नॅनोटेक्नॉलॉजीतील पुढचं पाऊल.
-
0:01 - 0:04एक शिल्पकार छिन्नी चालवून
एखादी मूर्ती घडवतो आहे, -
0:04 - 0:06अशी कल्पना करा.
-
0:06 - 0:09मायकेलअँजेलोने याचं सुंदर वर्णन केलं आहे.
तो म्हणतो, -
0:09 - 0:12दगडाच्या प्रत्येक तुकड्यात
एक मूर्ती दडलेली असते. -
0:12 - 0:15ती शोधणं हेच शिल्पकाराचं काम.
-
0:15 - 0:18पण हेच काम त्याने
विरुद्ध दिशेकडून केलं तर? -
0:18 - 0:20कामाची सुरुवात दगडापासून न करता,
-
0:20 - 0:21धुळीच्या ढिगाऱ्यापासून केली तर?
-
0:21 - 0:26धुळीचे कोट्यवधी कण एकत्र चिकटवून
मूर्ती घडवली तर? -
0:26 - 0:27खुळचट कल्पना.. ठाऊक आहे मला.
-
0:27 - 0:29आणि कदाचित अशक्य कोटीतलीही.
-
0:29 - 0:32धुळीपासून मूर्ती बनवण्याचा एकच मार्ग आहे.
-
0:32 - 0:34मूर्तीनेच स्वतःला घडविणे.
-
0:34 - 0:38आपण त्या कोट्यवधी धूलिकणांना
जबरदस्तीने एकत्र यायला भाग पाडू शकलो -
0:38 - 0:40तरच ही मूर्ती घडेल.
-
0:40 - 0:42ऐकायला विचित्र वाटेल, पण
-
0:42 - 0:46मी माझ्या प्रयोगशाळेत अगदी
अशाच प्रकारच्या प्रश्नावर काम करतो. -
0:46 - 0:47मी दगड वापरत नाही.
-
0:47 - 0:49अतिसूक्ष्म पदार्थ वापरतो.
-
0:49 - 0:53हे अद्भुत पदार्थ अशक्य वाटतील इतके
सूक्ष्म असतात. -
0:53 - 0:57इतके सूक्ष्म, की हा कंट्रोलर म्हणजे जर
एक अतिसूक्ष्म कण मानला, -
0:57 - 1:00तर मानवी केसाचा आकार,
ही खोली भरून टाकण्याइतका असेल. -
1:00 - 1:02हे कण म्हणजे
नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्राचा गाभा आहे. -
1:02 - 1:04याविषयी आपण सर्वांनी ऐकलंच असेल.
-
1:04 - 1:08त्यामुळे कसं जग बदलून जाणार आहे, तेही.
-
1:08 - 1:09माझ्या पदव्युत्तर शिक्षणाचा काळ
-
1:09 - 1:13हा नॅनोटेक्नॉलॉजीत काम करणाऱ्यांसाठी
सर्वात मनोहर काळ होता. -
1:13 - 1:16अत्यंत महत्त्वाचे शोध सतत लागत होते.
-
1:16 - 1:17परिषदा गजबजून जात होत्या.
-
1:17 - 1:20संस्था संशोधनासाठी भरपूर पैसे ओतत होत्या.
-
1:21 - 1:22याचं कारण असं, की
-
1:22 - 1:24जेव्हा पदार्थ अतिशय सूक्ष्म होतो,
-
1:24 - 1:27तेव्हा त्याचं भौतिकशास्त्र
सर्वसाधारण पदार्थांपेक्षा -
1:28 - 1:29निराळं होतं.
-
1:29 - 1:31त्याला क्वांटम मेकॅनिक्स म्हणतात.
-
1:31 - 1:34हे शास्त्र सांगतं, की त्या
सूक्ष्म कणांमध्ये छोटे छोटे बदल करून -
1:34 - 1:36त्यांचे गुणधर्म बदलता येतात.
उदाहरणार्थ, -
1:37 - 1:39त्या कणांमध्ये काही अणु
वाढवणे किंवा कमी करणे, -
1:39 - 1:41अथवा तो पदार्थ वळवणे.
-
1:41 - 1:43म्हणजे हे सर्वोत्कृष्ट साधन झालं.
-
1:43 - 1:46त्यामुळे असं वाटलं, की
आपण काय वाट्टेल ते करू शकतो. -
1:46 - 1:47आणि आम्ही ते करत होतोच.
-
1:47 - 1:50आम्ही, म्हणजे माझ्या वेळच्या
पदव्युत्तर विद्यार्थ्यांची पिढी. -
1:50 - 1:54आम्ही ते अतिसूक्ष्म कण वापरून वेगवान
संगणक बनवण्याचा प्रयत्न करीत होतो. -
1:54 - 1:55आम्ही "क्वांटम डॉट्स" बनवीत होतो,
-
1:55 - 1:59जे भविष्यकाळात शरीरात जाऊन
रोग शोधून तो बरा करतील, असे. -
1:59 - 2:02काही शास्त्रज्ञ कार्बन नॅनोट्यूब्सपासून
अवकाशात जाणारा एलिव्हेटर -
2:02 - 2:03करू पाहात होते.
-
2:04 - 2:06खरं सांगतोय. हवं तर शोधून पहा.
-
2:07 - 2:09आम्हांला वाटलं होतं, की
याचा परिणाम -
2:09 - 2:12संगणकापासून औषधांपर्यंत
सर्व विज्ञान, तंत्रज्ञानांवर होईल. -
2:12 - 2:13आणि आता कबुली देतो, की
-
2:13 - 2:15मी यावर डोळे झाकून विश्वास ठेवला.
-
2:15 - 2:18अगदी पूर्णपणे.
-
2:19 - 2:20पण ही झाली १५ वर्षांपूर्वीची गोष्ट.
-
2:21 - 2:22आणि
-
2:22 - 2:25खूप महत्त्वाचं, विलक्षण
कार्य या शास्त्रात घडलं. -
2:25 - 2:26आपण खूप काही शिकलो.
-
2:26 - 2:30पण आम्ही त्या शास्त्राचं रूपांतर करून,
लोकांना खरोखर उपयोगी ठरेल -
2:30 - 2:33असं नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकलो नाही.
-
2:33 - 2:35कारण हे अतिसूक्ष्म पदार्थ म्हणजे
-
2:36 - 2:37जणु दुधारी तलवार असते.
-
2:37 - 2:39त्यांच्या अतिसूक्ष्म आकारामुळे त्यांना
-
2:39 - 2:41महत्त्व प्राप्त होतं खरं,
-
2:41 - 2:43पण त्यामुळेच त्यांच्यावर काम करणं
अशक्य होतं. -
2:43 - 2:47हे अक्षरश: धुळीच्या ढिगाऱ्यापासून
मूर्ती घडवण्यासारखं आहे. -
2:47 - 2:51त्यांच्यावर काम करण्यासाठी तितकीच सूक्ष्म
साधनं हवीत, ती आपल्याजवळ नाहीत. -
2:51 - 2:53आणि ती जरी असली, तरी
फारसा फरक पडणार नाही. -
2:53 - 2:57कारण एक एक करून धुळीचे
कोट्यवधी कण एकत्र आणल्याने -
2:57 - 2:58तंत्रज्ञान तयार होत नाही.
-
2:59 - 3:00त्यामुळेच,
-
3:00 - 3:02ती सगळी आश्वासनं आणि तो उत्साह
-
3:02 - 3:05तिथल्यातिथेच राहिला.
-
3:05 - 3:07रोगांचा सामना करणारे नॅनोबॉट्स आले नाहीत,
-
3:07 - 3:09आणि अवकाशात जाणारे
एलिव्हेटर्ससुद्धा नाहीत. -
3:09 - 3:13किंवा माझ्या आवडीचे
नवीन संगणकही नाहीत. -
3:13 - 3:16हे शेवटचं सर्वात महत्त्वाचं आहे.
-
3:16 - 3:17संगणकशास्त्रात सतत
-
3:17 - 3:21वेगाने प्रगती होत राहणार,
अशी अपेक्षा आपण बाळगू लागलो आहोत. -
3:21 - 3:23या आधारावर आपण अखंड अर्थव्यवस्था
निर्माण केल्या आहेत. -
3:23 - 3:25संगणकाच्या एका चिपवर
-
3:25 - 3:28अधिकाधिक साधनं सामावण्याच्या
आपल्या क्षमतेमुळेच -
3:28 - 3:29ही प्रगती वेगाने होत आहे.
-
3:29 - 3:31ही साधनं जसजशी सूक्ष्म होत जातात,
-
3:31 - 3:33तसतशी ती जास्त जलद चालतात,
कमी ऊर्जा वापरतात, -
3:34 - 3:35आणि स्वस्तही होतात.
-
3:35 - 3:40या तीन गोष्टींच्या संगमामुळे प्रगतीला
असा अविश्वसनीय वेग येतो. -
3:40 - 3:41उदाहरणार्थ,
-
3:41 - 3:46समजा, मी तीन माणसांना चंद्रावर नेऊन
परत आणणारा, खोलीभर आकाराचा, -
3:46 - 3:48जगातला एकेकाळचा सर्वोत्कृष्ट
असा संगणक घेतला, -
3:48 - 3:52आणि त्यावर दाब देऊन तो
-
3:52 - 3:54स्मार्टफोनच्या आकाराचा केला.
-
3:54 - 3:56खऱ्या स्मार्टफोनसारखा,
-
3:56 - 3:59जो आपण ३०० डॉलर्सना घेतो
आणि दर दोन वर्षांनी फेकतो, तसा. -
3:59 - 4:01तर तो दाबून लहान केलेला संगणक निकामी होईल.
-
4:01 - 4:03स्मार्टफोन जे करु शकतो,
-
4:03 - 4:05त्यातलं काहीच तो करू शकणार नाही.
-
4:05 - 4:07तो अगदी संथ होईल.
-
4:07 - 4:09त्यावर आपण काहीही माहिती
साठवू शकणार नाही. -
4:09 - 4:11नशीब जोरावर असेल, तर
"वॉकिंग डेड" मालिकेच्या -
4:12 - 4:14एखाद्या भागातली पहिली दोन मिनिटं बघू शकू.
-
4:14 - 4:15(हशा)
-
4:15 - 4:17ही प्रगती हळू क्रमाक्रमाने होत नाही.
-
4:17 - 4:19ती सतत होत राहते आणि
-
4:19 - 4:20घातांकी प्रकाराने वाढते.
-
4:20 - 4:22तिची वाढ चक्रवाढ दराने होत राहते.
-
4:22 - 4:24इतकी, की तंत्रज्ञानाच्या
जुन्या आणि नव्या -
4:25 - 4:26पिढ्यांची तुलना केली असता,
-
4:26 - 4:28त्यांच्यात काहीच साम्य आढळत नाही.
-
4:28 - 4:31ही प्रगती अशीच पुढे नेण्याची जबाबदारी
आपल्यावर आहे. -
4:31 - 4:34आजपासून १०, २०, ३० वर्षांनंतर आपल्याला
म्हणता यायला हवं, की -
4:35 - 4:37बघा, गेल्या ३० वर्षांत आम्ही काय केलं.
-
4:37 - 4:40पण तरीही आपण जाणतो, की
ही प्रगती कायम टिकणार नाही. -
4:40 - 4:42खरं तर, आता तिचा भर ओसरू लागला आहे.
-
4:42 - 4:44जणु बार बंद होण्यापूर्वी
पिण्याची शेवटची संधी. -
4:44 - 4:46खोलवर जाऊन
-
4:46 - 4:49वेग, कार्य अशा प्रकारचे निकष लावून पाहिलं,
-
4:49 - 4:51तर प्रगती मंद होत होत
जवळपास थांबलेलीच दिसेल. -
4:52 - 4:54ही प्रगती जर अशीच सुरु ठेवायची असेल,
-
4:54 - 4:56तर पूर्वी जे करत होतो, तेच
करत राहायला हवं. -
4:56 - 4:58नवनिर्मिती.
-
4:58 - 5:00आमच्या गटाचं ध्येय आहे,
-
5:00 - 5:03कार्बन नॅनोट्यूब्स वापरून
नवनिर्मिती करणे. -
5:03 - 5:07कारण त्याद्वारे प्रगतीच्या मार्गावर
वाटचाल होत राहील, असं आम्हाला वाटतं. -
5:07 - 5:08नावाप्रमाणेच,
-
5:08 - 5:11त्या कार्बन अणुंच्या
सूक्ष्म, पोकळ नळ्या असतात. -
5:11 - 5:14त्यांच्या सूक्ष्म आकारामुळे
-
5:14 - 5:17त्यांचे इलेक्ट्रॉनिक गुणधर्म
उत्कृष्ट असतात. -
5:17 - 5:21शास्त्र सांगतं, की आपण जर त्यांना
संगणकांमध्ये वापरू शकलो, -
5:21 - 5:24तर त्यांची कार्यक्षमता दहा पटींनी वाढेल.
-
5:24 - 5:28जणु एकाच पावलात तंत्रज्ञानाच्या
अनेक पिढ्या ओलांडल्या जातील. -
5:29 - 5:30तर असं पहा,
-
5:30 - 5:32आपल्याजवळ एक महत्त्वाची समस्या आहे,
-
5:32 - 5:35आणि त्यावरचं आदर्श उत्तर आहे.
-
5:35 - 5:36शास्त्र ओरडून सांगतं आहे,
-
5:36 - 5:39"ही समस्या अशी सोडवा"
-
5:41 - 5:43ठीक आहे तर मग, तसंच करू.
-
5:43 - 5:44काम सुरु करू.
-
5:44 - 5:47पण इथे पुन्हा ती दुधारी तलवार आडवी येते.
-
5:47 - 5:51त्या आदर्श उत्तरात आहेत
वापरायला अशक्य असणारे पदार्थ. -
5:51 - 5:55संगणकाची एक चिप बनवायला
त्याचे कोट्यवधी कण रचावे लागतील. -
5:55 - 5:59म्हणजे जे कोडं समस्येत,
तेच उत्तरात पुन्हा आलं. -
5:59 - 6:01या ठिकाणी आम्ही ठरवलं, "आता पुरे."
-
6:01 - 6:03पुन्हा त्याच रस्त्याने जाणं नको.
-
6:03 - 6:06काय चुकलं ते पाहू.
-
6:06 - 6:07काय लक्षात घेतलं नव्हतं?
-
6:07 - 6:09काय करायचं बाकी आहे?
-
6:09 - 6:11"गॉडफादर" सारखं.
-
6:11 - 6:14फ्रेडो आपल्या भावाचा,
मायकलचा विश्वासघात करतो, -
6:14 - 6:15तेव्हा आपल्याला कळतं, की
-
6:15 - 6:17फ्रेडोला मारायला हवं.
-
6:17 - 6:18(हशा)
-
6:18 - 6:20पण मायकल लगेच तसं करत नाही.
-
6:20 - 6:21ठीक आहे, कळतं मला,
-
6:21 - 6:23त्यांची आई अद्याप हयात होती,
तिला दुःख झालं असतं. -
6:23 - 6:25आम्ही विचार केला,
-
6:25 - 6:27आमच्या समस्येतला फ्रेडो कोण?
-
6:27 - 6:29आपण कुठे दुर्लक्ष करत आहोत?
-
6:29 - 6:30काय करायचं बाकी आहे?
-
6:30 - 6:33यशासाठी आणखी काय करायला हवं?
-
6:33 - 6:37आणि याचं उत्तर म्हणजे,
मूर्तीने स्वतःला घडवायला हवं. -
6:37 - 6:39कसंही करून
-
6:39 - 6:43त्या कोट्यवधी कणांना
त्या तंत्रज्ञानात एकत्र यायला -
6:43 - 6:46भाग पाडायला हवं.
-
6:46 - 6:50ते आपण करू शकत नाही,
ते त्यांचं त्यांनीच करायला हवं. -
6:50 - 6:53कठीण असला, तरी
-
6:53 - 6:56हाच एक मार्ग आहे.
-
6:56 - 6:59आता समजतंय की हा प्रश्न काही नवीन नाही.
-
7:00 - 7:01फक्त, आपण अशा तऱ्हेने
-
7:01 - 7:03कोणतीच रचना करत नाही.
-
7:03 - 7:07पण सभोवती पाहिलं, तर
-
7:07 - 7:10निसर्ग सगळ्या गोष्टी अशाच घडवतो.
-
7:10 - 7:12सगळं विरुद्ध दिशेने घडवलं जातं.
-
7:12 - 7:13समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पहा,
-
7:14 - 7:17तिथे तुम्हांला छोटे प्राणी सापडतील,
जे प्रथिनं वापरतात. -
7:17 - 7:18म्हणजे रेणू वापरतात,
-
7:18 - 7:20आणि समुद्रातून घेतलेल्या रेतीपासून
-
7:20 - 7:21विविधतेने नटलेल्या
-
7:22 - 7:25सुरेख रचना निर्माण करतात.
-
7:25 - 7:28निसर्ग आपल्यासारखा
नुसतीच छिन्नी चालवत नाही. -
7:28 - 7:29तो सुबक, अर्थपूर्ण काम करतो.
-
7:29 - 7:32तो उपलब्ध घटक वापरून, एक एक रेणू करीत
-
7:32 - 7:34अशा विविध प्रकारच्या
गुंतागुंतीच्या रचना रचतो -
7:34 - 7:36की त्यांच्या जवळपास आपण पोहोचू शकत नाही.
-
7:37 - 7:39निसर्ग अतिसूक्ष्म पातळीवर आहे.
-
7:39 - 7:42कोट्यवधी वर्षं तो त्या पातळीवर आहे.
-
7:42 - 7:44आपण तिथे उशिरा पोहोचलो आहोत.
-
7:44 - 7:48म्हणून आम्ही ठरवलं, की
निसर्ग वापरतो तेच साधन वापरायचं. -
7:48 - 7:50म्हणजे, रसायनशास्त्र.
-
7:50 - 7:51अजून दडून राहिलेलं साधन.
-
7:51 - 7:54या बाबतीत रसायनशास्त्र उपयोगी पडतं, कारण
-
7:54 - 7:57ते अतिसूक्ष्म कण
साधारण रेणुंच्या आकाराचे असतात. -
7:57 - 8:00त्यामुळे त्या कणांना गती देण्यासाठी
रेणू वापरता येतात. -
8:00 - 8:01साधन म्हणून.
-
8:02 - 8:04आमच्या प्रयोगशाळेत आम्ही नेमकं हेच केलं.
-
8:04 - 8:07त्या अतिसूक्ष्म कणांच्या ढिगामध्ये जाणारं
आणि तिथले -
8:07 - 8:09नेमके हवे ते कण ओढून घेणारं
-
8:09 - 8:11रसायनशास्त्र आम्ही विकसित केलं आहे.
-
8:11 - 8:15आता आम्ही रसायनशास्त्र वापरून,
ते कोट्यवधी कण हवे तसे रचून -
8:15 - 8:17सर्किट्स बनवू शकतो.
-
8:17 - 8:19या क्षमतेमुळेच
-
8:19 - 8:21यापूर्वीच्या अतिसूक्ष्म कणांच्या
सर्किट्सपेक्षा -
8:21 - 8:24आमच्या सर्किट्सचा वेग अनेकपट जास्त आहे.
-
8:24 - 8:26रसायनशास्त्र हे हत्यार
-
8:26 - 8:30दिवसागणिक जास्त बिनचूक
आणि धारदार होत जातं. -
8:30 - 8:31काही वर्षांतच आम्ही
-
8:31 - 8:33आमची मूळ आश्वासनं पूर्ण करू शकू,
-
8:33 - 8:37अशी आम्हांला आशा वाटते.
-
8:37 - 8:39संगणक हे केवळ एक उदाहरण झालं.
-
8:39 - 8:42त्याची मला आवड आहे,
आणि आमचा गट त्यावर काम करतो. -
8:42 - 8:46पण इतर अनेक क्षेत्रांतली उदाहरणं आहेत,
शाश्वत ऊर्जा, वैद्यकीय, -
8:46 - 8:48रचना करण्यासाठी कच्चा माल.
-
8:48 - 8:51या सर्वांत शास्त्र सांगणार आहे,
नॅनोचा मार्ग स्वीकारा. -
8:51 - 8:53तो सर्वात फायदेशीर आहे.
-
8:54 - 8:55पण त्या मार्गाने जायचं असेल,
-
8:55 - 8:59तर वैज्ञानिकांना,
मी वर्णन केलं होतं त्यासारख्या -
8:59 - 9:01नवीन साधनांची गरज भासणार आहे.
-
9:01 - 9:05रसायनशास्त्राची गरज भासणार आहे.
-
9:05 - 9:08विज्ञानातलं सौंदर्य पहा,
एकदा ही साधनं विकसित झाली, -
9:08 - 9:10की ती कायमच उपलब्ध असतात.
-
9:10 - 9:11कोणीही, कुठेही
-
9:11 - 9:14ती घेऊन वापरू शकतो,
-
9:14 - 9:17आणि नॅनोटेक्नॉलॉजीचं आश्वासन पुरं करायला
हातभार लावू शकतो. -
9:17 - 9:20मला इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
मी आपला आभारी आहे. -
9:20 - 9:22(टाळ्या)
- Title:
- नॅनोटेक्नॉलॉजीतील पुढचं पाऊल.
- Speaker:
- जॉर्ज टुलेवस्की
- Description:
-
दरवर्षी संगणकातली सिलिकॉन चिप आकाराने अर्धी होते आणि तिची शक्ती दुपटीने वाढते. त्यामुळे आपली साधनं नेआण करायला आणि वापरायला सोपी होत जातात. पण एका मर्यादेनंतर चिपचा आकार कमी होऊच शकत नाही, तेव्हा पुढे काय? जॉर्ज टुलेवस्की यांनी अतिसूक्ष्म पदार्थांच्या अज्ञात जगावर संशोधन केलं आहे. त्यांचं सध्याचं काम आहे रासायनिक प्रक्रियांवर. या प्रक्रिया कोट्यवधी कार्बन नॅनोट्यूब्सना एकत्र यायला लावतात. आणि निसर्गातले सजीव जसे गुंतागुंतीच्या विविध सुबक रचना करतात, तशाच प्रकारे सर्किट्स बनवायला भाग पाडतात. यातच संगणकाच्या पुढच्या पिढीचं रहस्य दडलं असेल काय?
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 09:35
![]() |
Helene Batt edited Marathi subtitles for The next step in nanotechnology | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for The next step in nanotechnology | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for The next step in nanotechnology | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for The next step in nanotechnology | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for The next step in nanotechnology | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for The next step in nanotechnology | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for The next step in nanotechnology | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for The next step in nanotechnology |