-
आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की,
-
वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल-करण्यायोग्य आहे.
-
लाखो बहिऱ्या(श्रवणदोष असणाऱ्या) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे.
-
चित्रफीत(व्हिडीओ)कर्ते आणि संकेतस्थळे(वेबसाईटस्) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.
-
सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत(search) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक(Rankings) मिळतात.
-
युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते.
-
वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या, त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर (submit) करा.
-
आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित(टाईप) करा.
-
त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा.
-
झालं-आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत(कोड) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता.
-
त्या वेळी, प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात.
-
आम्ही यूट्यूब, ब्लीप, टीव्ही, यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो.
-
शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो.
-
युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते.
-
जसे की, एमपी-४, थिओरा, वेबएम आणि एचटीएमएल -५ च्या पुढे
-
वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं
-
त्यामुळे, कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो, तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल.