय प्रक्रिया
नियंत्रित करतो भाषा नव्हे. -
7:18 - 7:21पण तुम्हाला जर माहित नसेल
तुम्ही जे करता ते का करता, -
7:21 - 7:24आणि लोक जर तुम्ही जे करता ते
का करता याला प्रतिसाद देत असतील, -
7:24 - 7:27तर मग लोकांना प्रवृत्त कसं कराल
-
7:27 - 7:29मत देण्यासाठी किंवा
काही विकत घेण्यासाठी, -
7:29 - 7:31किंवा महत्त्वाचं म्हणजे
इमानी राहण्यासाठी -
7:31 - 7:34आणि तुम्ही जे करता याचा एक भाग होण्यासाठी.
-
7:34 - 7:37ज्या लोकांना तुमच्याकडे असलेलं
विकणं हे लक्ष्य नाही; लक्ष्य आहे -
7:37 - 7:40त्यांना विकणं जे तुम्ही विश्वास
ठेवत असलेल्या गोष्टी मानतात -
7:40 - 7:44ज्या लोकांना नोकरीची गरज आहे
त्यांना कामावर ठेवणं हे लक्ष्य नाही; -
7:44 - 7:47ते आहे त्या लोकांच्या नोकरीचं
जे तुमच्यासारखा विश्वास ठेवतात -
7:47 - 7:49मी नेहमी म्हणतो, असं बघा कि,
-
7:49 - 7:55एखादं काम करू शकतात म्हणून तुम्ही लोकांना
कामावर ठेवलं, तर ते पैशासाठी काम करतील, -
7:55 - 7:57पण त्यांचा विश्वास संलग्न असेल
-
7:57 - 7:59तर ते जीव ओतून, घाम गाळून
आणि अश्रु ढाळून काम करतील. -
7:59 - 8:03राईट बंधुंसारखं दुसरं उत्तम उदाहरण नाही.
-
8:03 - 8:07बऱ्याच लोकांना सॅम्युएल पियरपॉईंट
लँगले माहित नाहीत. -
8:07 - 8:09आणि मागे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात,
-
8:09 - 8:12शक्तिशाली मानवी उड्डाणाचा पाठपुरावा
आजच्या डॉट कॉम सारखा होता. -
8:12 - 8:14प्रत्येकजण त्याचा प्रयत्न करत होता.
-
8:14 - 8:17आणि सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेकडे,
आपण जो मानतो, -
8:17 - 8:20तो यशाचा मंत्र होता.
-
8:20 - 8:21आतासुद्धा, तुम्ही लोकांना विचारा,
-
8:21 - 8:24"तुमचं उत्पादन किंवा तुमची कंपनी
अपयशी का ठरली?" -
8:24 - 8:26आणि लोक तुम्हांला नेहमी तेच संयोजन सांगतील
-
8:26 - 8:28त्याच तीन गोष्टींचं:
-
8:28 - 8:31अपुरं भांडवल, अयोग्य लोक आणि
बाजाराची खराब परिस्थिती. -
8:31 - 8:34नेहमी याच तीन गोष्टी असतात,
बघू या कसं काय ते. -
8:34 - 8:36सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेला
-
8:36 - 8:39युद्ध विभागाकडून ५०,००० डॉलर
दिले गेले होते -
8:39 - 8:41हे उडणारं यंत्र काय आहे ते बघण्यासाठी.
-
8:41 - 8:43प्रश्न भांडवलाचा नव्हता.
-
8:43 - 8:45त्यांचा हार्वर्डशी संबंध होता,
-
8:45 - 8:48आणि स्मिथसोनियन संस्थेत काम केलं
होतं, लोकांशी उत्तम संबंध होता; -
8:48 - 8:50त्या काळातील मोठे
लोक त्यांना ठाऊक होते. -
8:50 - 8:54पैशांसाठी काम करणारे उत्तम बुद्धिमत्तेचे
लोक त्यांनी कामावर ठेवले होते -
8:54 - 8:56आणि बाजारही तेजीत होता.
-
8:56 - 8:59द न्यु यॉर्क टाईम्स त्यांना सगळीकडे
प्रसिद्धी देत होता, -
8:59 - 9:01व प्रत्येकजण लँगलेंना
प्रोत्साहन देत होता. -
9:01 - 9:04तरीही सॅम्युएल पियरपॉईंट लँगलेबद्दल
आपण कधीही कसंच ऐकलं नाही? -
9:04 - 9:07काहीशे मैलांवर डेटन ओहायोमध्ये,
-
9:08 - 9:09ऑर्विल आणि विल्बर राईट,
-
9:09 - 9:13यांच्याकडे आपण समजत असलेला
यशाचा मंत्र वैगैरे काही नव्हतं. -
9:13 - 9:15त्यांच्याकडे भांडवल नव्हतं;
-
9:15 - 9:18सायकलच्या दुकानातील कमाई
त्यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी वापरली; -
9:18 - 9:21राईट बंधुंच्या संघातील एकही व्यक्ती,
-
9:21 - 9:22महाविद्यालयात शिकलेला नव्हता,
-
9:22 - 9:24ऑर्विल आणि विल्बरसुद्धा;
-
9:24 - 9:27द न्यु यॉर्क टाईम्सने त्यांचा कुठेही
पाठपुरावा केलेला नव्हता. -
9:27 - 9:29फरक हा होता,
-
9:29 - 9:33ऑर्विल आणि विल्बर एका ध्येयाने,
उद्देशाने, विश्वासाने प्रेरीत होते. -
9:33 - 9:37त्यांचा असा विश्वास होता कि त्यांना
जर या उडत्या यंत्राची उकल झाली, -
9:37 - 9:39तर जगाची दिशाच बदलेल.
-
9:40 - 9:42सॅम्युएल पियरपॉईंट लँगले वेगळे होते.
-
9:42 - 9:45त्यांना श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचं होतं.
-
9:45 - 9:47ते फळाचा पाठपुरावा करत होते.
-
9:47 - 9:49ते श्रीमंतीचा पाठपुरावा करत होते.
-
9:49 - 9:51आणि पहा काय घडलं ते.
-
9:51 - 9:55जे लोक राईट बंधुंच्या स्वप्नावर
विश्वास ठेवणारे होते -
9:55 - 9:57त्यांनी त्यांच्यासोबत जीव ओतून काम केलं.
-
9:57 - 9:59इतरांनी फक्त पगारासाठी काम केलं.
-
9:59 - 10:02ते वर्णनं सांगतात कि राईट बंधू दरवेळी
बाहेर पडताना त्यांना कसे, -
10:02 - 10:04सुट्या भागांचे पाच संच न्यावे लागत असत,
-
10:04 - 10:07कारण संध्याकाळच्या नाश्त्यापर्यंत
ते तितक्या वेळा कोसळत असत. -
10:09 - 10:13आणि, अखेरीस, १७ डिसेंबर, १९०३ ला,
-
10:13 - 10:15राईट बंधूंनी उड्डाण केलं,
-
10:15 - 10:17आणि ते अनुभवण्यासाठी
तिथे कोणीही नव्हतं. -
10:17 - 10:19आपल्याला त्याबद्दल काही दिवसांनंतर कळलं.
-
10:21 - 10:25आणि लँगले हे चुकीच्या गोष्टीने प्रेरित
होते याचा आणखी पुरावा: -
10:25 - 10:27ज्या दिवशी राईट बंधूंनी उड्डाण केलं.
-
10:27 - 10:28ते बाहेर पडले.
-
10:28 - 10:30ते म्हणू शकले असते,
-
10:30 - 10:32"हा एक विस्मयकारी शोध आहे, मित्रांनो,
-
10:32 - 10:35व तुमच्या तंत्रज्ञानाधारे मी सुधारणा
करेन," पण ते म्हणले नाहीत. -
10:35 - 10:39ते प्रथम नव्हते, श्रीमंत झाले नाही,
प्रसिद्ध झाले नाही, म्हणून बाहेर पडले. -
10:40 - 10:42लोकांच्या लेखी मोल नाही
त्यामागचा हेतु महत्वाचा. -
10:42 - 10:44जे तुम्ही मानता
त्याबद्दल बोललात तर, -
10:44 - 10:47ते मानणाऱ्यांना तुम्ही आकर्षित कराल.
-
10:47 - 10:50पण जे तुम्ही मानता तेच मानणाऱ्यांना
आकर्षित करणं का महत्त्वाचं आहे? -
10:52 - 10:55नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम
असं काहीसं म्हणतात, -
10:55 - 10:57जरी नियम ठाऊक नसेल
तरी, त्याची परिभाषा माहिती आहे. -
10:58 - 11:02आपल्या लोकसंख्येतील पहिले २.५%
लोक आपले नावीन्यतेचे प्रवर्तक आहेत. -
11:02 - 11:06आपल्या लोकसंख्येतील पुढचे १३.५%
लोक त्याची तत्पर स्वीकृती करणारे आहेत. -
11:07 - 11:09पुढचे ३४% लोक हे
अग्रेसर बहुसांख्यिक, -
11:09 - 11:11हळू जाणारे बहुसांख्यिक
आणि रेंगाळणारे आहेत. -
11:12 - 11:15हे लोक टच-टोन फोन एवढ्याचसाठी घेतात कारण
-
11:15 - 11:17नंबर फिरवायचे फोन आता उपलब्ध नाहीत.
-
11:17 - 11:19(हशा)
-
11:19 - 11:22या मोजपट्टीवर आपण सगळे वेगवेगळ्या
वेळी वेगवेगळ्या जागी असतो, -
11:22 - 11:25पण नावीन्यतेच्या प्रसरणाचा नियम
आपल्याला काय सांगतो -
11:25 - 11:30कि तुम्हांला जर व्यापक यश हवं असेल किंवा
एखाद्या कल्पनेची व्यापक स्वीकृती हवी असेल, -
11:30 - 11:34तर ते तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही
-
11:34 - 11:37बाजार प्रवेशाचा १५ ते १८ टक्क्यांपर्यंतचा
पल्ला गाठत नाही, -
11:37 - 11:40आणि नंतर व्यवस्थेत उलथापालथ होते.
-
11:40 - 11:43मला कंपन्यांना विचारायला आवडतं
"नवीन व्यवसाय किती झाला?" -
11:43 - 11:46त्यांना तुम्हाला अभिमानाने सांगायला
आवडतं "जवळपास १०%". -
11:46 - 11:48तसं तर तुम्ही १०% ग्राहकांमध्ये
अडखळू शकता. -
11:48 - 11:50आपल्याकडे १०%
आहे ज्यांना अगदी सहज मिळतं. -
11:50 - 11:52आपण त्यांना असंच म्हणतो, खरंय ना?
-
11:52 - 11:54ते त्या आंतरिक भावनेसारखं आहे
"ते त्यांना सहज मिळतं" -
11:54 - 11:57प्रश्न हा आहे: ज्यांना हे कळतं
त्यांना कसं ओळखायचं -
11:57 - 11:59देवाणघेवाण न करता आणि
ज्यांना कळत नाही त्यांच्यापर्यंत? -
11:59 - 12:03म्हणून हे असं आहे हि छोटी पोकळी
तुम्हाला भरून काढावी लागेल, -
12:03 - 12:05जेफ्री मूर म्हणतात त्याप्रमाणे
"दरी ओलांडणे" -- -
12:05 - 12:09कारण हे बघा, लवकर कृती करणारे बहुसांख्यिक
तोपर्यंत काही आजमावणार नाहीत -
12:09 - 12:13जोपर्यंत कुणा दुसऱ्याने ते आजमावलं नसेल.
-
12:13 - 12:16आणि लोक जे नावीन्यतेचे प्रवर्तक
व तत्पर स्वीकृती करणारे आहेत, -
12:16 - 12:18ते सहजतेने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात.
-
12:18 - 12:21ते स्वाभाविक निर्णय घेण्यात
त्यांना सहजता वाटते -
12:21 - 12:25जे त्यांच्या जगाबद्दलच्या विश्वासाने
प्रेरीत असतात -
12:25 - 12:27आणि केवळ उत्पादन
आहे यावर विसंबून नसतात. -
12:27 - 12:30हे ते लोक आहेत जे सहा
तास रांगेत उभे राहिले -
12:30 - 12:32एका आयफोनसाठी जेव्हा
ते प्रथम बाजारात आले, -
12:32 - 12:35जेव्हा तुम्हाला एखादा पुढच्या
आठवड्यात सहज मिळाला असता. -
12:35 - 12:37हे ते लोक आहेत ज्यांनी
४०,००० डॉलर खर्च केले -
12:37 - 12:40सपाट पडद्याचा टिव्ही घेण्यासाठी
जेव्हा ते प्रथम बाजारात आले, -
12:40 - 12:42जरी त्याचं तंत्रज्ञान हलक्या
प्रतीचं होतं तरीही. -
12:43 - 12:47आणि तंत्रज्ञान उत्कृष्ट होतं
म्हणून त्यांनी हे केलं नाही; -
12:47 - 12:49ते त्यांनी स्वतःच्या समाधानासाठी केलं.
-
12:49 - 12:51कारण त्यांना अग्रेसर राहायचं होतं.
-
12:51 - 12:53लोक तुमच्या कृतीला मोल देत
नाहीत; तिच्या हेतुला देतात -
12:54 - 12:57आणि तुम्ही काय करता हे तुमचा
कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. -
12:57 - 13:01वास्तविक पाहता, लोक त्या गोष्टी करतात
ज्या त्यांचा विश्वास सिद्ध करतात. -
13:01 - 13:06त्या व्यक्तीने आयफोन पहिल्या
सहा तासांत घेण्याचं कारण, -
13:06 - 13:08सहा तास रांगेत उभं राहण्याचं कारण,
-
13:08 - 13:10जगाबद्दलचा त्यांचा विश्वास होय,
-
13:10 - 13:12आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन
कसा असावा हे आहे. -
13:12 - 13:13ते अग्रणी होते.
-
13:13 - 13:16लोक तुमच्या कृतीला मोल देत
नाहीत तर हेतुला देतात. -
13:16 - 13:18मी तुम्हांला एक प्रसिद्ध उदाहरण देतो,
-
13:18 - 13:23नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे एक
प्रसिद्ध अपयश आणि एक प्रसिद्ध यश. -
13:23 - 13:24प्रथम, एक प्रसिद्ध अपयश.
-
13:24 - 13:26ते एक व्यावसायिक उदाहरण आहे.
-
13:26 - 13:28आपण आधी म्हणल्याप्रमाणे, यशाचा मूलमंत्र
-
13:28 - 13:32हा भांडवल, योग्यतेचे लोक आणि
बाजाराची योग्य परिस्थिती आहे. -
13:32 - 13:33मग तुम्हांला यश मिळायला हवं.
-
13:33 - 13:35टिव्हो कंपनीचं बघा.
-
13:35 - 13:38आठ ते नऊ वर्षांपूर्वी टिव्हो कंपनी
सुरू झाल्यापासून, -
13:38 - 13:39ते आजतागायत,
-
13:39 - 13:43बाजारातील उत्कृष्ट गुणवत्तेचे
ते एकमेव उत्पादन आहे, -
13:43 - 13:45याबाबत कुठचेही दुमत नाही.
-
13:46 - 13:47त्यांच्याकडे पुष्कळ भांडवल होतं.
-
13:47 - 13:49बाजारातील परिस्थिती उत्तम होती.
-
13:49 - 13:51म्हणजे, आपल्यासाठी
टिव्हो क्रियापद आहे -
13:51 - 13:54मी नेहमी फालतू अशा टाईम वॉर्नर
कंपनीच्या DVR वर गोष्टी टिव्हो करतो -
13:54 - 13:56(हशा)
-
13:57 - 13:59पण टिव्हो हे एक व्यावसायिक अपयश आहे.
-
13:59 - 14:01त्यांनी कधीही पैसा कमावला नाही.
-
14:01 - 14:03आणि जेव्हा ते शेयर बाजारात आले,
-
14:03 - 14:05त्यांच्या शेयरची किंमत ३० का ४० डॉलर होती
-
14:05 - 14:07ती घसरली, आणि नंतर ती
कधीही १० डॉलरच्यावर गेली नाही. -
14:07 - 14:10वास्तविक पाहता, ती कधी सहा
डॉलरच्यावर गेली नाही, -
14:10 - 14:12एखाद दुसऱ्या शीघ्र वाढीचा प्रसंग वगळता.
-
14:12 - 14:14कारण असं बघा, टिव्होने जेव्हा
उत्पादन बाजारात आणलं -
14:14 - 14:17त्यांच्याकडे काय आहे हे त्यांनी सांगितलं.
-
14:17 - 14:20ते म्हणाले "आमचं उत्पादन टिव्हीवरचं
प्रक्षेपण थांबवतं, -
14:20 - 14:25जाहिराती वगळतं, प्रक्षेपण पुन्हा
सुरु करतं आणि तुमची आवड लक्षात ठेवतं -
14:25 - 14:27तुम्हाला न विचारता."
-
14:28 - 14:30आणि बहुसंख्य लोक उपहासाने म्हणाले,
-
14:30 - 14:32"आमचा तुमच्यावर विश्वास नाही.
-
14:32 - 14:35आम्हाला त्याची गरज नाही. आम्हाला
ते आवडलं नाही. -
14:35 - 14:36तुम्ही घाबरवत
आहात." -
14:37 - 14:38ते जर असं म्हणाले असते,
-
14:38 - 14:43"जर तुम्ही अशी व्यक्ती असाल
जिला पूर्ण नियंत्रण आवडते -
14:43 - 14:46आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर,
-
14:46 - 14:49तुमच्यासाठी आमच्याकडे एक उत्पादन आहे.
-
14:49 - 14:51ते प्रक्षेपण थांबवतं, जाहिराती वगळतं,
-
14:51 - 14:53तुमच्या आवडी लक्षात
ठेवतं इत्यादी इत्यादी" -
14:54 - 14:56लोक तुमच्या कृतीला मोल देत
नाहीत;तिच्या हेतुला देतात. -
14:56 - 15:00आणि तुम्ही काय करता हे तुमचा
कशावर विश्वास आहे हे सिद्ध करतं. -
15:01 - 15:05आता नावीन्यतेच्या प्रसरणाच्या नियमाचे
मी एक यशस्वी उदाहरण देतो. -
15:06 - 15:09१९६३ च्या उन्हाळ्यात,
-
15:09 - 15:13वॊशिंग्टनच्या एका मोठ्या पटांगणात
२,५०,००० लोक जमले होते -
15:13 - 15:15डॉ. किंग यांचं भाषण ऐकण्यासाठी.
-
15:16 - 15:19त्यांनी कुठलंही निमंत्रण दिलं नव्हतं,
-
15:19 - 15:22आणि तारीख पडताळण्यासाठी कुठलं
संकेतस्थळ नव्हतं. -
15:22 - 15:24तुम्हाला हे कसं जमू शकतं?
-
15:24 - 15:26डॉ. किंग काही अमेरिकेतील
एकमेव व्यक्ती नव्हती -
15:26 - 15:29जी उत्तम वक्ता होती.
-
15:29 - 15:31अमेरिकेतील यातना भोगलेला
एकमेव माणूस नव्हता -
15:31 - 15:33नागरी कायद्याच्या आधीच्या अमेरिकेतील.
-
15:33 - 15:35खरंतर, त्यांच्या काही
कल्पना चांगल्या नव्हत्या. -
15:35 - 15:36पण एक देणगी होती.
-
15:37 - 15:40अमेरिकेत काय बदल होणं गरजेचं आहे
हे ते सगळीकडे सांगत सुटले नाहीत. -
15:40 - 15:43त्यांना काय वाटतं हे
त्यांनी लोकांना सांगितलं. -
15:43 - 15:46"मी मानतो, मी मानतो,
मी मानतो" ते लोकांना म्हणाले. -
15:46 - 15:49आणि ते जे मानतात
ते मानणाऱ्या लोकांनी -
15:49 - 15:52त्यांचं ध्येय घेतलं आणि ते आपलं
मानलं आणि लोकांना सांगितलं. -
15:52 - 15:54आणि त्यांपैकी काही लोकांनी रचना तयार केली
-
15:54 - 15:57अधिक लोकांपर्यंत तो शब्द पोहोचवण्यासाठी.
-
15:57 - 16:00आणि बघा, २,५०,००० लोक जमले
-
16:00 - 16:04ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी
त्यांचं भाषण ऐकण्यासाठी. -
16:05 - 16:08त्यांच्यासाठी म्हणून किती जण आले होते?
-
16:09 - 16:10शून्य.
-
16:11 - 16:13ते स्वतःसाठी आले होते.
-
16:13 - 16:16अमेरिकेबद्दल त्यांना जे वाटत होतं
-
16:16 - 16:18त्याने त्यांना बसचा
प्रवास करवून खेचून आणलं -
16:18 - 16:21ऑगस्ट महिन्याच्या ऐन मध्यात
वॊशिंग्टनमध्ये भर उन्हात उभं केलं. -
16:21 - 16:24ते जे मानत होते ते हे होतं व
काळे विरुद्ध गोरे नव्हतं: -
16:24 - 16:26२५% श्रोते श्वेतवर्णीय होते.
-
16:27 - 16:31डॉ. किंग यांचा असा विश्वास होता कि
या जगात दोन प्रकारचे कायदे आहेत: -
16:31 - 16:35एक जे विधात्याने बनवलेले आहेत आणि
दुसरे जे माणसांनी बनवलेले आहेत. -
16:35 - 16:38आणि जोपर्यंत माणसांनी बनवलेले कायदे
-
16:38 - 16:41विधात्याने बनवलेल्या कायद्यांशी
सुसंगत होत नाहीत तोपर्यंत -
16:41 - 16:43आपण न्याय्य जगात राहत नसतो.
-
16:43 - 16:45नागरी हक्काची चळवळ हे एक केवळ निमित्त
-
16:45 - 16:49झालं त्यांचं ध्येय जीवित करण्यासाठी.
-
16:49 - 16:52आपण अनुसरण केलं, त्यांच्यासाठी
नव्हे तर आपल्या स्वतःसाठी. -
16:52 - 16:54बरं त्यांनी "माझं एक स्वप्न आहे"
हे भाषण दिलं, -
16:54 - 16:56"माझी एक योजना आहे" असं नाही.
-
16:56 - 17:00(हशा)
-
17:00 - 17:03आता राजकारण्यांची १२ मुद्द्यांची
सर्वसमावेशक योजना ऐका. -
17:03 - 17:05ते कोणालाही प्रेरीत करत नाहीत.
-
17:05 - 17:08कारण काही नेते असतात आणि
काही जे नेतृत्व करतात. -
17:08 - 17:12नेते सामर्थ्य आणि अधिकाराचा वापर करतात,
-
17:12 - 17:15पण जे नेतृत्व करतात ते प्रेरणा देतात.
-
17:17 - 17:19त्या व्यक्ती असतील किंवा संघटना असतील,
-
17:19 - 17:22नेतृत्व करणाऱ्यांच्या मागे आपण
जातो, ते जावं लागतं म्हणून नव्हे, -
17:22 - 17:24तर आपल्याला जावंसं वाटतं म्हणून.
-
17:25 - 17:29जे नेतृत्व करतात त्यांचं अनुसरण आपण
करतो, त्यांच्यासाठी नव्हे, तर स्वतःसाठी. -
17:30 - 17:33आणि जे "का" ने सुरुवात करतात,
-
17:33 - 17:38त्यांच्यातच सभोवतालच्या लोकांना
प्रेरीत करण्याची क्षमता असते -
17:38 - 17:40किंवा ते त्यांना प्रेरीत करू
शकणाऱ्यांना शोधतात. -
17:41 - 17:42आपला खूप आभारी आहे.
-
17:42 - 17:44(टाळ्या)
- Title:
- महान नेते कृती करण्यास कसे प्रेरित करतात
- Speaker:
- सायमन सिनेक
- Description:
-
एक सुवर्ण वर्तुळ आणि "का?" या प्रश्नाने सुरु होणारी सायमन सिनेक यांची प्रेरणादायी नेतृत्वावरची एक साधी पण सामर्थ्यवान अशी प्रतिकृती आहे. त्यांची उदाहरणं म्हणजे ऍपल, मार्टिन ल्युथर किंग आणि राईट बंधू -- आणि विरुद्ध मुद्दा म्हणून टिव्हो, जी (नुकत्याच मिळवलेल्या न्यायालयीन विजयामुळे जिच्या शेअरची किंमत तिप्पट झाली) अडखळताना दिसते.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 17:44
Abhinav Garule edited Marathi subtitles for How great leaders inspire action | ||
Abhinav Garule approved Marathi subtitles for How great leaders inspire action | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How great leaders inspire action | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for How great leaders inspire action | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How great leaders inspire action | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How great leaders inspire action | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for How great leaders inspire action | ||
Amol Terkar edited Marathi subtitles for How great leaders inspire action |