< Return to Video

स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोध

  • 0:01 - 0:11
    मूल जन्माला येते
  • 0:11 - 0:16
    आणि बर्याच काळासाठी
  • 0:16 - 0:21
    ते फक्त एक ग्राहक असते.
  • 0:21 - 0:33
    ते प्रत्यक्ष सहयोगी होऊ शकत नाही.
  • 0:33 - 0:35
    ते असहाय्य असते.
  • 0:35 - 0:38
    त्याला स्वतःचे अस्तित्व स्वतः राखता येत नाही,
  • 0:38 - 0:53
    जगण्याचे सहजज्ञान जन्मतःच मिळूनदेखील.
  • 0:53 - 1:09
    त्याला जगण्यासाठी आईची किंवा पालनकर्त्याची मदत घ्यावी लागते.
  • 1:09 - 1:22
    ते आपल्या पालनकर्त्यावर संशय घेऊ शकत नाही.
  • 1:22 - 1:27
    त्याला पूर्णपणे आत्मसमर्पण करावे लागते.
  • 1:27 - 1:32
    जसे शस्त्रक्रियेपूर्वी आपण स्वतःला भूलतज्ञाच्या हवाली करतो.
  • 1:32 - 1:38
    त्याला संपूर्ण समर्पण करावेच लागते.
  • 1:38 - 1:48
    त्यामधून विश्वासाची भावना सूचित होते.
  • 1:48 - 1:55
    अशी भावना असते की ही विश्वासू व्यक्ती
  • 1:55 - 1:58
    आपला विश्वासघात करणार नाही.
  • 1:58 - 2:03
    जसजसे मूल मोठे होत जाते,
  • 2:03 - 2:07
    त्याच्या लक्षात येऊ लागते
  • 2:07 - 2:13
    की ही विश्वासू व्यक्ती आपल्या विश्वासाला धक्का पोचवत आहे.
  • 2:13 - 2:18
    त्याला विश्वासघात हा शब्ददेखील माहिती नसतो.
  • 2:18 - 2:24
    त्यामुळे, ते स्वतःला दोष देते.
  • 2:24 - 2:27
    हा निःशब्द आत्मदोष असतो.
  • 2:27 - 2:39
    ज्याचे निराकरण करणे अतिशय अवघड असते,
  • 2:39 - 2:45
    असा निःशब्द आत्मदोष.
  • 2:45 - 2:50
    ते मूल आता वयात येऊ लागते.
  • 2:50 - 2:54
    आतापर्यंत ते फक्त एक ग्राहक होते.
  • 2:54 - 2:57
    परंतु मानवाची खरी वाढ
  • 2:57 - 3:07
    त्याच्या सहयोग क्षमतेमध्ये आहे,
  • 3:07 - 3:11
    त्याच्या सहयोगी, सहभागी होण्यामध्ये आहे.
  • 3:11 - 3:17
    त्याचा सहभाग तोपर्यंत शक्य नाही, जोपर्यंत त्याला सुरक्षित वाटत नाही,
  • 3:17 - 3:20
    मुक्त वाटत नाही,
  • 3:20 - 3:26
    किंवा माझ्याकडे देण्यासाठी खूप काही आहे असे वाटत नाही.
  • 3:26 - 3:30
    संवेदनशील होणे म्हणजे चेष्टा नव्हे.
  • 3:30 - 3:33
    वाटते तितके ते सोपे नाही.
  • 3:33 - 3:40
    त्यासाठी स्वतःची विशालता ओळखावी लागते.
  • 3:40 - 3:43
    ही विशालता स्वकेंद्रीत असावी लागते.
  • 3:43 - 3:46
    ना संपत्तीवर,
  • 3:46 - 3:50
    ना सत्तेवर,
  • 3:50 - 3:58
    ना तुमच्या समाजातील प्रतिष्ठेवर,
  • 3:58 - 4:03
    तर ती केंद्रीत असावी लागते स्वतःवर.
  • 4:03 - 4:07
    तुम्ही स्वतः, तुमचा आत्मबोध.
  • 4:07 - 4:14
    या 'स्व'वर ती महानता, ते पूर्णत्व केंद्रीत करावे लागते.
  • 4:14 - 4:21
    अन्यथा, अनुकंपा हा केवळ एक शब्द उरेल, आणि न पूर्ण होणारे स्वप्न.
  • 4:24 - 4:29
    तुम्ही कधी कधीच संवेदनशील होऊ शकता,
  • 4:29 - 4:33
    सहानुभूतीने अधिक भावनिक होऊन
  • 4:33 - 4:40
    अनुकंपेपेक्षा.
  • 4:40 - 4:44
    सुदैवाने आपण सारे सहानुभूतीपूर्वक विचार करु शकतो.
  • 4:44 - 4:49
    कुणीतरी दुःखी असेल, तर आपणही त्याच्या दुःखात सहभागी होतो.
  • 4:49 - 4:56
    एखाद्या विम्बल्डनच्या स्पर्धेत, अंतिम सामन्यात,
  • 4:56 - 4:59
    दोन प्रतिस्पर्धी समोरासमोर उभे ठाकतात.
  • 4:59 - 5:04
    प्रत्येकाकडे दोन डाव असतात.
  • 5:04 - 5:07
    तो कोणाचाही डाव असू शकतो.
  • 5:07 - 5:14
    त्यांनी आत्तापर्यंत गाळलेल्या घामाला काही अर्थ उरत नाही.
  • 5:14 - 5:20
    कारण शेवटी एकचजण जिंकतो.
  • 5:20 - 5:30
    टेनिसच्या शिष्टाचारानुसार दोन्ही खेळाडूंनी मधल्या जाळीजवळ येऊन
  • 5:30 - 5:35
    हस्तांदोलन करायचे असते.
  • 5:35 - 5:38
    विजेता हवेमध्ये ठोसा मारतो,
  • 5:38 - 5:43
    आणि टेनिस कोर्टाचे चुंबन घेतो,
  • 5:43 - 5:47
    प्रेक्षकांतील कुणीतरी वाट पाहत असल्यागत आपला शर्ट काढून भिरकावतो.
  • 5:47 - 5:50
    (हशा)
  • 5:50 - 5:54
    आता त्याच खेळाडूला मधल्या जाळीकडे जाणे भाग असते.
  • 5:54 - 5:57
    तो जेव्हा त्या जाळीजवळ येतो,
  • 5:57 - 6:02
    तेव्हा त्याच्या चेहर्यावरील भाव पूर्णपणे बदललेले तुम्हाला दिसतील.
  • 6:02 - 6:07
    आपण जिंकायला नको होते असे भाव त्याच्या चेहर्यावर दिसतात.
  • 6:07 - 6:12
    का? सहानुभूती!
  • 6:12 - 6:14
    हा मनुष्य स्वभाव आहे.
  • 6:14 - 6:20
    मानवी हृदय वागविणारा कोणीही ही सहानुभूती नाकारु शकत नाही.
  • 6:20 - 6:26
    कोणताही धर्म मतारोपणाने ती उद्ध्वस्त करु शकत नाही.
  • 6:26 - 6:32
    कोणतीही संस्कृती, कोणतेही राष्ट्र आणि राष्ट्रवाद,
  • 6:32 - 6:35
    कोणीही तिला धक्का पोचवू शकत नाही,
  • 6:35 - 6:38
    अशी ही सहानुभूती आहे.
  • 6:38 - 6:44
    आणि हीच सहानुभूतीची क्षमता
  • 6:44 - 6:52
    म्हणजे तुमचा इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे,
  • 6:52 - 6:57
    ज्यायोगे तुम्ही एखादाच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकता.
  • 6:57 - 7:02
    शब्दांच्या माध्यमातून आणि वेळेच्या माध्यमातूनही.
  • 7:02 - 7:07
    करुणा एका चौकटीत बसवता येत नाही.
  • 7:07 - 7:10
    ही भारतीय करुणा,
  • 7:10 - 7:14
    ती अमेरिकन सहानुभूती, असे वर्गीकरण करता येत नाही.
  • 7:14 - 7:20
    ती देश, लिंग, वय या सर्वांच्या पलिकडे आहे.
  • 7:20 - 7:31
    का? कारण, तिचे अस्तित्व प्रत्येकात आहे.
  • 7:31 - 7:38
    कधी कधी लोकांना तिची जाणीव होते.
  • 7:38 - 7:43
    अशा कधी कधी वाटणार्या करुणेबद्दल
  • 7:43 - 7:47
    आपण बोलत नाही आहोत.
  • 7:47 - 7:50
    ती नेहमीच अशी कधीमधीची असणार नाही.
  • 7:50 - 7:55
    आदेश देऊन तुम्ही एखाद्याला सहानुभूती वाटायला लावू शकत नाही.
  • 7:58 - 8:02
    "कृपा करुन माझ्यावर प्रेम करा," असे तुम्ही म्हणू शकत नाही.
  • 8:02 - 8:05
    प्रेम हे तुम्हाला धुंडाळावे लागते.
  • 8:05 - 8:10
    ती फक्त क्रिया असू शकत नाही.
  • 8:10 - 8:15
    परंतु, इंग्रजी भाषेमध्ये ती एक क्रियादेखील आहे.
  • 8:15 - 8:19
    त्याबद्दल मी नंतर बोलेन.
  • 8:19 - 8:26
    तर आपल्याला अशाप्रकारे पूर्णत्वाचा शोध घ्यायचा आहे.
  • 8:26 - 8:33
    पूर्णत्वाप्रत जाण्याच्या शक्यतेविषयी मी भाष्य करणार आहे,
  • 8:33 - 8:40
    जी आपल्या स्वतःच्या अनुभवांतून निर्माण झालेली आहे, सर्वांच्याच अनुभवातून.
  • 8:40 - 8:49
    अतिशय दुःखीकष्टी आयुष्यातदेखील,
  • 8:49 - 8:59
    खूप थोड्या आणि विरळ क्षणांमध्ये एखाद्याला आनंद वाटतो.
  • 8:59 - 9:02
    आणि जो खूष होऊ शकतो
  • 9:02 - 9:10
    एखाद्या क्षुल्लक विनोदावरसुद्धा
  • 9:10 - 9:19
    तो स्वतःला आणि स्वसमावेशक अशा आजूबाजूच्या परिस्थितीला स्वीकार करत असतो.
  • 9:19 - 9:23
    यामध्ये अखिल विश्वाचा,
  • 9:23 - 9:27
    त्यातील ज्ञात व अज्ञात वस्तूंचा समावेश होतो.
  • 9:27 - 9:33
    या सर्वांचा संपूर्ण स्वीकार केला जातो,
  • 9:33 - 9:39
    याचे कारण तुम्हाला स्वतःमधील पूर्णत्वाचा लागलेला शोध.
  • 9:39 - 9:43
    कर्ता म्हणजे मी
  • 9:43 - 9:46
    व प्रयोजन म्हणजे परिस्थिती,
  • 9:46 - 9:51
    हे एकमेकांत मिसळून जातात,
  • 9:51 - 9:57
    एक असा अनुभव जो "मला कधीच जाणवला नाही," असे कुणीच म्हणू शकत नाही,
  • 9:57 - 10:03
    एक असा अनुभव जो लहान-थोर सर्वांसाठी समान असतो.
  • 10:03 - 10:12
    हा अनुभव सिद्ध करतो की, तुमच्या सर्व मर्यादांसहित,
  • 10:12 - 10:17
    तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा - पूर्ण वा अपूर्ण – सहित, आणि क्रेडीट कार्ड,
  • 10:17 - 10:22
    व टाळेबंदी,
  • 10:22 - 10:26
    तसेच टकलेपणा,
  • 10:26 - 10:30
    या सर्वांसहित, तुम्ही आनंदी राहू शकता.
  • 10:30 - 10:35
    परंतु याचा तर्कसुसंगत विस्तार असा आहे की,
  • 10:35 - 10:41
    आनंदी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची गरज नाही.
  • 10:41 - 10:47
    तुम्हाला हवा असणारा आनंद, तुमचे पूर्णत्व, तुम्ही स्वतःच आहात.
  • 10:47 - 10:49
    यामध्ये आवड-निवडीचा पर्याय नाही.
  • 10:49 - 10:55
    हा तर्क अशी वस्तुस्थिती सिद्ध करतो की,
  • 10:55 - 11:02
    तुमचे पूर्णत्व तुमच्यापासून भिन्न असू शकत नाही,
  • 11:02 - 11:06
    तुमच्यामधून ते वेगळे काढता येत नाही.
  • 11:06 - 11:09
    हे पूर्णत्व म्हणजे तुम्ही स्वतःच असले पाहिजे.
  • 11:09 - 11:12
    तुम्ही या पूर्णत्वाचा फक्त एक अंश असू शकत नाही
  • 11:12 - 11:15
    आणि त्याच वेळी तुम्ही पूर्ण आहात, असेही होऊ शकत नाही.
  • 11:15 - 11:19
    तुमचा सुखाचा प्रत्येक क्षण -
  • 11:19 - 11:24
    ही वस्तुस्थिती, ही जाणीव, ही मान्यता अधोरेखित करतो.
  • 11:24 - 11:27
    कदाचित मीच ते पूर्णत्व आहे.
  • 11:27 - 11:30
    कदाचित स्वामीजींचे बरोबर आहे.
  • 11:30 - 11:41
    कदाचित स्वामीजींचे म्हणणे बरोबर आहे. स्वतःचे आयुष्य नव्याने सुरु करा.
  • 11:41 - 11:47
    मग प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त होईल.
  • 11:47 - 11:51
    आत्मदोषाचे काहीच कारण उरणार नाही.
  • 11:51 - 11:57
    एखाद्याने स्वतःला दोषच द्यायचे ठरवले तर त्याला लक्षावधी कारणे सापडतील.
  • 11:57 - 12:03
    पण मी जर असे म्हटले की, माझे शरीर सीमाबद्ध असून,
  • 12:03 - 12:12
    जर ते कृष्णवर्णीय असेल तर ते श्वेतवर्णीय नसेल, जर गोरे असेल तर काळे नसेल,
  • 12:12 - 12:18
    कसेही बघितले तरी शरीर सीमाबद्धच आहे. मर्यादीत.
  • 12:18 - 12:22
    तुमचे ज्ञान मर्यादीत आहे, आरोग्य सीमाबद्ध आहे,
  • 12:22 - 12:25
    आणि म्हणूनच शक्ती मर्यादीत आहे,
  • 12:25 - 12:30
    आणि उत्साहदेखील मर्यादीतच असणार आहे.
  • 12:30 - 12:33
    करुणा मर्यादीत राहणार आहे.
  • 12:33 - 12:38
    सर्व काही अमर्याद होणार आहे.
  • 12:38 - 12:44
    तुम्ही करुणेवर नियंत्रण मिळवू शकत नाही,
  • 12:44 - 12:48
    जोपर्यंत तुम्ही स्वतःला अमर्याद बनवीत नाही. आणि कोणीही अमर्याद बनू शकत नाही,
  • 12:48 - 12:53
    तुम्ही एकतर आहात किंवा नाहीत. विराम.
  • 12:53 - 13:02
    आणि तुम्ही अमर्याद नसण्याचाही काही मार्ग नाही.
  • 13:02 - 13:12
    तुमचा स्वतःचा अनुभव, कोणत्याही मर्यादेला न जुमानता, तुमचे पूर्णत्व प्रकट करेल.
  • 13:12 - 13:17
    आणि हे पूर्णत्वच तुमचे वास्तव रुप असेल,
  • 13:17 - 13:19
    या विश्वाच्या संबंधात.
  • 13:19 - 13:22
    सर्वात आधी असते प्रेम.
  • 13:22 - 13:24
    जेव्हा तुम्ही या जगाशी जोडले जाता,
  • 13:24 - 13:29
    तेव्हा याच पूर्णत्वाचे प्रेरक प्रकटीकरण असेल,
  • 13:29 - 13:34
    ज्याला आपण म्हणतो, प्रेम.
  • 13:34 - 13:38
    आणि त्याचेच रुपांतर करुणेत होते,
  • 13:38 - 13:49
    जेव्हा तुमच्याशी संबंधित असणारी विषयवस्तू त्या भावनेला आवाहन करते.
  • 13:49 - 13:59
    मग त्याचेच रुपांतर पुढे दातृत्वात व सहभागात होते.
  • 13:59 - 14:05
    तुमची अभिव्यक्ती तुमच्यातील अनुकंपेमुळे येते.
  • 14:05 - 14:11
    अनुकंपा समजून घेण्यासाठी तुम्हाला दयाळू बनावे लागेल.
  • 14:11 - 14:16
    दानाची व सहभागाची क्षमता जाणून घेण्यासाठी
  • 14:16 - 14:18
    तुम्हाला द्यावे लागेल व सहभागी व्हावे लागेल.
  • 14:18 - 14:23
    यासाठी कोणताही आडमार्ग नाही. स्वतः पोहूनच पोहून बघण्यासारखे आहे हे.
  • 14:23 - 14:27
    तुम्ही स्वतः पोहलात तरच तुम्ही पोहायला शिकू शकाल.
  • 14:27 - 14:31
    मऊ गादीवर पोहायला शिकून मग पाण्यात उतरायचे, असे तुम्ही करु शकत नाही.
  • 14:31 - 14:33
    (हशा)
  • 14:33 - 14:37
    स्वतः पोहूनच तुम्ही पोहायला शिकता. सायकल चालवूनच तुम्ही सायकलिंग शिकता.
  • 14:37 - 14:39
    स्वतः स्वयंपाक बनवूनच तुम्ही स्वयंपाक करायला शिकता.
  • 14:39 - 14:42
    अर्थात, काही दयाळू माणसे तुमच्या आजूबाजूला असतात म्हणून,
  • 14:42 - 14:44
    जी तुम्ही बनवलेले अन्न खायला तयार असतात.
  • 14:44 - 14:47
    (हशा)
  • 14:52 - 14:56
    आणि म्हणूनच मला हे सांगायचे आहे की,
  • 14:56 - 14:58
    तुम्हाला त्या गोष्टीचे सोंग आणून ती घडवावी लागेल.
  • 14:58 - 15:05
    (हशा)
  • 15:05 - 15:08
    असेच करणे भाग आहे.
  • 15:08 - 15:14
    माझ्या आधीचे वक्ते असेच म्हणून गेले.
  • 15:14 - 15:19
    तुम्हाला तशी कृती करावी लागेल.
  • 15:19 - 15:26
    तुम्हाला सहानुभूतीपूर्वक कृती करावी लागेल.
  • 15:26 - 15:31
    सहानुभूतीसाठी कोणतेही क्रियापद नाही,
  • 15:31 - 15:35
    पण सहानुभूतीसाठी क्रियाविशेषण आहे.
  • 15:35 - 15:39
    काय गंमत आहे पहा.
  • 15:39 - 15:45
    तुम्ही सहानुभूतीपूर्वक कृती करता.
  • 15:45 - 15:49
    पण दयाळू कृती कशी करता येईल, जर तुमच्या मनात दयाच नसेल?
  • 15:49 - 15:52
    इथेच तुम्हाला सोंग आणावे लागते.
  • 15:52 - 15:56
    कोणत्याही गोष्टीचे सोंग पांघरुन तुम्हाला ती गोष्ट घडवून आणता येते. अमेरिकन संघराज्यांचा तर हाच मंत्र बनला आहे.
  • 15:56 - 16:01
    (हशा)
  • 16:01 - 16:05
    बनाव करुन तुम्ही कोणतीही गोष्ट घडवता.
  • 16:05 - 16:08
    तुम्ही सहानुभूतीपूर्वक कृती करता, जणू तुमच्या मनात अपार करुणा भरली आहे,
  • 16:08 - 16:11
    तुम्ही पराकाष्ठेचे प्रयत्न करता,
  • 16:11 - 16:13
    सर्व बाजूंनी मदत मिळविण्याचा प्रयत्न करता,
  • 16:13 - 16:17
    तुम्हाला प्रार्थना करता येत असेल तर तुम्ही प्रार्थना करता.
  • 16:17 - 16:20
    करुणेचे देणे मागून घ्या.
  • 16:20 - 16:23
    सहानुभूतीपूर्वक कृती करु द्या.
  • 16:23 - 16:25
    असेच करीत रहा.
  • 16:25 - 16:27
    त्यातून तुम्हाला करुणेचा शोध लागेल.
  • 16:27 - 16:32
    आणि हळूहळू सापेक्ष करुणेचीही जाणीव होईल,
  • 16:32 - 16:36
    आणि हळूहळू, योग्य मार्गदर्शन मिळाले तर
  • 16:36 - 16:41
    तुम्हाला शोध लागेल की करुणा हे एक प्रेरक प्रकटीकरण आहे,
  • 16:41 - 16:47
    तुमच्या स्वतःच्या वास्तवाचे, म्हणजेच एकतेचे व पूर्णत्वाचे,
  • 16:47 - 16:49
    आणि हे सर्व म्हणजेच तुम्ही स्वतः आहात.
  • 16:49 - 16:52
    या शब्दांबरोबरच, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
  • 16:52 - 16:54
    (टाळ्या)
Title:
स्वामी दयानंद सरस्वतीः करुणेचा अभ्यासपूर्ण शोध
Speaker:
Dayananda Saraswati
Description:

स्वामी दयानंद सरस्वतींनी, वैयक्तिक विकास व करुणेच्या जाणीवेचे समांतर मार्ग आपल्यासमोर उलगडले आहेत. असहाय्य अर्भकावस्थेपासून, इतरांची काळजी घेण्याइतपत निर्भय होण्यापर्यंतच्या आत्मबोधाच्या सर्व पायर्‍या ते आपल्याला दाखवतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
16:54
Mandar Shinde added a translation

Marathi subtitles

Revisions