-
मी आठवीत असताना प्रोग्रॅमिंग शिकलो.
-
मी आधी हिरवं वर्तुळ काढायला शिकले
-
आणि स्क्रीनवर एक लाल चौरस दिसला.
-
आपण फक्त हे धडे शिकतो आणि ते फार नसतात,
-
आणि मग अशी वेळ येते की आपण जवळ जवळ
काय पाहिजे ते करू शकतो.
-
कॉम्प्युटर सायन्स म्हणजे फक्त कॉम्प्युटर कसा
काम करतो आणि कसा विचार करतो, हे शिकणं.
-
मग आपण त्याला नवीन गोष्टी करायला
शिकवू शकतो.
-
हल्ली कॉम्प्युटर सायन्समध्ये आपण अनेक अद्भुत
गोष्टी करू शकतो.
-
मला वाटतं, ही सुपर पॉवरच्या सगळ्यात
जवळची गोष्ट आहे .
-
(तान्या: कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थिनी) पुढच्या
तासाभरात आपण एक गेम खेळणार आहोत
-
त्यातून तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या मूलभूत
संकल्पना शिकाल.
-
सामान्यपणे प्रोग्रॅमिंगमध्ये सगळं टेक्स्ट असतं
पण आपण ब्लॉकली वापरणार आहोत,
-
यामध्ये व्हिज्युअल ब्लॉक्स वापरले आहेत.
ते ओढून आणि सोडून आपण प्रोग्रॅम्स लिहू शकतो.
-
त्यात तुम्ही खरंतर कोडच तयार करत असता.
-
सुरुवातीला आपण एका प्रोग्रॅमचा कोड
लिहीणार आहोत, तो वापरून
-
हा अँग्री बर्ड या चक्रव्यूहामध्ये जाईल आणि
त्याची अंडी चोरणाऱ्या दुष्ट डुकराला पकडेल.
-
ब्लॉकलीचे तीन मुख्य भाग आहेत.
-
डावीकडे बर्डचा चक्रव्यूह आहे, इथे तुमचा
प्रोग्रॅम रन होईल.
-
प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना
चक्रव्यूहाखाली दिलेल्या आहेत.
-
मधला भाग म्हणजे टूलबॉक्स.
-
आणि यातला प्रत्येक ब्लॉक म्हणजे एक कमांड
आहे, जी बर्डला समजू शकते.
-
उजवीकडचा पांढरा भाग म्हणजे वर्कस्पेस.
-
आणि इथे आपण आपला प्रोग्रॅम
तयार करणार आहोत.
-
मी "move" ब्लॉक वर्कस्पेसमध्ये ओढला
आणि "run" बटण दाबले, तर काय होतं?
-
बर्ड ग्रीडवर एक बॉक्स पुढे जातो.
-
आणि एक बॉक्स पुढे गेल्यावर मला बर्डला
काही करायला लावायचं असेल तर?
-
मी आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक
ब्लॉक जोडू शकते.
-
मी "turn right" ब्लॉक निवडणार आहे
आणि तो माझ्या "move" ब्लॉकखाली
-
ओढणार आहे , पिवळा बाण येईपर्यंत
-
आणि मग मी तो सोडून देईन आणि दोन्ही ब्लॉक्स
एकमेकांना जोडले जातील.
-
मी पुन्हा "run" दाबल्यावर, बर्ड
स्टॅकमधल्या कमांड्स वर ते खाली
-
या क्रमाने आपल्या वर्कस्पेसमध्ये करेल.
-
जर तुम्हाला कधी ब्लॉक काढून टाकायचा
असेल तर
-
तो स्टॅकमधून काढून ट्रॅश कॅनमध्ये टाका.
-
"run" बटण दाबल्यावर, तुम्ही नेहमी "reset"
बटण दाबून बर्डला पुन्हा सुरुवातीला नेऊ शकता.
-
चला, आता त्या डुकरांना पकडूया!